
• खासदार - ठाणे लोकसभा मतदारसंघ • महाराष्ट्र प्रदेश समन्वयक, प्रवक्ता शिवसेना • शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख • माजी महापौर, ठाणे #ShivSena
Thane
Joined May 2014
- Tweets11.5K
- Following103
- Followers12.8K
- Likes994
पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती ।
रत्नकीळ फांकती प्रभा ॥
अगणित लावण्य तेज पुंजाळले ।
न वर्णवे तेथील शोभा ॥
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#nareshmhaske #KartikiEkadashi #Pandurang
3
103
Warm birthday greetings to Union Cabinet Minister of Parliamentary Affairs Hon’ble Shri Kiren Rijiju Ji.
On this special occasion, I extend my heartfelt wishes to you. Your dedication towards public service, commitment to strengthening India's parliamentary democracy and contribution towards the development of the nation are truly commendable.
May you continue to serve the nation with the same enthusiasm, vision and determination, bringing new opportunities and progress to every section of society.
@KirenRijiju
#nareshmhaske #kiranrijiju #happybirthday
5
120
शिवसेना नेत्या व श्री सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्त श्रीम. मीनाताई कांबळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
त्यांना उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य लाभो, ही सदिच्छा.
#nareshmhaske #MeenaKamble #HappyBirthday #ShivSena #SiddhivinayakTemple #BirthdayWishes
3
114
📍संसद भवन, नवी दिल्ली
परदेशी देणगी (नियमन) सुधारणा विधेयक, २०२६ म्हणजेच Foreign Contribution (Regulation) Amendment Bill, 2026 संदर्भात लोकसभा सचिवालयाच्या संयुक्त संसदीय समितीची सातवी बैठक संसद भवनात समितीचे अध्यक्ष खासदार संजय जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथील पार पडत आहे.
परदेशातून प्राप्त होणाऱ्या देणग्यांचे नियमन, निधीचा पारदर्शक विनियोग, आर्थिक व्यवहारांमधील उत्तरदायित्व आणि स्वयंसेवी व सामाजिक संस्थांना कामकाजादरम्यान येणाऱ्या अडचणी अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येत आहे.
देशाच्या राष्ट्रीय हिताचं संरक्षण करताना परदेशी निधीचा गैरवापर रोखणं, निधीच्या वापरात पारदर्शकता राखणं आणि सामाजिक व धार्मिक संस्थांच्या वैध कार्यात अनावश्यक अडथळे निर्माण होणार नाहीत, याचीही काळजी घेणं आवश्यक आहे. या अनुषंगाने विविध मुद्दे आणि सूचना समितीसमोर मांडणार आहे.
या बैठकीत चार सत्रांमध्ये एकूण २५ संस्था व त्यांच्या प्रतिनिधींचं म्हणणे ऐकून घेण्यात येत आहे. यामध्ये सनदी लेखापाल, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, धार्मिक संस्था, कायदेतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनल, BAPS, माता अमृतानंदमयी मठ, द कन्व्हर्जन्स फाउंडेशन, सेंटर फॉर इक्विटी स्टडीज, विविध चर्च संघटना तसेच सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकिलांकडूनही या विधेयकासंदर्भात मतं आणि सूचना मांडल्या जातील.
माझ्या मते, कोणताही कायदा अधिक परिणामकारक करण्यासाठी त्याचा प्रत्यक्ष परिणाम होणाऱ्या सर्व घटकांचं म्हणणं ऐकून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकशाही व्यवस्थेत सर्वसमावेशक विचारविनिमयातूनच योग्य आणि दूरगामी निर्णय घेता येतात.
देशहित, पारदर्शकता आणि सामाजिक व धार्मिक संस्थांच्या वैध कार्याचं संरक्षण या तिन्ही बाबींचा योग्य समतोल साधला जावा, तसेच एफसीआरए सुधारणा विधेयक अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक व्हावं, यासाठी या बैठकीत माझी भूमिका आणि मतं मी मांडणार आहे.
