🚨 विरार पूर्व येथे अवैध गावठी हातभट्टीवर छापा; १,७५० लिटर रसायन व गावठी दारू नष्ट
गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४, वसई-विरार यांची अवैध गावठी हातभट्टीविरोधात प्रभावी कारवाई!
📍 कारवाईचा तपशील :
दिनांक २७/११/२०२६ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे विरार पूर्व, बरफपाडा खंडी हद्दीतील जंगलातील डोंगरावर अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला.
सदर कारवाईदरम्यान बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याचे आढळून आले.
🔹 जप्त व नष्ट करण्यात आलेला मुद्देमाल :
- १,७५० लिटर नवसागर व गूळ मिश्रित वॉश (रसायन)
- २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू
- गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याची साधने
💰 एकूण मुद्देमालाची किंमत : ८१,२५० रुपये
सदर रसायन, गावठी दारू व दारू तयार करण्याची साधने नष्ट करण्यात आली.
⚖️ कायदेशीर कारवाई :
सदर प्रकरणी विरार पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ८००/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ चे कलम ६५(फ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#MBVVPOLICE #MaharashtraPolice #CrimeBranch #IllegalLiquor #PoliceAction #PublicSafety #VasaiVirar
2
349
🚨 अवैध गावठी दारू भट्ट्यांवर गुन्हे शाखेचा छापा; ₹3.90 लाखांचा मुद्देमाल जप्त व नष्ट!
गुन्हे शाखा कक्ष-2, वसई यांची उल्लेखनीय कामगिरी
नालासोपारा-वसई परिसरातील कामण व मोरेगाव येथे सुरू असलेल्या अवैध गावठी दारू भट्ट्यांवर गुन्हे शाखा कक्ष-2, वसई यांच्याकडून दि. 25/11/2026 रोजी छापा कारवाई करण्यात आली.
📍 कारवाईची ठिकाणे
▪️ मोरीगाव, भेंडीपाडा, गावदेवी मंदिराजवळ, कामण – नायगाव पोलीस ठाणे हद्द
▪️ सिद्धी चाळ, मोरेगाव, नालासोपारा पूर्व – तुळींज पोलीस ठाणे हद्द
🔹 जप्त मुद्देमाल
▪️ 200 लिटर क्षमतेचे एकूण 28 ड्रम
▪️ गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा एकूण 6,000 लिटर वॉश
▪️ गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे बॉयलर, सतेल, चाटू व इतर साहित्य
एकूण मुद्देमालाची किंमत: ₹3,90,000/-
🔹 नष्ट केलेला मुद्देमाल :-
▪️सदर कारवाईदरम्यान अवैध गावठी दारू निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या 2 भट्ट्यांचे साहित्य उध्वस्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेला वॉश व इतर संबंधित साहित्य जागीच नष्ट करण्यात आले.
कायदेशीर कारवाई :-
सदर प्रकरणी नायगाव व तुळींज पोलीस ठाण्यांत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 च्या कलम 65(फ), 65(ब) अन्वये प्रत्येकी एक असे एकूण 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
🚫 अवैध दारू निर्मिती व विक्री हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. अशा अवैध धंद्यांविषयी माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
#MBVVpolice
#crimebranchunit2
#CrimeBranch
#PoliceAction
#IllegalLiquor
🚨 बेकायदेशीर गावठी हातभट्टीवर गुन्हे शाखा कक्ष-३, विरारची कारवाई!
₹84,300 किमतीचा मुद्देमाल जप्त; हातभट्टी उद्ध्वस्त
📍 कारवाईचा तपशील :
दिनांक 25/11/2026 रोजी विरार पूर्व, बरफपाडा, चंदनसार येथील जंगल परिसरात विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा कक्ष-३, विरार यांना प्राप्त झाली.
प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने जंगलातील पाण्याच्या ओहळाजवळ सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकला.
🔹 कारवाईतील महत्त्वाचे मुद्दे :
▪️ घटनास्थळावरून एकूण ₹84,300 किमतीचा प्रोव्हीजन गुन्ह्याचा मुद्देमाल मिळून आला.
▪️ तपासणीसाठी आवश्यक मुद्देमाल व गावठी दारूचे नमुने घेण्यात आले.
▪️ उर्वरित गावठी दारू, वॉश, ॲल्युमिनियम धातूच्या टाक्या व सतेले, प्लास्टिकचे ड्रम व इतर साधनसामग्री वाहून नेणे शक्य नसल्याने पंचांसमक्ष जागीच नष्ट करण्यात आली.
