विमुक्त (@migratorscave) header
विमुक्त (@migratorscave) profile picture

योजना पूर्णत्वाच्या व्यग्रतेतच नवनिर्माणाचे बीज असते ! - शब्दज

Joined May 2013
Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)
थ्रेड (भाग १) संविधान = गुलामगिरीचा घट्ट विळखा १. सुरुवात २. मध्य ३. निरीक्षणे ४. शेवट या भागात सुरुवात आणि मध्य समोर ठेवत आहे १. सुरुवात भारतातून ब्रिटिश निघण्याआधी १९४६ मध्ये संविधान निर्माण करण्याचा त्यांचा निर्णय झाला, त्यानुसार एक समिती गठीत केली गेली यासाठी @Nupur_Ahire
21
83
14
158
विमुक्त retweeted
रत्नागिरीतील स्पृश्य-अस्पृश्यांचे पहिले सहभोजन ! १९२४ ते १९३७ या काळात रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक सुधारणांचे कार्य हाती घेतले. जातिभेद, अस्पृश्यता, रोटीबंदी, बेटीबंदी आणि इतर सामाजिक रूढी दूर करून हिंदू समाजात एकता निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. याच प्रयत्नांचा भाग म्हणून १६ नोव्हेंबर १९३० रोजी रत्नागिरी येथे त्यांनी विविध जातींतील स्पृश्य-अस्पृश्य हिंदू बांधवांचे प्रकट सहभोजन आयोजित केले. शतकानुशतके रूढ असलेल्या सामाजिक भेदभावाला प्रत्यक्ष कृतीतून आव्हान देणारा हा उपक्रम होता. सावरकरांच्या मते अस्पृश्यता ही केवळ सामाजिक अन्यायाची बाब नव्हती तर हिंदू समाजाच्या एकतेला आणि सामूहिक सामर्थ्याला बाधा आणणारी समस्या होती. जन्माच्या आधारावर श्रेष्ठ-कनिष्ठता ठरविणे आणि रोटीबंदीसारख्या रूढींचे त्यांनी समर्थन केले नाही. प्रकट सहभोजनातून त्यांनी स्पृश्य-अस्पृश्य भेदभावाला प्रत्यक्ष आव्हान दिले. सर्व हिंदूंनी एकत्र बसून भोजन करावे, परस्परांना बंधू मानावे आणि सामाजिक जीवनात समानतेने वावरावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. सावरकरांनी अस्पृश्यतानिवारणासाठी सहभोजनाबरोबरच मंदिरप्रवेश, सार्वजनिक उत्सव, हळदीकुंकू समारंभ, सहशिक्षण आणि सामाजिक सलोखा वाढविणाऱ्या उपक्रमांवर भर दिला. भागोजीशेठ कीर यांच्या सहकार्याने त्यांनी सर्व जातींसाठी खुले असलेल्या पतित पावन मंदिराची स्थापना केली. १० मार्च १९२९ रोजी मंदिराची पायाभरणी झाली तर २२ फेब्रुवारी १९३१ रोजी लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सर्व हिंदूंना समान धार्मिक अधिकार मिळावेत हा या मंदिरामागील प्रमुख उद्देश होता. सावरकरांच्या मते हिंदुत्व, हिंदुसंस्कृती आणि हिंदुधर्म यांवर स्पृश्यांइतकाच अस्पृश्यांचाही समान वारसाहक्क आहे. हिंदुत्वावर केवळ स्पृश्यांचाच अधिकार असल्याची भावना चुकीची असून अस्पृश्य बांधवांनी स्वतःला समान हक्काचे वारसदार मानावे असे त्यांनी प्रतिपादन केले. संत चोखामेळा, संत रोहिदास आणि तिरुवल्लुवर यांसारख्या संतांचा उल्लेख करून त्यांनी हिंदू संस्कृतीच्या जतनातील अस्पृश्य समाजाच्या पूर्वजांचे योगदान अधोरेखित केले. हजारो वर्षांच्या अन्यायानंतरही पूर्वजांनी जतन केलेल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगून अस्पृश्य बांधवांनी आपले समान अधिकार ठामपणे मांडावेत