Mayuresh Konnur (@kmayuresh) header
Mayuresh Konnur (@kmayuresh) profile picture

Journalist. Travel. Music. Literature. History. Theatre. Films. Views strictly personal. #सर्वव्यापीआंबेडकर

Mumbai, India
Joined January 2010
Photo by Mayuresh Konnur (@kmayuresh)Photo by Mayuresh Konnur (@kmayuresh)Photo by Mayuresh Konnur (@kmayuresh)Photo by Mayuresh Konnur (@kmayuresh)Photo by Mayuresh Konnur (@kmayuresh)Photo by Mayuresh Konnur (@kmayuresh)Photo by Mayuresh Konnur (@kmayuresh)Photo by Mayuresh Konnur (@kmayuresh)Photo by Mayuresh Konnur (@kmayuresh)Photo by Mayuresh Konnur (@kmayuresh)
अभिनंदन @Kshitij_P
Poster is big, But moment is bigger. ♥️♥️♥️♥️ #eetha on 4th December.
1
1
376
Mayuresh Konnur retweeted
यंदाच्या ‘अनुभव’च्या दिवाळी अंकात देवदत्त पट्टनायक @devduttmyth यांची मुलाखत न चुकवता वाचण्यासारखी…!
📖 यंदाच्या 'अनुभव' दिवाळी अंकात वाचा 📖 इतिहास, मिथक आणि राजकारणाचा गुंता समजून सांगणारी अभ्यासपूर्ण मुलाखत मिथक आणि इतिहास यांची गल्लत केली तर दिशाभूल निश्चित! मुलाखत - देवदत्त पटनायक संवादक - मयुरेश कोण्णूर • 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 84849 88258
1
3
11
820
Mayuresh Konnur retweeted
दिवाळी अंकात लिहायची बऱ्याच वर्षांची इच्छा यंदा पूर्ण झाली. पहिला अंक ‘क्रिककथा’. कौस्तुभ चाटे हा माझा चुलत भाऊ. मी त्याला आदरार्थी वर्गात मानतो. क्रिकेट त्याचं वेड होतं, आहे. खरं तर मला ते फार उशीरा समजलं. त्यानं कोविडकाळात क्रिकेट व्लॅाग्स सुरू केले तेव्हा. सहा वर्षांपूर्वी त्यानं पूर्णपणे क्रिकेटला वाहिलेला ‘क्रिककथा’ हा दिवाळी अंक सुरू केला. मग नोकरी वगैरे सगळं सोडून क्रिकेटच्या त्याच्या वेडाला पूर्णवेळ वाहून घेतलं. एकटा दिवाळी अंकाचा गोवर्धन उचलत उभा असतो दरवर्षी. ‘पॅशन’ हाच एकमेव शब्द त्याला योग्य. यंदा तर तो हा अंक इंग्रजीतही प्रकाशित करतोय. मी त्याला दोन-तीन वर्षांपासून म्हणत होतो की मी तुझ्या अंकात लिहितो म्हणून. यंदा मुहूर्त लागला. आणि पहिल्यांदा क्रिकेटवर काही गंभीरपणे लिहिलंय. साहेबांचा हा खेळ या देशात ‘क्रिकेटधर्म’ वगैरे होण्यासाठी संस्थानिकांनी दिलेला राजाश्रय हा एक महत्वाचा टप्पा भारतीय क्रिकेटच्या प्रवासात आला. त्याविषयी लिहिलंय. ‘क्रिककथा’ नक्की वाचा. दुसरा अंक ‘अनुभव’. सुहास कुलकर्णी आणि गौरी कानिटकर यांनी सुचवलं की देवदत्त पट्टनायकांची मुलाखत करूया. पट्टनायकांशी काही वर्षांपूर्वी ‘माझा कट्ट्यावर’ ओळख झाली होती. पण त्यानंतरच्या काळात त्यांचा लेखनसंभार मोठा विस्तारला. मिथकशास्त्र हा त्यांचा मूळ विषय. पण इतिहास, मानववंशशास्त्र, भाषा अशा सगळ्या संलग्न विषयांत त्यांचा मुक्त संचार. मुख्य म्हणजे भूमिका घेण्यात कचरत नाहीत. स्पष्ट बोलतात. त्यांची काही मांडणी न पटणारीही असू शकते. पण त्याविषयी चर्चा होऊ शकते. मला वाटतं संशोधक-अभ्यासक न सापडलेली उत्तरं शोधत असतात. पण ती शोधण्यासोबतच जर त्यांच्या मांडणीनं भवतालातल्या