▪️ घटनास्थळी कोणीही व्यक्ती आढळून आली नाही. स्थानिक बातमीदारामार्फत खातरजमा केली असता सदर हातभट्टी ही बरफपाडा, विरार पूर्व येथील रहिवाशी महिलेची असल्याची व ती स्वतः गावठी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली.
⚖️ कायदेशीर कारवाई :
सदर महिलेविरुद्ध विरार पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. 794/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 चे कलम 65(ई)(फ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अवैध दारू निर्मिती व विक्रीविरुद्ध पोलीस प्रशासनाची कारवाई सुरूच राहणार!
#MBVVPolice #MiraBhayandarVasaiVirarPolice
#CrimeBranch
#PoliceAction
#IllegalLiquor
3
449
🚨 मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक; 3 गुन्हे उघडकीस!
🚔 पेल्हार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण कक्षाची उल्लेखनीय कामगिरी
नालासोपारा पूर्व येथून चोरीस गेलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून पेल्हार पोलिसांनी एका सराईत आरोपीला अटक केली आहे.
🔹 घटनेचा तपशील :
गौराईपाडा नाका, संतोषभवन, नालासोपारा पूर्व येथील मुस्कान अपार्टमेंट परिसरातून होंडा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटारसायकल (क्रमांक MH 48 DP 0082) चोरीस गेली होती.
🔹 गुन्हा दाखल :
दिनांक 19/11/2026 रोजी पेल्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1076/2026, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
🔹 तपास व अटक :
गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देऊन कौशल्यपूर्ण तपास केला. मोटारसायकल चोरी करून नेणारा इसम तपासात निष्पन्न झाला. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पेल्हार गाव परिसरात चोरीस गेलेल्या मोटारसायकलसह आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
🔹 एकूण 3 गुन्हे उघडकीस :
आरोपीच्या चौकशीत तुळींज पोलीस ठाणे हद्दीतील मोटारसायकल चोरीचे आणखी 2 गुन्हे उघडकीस आले.
🔹 मोटारसायकल हस्तगत :
पेल्हार येथील चोरीची 1 व तुळींज येथील चोरीची 1 अशा एकूण 2 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
🔹 आरोपीची सद्यस्थिती :
आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
उघडकीस आलेले गुन्हे :
1️⃣ पेल्हार पोलीस ठाणे — गु.र.क्र. 1076/2026, भा.न्या.सं. कलम 303(2)
2️⃣ तुळींज पोलीस ठाणे — गु.र.क्र. 710/2026, भा.न्या.सं. कलम 303(2)
3️⃣ तुळींज पोलीस ठाणे — गु.र.क्र. 817/2026, भा.न्या.सं. कलम 303(2)
🚔 मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय
आपली सुरक्षा, आमची जबाबदारी!
#MBVVPolice #PelharPolice
#MVTheft #MaharashtraPolice #VasaiVirar #CrimeDetection #PoliceAction
2
8
663
🚨 अवघ्या ५ तासांत चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा!
💰 चोरीस गेलेली संपूर्ण ₹५.५० लाखांची रोकड हस्तगत; आरोपी अटक!
मिरारोड पूर्व येथील शीतलनगर परिसरात टाटा टेम्पोच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली ₹५,५०,०००/- रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना घडली होती.
या गुन्ह्याची गंभीर दखल घेत मिरारोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत वडाळा रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ५ तासांत आरोपीला अटक करून चोरीस गेलेली संपूर्ण ₹५.५० लाखांची रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
👮♂️ मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय
सतर्क पोलीस, सुरक्षित नागरिक!
#MBVVPOLICE #MiraRoadPolice #CrimeDetection #PublicSafety #MaharashtraPolice
579
🚨 चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत आरोपीला अटक; गुन्हे शाखा कक्ष-३, विरारची उल्लेखनीय कामगिरी!
📍 दिनांक ०५/११/२०२६ रोजी रात्री नालासोपारा पूर्व, सनसिटी रोड येथे पतीसोबत स्कूटरवरून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने जबरदस्तीने खेचून पळ काढला होता. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🔹 गुन्हे शाखा कक्ष-३, विरारची तपासातील कामगिरी :
▪️ घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन समांतर तपास सुरू केला.
▪️ घटनास्थळी ठोस पुरावा नसतानाही घटनास्थळापासून तलासरी, जिल्हा पालघरपर्यंत सुमारे २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
▪️ तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख निष्पन्न केली.
▪️ पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरातून आरोपीतास ताब्यात घेतले.
