मिलिंद retweeted
सूर्याला काहीही फरक पडत नाही: ‘मकरसंक्रांती’ नावाची मानवी गोष्ट
सर्वप्रथम एक कटू सत्य मान्य करूया—सूर्याला मकरसंक्रांती माहित नाही. त्याला उत्तरायण, दक्षिणायन, पुण्यकाल, महापुण्यकाल, दान, उपवास, कीर्तन, भाषण—कशाचाच काहीही फरक पडत नाही.
तो फक्त हायड्रोजन जाळतो. तेही अब्जावधी वर्षांपासून. मानव अस्तित्वात येण्याच्या फार आधीपासून.
उरलेले सर्व अर्थ—आपण घडवलेले आहेत.
उत्तरायण शुभ असेल तर दक्षिणायन अशुभ का नाही?
जर सूर्याचा उत्तर दिशेने प्रवास ‘शुभ’ असेल, तर त्याच तर्काने त्याचा दक्षिणेकडील प्रवास ‘अशुभ’ असलाच पाहिजे.
पण तसे कुठे घडते?
दक्षिणायनात:
* पीक येते
* मूल जन्माला येते
* लग्नं होतात
* उद्योग चालतात
* संस्कृती नष्ट होत नाहीत
मग काय बिघडते?
काहीच नाही.
मग प्रश्न असा आहे की शुभ-अशुभ हे निसर्गाचे गुणधर्म आहेत की मानवी सोयीचे लेबल?
रात्र वाईट नाही. हिवाळा शाप नाही. अंधार म्हणजे अधःपतन नाही.
हे सर्व निसर्गावर लादलेले मानवी भावनिक अर्थ आहेत.
दिशा निसर्गाला कळत नाहीत
उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम—या दिशा माणसाने शोधलेल्या नाहीत, माणसाने ठरवल्या आहेत. निसर्गाला दिशा नसतात. त्याला फक्त बलं (forces) कळतात.
सूर्य “मकर राशीत प्रवेश करतो” ही भाषा वैज्ञानिक नाही; ती सांस्कृतिक आहे. आकाशात कुठेही मकर राशीची पाटी लावलेली नाही. सूर्य कुठल्याही सीमारेषा ओलांडत नाही.
मानवाने आकाशाचे तुकडे केले आणि मग त्या तुकड्यांना अर्थ चिकटवले.
सिंधू संस्कृतीत उत्तरायण नव्हते—का?
हा प्रश्न फार अस्वस्थ करणारा आहे, म्हणून तो विचारला जात नाही.
सिंधू संस्कृती—इतकी प्रगत, इतकी नियोजित, इतकी शिस्तबद्ध— पण तिथे:
* उत्तरायण नाही
* दक्षिणायन नाही
* सूर्याच्या दिशांना आध्यात्मिक श्रेणी नाही
का?
कारण त्या लोकांना निसर्गाशी जगायचं होतं, त्याच्यावर अर्थ लादायचा नव्हता. त्यांची संस्कृती प्रॅक्टिकल होती, पोएटिक नव्हती.
म्हणजेच— सूर्याच्या हालचालींना आध्यात्मिक अर्थ देणे हे अपरिहार्य नाही; ते सांस्कृतिक आयात आहे.
युक्रेनच्या थंडीतून जन्मलेली अध्यात्मिक गोष्ट
मग हे उत्तरायणाचं ‘शुभत्व’ कुठून आलं?
त्याचं उत्तर वेदात नाही, तर भूगोलात आहे.
स्टेपी प्रदेशात भटके गुराखी गायी पालनावर आपला उदरनिर्वाह करायचे. हा प्रदेश म्हणजे आजचा युक्रेन, रशिया, मध्य आशिया. तिथे हिवाळा म्हणजे:
* मृत्यू
* हालचाल थांबलेली
* अन्नटंचाई
* जीवनाचा प्रश्न
तिथे सूर्य उत्तर दिशेने येणं म्हणजे जगण्याची परवानगी.