पूर्वग्रह-समजुतींना धक्का बसला, काही नवीन प्रश्न आपल्याला पडले, विचारमंथन झालं तर संशोधनाचा एक महत्वाचा हेतू पूर्ण झाला असं म्हणावं लागेल. मला वाटतं देवदत्त अशा मंथनाला महत्व देणाऱ्या समकालीन लेखक-संशोधकांपैकी एक आहेत. दोन-अडीच तास त्यांच्या मुंबईतल्या घरी सलग चर्चा झाली. ती ही मुलाखत. जेव्हा मिथकं आणि इतिहासाचं मिश्रण करून त्यावर जाणीवपूर्वक राजकारण रचलं जातं आहे आणि त्याला उलट प्रश्न न विचारता बहुतांश लोक त्या राजकारणाचे बळी होताहेत, तेव्हा पट्टनायकांनी या मुलाखतीत घेतलेली भूमिका अत्यावश्यक ठरते. त्यामुळे ‘अनुभव’चा यंदाचा रौप्यमहोत्सवी अंक नक्की घेऊन वाचा. या दोन अंकांसोबतच वैचारिक घुसळण आणि समृद्धी असं दोन्ही देणारे अनेक अंक यंदाही आले आहेत. भरपूर वाचूया. सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा! #HappyDiwali
3
9
422

मानसिक स्वास्थ्य #MentalHealth हा अद्यापही निवडकांपर्यंत पोहोचलेला विषय. पण ज्या बदलत्या जगात आपण प्रवेश करतो आहोत, त्यात पूर्वी कधीही नव्हती तेवढा तो प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. ज्यांनी हा विषय मराठी जनांपर्यंत नेण्यासाठी बोलून, लिहून, संस्थात्मक काम उभारून हयातभर प्रयत्न केले त्या डॅा. आनंद नाडकर्णींचं अलिकडेच निधन झालं. त्यांना ट्रिब्यूट म्हणून यंदाच्या ‘अक्षर’च्या दिवाळी अंकात मानसिक स्वास्थ्यावर एक विशेष लेखमाला आहे. तिचं संपादन तेजस्विनीनं @DrTejaswiniK केलं आहे. बदलत्या जगाचे काय परिणाम आपल्या मनावर होताहेत आणि त्यासाठी जगभर कोणते नवे उपाय, संशोधन केलं जातं आहे, याबद्दल आणि इतरही अनेक आयामांबद्दल वाचायला मिळेल. आपल्या मनाबद्दल नव्यानं अनेक गोष्टी समजतील. शिवाय नेहमीप्रमाणे अंकात विविध वाचनीय लेख आहेतच. नक्की घ्या आणि वाचा! दिवाळीच्या शुभेच्छा!
3
9
461

As it looks, the SIR protests and politics around it will continue for sometime. But let’s not get distracted by the mere noise of it. The focus should not go away from key questions: 1. How and why crores of names were removed from voters list across the country? Were ‘logical discrepancies’ credible? 2. What about the loss of fundamental right of those voters who later won their appeals, but only after elections were over? 3. What about the disagreements by the two ECs raised by writing letters officially, as The Indian Express reported? Were the SIR related decisions taken unilaterally? 4. Was the control of the ECI’s centralised online platform for voter data update was restricted to few in Delhi? Is it now accessible to the EROs? 5. Were the contents of form 6 (new voter registration) changed/added without approval from the parliament/govt/SC? Who did that and why? 6. Is the real intent behind SIR being achieved? 7. Is the credibility of this important autonomous institution hit? How responsibility can be fixed? Is CEC being shielded?
