महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या विशेष मोहिमेत वीजचोरी व अनधिकृत वीज वापराचे प्रकार उघडकीस आले आहे.
यात पुणे प्रादेशिक विभाग- ७३, नागपूर- ६८ आणि छत्रपती संभाजीनगर - ५६ आणि कोकण प्रादेशिक विभागामध्ये ५३ चोरीचे प्रकार उघड झाले. यात २४० प्रकरणांत विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये कारवाई तर २ प्रकरणांमध्ये अनधिकृत वीज वापरापोटी कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली.
बिल व दंड वेळेत न भरल्यास फौजदारी गुन्हे दाखल होणार असून ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे!
नेहमी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करा!
#Mahavitaran #MSEDCL
महावितरणमध्ये तब्बल २३ हजारांवर विविध पदांसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत न घेता थेट भरती सुरू असल्याच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा माहिती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. केवळ दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती असल्याचे सांगत हजारो रुपयांच्या वेतनाचे आमिष दाखवले जात आहे. मात्र या सर्व जाहिराती किंवा माहिती दिशाभूल करणारी असून त्याचा महावितरणशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या नाहीत, अशा कोणत्याही बनावट जाहिरातींबाबत उमेदवारांनी सावध राहावे. सर्व पदांच्या भरती प्रक्रियेबाबतची कोणतीही अधिकृत जाहिरात किंवा वेळोवेळी दिली जाणारी माहिती ही केवळ महावितरणच्याच mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. उमेदवारांनी महावितरणमधील कर्मचारी भऱतीबाबत कोणतीही माहिती किंवा जाहिरातीबाबत अधिकृत संकेतस्थळावर खात्री करून घ्यावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यासोबतच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक देखील महावितरणच्याच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे उमेदवारांनी फसवणूक टाळण्यासाठी सोशल मीडियावरून प्राप्त झालेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या व चुकीच्या माहितीवर उमेदवारांनी किंवा नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
#Mahavitaran #MSEDCL
मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनात गेल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात मानव संसाधन विभागाने राबवलेल्या विविध उल्लेखनीय कामगिरीचा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा लेखाजोखा मांडणारे ‘प्रकाशगाथा; महावितरणच्या मानव संसाधनाची!’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी पुस्तकाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना सविनय भेट दिली. या पुस्तकाचे मा. मुख्यमंत्री महोदयांनी आस्थेने अवलोकन करत महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक योगदानाचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
#Mahavitaran #MSEDCL
Powering Maharashtra's Next Energy Revolution!
From 15% to 52% renewable energy by 2030, Maharashtra is accelerating its transition towards a cleaner energy future.
With peak electricity demand projected to reach 45 GW by 2030 and data centres emerging as a major driver of consumption, Mahavitaran is geared towards supporting the state's evolving energy needs.
The ambition is clear: 65% renewable energy in the coming decade.
Building a future powered by clean energy, innovation and reliability!
Read the full article: bloomberg.com/news/articles/…
#Mahavitaran #MSEDCL #RenewableEnergy #CleanEnergy #EnergyTransition
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या राजकीय आणि आर्थिक वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या जयंतीनिमित्त महावितरण परिवारातर्फे विनम्र अभिवादन! राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाची एकता, अखंडता आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प करूया!
#Mahavitaran #MSEDCL #IndiraGandhiJayanti
सूर्यशक्तीचा सूर्योदय! महाराष्ट्राची सौर ऊर्जेत ऐतिहासिक झेप!
महाराष्ट्राच्या घराघरांत आता सूर्यऊर्जेचा प्रकाश पोहोचत आहे! ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजने’ला राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सौर ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये ३.९२ लाख असलेली रूफटॉप सोलर प्रकल्पांची संख्या नोव्हेंबर २०२६ मध्ये तब्बल ८.९५ लाखांवर पोहोचली आहे. अवघ्या एका वर्षात झालेली ही १२८ टक्क्यांची वाढ राज्याच्या सौर ऊर्जेच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
देशभरात वितरित झालेल्या एकूण केंद्रीय अनुदानापैकी २१ टक्क्यांहून अधिक वाटा महाराष्ट्राने मिळवला असून, पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत तब्बल ६,३७५ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यामुळे राज्याची रूफटॉप सौर ऊर्जा निर्मिती क्षमता ३,३९२ मेगावॅटवर पोहोचली आहे. जिल्हानिहाय कामगिरीत नागपूर १ लाख २६ हजार २७३ प्रकल्पांसह आघाडीवर असून, पुणे जिल्ह्यात ६५ हजार ९४८ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यांनीही या अभियानात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
विशेष म्हणजे, सौरऊर्जेमुळे ग्राहकांना दरमहा ८०० ते २,४०० रुपयांपर्यंत वीजबिलात बचत करण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे सौरऊर्जा ही केवळ पर्यावरणपूरक वीज निर्मिती न राहता सर्वसामान्यांच्या आर्थिक बचतीचे प्रभावी साधन ठरत आहे.