म्हणून ते लोक सूर्याच्या उत्तरायणाला आनंदाने साजरं करत. ते धर्म नव्हतं—ते सुटकेचं समाधान होतं.
जेव्हा हे स्टेपी प्रदेशातील भटके गुराखी लोक ३९०० वर्षापूर्वी अन्नाच्या शोधात भारतात आले, तेव्हा त्यांनी आपला भौगोलिक अनुभव धर्मात रूपांतरित केला.
भारताला त्याची गरज नव्हती. पण कथा टिकून राहिली.
भूगोल जेव्हा देव बनतो
भारतात उत्तरायण नसतं तरी आयुष्य चाललं असतं. पण एकदा एखादी गोष्ट ‘पवित्र’ ठरली की, ती प्रश्न विचारायला बंदी घालते.
आणि इथेच समस्या सुरू होते.
आपण भूगोलाला देव बनवतो, हवामानाला तत्त्वज्ञान बनवतो, आणि मग त्यालाच शाश्वत सत्य समजतो.
शेतीला देव लागत नाही
शेतीला पाऊस लागतो. माती लागते. कष्ट लागतात.
देव, पुण्यकाल, संक्रांती—हे सर्व नंतर जोडलेलं आहे.
प्रथम गरज होती. मग निरीक्षण. मग सवय. मग विधी. मग धर्म.
हा क्रम उलटा सांगितला जातो—हीच फसवणूक आहे.
सूर्याला आपण महत्त्वाचे नाही
हे स्वीकारणं अवघड आहे, पण आवश्यक आहे:
* सूर्य आपल्यासाठी उगवत नाही
* ऋतू आपल्यासाठी बदलत नाहीत
* विश्व आपल्याला अर्थ देत नाही
अर्थ आपणच तयार करतो.
आणि मग तो अर्थ विश्वावर लादतो.
निष्कर्ष: मोठं होणं म्हणजे प्रामाणिक होणं
मकरसंक्रांती साजरी करू नये असं नाही. पण तिला वैश्विक सत्य म्हणू नये.
ती एक सांस्कृतिक आठवण आहे—युक्रेनच्या थंडीची, मानवी भीतीची, आणि सुटकेच्या आनंदाची.
सूर्य काही देत नाही. तो फक्त असतो.
अर्थ हवा असेल, तर तो आपण निर्माण करूया—खोट्या आकाशीय मंजुरीशिवाय.
कारण शेवटी एकच सत्य उरतं:
विश्व आपल्याला काहीच देणं लागत नाही.पण माणूस स्वतःला प्रामाणिकपणा देऊ शकतो.
आणि तोच खरा ‘उत्तरायण’ आहे.
-महेश झगडे
मिलिंद retweeted
काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?'
सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, 'कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?'
मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेंव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय?
अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये... सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही !
माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकारणांच्यात तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका.
। राज ठाकरे
मिलिंद retweeted
ठिकाण - लालबागचा राजा
♦️व्हिडीओ 1- सामान्य चेंगरणारे, गुदमरणारे, मुंबई स्पिरिट वाले भक्त
♦️व्हिडीओ 2 - तुरुंगवास भोगून आलेले पण अति श्रीमंत भाविक
-स्वतःची इतकी अवहेलना, इतका मानसिक आणि शारीरिक त्रास, चेंगरणं कश्यासाठी? -देवाच्या दरबारात सुद्धा इतक झिडकारल जात असेल तरी ही मरमर कश्याला?
-भक्तीच्या नावाखाली स्वतःची किती विटंबना करून घ्यायची याला मर्यादा आहे की नाही?
-चेंगरायला सकाळची मुंबई लोकल मधली गर्दी काय पुरेशी नाही का?
#LalbaugchaRaja #LalBagh #GaneshFestival2024
मिलिंद retweeted
नाशिकच्या काठे गल्ली भागातील लिफ्ट
नसलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर संदेश आणि अंजली नारायणे हे दांपत्य राहतं. दोघंही अंध.