असे आवाहन त्यांनी केले. सावरकरांच्या मते अस्पृश्यतेविरुद्धचा संघर्ष हा आत्मसन्मान, समान अधिकार आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्याचा संघर्ष होता. अन्यायाविरुद्ध ठामपणे लढावे. मात्र आपल्या पूर्वजांनी जतन केलेल्या हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या वारशाचा त्याग करू नये असे त्यांचे मत होते. धर्मांतरामुळे सामाजिक विषमता आपोआप दूर होईलच असे नाही असा युक्तिवाद करत त्यांनी हिंदू समाजातच समान हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले. सावरकरांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्याला काही घटकांचा विरोध झाला तरी त्यांनी सहभोजन, मंदिरप्रवेश आणि सर्वजातीय सामाजिक उपक्रम सुरू ठेवले. त्यांच्या मते समाजसुधारणा केवळ विचारांनी नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून घडली पाहिजे. सर्व हिंदूंना समान प्रतिष्ठा, अधिकार आणि बंधुभाव मिळावा हा त्यांच्या अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यामागील मूलभूत विचार होता. #आंतरजातीय_सहभोजन #स्वातंत्र्यवीर_सावरकर
3
16
1
89
1,340
विमुक्त retweeted
दुःखाचे मूळ कारण काय? उत्तर एकाच शब्दात: "अज्ञान" मगाशी मी तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारला होता: "आपल्या दुःखाचे, आपल्या suffering चे मूळ कारण काय?" काही लोकांनी विचारपूर्वक उत्तरे दिली, त्याबद्दल मनापासून आभार. आता त्या प्रश्नाचे माझे उत्तर मांडतो आहे. हे उत्तर कदाचित पहिल्यांदा वाचताना पटणार नाही. तरी शेवटपर्यंत वाचा. उत्तर आहे: अज्ञान. "अज्ञान हे प्रत्येक दुःखाचे कारण कसे असू शकेल?" असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. चला, थोडे खोलात जाऊन पाहूया. 🔹 दुःख नेमके केव्हा होते? प्रिय व्यक्तीचा विरह झाला की, हवे असलेले काही गमावले की, किंवा जे आपल्याला मिळाले नाही ते दुसऱ्याला मिळाले म्हणून मत्सर वाटला की आपल्याला दुःख होते. आणि या सगळ्यामागे एक सतत चालू असणारी भावना असते, ती म्हणजे भीती. काहीतरी गमावण्याची भीती, प्रिय व्यक्ती दुरावण्याची भीती, स्वतःचे शरीर गमावण्याची भीती, समोरची व्यक्ती आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकेल का ही भीती. म्हणजे भीती आणि insecurity ही दुःखाची मोठी कारणे आहेत. पण मग प्रश्न असा येतो की भीती तरी कुठून जन्माला येते? 🔹 उदाहरण १: अंधारी खोली आणि बागुलबुवा एखाद्या लहान मुलाला सांगितलेले असते की त्या अंधाऱ्या खोलीत बागुलबुवा आहे. त्यामुळे ते मूल त्या खोलीत जायला धजावत नाही. मग एक दिवस आजोबा किंवा मोठा भाऊ त्याला हाताला धरून त्या खोलीत नेतात आणि सांगतात, "हे बघ, इथे कुणीच नाही." त्या क्षणी काय घडते? मुलाला ज्ञान होते. आणि ज्ञान होताच त्याची भीती नाहीशी होते. याचा अर्थ ती भीती अज्ञानातूनच निर्माण झाली होती. 