हस्तगत मुद्देमाल :
✅ गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल.
✅ चोरीस गेलेली सोन्याची चैन.
✅ इतर मुद्देमाल.
एकूण ₹१,४०,५३२/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणण्यात यश.
⚖️ आरोपीच्या पूर्वइतिहासाची तपासणी केली असता त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारचे एकूण ४ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय
सदैव आपल्या सुरक्षिततेसाठी!
#MBVVPolice #CrimeBranch #ChainSnatching #PoliceAction #CrimeDetection #PublicSafety #MaharashtraPolice
MIRA BHAYANDAR VASAI VIRAR POLICE retweeted
आपली वैयक्तिक माहिती गुप्त ठेवणे, सायबर घोटाळ्यापासून सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. सर्वांची दिवाळी उत्साहात, आनंदात आणि सुरक्षित जावो, याच सदिच्छा.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
#दिवाळी_२०२६
MIRA BHAYANDAR VASAI VIRAR POLICE retweeted
विभिन्नतेतही एकता जपणाऱ्या सर्व भारतीयांना राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त मनःपूर्वक अभिवादन!
#राष्ट्रीय_एकता_दिवस
🚨 गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ची मोठी कारवाई
पाशमैलाराम, पटनचेरू, जि. संगारेड्डी, तेलंगणा येथे एमडी (मेफेड्रॉन) तयार करण्यासाठी लागणाऱ्या नियंत्रित रसायनाची अवैध निर्मिती करणारा कारखाना उध्वस्त करण्यात आला.
🔹 44.699 किलो 2-BROMO-4METHYLPROPIOPHENONE
🔹 अंदाजे ₹27.06 लाखांचा मुद्देमाल जप्त
🔹 इतर रसायने व लॅब साहित्य हस्तगत
🔹 या प्रकरणात आतापर्यंत 25 आरोपींना अटक
🔹 महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश व तेलंगणा येथे कारवाई
अंमली पदार्थांच्या निर्मिती, पुरवठा व तस्करीची साखळी मोडून काढण्यासाठी पोलीसांकडून सातत्याने प्रभावी कारवाई सुरू आहे.
अंमली पदार्थमुक्त समाजासाठी कटिबद्ध! 🚔
#CrimeBranch #PoliceAction
#NDPS #DrugFreeIndia #DrugFreeSociety #AntiDrug #Mephadron #MDDrugs #MaharashtraPolice #CrimeNews
On 21 October, we pay our heartfelt tribute to the brave police personnel who made the supreme sacrifice in the service of our nation.
Their courage, dedication and selfless service will forever inspire us. We salute their sacrifice and honour their memory with deepest respect. 🙏
Salute to our martyrs. Their sacrifice will never be forgotten.
⸻
२१ ऑक्टोबर — पोलीस हुतात्मा दिन.
देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व पोलीस हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
त्यांचे शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा सदैव प्रेरणा देत राहतील. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला भावपूर्ण श्रद्धांजली!
हुतात्म्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील. 🇮🇳
#पोलीसहुतात्मादिन #हुतात्मादिन #२१ऑक्टोबर #महाराष्ट्रपोलीस #MBVVPolice #विनम्रअभिवादन
🚨 घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस; आरोपी अटक!
विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची उल्लेखनीय कामगिरी.
दि. ३०/०९/२०२६ ते ०१/१०/२०२६ दरम्यान विरार येथे घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली.
🔸 गुन्हा रजि. नं. ५९५/२०२६
🔸 भा.न्या.सं. २०२३ कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ)
🔸 चोरीस गेलेले १००% सोन्याचे दागिने हस्तगत
🔸 कौशल्यपूर्ण तपास व गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्याची उकल
गुन्हेगारांवर कायद्याचा वचक — नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस सदैव तत्पर! 👮♂️
#VirarPolice #VasaiVirarPolice #MaharashtraPolice #CrimeDetection #HouseBreaking #LawAndOrder
Celebrating the victory of truth over falsehood, justice over injustice, and good over evil.
May this Dussehra bring peace, courage, and positivity to every life. Wishing everyone a safe and joyous Dussehra! 🏹🔥
Shubh Dasara!
#ShubhDasara #HappyDussehra #MaharashtraPolice #MBVVPolice #VictoryOfGoodOverEvil
5
1,248
असत्यावर सत्याचा, अन्यायावर न्यायाचा आणि अधर्मावर धर्माचा विजय होवो!