अंजली गुजराथी घरातली, तर संदेश मराठी. अहमदाबादमध्ये फिजिओथेरपीचं शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली.
पुढं 2001 मध्ये तिचं रूपांतर विवाहात झालं.
मिलिंद retweeted
मैं फिर से कहूँगी…
आपके पसंदीदा खिलाड़ी को आपकी बेरोज़गारी और पेपरलीक से कोई फ़र्क़ नहीं पड़ता…
खेल में मत उलझिये…आपको खेल में उलझाकर बड़ा खेला किया जा रहा है…
…शाह के लड़के को इसीलिए BCCI में बैठाकर थोक भाव में क्रिकेट परोसा जा रहा है. …और शाहपुत्र के रहते इन ‘विश्वविजेताओं’ की औक़ात भी नहीं है कि आपके फेवर में कुछ बोल दें.
आपने अपने जीवन के सैकड़ों-हज़ारों घंटे उनके लिए बर्बाद कर दिये…की-बोर्ड पर उँगलियाँ घिस डालीं…
…लेकिन उनकी तरफ़ से आपके लिए दो ट्वीट्स तक नहीं हुए! क्यों करेंगे वो..?
उनका एक-एक ट्वीट लाखों-करोड़ों का होता है…और आप! आप जाकर अपना बाज़ार भाव पता कीजिए.
#VictoryParade #IndianCricketTeam
मिलिंद retweeted
आखिर यूं ही नहीं कोई जननायक बन जाता है 🔥
राहुल गांधी शपथ लेने के लिए गए हुए थे, उन्होंने अपनी शपथ लेने के बाद स्पीकर साहब से हाथ मिलाया उसके बाद वह लौटने लगे वैसे ही उनके दिमाग में कुछ आया
और वह वापस लौटे और स्पीकर के पास खड़े व्यक्ति से भी हाथ मिलाया और एक व्यक्ति थोड़े दूर खड़े थे तो उनसे दूर से ही अभिवादन कर लिया।
यह है सम्मान, समता, बराबरी। राहुल गांधी जी ने आज सबका दिल जीत लिया है।
मिलिंद retweeted
Replying to @JaikyYadav16
ये तस्वीरें देश के 140 करोड़ हिंदुस्तानियों
की उम्मीदों को नई ऊर्जा देने वाली है,
ये देश संविधान से है, संविधान से ही चलेगा🇮🇳
मिलिंद retweeted
'सिरम इन्स्टिट्यूट'नं तयार केलेली कोविडवरची लस घेतली तुम्ही? त्यानंतर मिळणारं माननीय पंतप्रधानांचा फोटो असलेलं सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे?
त्या 'सिरम इन्स्टिट्यूट'नं १८ ऑगस्ट २०२२ ला एका राजकीय पक्षाला निवडणुकीसाठी करोडो रूपये दिल्याचा पुरावा इलेक्टोरल बाॅन्डमधनं समोर आलाय !
बाकी त्यानंतर २३ ऑगस्टला आदर पुनावालाला कुठला राजकीय नेता भेटला... एकमेकांचं कौतुक कसं झालं... हे मी नाही सांगत बसणार. तुम्ही कमेन्ट बाॅक्समध्ये लिहालंच.
बाय द वे... एक सांगायचं राहीलंच. आपल्या सगळ्या देशानं लसी टोचुन घेतल्यानंतर, डिसेंबर २०२३ मध्ये या आदर पुनावालानं लंडन इथं भव्य, आलीशान बंगला विकत घेतला... ज्याची किंमत आहे, १४४६ करोड रूपये !
आणि हो, पुनावाला हा घोड्यांचा मोठा व्यापारीही आहे. नाही नाही, गुवाहाटी किंवा सुरतच्या घोड्यांचा नाही, खर्या घोड्यांचा. असो.
हो हो माहिती आहे, "कितीही आपटा येणार तर..."
पण आमच्यासाठी 'राष्ट्र' प्रथम... विषय कट !
- किरण माने.
