माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) header
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) profile picture

Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.

Mumbai, India
Joined February 2013
Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)
📚Mumbai Book Festival – 2026: Promoting the Culture of Reading! 🔷The Mumbai Book Festival – 2026 is being organised to promote the culture of reading and provide an enriching experience of knowledge, ideas and the world of literature through books. 🗓️The festival will be held from 24th to 29th November 2026 at the University of Mumbai, Kalina Campus. The exhibition will remain open to the public daily from 11:00 a.m. to 10:00 p.m. 🔷In addition to the book exhibition, the festival will feature literary discussion sessions, special activities for children, cultural programmes and theme-based exhibitions, offering visitors an opportunity to explore and experience diverse aspects of literature and knowledge. #MumbaiBookFestival2026 #MumbaiBookFestival #NationalBookTrust #Mumbai #BookFestival #NBTIndia #ReadIndia #BookLovers #Literature #MumbaiReads @nbt_india
2
20
25
7,474
📚वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारा 'मुंबई पुस्तक महोत्सव- २०२६' दिनांक २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबई विद्यापीठ, कलिना संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुला राहणार आहे. #MumbaiBookFestival2026 #MumbaiBookFestival #NationalBookTrust #Mumbai #BookFestival #NBTIndia @nbt_india
5
24
30
8,195
🏥 मुंबई डिजीहेल्थ कनेक्ट अभियानाद्वारे आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) ला गती. 🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रीमती मनसादेवी तुलसीदास अगरवाल रुग्णालय आणि सेठ वाडीलाल छभुत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा (राजावाडी) रुग्णालय येथे मुंबई डिजीहेल्थ कनेक्ट (MDC) अभियानांतर्गत ABDM च्या अंमलबजावणीला गती देण्यात येत आहे. 🔷या अभियानांतर्गत ABHA कार्ड निर्मिती, हेल्थकेअर प्रोफेशनल्स रजिस्ट्री (HPR) आणि हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री (HFR) मधील नोंदणीवर विशेष भर देण्यात येत आहे. 🔷आज रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आया, सुरक्षारक्षक आणि स्वच्छता कर्मचारी यांची हेल्थकेअर प्रोफेशनल्स रजिस्ट्री (HPR) अंतर्गत नोंदणी करण्यात आली. 🔷या उपक्रमामुळे आरोग्यसेवा व्यावसायिकांची डिजिटल ओळख निर्माण होण्यास, आरोग्य सुविधांची डिजिटल नोंदणी सुनिश्चित होण्यास तसेच ABHA द्वारे नागरिकांच्या आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात उपलब्ध व सुलभपणे शेअर करण्यास मदत होणार आहे. यामुळे आरोग्यसेवांची सुलभता, सातत्य आणि कार्यक्षमता वाढण्यास हातभार लागेल. मुंबईची डिजिटल आरोग्य परिसंस्था अधिक सक्षम व एकात्मिक करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. #MumbaiDigiHealthConnect #ABDM #ABHA #HPR #HFR #DigitalHealth #MyBMCUpdates #BMC #PublicHealth @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
5
20
28
12,154
💧मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा… #mybmcupdates
33
96
5
222
30,866
📚वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारा 'मुंबई पुस्तक महोत्सव- २०२६' दिनांक २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबई विद्यापीठ, कलिना संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुला राहणार आहे. #MumbaiBookFestival @nbt_india
1
26
28
2,655
📚Mumbai Book Festival – 2026: Promoting the Culture of Reading! 🔷The Mumbai Book Festival – 2026 is being organised to promote the culture of reading and provide an enriching experience of knowledge, ideas and the world of literature through books. 🗓️The festival will be held from 24th to 29th November 2026 at the University of Mumbai, Kalina Campus. The exhibition will remain open to the public daily from 11:00 a.m. to 10:00 p.m. 🔷In addition to the book exhibition, the festival will feature literary discussion sessions, special activities for children, cultural programmes and theme-based exhibitions, offering visitors an opportunity to explore and experience diverse aspects of literature and knowledge. #MumbaiBookFestival @nbt_india
3
31
1
47
11,022