हा दसरा सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येवो. सर्वांना सुरक्षित आणि आनंदमय दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🚩
शुभ दसरा!
#ShubhDasara #HappyDussehra #MaharashtraPolice #MBVVPolice #VictoryOfGoodOverEvil
3
1,104
🌺✨ भक्तीचा उत्सव… सुरक्षिततेची जबाबदारी! ✨🌺
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचमार्फत सर्व नागरिक, भाविक आणि नवरात्रोत्सव मंडळांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🪔
आई जगदंबेच्या भक्तीचा आणि विजयादशमीच्या उत्साहाचा हा सण आनंदात, उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करूया.
🚦 नागरिक व नवरात्रोत्सव मंडळांसाठी मी.भा.व.वि. आयुक्तालायमार्फत आवाहन
📍 दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ नंतर शक्यतो वाहतूक नियंत्रण असलेल्या मार्गांवरून प्रवास टाळा.
🔄 प्रवास आवश्यक असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करा.
🚧 बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक व वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करा.
🚗 विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर वाहने पार्क करू नका.
⚠️ वाहतूक कोंडीच्या वेळी घाई, धोकादायक ओव्हरटेकिंग किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवणे टाळा.
🤝 मिरवणुकीतील सर्व मंडळे व नागरिकांनी पोलीस आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करा.
❌ बॅरिकेड्स हटवू नका किंवा वाहतूक नियंत्रण असलेल्या मार्गावर प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नका.
🔊 ध्वनीवर्धक वापराबाबत महत्त्वाचे आवाहन
*दसरा (विजयादशमी) उत्सवाच्या दिवशी रात्री १०.०० वाजेपर्यंतच वाद्य व ध्वनीवर्धक वाजविण्यास परवानगी आहे.*
⏰ रात्री १०.०० नंतर वाद्य व ध्वनीवर्धकांचा वापर पूर्णतः बंद ठेवावा.
उत्सवाचा आनंद घेताना ध्वनीची मर्यादा पाळा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयास सहकार्य करा.
🚑 अत्यावश्यक सेवांना सूट
पोलीस, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत.
🌟 मंडळांचा उत्साह + नागरिकांची शिस्त + पोलिसांचे सहकार्य = सुरक्षित आणि सुरळीत उत्सव!
🙏 आपले सहकार्य, आपली जबाबदारी — सुरक्षित उत्सवाची हमी!
🪔 विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!
सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि विजय लाभो! 🙏
#Navratri2026 #Dussehra2026 #MiraBhayandarVasaiVirar
#MiraBhayandarPolice #SafeFestival #SafeNavratri #TrafficAdvisory
🚨 घरफोडी चोरी करणारे २ आरोपी जेरबंद; चोरीस गेलेले संपूर्ण सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत! 👮♂️
आचोळे पोलिसांची गुन्हेगारीविरोधातील प्रभावी कारवाई! 🚔
आचोळे पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद करून गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे.
📄 गु.र.नं.: 507/2026
⚖️ कलम: भा.न्या. संहिता 2023 चे कलम 305, 331(3), 331(4)
फिर्यादी कुटुंबीयांसह प्रार्थनेसाठी बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूस असलेला लोखंडी दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने चोरी करण्यात आले.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेऊन कातकरी पाडा, विरार पूर्व परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कौशल्यपूर्ण व सखोल तपासादरम्यान आरोपींकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
🔴 चोरीस गेलेली मालमत्ता
💰 एकूण किंमत – ₹2,28,000/-
➡️ सोन्या-चांदीचे विविध दागिने.
🟢 हस्तगत मालमत्ता
✅ चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे संपूर्ण दागिने
💰 एकूण किंमत – ₹2,28,000/-
अशाप्रकारे चोरीस गेलेल्या 100% मुद्देमालाची हस्तगत करून गुन्ह्याची यशस्वी उकल करण्यात आली आहे.
#MaharashtraPolice #AcholePoliceStation #CrimeDetection #HouseBreaking #HouseBurglary #PoliceAtWork #CrimeControl
🚨 आचोळे पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी! 👮♂️
दिनांक 17/10/2026 रोजी तक्रारदार महिला गाळानगर ते नालासोपारा रेल्वे स्टेशन असा रिक्षाने प्रवास करीत असताना त्यांच्या मांडीवर ठेवलेली पर्स रिक्षातून पडून गहाळ झाली.