🔹 उदाहरण २: स्वप्न स्वप्नात आपल्यासमोर वाघ येतो, किंवा एखादी प्रिय व्यक्ती गेल्याचे आपण पाहतो आणि ढसाढसा रडतो. ते दुःख त्या क्षणी पूर्णपणे खरे वाटते. मग जाग येते आणि आपण म्हणतो, "अरे, हे तर स्वप्न होते!" इथे काय झाले? ज्ञान झाले. स्वप्नात असताना आपण प्रत्यक्षात आपल्या बेडवर शांत झोपलो आहोत याचे आपल्याला भानच नव्हते. ते अज्ञान होते. स्वप्नात आपल्याला एक वेगळे शरीर मिळते. त्या शरीराने आपण चालतो, डोंगर चढतो, लोकांशी बोलतो. ते शरीर आपलेच आहे असे मानतो. पण त्या स्वप्नातील "मी", ती प्रिय व्यक्ती, तो वाघ, ते डोंगर हे सगळे एकाच मनाने घेतलेली रूपे असतात. मग कोण कोणापासून वेगळे झाले? कोण कोणाला गमावले? तरीही "आम्ही दोन वेगळ्या व्यक्ती आहोत" हा ठाम विश्वास त्या स्वप्नात असतो, तो केवळ अज्ञानामुळे. 🔹 जागेपणीचे "स्वप्न" आता हेच जागेपणी पाहा. "हे शरीर आणि हे मन म्हणजेच मी. माझे आई-वडील, पत्नी, मुले, मित्र हे सगळे माझ्यापासून वेगळे आहेत. मी या शरीरापुरता मर्यादित आहे." हीच समजूत आपण आयुष्यभर घेऊन जगत असतो. अगदी स्वप्नासारखेच. हेच आहे इथले अज्ञान. 🔹 जन्म आणि मृत्यू आपण खरोखर अनुभवले आहेत का? थोडा विचार करा. आपल्याला स्वतःचा जन्म आठवतो का? नाही. कुणालाच आठवत नाही. तरीही आपण तो सत्य मानतो. मृत्यूचेही तसेच आहे. तो अनुभवून सांगायला कुणीच परत येत नाही. तरीही "मी जन्मलो आणि मी मरणार" या कल्पनेवर आपला प्रचंड विश्वास असतो. आईच्या उदरात हे शरीर घडत होते, तेव्हा "मी म्हणजे हे शरीर आहे" किंवा "मी माझे शरीर तयार होताना बघत आहे" अशी जाणीवही नव्हती. तरीही शरीराला जे हवे ते सगळे आपोआप घडत होते. ते कोण करत होते? गाढ झोपेत किंवा भूल दिल्यावर "मी अमुक व्यक्ती आहे" ही जाणीव, शरीराचे भान आणि विचार सगळे नाहीसे होतात. तरीही शरीर चालूच असते. आणि जागे झाल्यावर आपण म्हणतो, "मला छान झोप लागली." म्हणजे त्या शांततेचाही कोणीतरी साक्षी होता. तो साक्षी कोण? जेव्हा "मी" ही भावना जन्माआधी देखील नव्हती तशीच गाढ झोपेमध्ये पण नसते मग ती अवस्था कोण बघत असते? त्याचे साक्षीत्व कोण करत असते बरे? हे शरीर तयार होण्याआधीही जो होता, शरीर नसतानाही जो असेल, ते आपले खरे स्वरूप आहे. म्हणूनच सनातन धर्मात आत्म्याला अजन्मा, अविनाशी, अनादि-अनंत म्हटले आहे. हे वाक्य फक्त वाचून सोडून द्यायचे नाही. त्यावर खोलवर चिंतन करायचे आहे. जो या प्रश्नावर पूर्ण लक्ष केंद्रित करून बसतो, त्यालाच हे उलगडते. 🔹 लाट आणि समुद्र समुद्रात अनंत लाटा उठतात. काही छोट्या, काही मोठ्या, तर काही सुनामीएवढ्या प्रचंड. प्रत्येक लाटेला वाटते, "माझे अस्तित्व वेगळे आहे. मी जन्मले, आता मी संपणार." पण जेव्हा ती लाट खोलवर पाहते, तेव्हा तिला कळते की ती उठण्याआधीही ती होतीच, पाणी म्हणून, अथांग समुद्र म्हणून. आणि ती विरल्यानंतरही ती समुद्रच असणार. केवळ पाण्याच्या आकारात बदल झाला म्हणून त्या स्वरूपाला आपण वेगळे मानले, त्याला लाट ही नाव दिले. पण मुळात त्यात पाणी सोडून काहीच नवीन नव्हते. #अद्वैतवेदांत #आत्मज्ञान #दुःखाचेमूळ #Vedanta #मराठी
तुमच्या मते,कोणत्याही प्रकारच्या दुःखाचे मूळ कारण काय असेल? What is the core reason behind any kind of suffering according to you?