1
1
1
10
679
नाना नाना पाटेकरांबद्दल अनेक अंगांनी लिहिता येईल. वेडा माणूस होता. स्वतःच्याच कैफात जगणारा. ती धुंदी इतकी विलक्षण की कधी ते वागणं खोटंही वाटावं. पण त्यांनी फिकिर केली नाही. एकदा पुण्यात ‘वसंतोत्सवा’त किशोरी आमोणकरांचं गाणं होतं. मैफल अशी रंगत गेली की सगळं भान हरपलं. वेळेचंही भान सुटून गेलं. किशोरीताईंनाही थांबावसं वाटत नव्हतं. स्वर कमालीचा लागला होता. नुकतीच सुप्रिम कोर्टानं खुल्या मैदानातल्या कार्यक्रमांना रात्री १०ची मर्यादा घातली होती. पण किशोरीताई समोर गात असतांना घड्याळ्याकडे कोण पाहणार? पोलीस मात्र पाहात होते. स्टेजच्या कोपऱ्यातून एक अधिकारी हळूच वर चढले आणि सूत्रसंचालन करणाऱ्या नाना पाटेकरांच्या कानात कुजबुजले. नानांना भान आलं. त्यांच्यासमोरही पर्याय नव्हता. किशोरीताईंचा स्वरभंग ‘कायद्याला धरून’ होता. नाना पुढं जाऊन त्यांना कल्पना दिली आणि गाणं थांबलं. ही रात्र कधी संपूच नये असं वाटत असतांना हा रसभंग कसा सहन व्हावा? हे अकल्पनीय होतं. पण नानांनी नियमाची आठवण करून दिली. आणि त्यानंतर त्यांनी जे काही केलं ते त्यानं किशोरीताईंसह सगळे अचंबित तर झालेच, पण समोरचे रसिक ही आपलीच भावना आहे या जाणीवेत नकळत उभे राहून टाळ्या वाजवू लागले. नानांनी चक्क किशोरीताईंसमोर साष्टांग लोटांगण घातलं होतं. माफी मागत. तुमच्या प्रतिभेचा भंग रसिकांच्या कायद्यात गुन्हा असेल, पण न्यायालयाचा शब्द पाळायला हवा. म्हणून ताईंना थांबवल्याबद्दल ते माफी मागत होते. ती फ्रेम आजही मनात कोरलेली आहे. हे नाना होते. इन्स्टिंक्टिव्ह. मनात आलं, केलं. नानांच्या अभिनयाबद्दल अनेक जण लिहिताहेत. ज्यांचा तो अधिकार आहे असे लिहिताहेत. माझा तो नाही. पण तरीही एक निरीक्षण नोंदवण्याचं साहस इथं करतो. विशेषतः त्या काळात जेव्हा सिनेमा आणि रंगभूमी दोन्हीकडे वास्तववादी (रिअलिस्टिक) अभिनय हा सर्वात वरचा पॅरामीटर मानला जातो आहे. आता तर तो अतिवास्तव होण्याकडे झुकला आहे. हरकत नाही. ती एक निवड आहे. पण कधी कधी अभिनयानं भूमिका साकारतांना एखादा कलाकार निव्वळ कल्पनेनं आणि नजाकतीनं एखाद्या स्टाईलला जन्म देतो. ती वास्तवाच्या बाहेरची असते. प्रत्यक्षात कोणी तसं करत नसतं. तसं बोलत नसतं. पण तसं नसणं हाच काहींच्या बाबतीत स्ट्रोक ॲाफ जिनियस असतो. ती शैली त्यांना वेगळेपण देते. उदा. दिलीप कुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, अमरीश पुरी, शाहरुख. यांनी त्यांच्या जीनियसनं स्टाईल जन्माला घातली. आणि बाकी बहुतेक ती फॅालो करत गेले. ग्रेगरी पेक, अल पचिनो, डी निरो अशी काही हॅालिवूडमधली नावं. अलिकडेच किलियन मर्फीचं ‘पिकी ब्लाईंडर्स’ पाहात असतांना हे परत परत वाटत राहिलं की भारतीय आसमंतातला हा स्टासलिशनेस गेला कुठे? मला वाटतं की अभिनयात अशी स्टाईल शोधणाऱ्या निवडकांपैकी, जीनियसपैकी नाना एक होते. त्यांनी स्वतःची शैली जन्माला घातली. त्यांचा मोठेपणा हा की खरं तर थिएटर करून, विजयाबाईंसारख्या दिग्दर्शकाहाती मेथॅाडिकल ॲक्टिंग करून, जेव्हा नाना कॅमेऱ्यासमोर आले तेव्हा मेथडच्या मर्यादा तोडून त्यांनी नवी शैली, स्टाईल शोधली. ती रसिकांना थेट भिडली. भावली. पटली. ती स्टाईलच त्यांना मराठीच्या