पर्समध्ये तब्बल ₹43,93,000/- किंमतीचे सोन्याचे दागिने होते. नालासोपारा रेल्वे स्टेशन येथे पर्स गहाळ झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी तात्काळ आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रारीची तात्काळ दखल घेत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गाळानगर रिक्षा स्टँड ते नालासोपारा रेल्वे स्टेशन परिसरात कौशल्यपूर्ण तपास सुरू केला. दाट लोकवस्ती व गर्दीचे ठिकाण असूनही अवघ्या तीन तासांच्या अथक प्रयत्नांत गहाळ पर्स व त्यातील संपूर्ण सोन्याचे दागिने शोधून हस्तगत करण्यात आले.
🔹 गहाळ माल:
एकूण 20 प्रकारचे सोन्याचे दागिने, ज्यामध्ये —
* सोन्याचे हार/गंठण
* नेकलेस
* मनीमंगळसूत्र व मंगळसूत्र
* विविध सोन्याच्या चैन
* गणपती पेंडल असलेली चैन
* मोहनमाळ
* लॉकेट असलेली चैन
* 10 सोन्याच्या अंगठ्या
* कर्णफुले व वेल
* नाकातील 3 नथ
* कानातील टॉप्स
आदी दागिन्यांचा समावेश होता.
💰 गहाळ मालाची एकूण किंमत: ₹43,93,000/-
🔹 हस्तगत माल:
✅ गहाळ झालेली पर्स
✅ पर्समधील संपूर्ण सोन्याचे 20 प्रकारचे दागिने
✅ एकूण किंमत ₹43,93,000/-
हस्तगत केलेला संपूर्ण माल तक्रारदार महिलेला सुरक्षितपणे परत करण्यात आला. गहाळ झालेले मौल्यवान दागिने परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त करून आचोळे पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.
नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण यासाठी आचोळे पोलीस सदैव तत्पर! 🚔🇮🇳
#MaharashtraPolice #PoliceAtWork #RecoveredProperty #CitizenFirst #Nalasopara #AcholePoliceStation #LawAndOrder
✨ वर्दीच्या जबाबदारीसोबत कर्तृत्वाची नवी ओळख! ✨
नवरंग २०२६ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातील या कर्तृत्ववान महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीला मानाचा मुजरा—
👮♀️ P.I. Meghna Burande — गुन्हे उकल आणि तपासातील उल्लेखनीय कामगिरी.
⚖️ A.P.I. Rekha Patil — प्रभावी तपास व न्यायालयीन पाठपुराव्यात उल्लेखनीय योगदान.
⚖️ P.S.I. Ranjana Shirgare — संवेदनशील गुन्ह्याच्या तपासातून आरोपीला न्यायालयीन शिक्षेपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका.
⚖️ P.S.I. Sneha Solanke — अल्पवयीन पीडितेवरील अत्याचाराच्या प्रकरणात प्रभावी तपास व न्यायालयीन पाठपुरावा.
🏊♀️🚴♀️🏃♀️ H.C. Reshma Kute — Ironman Vietnamसारख्या कठीण स्पर्धेत यशस्वी सहभाग.
🏃♀️🏅 P.C. Rohini Patil — राष्ट्रीय क्रॉस-कंट्रीमध्ये महाराष्ट्रासाठी तृतीय क्रमांक आणि विविध धावण्याच्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कमाई.
🏔️ P.C. Pallavi Narwade — गडकिल्ले व Tiger Hill सर करून गिर्यारोहणाच्या नव्या शिखरांकडे वाटचाल.
ही केवळ सात नावांची यादी नाही…
ही आहे कर्तव्यनिष्ठा, धाडस, जिद्द, क्रीडाप्रेम आणि सामाजिक न्यायासाठीच्या समर्पणाची प्रेरणादायी कहाणी! ❤️🔥
🚔 महाराष्ट्र पोलीस दलातील महिला शक्तीला मनःपूर्वक सलाम!