महाराष्ट्राची सौर भरारी नवनवीन विक्रम प्रस्थापित करत असून, देशाच्या हरित ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा देत आहे.
#Mahavitaran #MSEDCL #RooftopSolar #PMSuryaGhar #SolarEnergy #RenewableEnergy #GreenMaharashtra
Maharashtra's Solar Power Surge: 128% Growth in Just One Year!
Maharashtra is making remarkable strides in its solar energy journey! Driven by the strong response to the PM Surya Ghar: Muft Bijli Yojana, rooftop solar installations have surged from 3.92 lakh in December 2025 to an impressive 8.95 lakh in November 2026.
With ₹6,375 crore in central subsidies and a rooftop solar generation capacity of 3,392 MW, Maharashtra accounts for over 21% of the central subsidy disbursed nationwide. Nagpur leads the state's district-wise performance with 1,26,273 installations, followed by Pune with 65,948.
Beyond clean energy, rooftop solar is delivering tangible benefits to households, offering potential monthly electricity bill savings of ₹800 to ₹2,400, along with the opportunity to benefit from surplus power supplied to the grid.
Mahavitaran is powering Maharashtra's solar transformation, enabling households to embrace clean energy, save on electricity costs and contribute to a greener, energy-secure future!
#Mahavitaran #MSEDCL #RooftopSolar #PMSuryaGhar #SolarEnergy #RenewableEnergy #GreenMaharashtra
दिवाळी आणि भाऊबीजेचा आनंद सर्वजण कुटुंबीयांसोबत साजरा करत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मुचरी आणि तेरे परिसरातील नागरिकांवर मात्र अंधाराचे सावट पसरले होते. ऐन दिवाळीत मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळामुळे तब्बल ४० वीज खांब कोसळले आणि ८ रोहित्रांचा वीजपुरवठा बंद झाला. परिणामी सुमारे ५०० घरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
घनदाट जंगल, दुर्गम भाग आणि सततची आव्हाने समोर असतानाही महावितरणच्या जिगरबाज अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी स्वतःचा सण बाजूला सारत सलग ५ दिवस अहोरात्र मेहनत घेतली. हे काम पूर्ण करायला १०-१२ दिवस लागण्याची शक्यता असताना केवळ ५ दिवसांत वीजयंत्रणा पुन्हा उभी करत या शिलेदारांनी ग्राहकांचे घर पुन्हा प्रकाशमान केले.
अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे, उपकार्यकारी अभियंता फारूक गवंडी तसेच जनमित्र रवी कदम, ओंकार कळंबटे, किशोर लाड, अंकेश गेले, राहुल धनावडे, विश्वनाथ जोशी, विलास भरणकर, अक्षय खानविलकर, किरण मोरे, विनिल काष्टे आणि रमेश कदम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
#Mahavitaran #MSEDCL
ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करत आदिवासी समाजाचे हक्क, जल-जंगल-जमिनीवरील अधिकार आणि सांस्कृतिक अस्मितेच्या रक्षणासाठी लढा देणारे महान जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महावितरण परिवारातर्फे विनम्र अभिवादन!
#Mahavitaran #MSEDCL #BhagwanBirsaMundaJayant
स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही संस्थांची उभारणी, वैज्ञानिक संशोधन, उच्च शिक्षण आणि औद्योगिक विकासाला चालना देणारे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महावितरण परिवारातर्फे विनम्र अभिवादन!
#Mahavitaran #MSEDCL #PanditJawaharlalNehruJayanti
प्रत्येक बालकाला शिक्षण, संधी आणि प्रगतीची समान संधी मिळो. सर्व बालकांना महावितरण परिवारातर्फे बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#Mahavitaran #MSEDCL #ChildrensDay
🤖 Made with AI
बहिण-भावाच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकी अधिक दृढ होवो. महावितरण परिवारातर्फे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
#Mahavitaran #MSEDCL #BhaiDooj
MSEDCL’s ambitious growth and transformation roadmap takes centre stage!
In a conversation with ET Manufacturing, Shri Lokesh Chandra, Chairman and Managing Director, MSEDCL, highlighted the company’s proposed IPO, ₹60,000 crore investment plans, and focus on strengthening power infrastructure, operational efficiency and renewable energy integration.
Read the full article: manufacturing.economictimes.…
#Mahavitaran #MSEDCL
दीपावलीचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन येवो. महावितरण परिवारातर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
#Mahavitaran #MSEDCL #Diwali
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचा सामाजिक पुढाकार!
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३ कोटी ६८ लाख १७ हजार ८८७ रुपयांचे योगदान दिले आहे. वर्ग एकच्या अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी स्वेच्छेने या मदतकार्यात सहभाग नोंदवला.