📚वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारा मुंबई पुस्तक महोत्सव- २०२६! 🔷पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञान, विचार आणि साहित्यविश्वाचा समृद्ध अनुभव देणारा मुंबई पुस्तक महोत्सव- २०२६ आयोजित करण्यात येत आहे. 🗓️ दिनांक २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबई विद्यापीठ, कलिना संकुल येथे सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. 🔷या महोत्सवात पुस्तक प्रदर्शनासह साहित्यिक चर्चा सत्र, बालकांसाठी विशेष उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विषय विशेष प्रदर्शनांचा आनंद घेता येणार आहे. #MumbaiBookFestival @nbt_india
6
24
31
9,774
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुसज्ज नागरी सेवा-सुविधा पुरवाव्यात पूर्वतयारी आढावा बैठकीत मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे निर्देश 🔷हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून शिवसैनिक तसेच नागरिक हे दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानस्थित स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येतात. त्यादृष्टीने स्मृतिस्थळ व परिसरात सुसज्जता राखून आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले आहेत. 🔷मंगळवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. या अनुषंगाने स्मृतिदिन पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील स्थायी समिती दालनात, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी आढावा बैठक पार पडली. त्यावेळी महापौर श्रीमती तावडे बोलत होत्या. 🔷या बैठकीस उपमहापौर श्री. संजय घाडी, सभागृह नेते श्री. गणेश खणकर, सुधार समितीच्या अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, जलअभियंता श्री. मंगेश शेवाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. योगेश देसाई, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, प्रमुख सुरक्षा अधिकारी श्री. अजित तावडे, उपप्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) श्री. विजय गोतारणे, उप उद्यान अधीक्षक श्री. दशरथ घुले, उप प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. के. आर. यादव, कीटकनाशक अधिकारी श्री. रितेश मारापे तसेच सहायक पोलीस आयुक्त (मध्य पश्चिम वाहतूक) श्री. दिलीप पाटील, सहायक पोलीस आयुक्त (समन्वय - मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय) श्री. मोहन खंदारे यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. 🔷प्रारंभी, सहायक आयुक्त श्री. योगेश देसाई यांनी पूर्वतयारीची माहिती दिली. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ आहे. दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतिस्थळ व परिसरात पुरवावयाच्या नागरी सेवा-सुविधा तसेच स्मृतिस्थळावर करावयाची तयारी ही कामे सुरू करण्यात आली आहेत, असे नमूद करून त्याचा तपशील श्री. देसाई यांनी सादर केला. 🔷उपमहापौर श्री. संजय घाडी म्हणाले की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार आणि कार्यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे. यंदा बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष देखील आहे. त्यानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रम सुरू आहेत. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता, स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील स्मृतिस्थळावर महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक येतील. त्यामुळे महानगरपालिकेने पोलीस आणि इतर शासकीय विभागांच्या समन्वयाने पुरेशी व्यवस्था करावी. दर्शन रांगेतील नागरिकांसाठी छत, पिण्याचे पाणी, मैदानात धूळ प्रतिबंधक उपाययोजना, आसन व्यवस्था, सातत्याने परिसरात स्वच्छता, वाहतूक पोलिसांशी समन्वय या सर्व बाबींवर योग्य कार्यवाही करावी. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची विविध छायाचित्रे परिसरात प्रदर्शित करावीत, इत्यादी सूचना श्री. घाडी यांनी दिल्या. 🔷अध्यक्षस्थानावरून संबोधित करताना महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईसह महाराष्ट्रासाठी अत्यंत मोठे योगदान आहे. त्यांच्या विचारांना मानणारा वर्ग महाराष्ट्रासह देशभरात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोठ्या संख्येने येणारे शिवसैनिक आणि नागरिक लक्षात घेता, महानगरपालिकेच्या वतीने पुरविल्या जाणाऱ्या नागरी सेवा-सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये. पिण्याचे पाणी, दर्शन रांग, स्वच्छता, वाहतूक समन्वय, फिरती प्रसाधनगृहे यासह महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्ज ठेवाव्यात. त्याचप्रमाणे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निगडित इतर स्थळे, पुतळे, चौक इत्यादी ठिकाणी देखील स्मृतिदिनास साजेशी व्यवस्था करावी. आवश्यकता भासल्यास प्रशासनाने वाढीव निधी उपलब्ध करून घ्यावा आणि सुसज्ज व्यवस्था करावी, असे निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले. या पूर्वतयारीची प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन पाहणी केली जाईल, असेही महापौरांनी नमूद केले. @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