#nareshmhaske #FCRAAmendmentBill2026 #JointParliamentaryCommittee #IndianParliament #FinancialTransparency #NationalInterest
2
5
260
युवा नेते, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येत असलेल्या 'खासदार क्रीडा संग्राम' या भव्य क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासंदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मी उपस्थित पत्रकारांना संबोधित केलं.
#nareshmhaske #KhasdarKridaSangram #ShrikantShinde #Thane #Kalyan #Bhiwandi
भारतातच नव्हे, तर परदेशातील तब्बल २३ देशांमध्ये आपल्या उत्पादनांचा ठसा उमटवणाऱ्या ठाण्यातील प्रसिद्ध ‘पितांबरी’ ब्रँडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभू देसाई आणि वाईचे चेअरमन श्री. परीक्षित रवींद्र प्रभू देसाई यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांनी बाजारपेठेत लवकरच दाखल होणाऱ्या आपल्या नवीन उत्पादनांची माहिती दिली. पितांबरी हा केवळ एक ब्रँड नसून, गुणवत्ता, विश्वास आणि ग्राहकांच्या मनात निर्माण केलेली विश्वासार्हता यांचं उत्तम उदाहरण आहे. घराघरांत पोहोचलेली पितांबरीची नैसर्गिक आणि दर्जेदार उत्पादने आज भारतासह जगभरातील २३ देशांमध्ये वापरली जात आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
एक ठाणेकर उद्योजक म्हणून रवींद्र प्रभू देसाई यांनी आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर पितांबरी ब्रँडला जागतिक स्तरावर पोहोचवलं आहे. ठाण्याचं नाव उद्योगविश्वात सातासमुद्रापार नेणाऱ्या अशा उद्योजकांचं नेहमीच कौतुक वाटतं.
विशेष म्हणजे उद्योग-व्यवसाय सांभाळतानाच अनेक लहान-मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांना मदतीचा हात देण्याचं कामही ते सातत्याने करत असतात. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचंही यावेळी कौतुक केलं.
स्वतःच्या कर्तृत्वाने, मेहनतीने आणि सचोटीने ठाण्याची ओळख जागतिक स्तरावर निर्माण करणाऱ्या रवींद्र प्रभू देसाई यांचा सार्थ अभिमान वाटतो. यासाठी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि नवीन उत्पादनांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#nareshmhaske #Pitambari #RavindraPrabhuDesai #Thane #IndianEntrepreneurship #LocalToGlobal
6
176
ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यापासून ते सभागृह नेता आणि स्थायी समिती सभापती म्हणून काम करत असताना, गेल्या वीस वर्षांत दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्याचा प्रयत्न केला.
दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत मिळावी, त्यांना कोणावरही अवलंबून राहावं लागू नये, या उद्देशाने विविध अनुदान योजना सुरू केल्या. विशेष म्हणजे, या योजनांचं अनुदान थेट दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले. उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनीदेखील नगरसेवक म्हणून काम करत असताना या योजनांसंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. आजही त्या योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचत आहे.
अशा लोकाभिमुख योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ठाणे महानगरपालिका देशातील अग्रगण्य महानगरपालिकांमध्ये गणली जात होती. आजही या योजना सुरू असून, दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.
याच अनुषंगाने यावर्षीच्या योजनांसाठी अर्ज मागविण्याबाबतची सूचना करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दिव्यांग बांधवांना माझं आवाहन आहे की, आपण आपल्या जवळच्या प्रभाग समिती कार्यालयात जाऊन आपल्यासाठी लागू असलेल्या योजनेची माहिती घ्यावी, संबंधित योजनेचा अर्ज प्राप्त करून तो आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर महानगरपालिकेत जमा करावा.
#nareshmhaske #ThaneMunicipalCorporation #DivyangWelfare #DisabilityInclusion #FinancialAssistance #Thane
5
163
रीत क्रिएशन आणि रीत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२६' ची अंतिम फेरी गडकरी रंगायतन येथे उत्साहात पार पडली.
