Pinned Tweet
धन्यवाद राजसाहेब.. आज एक महाराष्ट्र सैनिक नेता झाला..हे फ़क्त तुम्हीच करु शकता.. हा महाराष्ट्र सैनिक तसाच जमिनीवर राहून महाराष्ट्रासाठी काम करेल. 🚩@mnsadhikrut
संवेदनशील राजसाहेब.. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात दुष्काळाच संकट असल्यामुळे दरवर्षी शिवतीर्थावर होणारा मनसे दिवाळी महोत्सव रद्द केला.. शेतकऱ्यांची, ग्रामीण महाराष्ट्राची तळमळ मनात असल्यामुळे आणि भविष्यातील संकटाची दखल घेवून मनसेकडून मदत करण्याचं त्यांनी ठरवलं आहे..
पूर्णेकर कुटुंबियांना न्याय देण्यासाठी टाळत असाल. पण त्यांच्या न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांवर ज्या पोलिसांनी अमानुषपणे लैंगिक अत्याचार केलेत त्यांच्यावरही कायद्यान्वये कारवाई होत नाही? पालकमंत्र्यांनी लोकशाही बचावतंत्र समजून ठाण्यात पालकत्व निभवावं. ही झुंडशाही की लोकशाही?
जिथे लोकशाहीच यंत्र बिघडलंय तिथे लोकतंत्र बचाव काढतायेत, ते पण जे सत्तेत आहे ते.. ठाणेकर हे सर्व जाणतात..
केंद्र सरकारच्या भारत राजपत्र ०३ ऑक्टोबर २०१८ मध्ये देशातील २२०० गावांची यादी आहे ज्यात कुठलाही प्रकल्प लादता येणार नाही. ह्यात कर्जत जंगलातील पाळी, ढाक आणि साईडोंगर ही तीन गाव आहेत. मग कुठल्या आधारावर इथे प्रकल्प लादत आहात? भारत राजपत्रही आता डावलल जात? ही लोकशाही का हुकूमशाही?
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित ‘लोकमत आयकॉन पालघर’ सन्मान सोहळ्यात मनसेचे केळवे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री. संदीप भगवान किणी यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. अभिमान मनसे..
अन्याय जंगलात असो वा ठाण्यात आम्ही आवाज उठवणार.. सरकार जनतेचा आवाज चिरडत असेल तर आम्ही सरकारला आवाज काय असतो ते समजवून सांगू.. म्हणून कर्जतमध्ये जनतेच्या मागे आणि ठाण्यात सत्याच्या मागे आम्ही उभे राहणार.. सरकार मायबाप असत गुंड प्रवृत्ती किंवा राक्षसी महत्वाकांक्षेच नसत..
महाराष्ट्रात सुजाण आहे. बॅलोट पेपरवर पदवीधरांनी ३ पैकी ३ जागा विरोधकांना दिल्या आणि २ जागा सत्ताधाऱ्याना दिल्या. म्हणजे तरुणाईचा आणि सुशिक्षितांचा कौल स्पष्ट आहे. शिक्षकांनी सत्ताधाऱ्यांना निवडलं कारण शिक्षण संस्थेतील राजकारण.. निवडणूक आयोगाच्या जोरावर निवडलेले काय बोलणार??
मुख्यमंत्र्यांनी एक व्हिडिओ रिलीज़ केला आहे त्यात लिहल आहे की डिलीट होण्याआधी बघून घ्या. तस ते कॉपी करण्यातच एक्सपर्ट आहेत. याने ते केल त्याने ते केल, त्यापेक्षा तुमच चुकतय त्याच काय? अहो जर हा फायद्याचा प्रकल्प असता! तर महाराष्ट्रात आला असता का? तो मालकाच्या राज्यात गेला असता..
महाराष्ट्र पोलिस जागतिक दर्जाच्या कीर्तीचे आहेत. मग ठाण्यात पुर्णेकर कुटुंबीयांनी पुरावे दिले त्यानंतरही आरोपीला अटक का नाही? इतकी ९ वेळा चौकशी केली ती चहापानी करून सोडण्यासाठी का कॅमेऱ्यात दाखवण्यासाठी? कोणत्या पालकाचा दबाव आहे? ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद लक्षात असू द्या.
