
Official Twitter account of DIO, Solapur. Directorate General of Information & Public Relations, Govt. of Maharashtra. #DGIPRNEWS #मी_जबाबदार
SOLAPUR, MAHARASHTRA
Joined July 2016
- Tweets14K
- Following336
- Followers13.7K
- Likes2.9K
#कार्तिकीवारी नियोजनात जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व जिल्हा प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक!
यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष करत उपमुख्यमंत्र्यांनी पावली केली. सर्व वारकरी व भाविकांना शुभेच्छा!
#पंढरपूर
2
217
राज्यातील प्रदूषण कमी करण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वपूर्ण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पर्यावरण संवर्धनात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. प्रत्येक वारी प्रदूषणमुक्त, निर्मल व स्वच्छ करण्याचा संकल्प करूया- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
#पर्यावरणसंवर्धन
2
181
राज्यात मे २०२७ पर्यंत ३४ लाख ८३ हजार ९४० भूजल पुनर्भरण संरचनांची निर्मिती पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जलसंचय : जनभागीदारी अभियानांतर्गत जलयुक्त शिवार ३.० ची १८ हजार गावांत अंमलबजावणी करण्यात येणार. भूजल पातळी वाढवा, हा अभियानाचा मुख्य उद्देश!
#सोलापूर
कार्तिकी यात्रा कालावधीत एकाही वारकऱ्याची गैरसोय होऊ देऊ नका! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जिल्हा प्रशासन व सर्व विभागांनी समन्वयाने काम करून #कार्तिकीवारी यशस्वी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
#पंढरपूर
सर्वसामान्य वारकरी हाच खरा व्हीआयपी!
पायी चालत पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सुलभ व वेळेत दर्शन मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले.
वारकऱ्यांच्या सुविधांना सर्वोच्च प्राधान्य!
#कार्तिकीवारी #पंढरपूर
आंबे दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांची तनपुरे मठ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
मृत कामगारांच्या कुटुंबातील मुलाला नोकरी व मुलीच्या शिक्षणाची जबाबदारीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली.
#सोलापूर
#कार्तिकीवारी च्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपुरातील सुविधांची पाहणी!
भक्तीसागर (६५ एकर), चंद्रभागा वाळवंट आणि पत्राशेड परिसरातील स्वच्छता, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा व दर्शन व्यवस्थेचा घेतला आढावा.
वारकऱ्यांशी संवाद साधत सुविधांबाबत जाणून घेतली माहिती.
चंद्रभागा नदीपात्रात बुडणाऱ्या बाबलू खिलारे (वय १५, रा. मोहोळ) याची चार रोबोटिक रेस्क्यू क्राफ्टपैकी एका क्राफ्टच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली.
#जिल्हाआपत्तीव्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे भाविकाचे प्राण वाचले. कार्तिकी वारीत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बचाव यंत्रणा सज्ज!
कार्तिकी वारीत रोबोटिक रेस्क्यू क्राफ्टच्या मदतीने १५ वर्षीय वारकऱ्याला जीवदान!
पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात प्रशिक्षण सुरू असतानाच पाण्यात बुडणाऱ्या बाबलू खिलारे (वय १५, रा. मोहोळ) या वारकऱ्याची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने सुटका केली.
#DisasterManagement
220
जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 64 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजारांचे दुष्काळ अनुदान जमा...
#सोलापूर
आषाढी वारीच्या नियोजनाप्रमाणेच कार्तिकी वारी यशस्वी करा!
कार्तिकी यात्रेत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या. सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
#कार्तिकीवारी #Pandharpur #Solapur
कार्तिकी यात्रेच्या तयारीचा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून आढावा!
पंढरपुरातील वाखरी पालखी तळ, सरगम चौक, चंद्रभागा वाळवंट व भक्तीसागर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, पाणीपुरवठा, भाविकांच्या सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेच्या तयारीचा आढावा घेतला.
#कार्तिकीवारी #पंढरपर
जिल्ह्यातील २२९ गावे व ९५७ वाड्यांना २२९ टँकरद्वारे पाणीपुरवठा
▪️ ५० विहिरी व ३२ बोअर असे एकूण ८२ जलस्रोत अधिग्रहित
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात नियमित पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना सुरू.
#Solapur #WaterSupply #दुष्काळ
358
अक्कलकोटमध्ये पेढा व मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई!
▪️ ८५० किलो पेढा व मिठाईचा साठा जप्त; किंमत २.५० लाख रुपये ▪️ चार आस्थापनांना व्यवसाय बंदचे आदेश ▪️ मुख्य पुरवठादाराचा अन्न परवाना व एका आस्थापनेची नोंदणी निलंबित
#FoodSafety #Akkalkot
आंबे येथील विहीर खोदकामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळून चार कामगार अडकल्याच्या दुर्घटनास्थळी बचावकार्यासाठी एनडीआरएफचे पथक दाखल झाले. बचावकार्याला गती देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक समन्वय व कार्यवाही सुरू आहे.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन उपस्थित होते.
#सोलापूर
शासना कडून मिळालेल्या 5 हजार रू. मदतीबद्दल
शेतकरी श्री फिरोज फरीद शेख, मौजे तांदूळवाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर
यांचे मनोगत...
#सोलापूर
📍 आंबे, ता. पंढरपूर
आंबे येथील विहीर खोदकामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळून चार कामगार अडकल्याच्या दुर्घटनास्थळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला.
बचावकार्याला गती देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.
#सोलापूर
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, #सोलापूर यांच्या वतीने जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह साजरा करण्यात आला.
आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध!
#भगवानबिरसामुंडा




