🌟 नवरंग २०२६ — कर्तृत्वाचा उत्सव! 🌟
#Navrang2026 #MaharashtraPolice #WomenInUniform #WomenPower #PoliceWomen #Inspiration
1
5
845
🚨 दुर्गामूर्ती विसर्जनासाठी वाहतूक नियोजन 🚨
🙏 दसरा व नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दि. 20 ऑक्टोबर 2026 रोजी दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी व अपघात टाळता यावेत, यासाठी मिरा-भाईंदर शहरात तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
🕒 अंमलबजावणी
📅 20 ऑक्टोबर 2026
⏰ दुपारी 3.00 वा. पासून विसर्जन समाप्त होईपर्यंत
🟠 भाईंदर पूर्व | विसर्जन मार्ग
गोल्डन नेस्ट → नवघर फाटक → घोडदेव नाका → बी.पी. रोड → भाईंदर पूर्व रेल्वे स्टेशन → जैसल पार्क चौपाटी
लहान वाहनांसाठी:
फाटक रोड चौक → केबिन रोड → भाईंदर पूर्व रेल्वे स्टेशन → जैसल पार्क चौपाटी
🔵 जैसल पार्क | परतीचा मार्ग
जैसल पार्क चौपाटी → कोळीवाडा → आर.एन.पी. पार्क → एस.व्ही. रोड → नवघर रोड → नवघर नाका → विमल डेअरी → इंद्रलोक नाका → गोल्डन नेस्ट
🟢 भाईंदर पश्चिम | विसर्जन मार्ग
नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान → भाईंदर पोलीस ठाणे → स्टेशन रोड → भाईंदर पश्चिम रेल्वे स्टेशन → खाडी (जेटी)
⚠️ महत्त्वाचे
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर आवश्यकतेनुसार एकदिशा वाहतूक व प्रवेशबंदी लागू राहील. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा.
🚑 अत्यावश्यक सेवा वाहनांना सूट
पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत.
🙏 नागरिकांनी सहकार्य करावे आणि सुरक्षित व सुरळीत दुर्गामूर्ती विसर्जनासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय
सुरक्षितता प्रथम | वाहतूक शिस्त सर्वांची जबाबदारी
#MBVVPolice #TrafficUpdate #Navratri2026 #Dussehra2026 #DurgaVisarjan #TrafficPolice #SafeVisarjan
4
1,024
🚨 दुर्गामूर्ती विसर्जनासाठी वाहतूक नियोजन 🚨
🙏 दसरा व नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दि. 20 ऑक्टोबर 2026 रोजी दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी व अपघात टाळता यावेत, यासाठी मिरा-भाईंदर शहरात तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
🕒 अंमलबजावणी
📅 20 ऑक्टोबर 2026
⏰ दुपारी 3.00 वा. पासून विसर्जन समाप्त होईपर्यंत
🟠 भाईंदर पूर्व | विसर्जन मार्ग
गोल्डन नेस्ट → नवघर फाटक → घोडदेव नाका → बी.पी. रोड → भाईंदर पूर्व रेल्वे स्टेशन → जैसल पार्क चौपाटी
लहान वाहनांसाठी:
फाटक रोड चौक → केबिन रोड → भाईंदर पूर्व रेल्वे स्टेशन → जैसल पार्क चौपाटी
🔵 जैसल पार्क | परतीचा मार्ग
जैसल पार्क चौपाटी → कोळीवाडा → आर.एन.पी. पार्क → एस.व्ही. रोड → नवघर रोड → नवघर नाका → विमल डेअरी → इंद्रलोक नाका → गोल्डन नेस्ट
🟢 भाईंदर पश्चिम | विसर्जन मार्ग
नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान → भाईंदर पोलीस ठाणे → स्टेशन रोड → भाईंदर पश्चिम रेल्वे स्टेशन → खाडी (जेटी)
⚠️ महत्त्वाचे
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर आवश्यकतेनुसार एकदिशा वाहतूक व प्रवेशबंदी लागू राहील. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा.
🚑 अत्यावश्यक सेवा वाहनांना सूट
पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत.
🙏 नागरिकांनी सहकार्य करावे आणि सुरक्षित व सुरळीत दुर्गामूर्ती विसर्जनासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय
सुरक्षितता प्रथम | वाहतूक शिस्त सर्वांची जबाबदारी
#MBVVPolice #TrafficUpdate #Navratri2026 #Dussehra2026 #DurgaVisarjan #TrafficPolice #SafeVisarjan
🚨 चोरीचे वाहन वापरून घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक!
विरार पूर्व येथे पार्क केलेली सुमारे ₹९०,००० किंमतीची मारुती सुझुकी ईको कार चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष-३, विरार यांनी कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीस अटक केली.
🔹 चोरीस गेलेले वाहन जप्त
🔹 आरोपीकडून ३ गुन्हे उघडकीस
🔹 आरोपीविरुद्ध यापूर्वी २ गुन्हे दाखल
गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे केलेल्या कारवाईत आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी विरार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
👮♂️ गुन्हे शाखा कक्ष-३, विरार यांची उल्लेखनीय कामगिरी!
#Virar #VasaiVirar #CrimeBranch #Police #VehicleTheft #HouseBreaking #MaharashtraPolice