6
24
1
94
14,348
🚨महत्त्वाची सूचना🚨 🔷अग्निसुरक्षेसंदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी, अग्निशमन प्रतिबंधात्मक प्रमाणपत्रांचे वितरण तसेच त्यासंदर्भातील सेवा शुल्क आकारणी याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत जनहितार्थ सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. समाजमाध्यमांवर या संदर्भात प्रसारित होत असलेली माहिती दिशाभूल करणारी व खोटी आहे. #mybmcupdates #fakenews
1
33
48
17,152
माझी Mumbai, आपली BMC retweeted
अनधिकृत बॅनर, पोस्टर्स आणि फ्लेक्समुक्त मुंबई मोहिमेला महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडून बळ शीव येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलावरील सर्वपक्षीय आणि व्यावसायिक अनधिकृत बॅनर्स महापौरांनी स्वतः थांबून हटवले संपूर्ण मुंबईत अनधिकृत फलक हटविण्याची व्यापक कारवाई करा, अन्यथा संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापौरांचा सक्त इशारा 🔷मुंबईला अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सच्या विळख्यातून कायमस्वरूपी मुक्त करण्याचा निर्धार केलेल्या मुंबईच्या प्रथम नागरिक, महापौर श्रीमती रितू राजेश तावडे या मोहिमेसाठी अविरत प्रयत्न करत आहेत. केवळ आदेश न देता प्रत्यक्ष मैदानात उतरून कामकाज करण्याच्या आपल्या कार्यपद्धतीचा प्रत्यय महापौरांनी आज (गुरुवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२६) सायंकाळी पुन्हा एकदा दिला. 🔷एका दौऱ्यावरून येत असताना, शीव (सायन) येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलावर लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स तसेच जाहिरात फलक महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या निदर्शनास आले. या बॅनर्स आणि फलकांमुळे सिग्नल्स आणि दिशादर्शक फलक झाकले जात होते. परिणामी, वाहनचालकांना अडथळा होत होता. अनधिकृत फलकांचा विळखा पाहून महापौरांनी वाहन थांबवले आणि तत्काळ संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना पाचारण केले. 🔷महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्वतः उड्डाणपुलावर तसेच आजुबाजूच्या परिसरात उभे राहून कारवाईचा बडगा उगारला. 🔷कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा व्यावसायिकाचा मुलाहिजा न ठेवता, पुलाच्या कठड्यांवर व परिसरात लावलेले सर्वपक्षीय बॅनर्स तसेच व्यावसायिक फलक काढण्याचे आदेश महापौरांनी दिले. 🔷विशेष म्हणजे, जोपर्यंत पुलावरील आणि परिसरातील सर्व अनधिकृत फलक पूर्णपणे हटवले जात नाहीत, तोपर्यंत महापौर स्वतः त्या ठिकाणी थांबून राहिल्या आणि परिसर बॅनरमुक्त करून घेतला. या कारवाईदरम्यान अनुज्ञापन, परिरक्षण व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 🔷नव्याने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि उड्डाणपुलांचे विद्रूपीकरण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा महापौरांनी यावेळी दिला. 🔷दरम्यान, केवळ एका भागापुरती कारवाई मर्यादित न ठेवता, प्रशासनाने संपूर्ण मुंबईतील अनधिकृत बॅनर्स आणि जाहिरात फलक काढण्याची मोहीम अधिक व्यापक आणि तीव्र करावी, अशा स्पष्ट सूचना महापौर श्रीमती रितू तावडे यांनी यावेळी दिल्या. या कामात हलगर्जीपणा किंवा दिरंगाई आढळल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असा इशाराही महापौरांनी दिला आहे. 🔷महापौरांकडून सुरू असलेल्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रत्यक्ष कृतीमुळे महानगरपालिका प्रशासनाच्या कारवाईला मोठी गती मिळाली आहे. राजकीय भेदाभेद विसरून आणि हितसंबंधांना थारा न देता सर्व घटकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर श्रीमती रितू तावडे यांनी पुन्हा एकदा केले आहे. @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
52
12
7
85
9,030
🔷दिवाळी सणानिमित्त फटाके फोडताना काळजी घेण्याचे महानगरपालिकेचे विनम्र आवाहन #mybmcupdates @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha @mybmcSWM @MumbaiPolice
29
37
3
67
10,756
🔷शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत रॉकेट व तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांचा वापर करण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात येत आहे. 🔷नागरिकांनी नियमांचे आणि निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. #Mybmcupdates @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha @mybmcSWM @MumbaiPolice
134
147
28
294
49,950
🔷दिवाळी साजरी करताना, फटाके फोडताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे - मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांचे विनम्र आवाहन #Diwali
138
61
16
178
34,136