3
8
1
33
1,945
विमुक्त retweeted
तुमच्या मते,कोणत्याही प्रकारच्या दुःखाचे मूळ कारण काय असेल? What is the core reason behind any kind of suffering according to you?
21
3
2
24
3,806
विमुक्त retweeted
बाबा, I Love You. ३० सप्टेंबरला बायकोने मला एक रील पाठवली. त्यात बायकांना एक गंमतीशीर चॅलेंज दिलं होतं. नवऱ्याला अचानक फोन करायचा, "I love you" म्हणायचं आणि त्याचा प्रतिसाद बघायचा. रील खूपच मजेशीर होती. मग ती मला म्हणाली, "तू तुझ्या बाबांना फोन कर आणि त्यांना I love you म्हण. बघ ते काय म्हणतात." आपल्याकडे मुलं आईशी मोकळेपणाने बोलतात. पण बाबांशी? त्यांच्याबद्दल मनात आदर असतो, धाक असतो, प्रेमही असतं. पण ते प्रेम आपण कधी शब्दांत सांगत नाही. आपल्याला संकोच वाटतो. मीही तेच केलं. "आत्ता नको, संध्याकाळी करतो," असं म्हणून वेळ मारून नेली. वाटलं, ही विसरून जाईल. पण बायको शेवटी बायकोच! ती विसरली नाही. संध्याकाळी कसाबसा धीर करून मी फोन लावला. सुरुवातीला इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मग म्हणालो, "बाबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे." पलीकडे बाबा थोडे काळजीत पडले असावेत. "याला असं काय सांगायचं आहे?" मी म्हणालो, "बाबा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. I love you." चार-पाच सेकंद पूर्ण शांतता होती. आणि मग बाबा हसायला लागले. फोन स्पीकरवर होता, त्यामुळे आईसुद्धा हसू लागली. ती म्हणाली, "अरे, त्यात काय? हे तर आम्हाला माहितीच आहे. तू पुण्याला जायला निघतोस किंवा आम्ही तिकडून निघतो, तेव्हा ते तुझ्या डोळ्यांत दिसतंच. ते बोलून दाखवायची काय गरज?" आई बहुधा स्वयंपाकघरात निघून गेली. मग बाबा हळूच म्हणाले, "आय लव्ह यू टू." ❤️ त्या क्षणी जे वाटलं ते शब्दांत सांगता येणार नाही. तो व्हिडिओ मी इथे मुद्दाम जोडतोय. माझी खासगी गोष्ट सगळ्यांसमोर मांडावी म्हणून नाही. खरी गोष्ट पुढे आहे. हा फोन ३० सप्टेंबरला केला होता. त्यानंतर फक्त आठ-नऊ दिवसांनी, म्हणजे ९ ऑक्टोबरला, मी दिवाळीसाठी महाडला गेलो. गेलं वर्षभर बाबा कॅन्सरशी लढत आहेत. केमोथेरपी झाली होती, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणा जाणवत होता. घरी पोहोचलो त्याच दिवशी लक्षात आलं की त्यांचं शरीर पिवळसर दिसतंय. लगेच टेस्ट्स केल्या. डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं आणि रिपोर्टमध्येही तेच आलं. कावीळ. अनेक चांगल्या डॉक्टरांशी फोनवर बोललो. सगळ्यांचं एकच सांगणं होतं: "आता फारसा उपाय नाही. उगाच त्यांना पुण्याला हलवू नकोस." पण मुलगा म्हणून मन ऐकत नव्हतं. शेवटचा प्रयत्न म्हणून मी बाबांना पुण्याला घेऊन आलो. पुन्हा सगळ्या टेस्ट्स झाल्या, पेट स्कॅन झाला. आणि परवा संध्याकाळी डॉक्टरांनी मला