भीमाशंकर जंगलात ३४ हजार नाही तर ९० हजार झाडे तोडणार.. आणि अजून असे २३ प्रकल्प यांच्या नियोजनात आहेत त्यात लाखो झाडे तोडणार आहेत.. आरे आणि नाशिकमध्ये ह्या कतलखोर सरकारांनी झाडांची कत्तल केली आहे. झाडखाऊ सरकार लाचारीमुळे महाराष्ट्राची नैसर्गिक संपती नष्ट करत आहे. उघड डोळे बघा नीट.
सर्वांनी मोठ्या संख्येने या.. महाराष्ट्राचा श्वास गुदामरतोय, त्याला स्वाभिमानाचा ऑक्सीजन देवून जगवूया..
आम्ही थोड्या वेळापूर्वी जी जंगलतोड केली जात आहे ती प्रत्यक्षात बघितली. सुमारे ४० वर्ष जुनी १५०० च्या वर झाड तोडण्यात आली आहेत. गुजरात धार्जिण्या कंपनीसाठी महाराष्ट्रातील वनसंपत्ती संपवण म्हणजे सरकारसाठी नालायक शब्द पण कमी आहे.. स्वतःची काही बुद्धी आहे, का सर्वच लाचारीत गमावलं???
महाराष्ट्र दुष्काळाच्या भीतीने होरपळतोय आणि हे नालायक सरकार गुजराती टोरेंट कंपनीसाठी भीमाशंकर जवळच्या जंगलात शेकडो झाड तोडण्याची परवानगी देतय..?? नक्की महाराष्ट्राचे लचके महाराष्ट्रातील आमदार आणि खासदारच तोडत नाही ना? आणि कधी आपण जागे होवू मरायला टेकल्यावर की मारायला आल्यावर?
ठाणे रिंगरोडला ठाणेकरांचा तीव्र विरोध असून तरीही तो नागरिकांवर लादण्याचा घाट घातला जातोय. आज ठाण्याच्या सर्व भागातील नागरिक, संस्था यावर विरोध म्हणून विचारमंथन करण्यासाठी गडकरी रंगायतन हॉलमध्ये जमले होते. राजकीय पोळी भाजण्यासाठी ठाणेकरांच्या भावनांना भाजू नका..
avinash jadhav retweeted
‘राज ठाकरेंची सुरक्षा काढल्यास ते घराबाहेरही पडणार नाहीत’; परिणय फुके यांच्या इशाऱ्याला मनसे नेते अविनाश जाधव यांचे प्रत्युत्तर.
#AvinashJadhav #ParinayFuke #RajThackeray #MNS #MarathiNews
avinash jadhav retweeted
काही महिन्यांपूर्वी परिणय फुके यांचा कौटुंबिक वाद साहेबांकडे आला होता. साहेबांनी मला त्यांना भेटायला सांगितले होते; कौटुंबिक वादात पडायचे नाही, ही साहेबांची भूमिका होती. त्या वेळी आम्ही हस्तक्षेप केला असता, तर परिणय फुके यांना महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा उरली नसती. राज ठाकरे हे मैत्रीच्या दुनियेतील राजामाणूस आहेत! आणि तुझ्यात जर हिंमत असेल, तर राज ठाकरेंचे पोलीस संरक्षण काढून दाखवा. मग तुम्हीही महाराष्ट्रात कसे फिरता, ते बघू! - अविनाश जाधव, नेते, मनसे
#AvinashJadhav #ParinayFuke #RajThackeray #MarathiNews #latestnews
(Avinash Jadhav, Parinay Fuke, Raj Thackeray, Marathi News, Latest News)
काही महिन्यापूर्वी आमदार परिणय फुकेंच्या कौटुंबिक वाद राजसाहेबांकडे आला होता, तेव्हा मला त्यांना भेटायला सांगितल आणि त्यात आपण हस्तक्षेप करायचा नाही हे आवर्जून सांगितल होत. राजसाहेबांनी राजकारण केल नाही, आज तेच फुके राजसाहेबांच पोलीस संरक्षण काढण्याची भाषा करतायेत???