मिलिंद retweeted
अडानी जी इंडोनेशिया से कोयला खरीदते हैं और जब वो कोयला हिंदुस्तान पहुंचता है तो उसका दाम बढ़ जाता है।
इस तरह से अडानी जी ने करीब 12 हजार करोड़ रुपए सीधे हिंदुस्तान के नागरिकों की जेब से निकाला है।
अडानी ने कोयले के दाम को बढ़ाया, जिससे बिजली महंगी हो गई।
हिंदुस्तान के नागरिकों को यह समझना है कि आपका बिजली का बिल जो बढ़ रहा है, उससे 12 हजार करोड़ रुपए सीधे अडानी की जेब में गए हैं।
रोचक बात है कि यह स्टोरी आती है, लेकिन हिंदुस्तान की मीडिया एक सवाल नहीं पूछती।
: @RahulGandhi जी
मिलिंद retweeted
सरकारच्या पहिल्या सात महिन्यात जाहिरातीवरील खर्च ₹42.44 कोटी म्हणजेच दिवसाला ₹20 लाख खर्च
शासन आपल्या दारी योजनेचा निव्वळ जाहिरातीचा ₹52.90 कोटी खर्च
मागच्या वर्षात राबविलेल्या योजनांची यंदा जाहिरात करण्यासाठी ₹26 कोटी खर्च
सत्ताधारी आमदारांच्या सुरक्षेसाठी एका वर्षाला ₹150 कोटी खर्च
योजना राबविल्या आहेत,
कामं केली आहेत,
तर इतकी जाहिरात करण्याची खरंच गरज आहे का ?
केलेली कामं जनतेपर्यंत पोहचण्यासाठी जाहिराती गरजेच्या आहेत का ?
हा वायफळ खर्च टाळून,
सर्वसामान्यांसाठी कुठली योजना राबविता आली असती का ?
तुमचं काय मत आहे ?
मिलिंद retweeted
सावरकरांची समुद्रात मारलेली उडी घराघरात पोहोचली पण अजूनही इंग्रजांना चुकवणार्या खालील 4 जणांच्या उड्या लोकांना माहीत नाही
1) क्रांतिसिंह नाना पाटील यांनी अटकेत असताना रेल्वेतून कृष्णेच्या पात्रात मारलेली उडी.
मिलिंद retweeted
राहुल गांधींकडुन शिकायच्या गोष्टी
१. जेव्हा काहीच सकारात्मक घडत नसते तेव्हा शांत रहावे
२. जेव्हा काहीच सकारात्मक घडत नसते, तेंव्हा तुमच्यावर ऐरे गैरे नत्थू खैरे बांडे पण चिखलफेक करतात, संयमाने दुर्लक्ष करावे
३. चिखलफेकी मागचा उद्देशच असतो कि तुम्ही भावनिक होऊन तुमच्या हातून चुका घडाव्यात, ते टाळावे
४. चिखलफेक, बदनामी त्यांचीच होते ज्यांच्यात ताकद असते, वलय असते, आणि जे स्पर्धेचे घोडे असतात, ज्यांच्यात काहीच दम नाही त्यांची कधीच बदनामी होत नाही, त्यांच्यावर कुणी चिखलफेक करत नाही
५. कुणीही कुणाला संपवू शकत नाही, स्वतःशिवाय
६. आपल्याकडून काही चुकत आहे का त्याचे आत्मपरीक्षण करावे
७. फक्त चांगल्याच नाही तर आपल्या लोकांच्या संगतीत रहावे