आणि आईला समोर बसवून सांगितलं, "आपण आता उपचार थांबवूया. रोग खूप पसरलाय. आता उपचारांनी काही होणार नाही. त्यांना घरी घेऊन जा." आमच्याकडे कदाचित फक्त तीन आठवडे उरले आहेत. कालपर्यंत बऱ्यापैकी फ्रेश असलेले बाबा आज दिवसभर झोपूनच आहेत. हा आजार शेवटाकडे जातो तेव्हा असंच होतं, हे माहीत आहे. पण माहीत असणं आणि ते डोळ्यांसमोर घडताना बघणं, यात खूप फरक आहे. हे लिहिताना माझा कंठ दाटून आलाय. डोळे भरून आलेत. आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून सांगतोय... विशेषतः प्रत्येक मुलाला. मुली आई-बाबांना सहज "I love you" म्हणतात, मिठी मारतात, मनातलं बोलतात. पण आपण मुलं? आपण प्रेम करतो, जीव ओवाळून टाकतो, पण ते बोलून दाखवत नाही. "त्यांना माहितीच आहे" असं म्हणून गप्प बसतो. हो, त्यांना माहिती असतं. पण ते शब्द ऐकल्यावर त्यांना जो आनंद होतो, तो वेगळाच असतो. ते तो आनंद दाखवणार नाहीत. पण नंतर एकटे असताना त्या शब्दांची आठवण काढून ते किती खुश होत असतील, याचा विचार करा. जे व्हायचं ते परमेश्वराच्या इच्छेने आणि नियतीने होणारच. त्यात आपण काहीच करू शकत नाही. पण जोपर्यंत हे शरीर आहे, तोपर्यंत मातृऋण आणि पितृऋण फेडणं आपल्याच हातात आहे. आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम शब्दांत व्यक्त करण्याइतका मोठा आनंद दुसरा कुठलाच नाही. माझ्या आयुष्यात हे सगळं खूप वेगाने घडलं. पण त्याआधी, बायकोमुळे आणि नियतीमुळे, मी बाबांना "I love you" म्हणू शकलो. त्या दिवशी त्यांच्या आवाजात जे समाधान ऐकलं, ते आयुष्यभर माझ्यासोबत राहील. म्हणून आज, आत्ता, हा लेख वाचून झाल्यावर, फोन उचला. बाबांना फोन करा. थोडं इकडचं तिकडचं बोला. आणि मग धीर करून म्हणा, "बाबा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे." उद्यावर ढकलू नका. कारण उद्या कसा असेल, हे आपल्यापैकी कोणालाच माहीत नसतं. 🙏
11
10
53
2,596
विमुक्त retweeted
२०११ च्या जनगणनेनूसार महाराष्ट्रात बिहार वरून आलेल्यांची ५.५ लाख+ संख्या होती. आता ५० लाख+ झाली असेल तर नवल वाटायला नको. त्यांचं जनगणने अनूसार मराठी माणसाची बिहारमधील संख्या २ हजार पेक्षा कमी होती, जी आणखी कमी झाली असण्याची शक्यता. 😐
18
18
9
67
16,212
विमुक्त retweeted
शिवभक्त, इतिहास संशोधक,पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण 'बाबासाहेब पुरंदरे ऊर्फ बळवंत मोरेश्वर पुरंदरे' यांचा आज स्मृतिदिन.विनम्र अभिवादन.
1
5
2
23
832
छटपूजा थ्रेड मराठीचा झेंडा हाती घेतलेल्यांसाठी विचारांची सुस्पष्टता येण्यासाठी! छटपुजेचे प्रसिद्धी आणि त्यापुढे जाऊन उदात्तीकरण सुरू आहे का? तर हो, तसंच सुरू आहे. छटपूजा हा उत्तर भारतीय हिंदूंचा महत्त्वाचा विधी असून खरेतर याला कोणत्याही हिंदूचा विरोध असता कामा नये. पण...