मर्यादा ओलांडून देशभरातल्या बहुभाषिक प्रेक्षकांपर्यंत घेऊन गेली. बच्चन-शाहरूखच्या काळात केवळ आपल्या नावानं हिंदी चित्रपटगृहं हाऊसफुल्ल करणारा मराठी अभिनेता होता हा. दुसरं कोणी आहे? क्रांतिवीर, प्रहार, यशवंत अशा सिनेमांतले संवाद सगळ्यांच्या तोंडी आले कारण ती जगावेगळी स्टाईल, शैली, स्ट्रोक ॲाफ जीनियस. या स्टाईलनं नानाला ‘ॲारा’ दिला. बाय द वे, माझ्यासाठी नाना पाटेकरांची सगळ्यात आवडती कलाकृती आहे ‘प्रहार’. इथं त्यांचा स्टायलिश अभिनय आहेच पण दिग्दर्शक म्हणूनही नाना काय रसायन होतं! मन्ना डे च्या आवाजातली ती प्रार्थना, रेड लाईट एरियातून कॅमेरा फिरतांना मागे शोभा गुर्टूंच्या आवाजातली ठुमरी ‘याद पिया की आये’, समुद्रकिनाऱ्यावर हबीब तन्वीर आणि नानांचा तो दीर्घ संवाद… अविस्मरणीय बरंच काही. नानांनी दिग्दर्शक म्हणून अजून खूप काही करायला पाहिजे होतं. एक खंत. त्यांनी रंगभूमीवर केलेलं जयवंत दळवींचं ‘पुरूष’ कधी पाहता आलं नाही. ते असंच कधीतरी एखादा प्रयोग करतील अशी आशा उगाच मनात होती. आज ती संपली. गुडबाय नाना!
14
51
3
385
16,900
काल लिओनेल मेसी ब्यूनोस आयरिसमध्ये अर्जेंटिनासाठी शेवटची, निरोपाची मॅच खेळला. जे वातावरण वानखेडेवर सचिनच्या शेवटच्या मॅचला होतं, तेच इथंही होतं. मेसीनं निवृत्ती घोषित केल्यावर हे लिहिलं होतं काही दिवसांपूर्वी. परत शेअर करतोय. नक्की वाचा. #MessiAdiós
1
5
340
Mayuresh Konnur retweeted
Shivaji Park Protest: मुंबईच्या आंदोलनात काल नेमकं काय दिसलं? थेट ग्राऊंडवरून चर्चा 👇👇 youtu.be/ptgcJ8vCqmY
1
1
47
3,360
Mayuresh Konnur retweeted
एक म्हण आहे. Process is punishment. प्रक्रिया हीच शिक्षा. म्हणजे आपल्याकडे बऱ्याचदा म्हटलं जातं की शहाण्यानं कोर्टात पायरी चढू नये. कारण हेच की ती प्रक्रियाच अशी आहे की न्याय मिळणं दूरच, उलट शिक्षाच वाटावी. त्यामुळे एखाद्याला शिक्षा द्यायची असेल तर त्याला लांबलचक प्रक्रियेत अडकवा. हा असा प्रसंगी खचवणारा अनुभव नजीकच्या इतिहासात अनेकदा आलाय. नोटाबदलीच्या रांगेत, hsrp प्लेटबदलीत, कोविडच्या लसीकरणात, फोन वगैरे सगळं आधारला जोडतांना. तुम्हाला या यादीत जर अजून भर घालायची असेल तर घाला. उदात्त हेतू दाखवून त्यामागे कळपांना पिटाळणं. हे SIR प्रकरण असंच काही आहे का? वास्तविक, मतदारयाद्यांची दुरुस्ती ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पण एक विशेष मोहीम राबवायला सुरू केली गेली. सुरूवात बिहारपासून झाली . मग बंगाल. आता महाराष्ट्रासह इतर राज्यं. हळूहळू सगळा देश. मतदार यादीत असंख्य ‘घुसखोर’ घुसलेत, राष्ट्रीय सुरक्षा वगैरे तर्क देण्यात आले. हरकत नाही. पण मग किती असे लोक पकडले गेले? बंगालमध्ये सुरुवातीला 90 लाखांच्या आसपास नावं वगळण्यात आली. त्यात किती कथित घुसखोर सापडले? पण आता निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार, ज्यांनी आपली नावं वगळण्याविरूद्ध अपील केलं होतं, त्यातल्या 93 टक्के मतदारांनी आपलं अपील जिंकलं आहे. सिद्ध झालं की ते कायदेशीर मतदार आहेतं. त्यांची नावं वगळली जायला नको होती. पण निवडणूक तर त्यांच्याविना झाली ना? त्यांची नावं आता कदाचित परत यादीत येतीलही (जशा चलनाबाहेर