८. वाईट काळात आपले लोक ओळखू येतात त्याची काळजी नसावी
९. वाईट काळ कधी छोटा असतो कधी मोठा असू शकतो, त्यामध्ये स्वत:ला मजबूत ठेवून आपल्याकडल्या हत्यारांना गुपचूपपणे धार देत रहावी
१०. म्हणजे आपले ध्येय काय आहे त्याची उजळणी करावी आणि आणि बाकी अनावश्यक गोष्टीवरून लक्ष काढून आपल्या ध्येय गाठण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक असलेल्या स्किल्सच्या विकासावर भर द्यावा
११. चांगला काळ एका रात्रीत येत नाही, काळ्या ढगाला असणारी सोनेरी किनार छोटीच असते किंवा अंधाऱ्या बोगद्यातून पलीकडला दिसणारा प्रकाश छोटाच असतो, पण एकदा दिसला कि आपले दिवस आले समजावे
१२. लोखंड लाल झालेय तेंव्हा हथोडी मारायला विसरू नये, पहिला दणका सगळं काही देणार नाही , पण अनेक दणके मात्र तुम्हाला पाहिजे तसा आकार घडवून आणतील
१३. दणके मारत राहिले पाहिजे
१४. वाईट काळात विरोधकांच्या नादि लागून तुमच्यावर चिखलफेक करणारी टोळकी उद्या तुमच्या बाजूने येऊ शकतात, टोळक्यांचा दोष नसतो, त्यांच्यात आणि मेंढरात काही फरक नसतो, त्यांना माफ करून टाकावे
१५. वाईट काळात आपल्या बरोबर राहणारी आणि निघून जाणारी लोकं लक्षात ठेवावी
१६. वाईट काळ जाताना खरी परीक्षा असते, चेहऱ्यावर माज दिसू देऊ नये, आत्मविश्वास आपोआप दिसतो
१७. नसत्या सल्लागारां पासून दूर रहावे, आम्ही तुमचेच म्हणून लोक परत येऊ लागतील, त्यांना घ्यावे पण कुठे ठेवावे हे वोळखावे
१८. पाचवा मुद्दा लक्षात ठेवावा, शत्रूला संपवणे आपले ध्येय नाही, कुणीच कुणाला संपवू शकत नाही
१९.और जीत आपकीहि होगी.आज नही तो कल होगी, लेकीन आपकीही होगी
मिलिंद retweeted
केरळ स्टोरी च्या निर्मात्यांनी ३०००० सोडा, फक्त दहा केसेस आणून दाखवाव्यात आणि दहा लाख रुपये घेऊन जावेत असं आव्हान सोशल मीडियावर होतं. केवळ निर्माते नव्हेत, तर इतर कुणीही यावं आणि दहा लाख रुपये घेऊन जावेत असं ते आव्हान होतं. कुणीही स्वीकारलं नाही. उलट निर्मात्यांनी टीझरमधून
मिलिंद retweeted
देशाची ही अवस्था झालीय की एका ऑलिंपिक मेडलिस्ट ला ट्विटरवर टॅग करून आपल्या राज्यात होणा-या जाळपोळ साठी मदत मागावी लागतेय . तर राजधानीत खेळाडू धरणे देत आहेत पण शेठ फक्त कर्नाटक मध्ये रडत फिरतोय . देशात रोल मॉडेल असणा-यांची ही दशा आहे.