🔷गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा ३ (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) खालून बांधण्यात येणाऱ्या दुहेरी भूमिगत बोगद्याच्या कामात महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात यश आले आहे. या दुहेरी बोगद्यांपैकी पहिल्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या ‘तुळशी’ या बोगदा खनन यंत्राद्वारे (Tunnel Boring Machine –TBM) आतापर्यंत २७० मीटर लांबीचे खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामासाठी सज्ज असलेल्या ‘विहार’ या दुसऱ्या बोगदा खनन यंत्राद्वारे शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ पासून प्रत्यक्ष खोदकामास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील दोन्ही बोगद्यांच्या निर्मितीच्या कामाला आता गती प्राप्त झाली आहे. 🔷गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा १२.२० किलोमीटर लांबीचा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन (TBM) तंत्रज्ञानाद्वारे ५.३४ किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. 🔷यापैकी पहिल्या बोगदा खणन सयंत्राचे नामकरण 'तुळशी' आणि दुसऱ्या बोगदा खणन सयंत्राचे नामकरण ‘विहार’ असे करण्यात आले आहे. संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी ‘तुळशी’ कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यानंतर आतापर्यंत गोरेगावकडून मुलुंडच्या दिशेने २७० मीटरपेक्षा अधिक लांबीचे खोदकाम पूर्ण केले आहे. 🔷दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘विहार’ या बोगदा खनन संयंत्राची स्थळ स्वीकृत चाचणी (Site Acceptance Test) नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर , शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ पासून दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामास अधिकृतपणे प्रारंभ करण्यात आला आहे. 🔷‘विहार’ हे दुसरे बोगदा खनन संयंत्र ‘तुळशी’ प्रमाणेच अत्याधुनिक सिंगल शिल्ड अर्थ प्रेशर बॅलन्स (Single Shield Earth Pressure Balance – EPB) तंत्रज्ञानावर आधारित आहे. या संयंत्राच्या कटर हेडचा व्यास १४.४९ मीटर असून संपूर्ण संयंत्राची लांबी ८३ मीटर आहे. यामध्ये २२ मीटर लांबीचा शिल्ड भाग आणि तीन मजली रचनेचा ६१ मीटर लांबीचा बॅकअप गॅन्ट्री विभाग समाविष्ट आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे खोदकाम करताना बोगद्याच्या अग्रभागातील मातीचा दाब नियंत्रित ठेवता येतो. परिणामी, जमिनीची स्थिरता राखून सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने बोगद्याचे खोदकाम करणे शक्य होते. 🔷संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
5
45
4
233
31,918
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!🪔 #Diwali
10
39
78
11,741
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. 🔷आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क 🔷1916 (मदतसेवा क्रमांक) आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, मुख्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई [email protected] #mybmcupdates @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha @mybmcSWM @MumbaiPolice
50
48
8
68
19,565
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आश्रय योजना कक्ष, टप्पा-२ अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थानांच्या चाव्यांचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. चावी वितरणाचा समारंभ राजवाडकर स्ट्रीट, पंचशील नगर, कुलाबा येथे आज पार पडला. 🔷महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री तथा पालकमंत्री (मुंबई शहर जिल्हा) श्री. एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष तथा स्थानिक आमदार अॅड. राहुल नार्वेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमहापौर श्री. संजय घाडी यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 🔷सभागृह नेता श्री. गणेश खणकर, शिवसेना गटनेता श्री. अमेय घोले, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, नगरसेवक अॅड. मकरंद नार्वेकर, स्थानिक नगरसेविका श्रीमती हर्षिता नार्वेकर, नगसेविका श्रीमती गौरवी शिवलकर-नार्वेकर, नामनिर्देशित नगरसेवक श्री. कमलाकर दळवी, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, श्रीमती शायना एन. सी आदी उपस्थित होते. 🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने आश्रय योजना कक्ष, टप्पा-२ अंतर्गत पंचशील नगर, राजवाडकर स्ट्रीट, कुलाबा येथे ४ हजार १६६.९० चौरस मीटर क्षेत्रफळावर दोन मजली इमारती बांधण्यात आल्या आहेत. तळमजला अधिक तीन मजल्याच्या या दोन्ही इमारतींमध्ये एकूण १४० सदनिका आहेत. 🔷स्वच्छता कर्मचारी पूर्वी १५० चौरस फुटांच्या घरांत राहायचे. त्याऐवजी आता त्यांच्यासाठी ३०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली सर्व सोयीसुविधांनी युक्त नवीन सेवानिवासस्थाने उपलब्ध झाली आहेत. यामध्ये स्वतंत्र स्नानगृह आणि शौचालयाची व्यवस्था आहे. या सदनिकांच्या बांधकामासाठी प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
4
24
42
14,514