गेलेल्या नोटा परत चलनात आल्या), पण मतदानाचा हक्क गेल्या निवडणुकीत हिरावला गेला ना? वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे मतदान करणाऱ्या, ज्यांनी नागरिक म्हणून सगळी कर्तव्यं बजावली आहेत, त्यांनाच आपण सांगतो आहोत की तुम्ही बेकायदा मतदार नाही आहात हे सिद्ध करा. ते सगळे कर नियमित भरत आहेत, त्यांच्या नोंदी आहेत, त्यांच्याकडे पासपोर्ट, लायसन्स, आधार कार्ड अशी मोठ्या तपासणीअंती मिळालेली अधिकृत कागदपत्रं आहेत, त्यांच्यावर स्वतःला मतदार म्हणून सिद्ध करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. महाराष्ट्रात सध्या SIR सुरू आहे. पहिल्या टप्प्यानंतर जवळपास 2 कोटी मतदार यादीबाहेर गेलेत. नोटीसेस आल्यात. सिद्ध करा. अनेकांनी कित्येक वर्षं एकाच मतदान केंद्रावर मतदान केलंय. त्यांना प्रश्न पडलाय की आम्ही आत्ताच हे सिद्ध का करायचं? Process is punishment. कोणीही मतदारयाद्या दुरूस्त व्हाव्यात या उद्देशाला विरोध करणार नाही. प्रश्न प्रक्रियेचा आहे. न्यायाचं एक तत्व आपण कायम ऐकतो ते म्हणजे अनेक दोषी सुटले तरी चालेल एकवेळ पण एकाही निर्दोषाला शिक्षा होता कामा नये. इथं त्याच्या विरुद्ध होतंय. चोर सोडून संन्याशाला सुळावर चढवलं जातं आहे का? उदाहरणार्थ, जे गोव्याचं प्रकरण आहे ते. ‘द इंडियन एक्सप्रेस’नं ज्याचा उल्लेख केला आहे. तिथल्या SIR मध्ये 97 जणांची अगोदर नावं वगळण्यात आली होती. नंतर ते अपिलात गेले. त्यात सिद्ध झालं की ते कायदेशीर मतदार आहेत. मग त्यांची नावं परत यादीत यायला हवीत. स्थानिक अधिकाऱ्यांनी जेव्हा ते Online करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना या system access नसल्याचं समजलं. या ॲक्सेस बद्दल बोलूच, पण जेव्हा तुम्ही गोव्यात मतदार यादीतून बाहेर पडता तेव्हा मतदानापेक्षा अनेक गोष्टी तुम्ही गमावता. इथल्या अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, मुख्यतः आरोग्य-मेडिक्लेम यांच्या, तुमचं नाव मतदार यादीत असावं लागतं. ते नसेल, तर तुम्ही अपात्र. ही कोणती शिक्षा? हक्क असूनही नाव वगळणाऱ्या प्रक्रियेची. बंगालचंही असंच एक प्रकरण खूप चर्चेत आलं होतं तुम्हाला आठवत असेल तर. तिथल्या ‘द टेलीग्राफ’ या वृत्तपत्राचे माजी संपादक आर. राजगोपाल याचं नाव SIR मध्ये गेलं. पुढे जेव्हा काही दिवसांनी त्यांचा पासपोर्ट नूतनीकरणासाठी गेला तेव्हा तिथे तो अडकला कारण पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये त्यांचं नाव मतदार यादीत नसल्याचं सांगितलं गेलं. म्हणजे, प्रश्न असा आहे, मतदार यादी हा सर्वोच्च पुरावा मानला जाणार आहे का? पुढे भारतभर असं होणार आहे का? त्याचा तर्क काय? तसं असेल तर या यादी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेचा हेतू नेमका काय आहे? मतदारांना प्रक्रियेची शिक्षा? (Continued👇)
1
3
5
431