#ब्रजभूषण_शरण_सिंह #Modi #ManipurOnFire
My state Manipur is burning, kindly help @narendramodi @PMOIndia @AmitShah @rajnathsingh @republic @ndtv @IndiaToday
मिलिंद retweeted
परवा लोकसत्तात रिफायनरी विषयी एक बाष्कळ अन् वाह्यात अग्रलेख वाचण्यात आला. कशाचाही कशाला संबंध जोडून रिफायनरी कशी योग्य आहे यासंबंधी अकलेचे तारे तोडल्याचे दिसले. अग्रलेखात सुरवातीला असं म्हटलं की, स्थानिकांना फार ज्ञान नसत; स्थानिकांची मते विचारात घेणे म्हणजे थोतांड वगैरे. त्यासाठी त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या महापौर बंगल्याचे उदाहरण दिले. एरव्ही गिरीश कुबेर हे लोकशाही वाचवा म्हणून गळे काढत असतात.नक्राश्रू ढाळत असतात.लोकशाहीच्या व्याख्येत शेवटच्या एका माणसाचेही विरोधी मत सुद्धा विचारात घेतलं पाहिजे तरच तिला लोकशाही म्हणतात. स्थानिकांना अक्कल नाही असं म्हणणे हे कशाचे द्योतक असावे? महापौर बंगल्याच्या जागेची तुलना रिफायनरी सोबत करता? रिफायनरी मुळे हजारो एकर जमिन जाणार,शेकडो परिवार बेघर होणार. त्यांच्या पुनर्वसनाचे काय ? अनेक ठिकाणच्या प्रकल्पबाधितांची तिसरी पिढी न्याय्य हक्कांसाठी लढतेय.तुम्ही प्रकल्पग्रस्त जनतेचे जीवन कधी अनुभवले आहे का? 'मुळात विकासाच्या प्रश्नांची उठाठेव हा काही मूठभर लोकांचा मक्ता नसून, या निर्णयाचे खऱ्या अर्थाने समाजकरण व्हावे. राजकीय नेते अन् बाबूंनी विकास म्हणजे काय हे दिल्ली, मुंबई सारख्या ठिकाणी बसून ठरवू नये. या निर्णयप्रकियेत लोकांचा सहभाग हवा. निसर्गरक्षणासाठी अन लोकशाहीसाठी ते खऱ्या अर्थाने उचित आहे. ग्रामसभांना विश्वासात घेऊन विकास कसा करायचा ते ठरवा' असे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ समितीचा अहवाल सांगतो. दुसरे, त्यांनी कोकण रेल्वेची तुलना रिफायनरी सोबत केली. रेल्वेसाठी साधारण आडवी 25 फूट जागा लागत असावी, त्याची तुलना रिफायनरीच्या हजारो एकर जागेशी करणे म्हणजे कुबेरांच्या बुद्धीची दिवाळखोरी समजावी का? असा प्रश्न पडतो.
पुढे त्यांनी सिंगापूरच्या एगझोन-मोबील या रिफायनरीचा दाखला दिला, सिंगापूरमधील प्रदूषणात 80% वाटा हा उद्योगाचा असल्याचे रिपोर्ट सांगतात, तसेच सिंगापूरला सर्वात जास्त मासे आपला भारत देश पुरवतो. दुसऱ्या देशात हे झाले म्हणून ते आपल्या इथेही करा म्हणणे म्हणजे..? थोडक्यात इस्रायल सारखी प्रगत शेती राजस्थान सारख्या वाळवंटात करण्याचे हे दिवास्वप्नच.
त्या देशाचे भौगोलिक स्थान, वातावरण, तेथील व्यावसायिक गरज, पर्यावरण हे आपल्या पेक्षा वेगळे असेल ना ? त्याचा काही विचार केला आहे का ? पुढे लिहताना त्यांनी शासनाने कोकणात काय केले ? असं तसं विचारलं आहे. मा. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना कोकण विकासासाठी खास 10 हजार कोटींचे पॅकेज दिले, त्यातून नवनवीन योजना पुढे येऊन कोकणच्या विकासास हातभार लागला, चिपी एअरपोर्ट, कोकण रेल्वे, हायवे यातून दळणवळणाची साधने सोपी झाली. कोकणी जनता प्रकल्पांना विरोध करते असे भयावह चित्र निर्माण केले जातेय. त्यांचा विरोध हा अणुऊर्जा,रिफायनरी अशा प्रकल्पांना असतो ? मॅनुफॅक्चरिंगचे उद्योग आणायला कोणी विरोध केला आहे ? कोकण किनारपट्टी या रेड कॅटेगिरी प्रकल्पांनी उद्धवस्त होण्याची शक्यता आहे.