5
4
1
39
10,975
प्रकारे सक्षम आहेत. महाराष्ट्रापुरते नमूद करावे लागते की, या सगळ्या प्रकारच्या प्रायोजकत्वाची अमराठी समुदायांना गरज वाटत नसते. ते त्यांचे त्यासाठी जे करायचे ते करत असतात. पण याचा अर्थ त्यांच्या आस्थेबद्दल मला अनादर किंवा दूजाभाव आहे असा नसून उत्तर भारतातील पद्धती तिथल्या
1
4
607
ऋतुमानाला, निसर्गचक्राला साजेशा आहेत, इथल्या नाही हे साधी समजण्यासारखी गोष्ट आहे. वंदे मातरम् जय महाराष्ट्र
1
6
556
विमुक्त retweeted
आम्हा सामान्य लोकांना राष्ट्रवादी एकत्र आल्या काय, ठाकरे बंधू एकत्र आले काय,याच्याशी काहीही संबंध नाही. हे नेपो किड्स रोहित-सुप्रिया-आदित्य-अमित साठी चांगलं असेल. आम्हाला फरक पडतोय ते मेट्रो लाईन सुरु होतीये त्याने, मराठवाडा ग्रीड बनतंय, रिंग रोड बनतोय, विदर्भात रोजगार येतोय.
22
77
5
472
9,073
विमुक्त retweeted
लहानपणी तुमच्या काकांसोबत फिरत होता तेव्हा त्यांची भाषणे तुम्ही ऐकली असतीलच. तुमच्या कुटुंबाला z सिक्युरिटी मिळाली ती बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषण व राजकीय कृतींमुळे. ती भाषणे म्हणजे "लांडया, हिरवा साप, मुल्ले, जिहादी,बाटगे, लुंगीवाले, बिमारु,पांढऱ्या पायाची" अशा अनेक शब्दांनी सजलेली असत. या भाषणानंतर दंगली,दगडफेक व्हायच्या म्हणून पोलीस आधीच कलम 144 म्हणजे जमावबंदीचे कलम लावायचे. तुमच्या कुटुंबाचे राजकारण उभे राहिले तेच हिंदू मुस्लिम दंगलीवर, अध्येमध्ये शीख,नवबौद्ध यांच्याबरोबर देखील हाणामाऱ्या केल्या आहेत. आता मात्र तुम्ही दोघे ठाकरे बंधू अशा प्रकारची भाषणे लेखन करतात जसे काय बाबा आमटे यांचेच नातू पणतू आहात.
सस्नेह जय महाराष्ट्र, भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा. पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी. भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं! जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच ! माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की. भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो ! बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते ! भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ ! राज ठाकरे ।
22
138
3
768
27,861
विमुक्त retweeted
एक निरिक्षण जी स्त्री आर्थिक स्वतंत्र नसते तिच्या मताला घरात काडीची किंमत नसते हे सत्य आहे तिने सदैव घरातील पुरुषाचेच ऐकावे अशी अपेक्षा असते अनेक वेळा स्त्री षुरुषापेक्षा जास्त विद्वान,तर्कशुद्ध कर्तबगार असू शकते अशावेळी कुटुंबाच्या भल्यासाठी सुद्धा पुरुष तिचे मत घेत नाहीत
मयूर भाऊ तुमचं लग्न झालं आहे त्यामुळे तुमचे मत हे काही अंशी पक्षपाती असू शकते. 😄 मुलींच्यावर टीका होते हे मान्य पण त्याला कारणे सुद्धा तशीच आहेत. कारण पुरुष हा अजून वाहणारा बैलच आहे. पुरुष हे निसर्गत: आक्रमक असतात, बाई साठी, संपत्ती साठी, प्रदेशासाठी पुरुषांनी रक्त सांडले आहे. त्यामुळे तिला बेस्ट ऑफ करंट हवा असेल तर त्याला कंट्रोल हवा असतो हाही निसर्ग आहे. मी म्हणतो मुलींना अपेक्षित “स्वातंत्र्य” हे क्षणिक सुख आहे. नोकरी मध्ये पैसा आहे पण आधी जी घरातील “गुलामी” होती ती बाहेरची “गुलामी” आहे. पुरुषांसाठी अर्थार्जन हे अनिवार्य आहे बाईसाठी नाही. त्यामुळे समोर राजेशाही असो, सावकारशाही असो की भांडवलशाही पुरुषाला चाकरी ची गुलामी करावीच लागते. महिला जितक्या जास्त प्रमाणात शिकतील, जितक्या नोकऱ्या करतील प्रजनन दर कमी होईल. स्त्रियांचे प्रश्न हे पुरुषी पद्धतीने सोडवण्याचे प्रयत्न आपण केले ही सगळी त्याची फळे आहेत. स्त्रियांना काय हवे हे फुले, आंबेडकर, आगरकर, इत्यादी किंवा जगातील विद्वान “पुरुषांनी” विचारले नाही. त्यांनी पुरुषी दृष्टिकोनातून चूक बरोबर ठरवले (त्यांचा सुद्धा दोष नाही). असो.