‘द इंडियन एक्सप्रेस’ च्या बातमीचा एक मुख्य भाग होता नवीन Form No. 6, जो पहिल्यांदा मतदार होण्यासाठी भरायचा असतो. वास्तविक त्यात तुम्ही किंवा तुमचे पालक 2002 पूर्वीच्या यादीत होता का, हा प्रश्न अप्रस्तुत आहे. तो प्रश्न SIR मध्ये विचारला जातो आहे. पण इथे का? ते कायद्याला धरून अथवा कायद्यात आवश्यक बदल करून होतं का? दोन केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या आक्षेपांमध्ये हाही होता. आता मोठा गजहब झाल्यावर आयोगानं जुनाच अर्ज वापरणार आहोत असं म्हटलं आहे. पण तसं मुळात का केलं गेलं होतं? हे स्पष्ट आहे की नवीन/पहिले मतदार हे मुख्यत्वे Gen Z असणार आहेत. त्यांना अकारण प्रश्न विचारून प्रक्रियेची शिक्षा का? शनिवारी निवडणूक आयोगानं बैठक घेऊन आता आपण काय पावलं उचलणार आहोत हे जाहीर केलं. त्यातून या प्रक्रियेबद्दल घेतल्या गेलेल्या आक्षेपांची पुष्टीच झाली. म्हणजे एका प्रकारे चुका मान्य केल्या गेल्या. पण तेवढ्यानं पुरेल का? जबाबदारीशिवाय सगळं विसरून जाता येईल का? आणि अजून बऱ्याच आक्षेपांची उत्तरं मिळालेली नाहीत. उदाहरणार्थ, नावं घालण्यात/वगळण्यासाठी नव्यानं आणलेल्या सॅाफ्टवेअरचा सगळ्या राज्यांतल्या निवडणूक अधिकाऱ्यांना असणारा ॲक्सेस. ती दिल्लीत काही निवडकांच्या हाती असलेली यंत्रणा न राहता पारदर्शकता येणं. भारताच्या बहुपक्षीय लोकशाहीच्या मुळावर गंभीर परिणाम करणारी ही प्रक्रिया सुधारणं आवश्यक आहे. जे चूक आहे ते फार काळ झाकून ठेवता येणार नाही. ते झाकू पाहणारे काहीही हास्यास्पद तर्क दिले जाताहेत. म्हणे, दोन निवडणूक आयुक्तांनी मतभिन्नता दाखवली म्हणजेच किती पारदर्शक लोकशाही प्रक्रिया आहे पाहा. प्रश्न हा आहे की जर मतभिन्नता होती, आक्षेप लिखित स्वरूपात घेतले गेले, तरीही निर्णय unanimously कसे घेतले गेले? आणि, ते निर्णय योग्य होते तर आता बदल का झाले? ‘बातमी चूक आहे’ असं आयोगानं थेट का म्हटलं नाही? मतदान हा लोकशाहीतला सर्वात बहुमूल्य अधिकार आहे. त्यावर सगळा डोलारा उभा आहे. त्या अधिकारामुळेच प्रत्येक नागरिकाला या देशातली स्वतःचं अस्तित्व खरं वाटते. Conviction येतं. जर त्याबद्दल शंका निर्माण झाली तर पाया हादरेल. ती वास्तव भीती आहे.
1
3
255
The most important story of the day and days to come.
The Election Commission of India is under fire like never before. The SIR has struck 13 crore names off draft rolls, putting the EC at the centre of intense public debate over its role in deciding who gets to vote — and who doesn’t. HOWEVER, what nobody knew: through that same period, some of the sharpest questions were being asked from inside. Out today, after months of work. Our #ExpressInvestigation 🧵 (1/10)
1
6
252
काय म्हणावे याला? जेव्हा एका हिंदू धार्मिक संस्थेशी संबंधित धर्मगुरू आणि त्यांचा जथ्था पॅरीसच्या आयफेल टॉवरला भेट द्यायला गेले, तेव्हा स्त्रियांना तिथून जायला सांगितलं. indianexpress.com/article/wo…
1
7
364
विद्यानंद बापटांना पुण्यात मारहाण झाली. स्वतःचे मत मांडले म्हणून हल्ला होण्याची ही अजून एक ‘परंपरा’ ज्याबद्दल लाज वाटायला पाहिजे. पण ती परंपरा काही थांबत नाही. यातून एक संदेश स्पष्ट आहे. प्रश्न व्यक्तीच्या विचारस्वातंत्र्याचा आणि सुरक्षेचा आहेच. पण ध्वनिप्रदूषणाबद्दल बोलू नका. त्रास होत असेल तरी त्याला विरोध करू नका. तसं केलं तर झुंड तुमच्या अंगावर येईल. कोणतीही राजकीय व्यवस्था तुमच्या बाजूची नाही.
2
30
172
3,293