जमिनीच्या बाबतीत तर अग्रलेखातून असं लिहलं आहे की तुमचा एकरी मोबदला सांगा, अहो कुबेर साहेब, राज्यभरातून मुंबईत गरजू विद्यार्थी,रुग्ण येत असतात त्यांना मुंबईत राहायला जागा मिळत नाही, त्यांच्यासाठी लोकसत्ताचे एक्सप्रेस टॉवर खुले कराल का ? घरासमोरून फ्लायओव्हर होतोय म्हणून देश सोडून जायची धमकी देणाऱ्या शहरी समाजव्यवस्थेचे प्रतीक तुम्ही आहात. त्यामुळे तुम्ही जमिनीच्या मोबदल्याची भाषा करावी ? जामनगरचे आंबे उत्तम आहेत म्हणता, तुम्ही तरी आजवर खाल्लेत का ? रिफायनरी सारखे प्रकल्प आणल्यावर नियमाने झाडे लावायची असतात, त्यामुळे ते आंबे लावलेत. त्यात केसरचे प्रमाण आहे. हापूस कोकण सोडून कुठेही होत नाही. जामनगर अन सिधुदुर्ग येथील येथील हवेची गुणवत्ता ऑनलाईन तपासा, जामनगर येथील हवा जास्त प्रदूषित आहे.
हे झाले लोकसत्ताच्या अग्रलेखा बाबतीत...
कोकण म्हणायला आता 2 जिल्ह्याचा उरला आहे, तिथेही असे प्रकल्प आणत असाल तर कुबेरांसारख्या पुण्या-मुंबईत राहणाऱ्या लोकांनी आपला विकेंड सुखात घालवायला कुठे जावे ? कोकण माथ्यावरून अरबी समुद्रातून पावसासाठी आवश्यक खारे वारे पुढे जातात. तिथे वायूप्रदूषण होत असेल तर जे पावसाचे ढग बनतात त्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कोणी नाकारु शकत नाही. आधीच अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. सगळीकडे आपण सिमेंटची अमर्याद जंगले उभा करत चाललो आहोत. कुठेतरी निसर्गाचा समतोल ठेवावा. कोकणात पर्यटनाच्या दृष्टीने हजारो गोष्टी करता येतील. मागच्या सरकार काळात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ताज सारख्या हॉटेल सोबत टायप करुन कोकणातील काही बीचवर त्यांचे हॉटेल्स उभारण्याचे प्रयत्न केलेले. कोकणाला समृध्द करणारं असं काही हवं. पर्यावरणाला घातक काही नको; तर पोषक काही तरी हवं.
मिलिंद retweeted
त्याला पप्पू म्हणून कमी लेखले, त्याचा आलू से सोनाचा अर्धवट व्हिडिओ फिरवून मानहानी करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्या टी शर्ट, बुटांच्या किमतीवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. एवढं करूनही हा गडी आवरत नाही लक्षात येताच आज त्याला थेट सभागृहातूनच बाहेर काढण्याचा निर्णय घेतला गेला.
मिलिंद retweeted
"मेरा नाम आज़ाद है, पिता का नाम स्वतंत्र और पता जेल है"
महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा आज स्मृतिदिन.आजच्याच दिवशी इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून आल्फ्रेड पार्क मध्ये आझाद यांनी रिव्हॉल्व्हरची गोळी स्वतःवर झाडून शहीद झाले.आझाद यांची इंग्रजांना माहिती नेहरूंनी दिली
मिलिंद retweeted
२०१२ मध्ये भाजपने प्रचार सुरू केला होता की सोनिया गांधी २०० अब्ज रु. च्या मालकीण असून जगातल्या ४ थ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत....
सोबत अनेक काँग्रेस व इतर लोकांची पण आकडेवारी व्हाट्सऍपला अजुन फिरतात.
मिलिंद retweeted
अदानी हा बकासुर सगळा देश गिळंकृत करू पाहतोय.आता त्याची नजर महावितरणवर पडली आहे.
भाजप प्रत्येक राज्यात सरकारं विकत घेत आहे, ते यांच्या पैशातूनच.
महावितरण चे सर्व कर्मचारी ह्या खरेदीला विरोध म्हणून संपावर गेले आहेत
आपण #I_SUPPORT_MAHAVITARAN हा ट्रेंड चालवून पाठिंबा देऊ.





