1
2
29
486
विमुक्त retweeted
हे जग 'तो' नाही, 'ती' चालवते! शक्तीविना शिव म्हणजे 'शव' आणि शिवाविना शक्ती दिशाहीन. सांख्य आणि अद्वैत वेदांत सांगतात ते स्त्रीशक्तीचे खरे स्थान. आपण स्त्री आणि पुरुष यांच्याबद्दल बोलतो, तेव्हा सहसा माणसांमधील किंवा पशुपक्ष्यांमधील नर-मादी एवढाच विचार करतो. पण कधी असा विचार केला आहे का, की संपूर्ण विश्वाच्या पातळीवरही 'नर' आणि 'मादी' अशी दोन तत्त्वे असतील? आणि त्यांच्यामुळेच हे जग निर्माण होत असेल? आपल्या सनातन परंपरेत यावर फार सुंदर विचार झाला आहे. तो प्रत्येकाने निदान वरवर तरी समजून घ्यावा. यासाठी दोन दर्शने सर्वात उत्तम आहेत: सांख्यशास्त्र आणि अद्वैत वेदांत. सांख्य याला पुरुष आणि प्रकृती म्हणते, तर अद्वैत ब्रह्म आणि माया. 🔸 डोळ्यांना दिसणारे सत्य वरवर पाहता नर जास्त ताकदवान दिसतो. माणसांमध्ये तर गेली अनेक शतके पितृसत्ताक व्यवस्था याच शारीरिक सामर्थ्याच्या जोरावर उभी राहिली. स्त्रीचे अस्तित्व महत्त्वाचे असूनही तिला गौण स्थान मिळाले. अपत्याला वडिलांचे नाव लागते, आईचे नाही. आता हे हळूहळू बदलत आहे, पण मूळ चित्र असेच होते. पण सांख्य, तंत्र आणि सनातन धर्मातील इतर दर्शनांच्या नजरेतून पाहिले, तर चित्र पूर्ण उलटे दिसते. या जगात सर्वात ताकदवान आहे ती प्रकृती. इथे 'ताकदवान' म्हणजे 'वरचढ' नव्हे. पुरुष आणि प्रकृती यांचे स्वभावच पूर्णपणे वेगळे आहेत, त्यामुळे त्यांच्यात वर-खाली अशी तुलना होऊच शकत नाही. 🔸 तो: शांत, निश्चल, साक्षी सांख्यानुसार पुरुष म्हणजे पूर्ण शांतता, जिथे कोणतीही हालचाल नाही. तो अकर्ता आहे. कोणत्याही कर्माशी किंवा जगातील कोणत्याही घडामोडीशी त्याचा संबंध नाही. तरीही तो सर्वत्र आहे. तो फक्त आहे, आणि पाहतो. 🔸 ती: प्रत्येक स्पंदनामागची शक्ती अणूमधील इलेक्ट्रॉन-प्रोटॉनचे नर्तन, वाऱ्यावर थरथरणारे झाडाचे पान, आपल्या हृदयाचे ठोके... या जगातील प्रत्येक हालचालीमागे एकच तत्त्व आहे: प्रकृती, म्हणजेच शक्ती. ही स्त्री-ऊर्जा आहे. जगाची निर्मिती, त्याचे चालणे आणि त्यात होणारे बदल हा सगळा कारभार तिचाच. भगवद्गीता हेच सांगते: "मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम्।" (९.१०) अर्थ: माझ्या केवळ उपस्थितीत प्रकृती हे सारे चराचर जग जन्माला घालते. "कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते।" (१३.२०) अर्थ: प्रत्येक कृतीचे आणि कर्तेपणाचे कारण प्रकृती आहे. 