रेवा रवींद्र समेळ आणि रवींद्र समेळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठ वर्षांपासून या स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या स्पर्धेतील विजेत्या एकांकिका संघांना आणि कलाकारांना माझ्या हस्ते, महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि सुप्रसिद्ध अभिनेते जावेद जाफरी यांच्या उपस्थितीत पारितोषिकं प्रदान करण्यात आली.
रीत क्रिएशन आणि रीत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. विशेषतः नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं, या उद्देशाने गेली आठ वर्षे सातत्याने या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल रेवा रवींद्र समेळ आणि संपूर्ण रीत क्रिएशनच्या टीमचं मी मनापासून कौतुक केलं.
नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धांचं आयोजन अत्यंत मोलाचं आहे. कारण अशाच व्यासपीठांमधून उद्याचे प्रतिभावान कलाकार घडत असतात. त्यामुळे तरुण कलाकारांना संधी देणाऱ्या अशा उपक्रमांना समाजाने आणि सांस्कृतिक क्षेत्राने पाठबळ देणं गरजेचं आहे.
या स्पर्धेत महर्षी दयानंद महाविद्यालयाने प्रथम, तर मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सने द्वितीय पारितोषिक पटकावलं. दोन्ही विजेत्या संघांचे तसेच सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचं मनःपूर्वक अभिनंदन केलं आणि त्यांच्या पुढील कलात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माझ्यासह माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांच्यासह अनेक मान्यवर कलाकार, परीक्षक आणि रसिक उपस्थित होते.
#nareshmhaske #ReetEkankikaSpardha #MarathiTheatre #OneActPlay #GadkariRangayatan #Thane
युवा नेते, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येत असलेल्या 'खासदार क्रीडा संग्राम' या भव्य क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासंदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मी उपस्थित पत्रकारांना संबोधित केलं.
यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले विविध खेळ, स्पर्धांचं नियोजन, पारितोषिक वितरण समारंभ तसेच उद्घाटन सोहळ्याबाबत सविस्तर माहिती दिली.
या क्रीडा संग्रामाला खेळाडूंकडून मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ७५ हजारांहून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. तब्बल ३३ विविध खेळांचा समावेश असलेल्या या स्पर्धांचं आयोजन ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये करण्यात आलं आहे.
स्थानिक खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळावं, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं आणि क्रीडा संस्कृतीला अधिक चालना मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या पत्रकार परिषदेला विविध क्रीडा संघटना आणि असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
#nareshmhaske #KhasdarKridaSangram #ShrikantShinde #Thane #Kalyan #Bhiwandi
1
9
366
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं.
स्व. बाळासाहेब ठाकरे हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर ते एक उत्तम व्यंगचित्रकार, कलाकार आणि प्रभावी वक्ते होते. त्यांच्या कलात्मक व्यक्तिमत्त्वाची आणि विचारांची आठवण कायम जपली जावी, तसेच नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं, या उद्देशाने माझ्या पुढाकाराने आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कलादालनाची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून अनेक कलाकारांना आपली कला प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
यावेळी लोकसभेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केलं.
यावेळी माझ्यासह आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर, राजेश मोरे, सिद्धार्थ कोळेकर, शिवसेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, आमदार बालाजी किणीकर, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार हेमंत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
#nareshmhaske #BalasahebThackeray #ArtGallery #Punyatithi #ShivSena #Thane
1
2
196
उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समवेत रायलादेवी येथे आयोजित करण्यात आलेल्या छठपूजा महोत्सवाला भेट देऊन तिथे छठपूजेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गंगा आरतीमध्ये सहभागी झालो.
#nareshmhaske #ChhathPuja #GangaAarti #Rayladevi #EknathShinde #Thane
3
145


















