🔸 सूर्य उगवला की शेतकरी शेतात जातो, फुले उमलतात, पक्षी गाऊ लागतात आणि सगळे जग कामाला लागते. पण सूर्य स्वतः यातले काहीच करत नाही. तो कोणाला उठवत नाही, कोणाला आज्ञा देत नाही. तो फक्त असतो, आणि त्याच्या असण्यामुळे सगळे घडते. सूर्य म्हणजे पुरुष आणि त्याच्या प्रकाशात चाललेला हा सगळा उत्सव म्हणजे प्रकृती. 🔸 आंधळा आणि लंगडा सांख्यकारिकेत (कारिका २१) एक अप्रतिम उदाहरण आहे. एक आंधळा आणि एक लंगडा आहेत. आंधळ्याला चालता येते पण दिसत नाही, तर लंगड्याला दिसते पण चालता येत नाही. लंगडा आंधळ्याच्या खांद्यावर बसतो आणि दोघे मिळून प्रवास पूर्ण करतात. प्रकृती चालते आणि पुरुष पाहतो. दोघांशिवाय हा प्रवास अशक्य आहे. 🔸 आकाश कधी पाहिलं आहे का? कोणाला विचारा की आकाश म्हणजे काय. तो निळाशार रंग, ढग, उडणारे पक्षी, विमान आणि इंद्रधनुष्य यांचे वर्णन करेल. पण यातले काहीच आकाश नाही! ही आकाशाच्या पटलावर चाललेली हालचाल आहे, म्हणजेच प्रकृती. आकाश स्वतः तसेच स्थिर आहे. ढग आले-गेले, वादळे उठली-शमली, तरी त्याच्यावर ओरखडाही उमटत नाही. त्याला रंग नाही, ठावठिकाणा नाही, पण अस्तित्व आहे. हाच पुरुष. 🔸 कॅमेऱ्याच्या नजरेतून एक छायाचित्रकार म्हणून मला हे रोज जाणवते. फोटोत जे काही दिसते, ते सगळे प्रकाशाचे खेळ असतात: रंग, सावल्या, चेहऱ्यावरचे भाव, सोनेरी संध्याकाळ. हा सगळा खेळ प्रकृतीचा आहे. पण ज्या कोऱ्या सेन्सरवर हे चित्र उमटते, तो स्वतः कधीच बदलत नाही. आज त्यावर वाघाचे चित्र उमटले, उद्या लग्नसोहळ्याचे उमटेल, पण तो तसाच कोरा राहतो. सिनेमाच्या पडद्याचेही तसेच आहे. पडद्यावर चालू असणाऱ्या सिनेमामध्ये आग लागली तरी पडदा जळत नाही आणि पूर आला तरी तो भिजत नाही. तो कोरा पडदा म्हणजे पुरुष. 🔸 दोन मार्ग: शक्तीचा आणि शिवाचा म्हणूनच सनातन धर्मात तंत्र आणि शक्ती-उपासनेचे अनेक मार्ग आहेत. या मार्गांत फळ लवकर मिळते आणि सिद्धी लवकर प्राप्त होतात, असे मानले जाते. अगदी पंचमहाभूतांवर नियंत्रणही मिळते असे म्हणतात. इथे शक्तीला सर्वाधिक महत्त्व आहे. याउलट, अद्वैत वेदांत थेट पुरुषाकडे, म्हणजे ब्रह्माकडे, नेतो. इथे सिद्धींचा पाठलाग नाही. त्या मिळाल्या काय किंवा न मिळाल्या काय, काहीच फरक पडत नाही. शक्तीच्या मार्गात ताकद मिळते, पण शांती मिळेलच असे नाही. महर्षी पतंजली स्पष्ट सांगतात: "ते समाधावुपसर्गाः" (योगसूत्र ३.३७) या सिद्धी समाधीच्या मार्गातील अडथळे आहेत
3
5
2
24
1,027