मुंबई येथे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मदतीचा धनादेश अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला आणि मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सुपूर्द केला. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विक्रम कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राधाकृष्णन बी. तसेच महावितरणचे संचालक श्री. धनंजय औंढेकर (संचालन), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), श्री. अनुदीप दिघे (वित्त) आणि श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) उपस्थित होते.
#Mahavitaran #MSEDCL
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd retweeted
☀️Heartiest congratulations to our Energy Department for this outstanding achievement!
Your team work and hard work has brought National honour to Maharashtra in the renewable energy sector and it stands out the best among 36 States !
Onwards and upwards… ☀️
@MeghnaBordikar @mahaurja
#renewable
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट घेऊन महाराष्ट्राला नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीसाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला !
@MeghnaBordikar
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd retweeted
Yet another accolade for Renewable Energy work!
Congratulations Maharashtra !
Maharashtra ranks 2nd among 36 States / UT in the ‘Renewable Energy State Assessment Framework 2026’, scoring 76.07 points at the ‘Bharat Renewable Energy Summit & Expo 2026’ held in New Delhi.
The award was presented by Hon Vice President CP Radhakrishnan and received by Maharashtra Minister of State Meghna Sakore-Bordikar & ACS.
This recognition reflects on Maharashtra’s strong performance in renewable energy, driven by initiatives such as the Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana - 2.0, Magel Tyala Saur Krushi Pump Yojana and the PM Surya Ghar Muft Bijli Yojana, under the visionary leadership of CM Devendra Fadnavis.
नवीकरणीय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्राची दमदार कामगिरी! महाराष्ट्राचे अभिनंदन !
नवी दिल्ली येथे आयोजित ‘भारत रिन्यूएबल एनर्जी समिट अँड एक्सपो 2026’ (Bharat Renewable Energy Summit & Expo 2026) मध्ये, ‘रिन्यूएबल एनर्जी स्टेट असेसमेंट फ्रेमवर्क 2026’ (Renewable Energy State Assessment Framework 2026) अंतर्गत, 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत महाराष्ट्र 76.07 गुणांसह महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
हा पुरस्कार माननीय उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, जो महाराष्ट्राच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि अपर मुख्य सचिव (ACS) यांनी स्वीकारला.
ही मान्यता नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने केलेल्या दमदार कामगिरीचे प्रतिबिंब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - 2.0’, ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ आणि ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना’ यांसारख्या उपक्रमांमुळे हे यश शक्य झाले आहे.
@CPR_VP @Dev_Fadnavis @MeghnaBordikar
#Maharashtra #DevendraFadnavis #RenewableEnergy
धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो. महावितरण परिवारातर्फे धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#Mahavitaran #MSEDCL #Dhanteras
Under the leadership of Hon'ble Chief Minister Shri Devendra Fadnavis, Maharashtra has achieved national recognition for its remarkable progress in renewable energy. The Renewable Energy State Assessment Framework (RE-SAF) Award, recognising the State's second-place ranking nationally, was presented by Hon'ble Vice-President Shri C. P. Radhakrishnan to Maharashtra's Minister of State for Energy, Smt. Meghna Sakore-Bordikar, and Additional Chief Secretary (Energy), Smt. Abha Shukla, in the presence of Shri Pralhad Joshi, Minister of New and Renewable Energy, and Shri Shripad Naik, Minister of State for New and Renewable Energy, in New Delhi.
@CMOMaharashtra | @CPR_VP | @MeghnaBordikar | @JoshiPralhad | @shripadynaik
#Mahavitaran #MSEDCL
Maharashtra Shines on the National Renewable Energy Map!
Maharashtra has earned national recognition for its outstanding performance in the renewable energy sector, securing the 2nd rank among the best-performing states in India under the Renewable Energy State Assessment Framework (RE-SAF).
This recognition, based on the assessment by the Ministry of New and Renewable Energy (MNRE) and Power Finance Corporation (PFC), acknowledges the state's significant contribution to India's clean energy transition.
Under the leadership of Hon'ble Chief Minister Shri Devendra Fadnavis, Maharashtra continues to make remarkable strides towards a sustainable and environmentally responsible energy future, contributing to India's ambitious target of 500 GW of renewable energy.
The prestigious award was presented by Hon'ble Vice-President of India Shri C. P. Radhakrishnan to Maharashtra's Minister of State for Energy, Smt. Meghna Sakore-Bordikar, and Additional Chief Secretary (Energy), Smt. Abha Shukla, in the presence of Shri Pralhad Joshi, Minister of New and Renewable Energy, and Shri Shripad Naik, Minister of State for New and Renewable Energy, at the concluding ceremony of Bharat RE Summit & Expo 2026 in New Delhi on November 5, 2026.
A national recognition of Maharashtra's green energy leadership and a strong step towards a sustainable tomorrow!
#Mahavitaran #MSEDCL #RenewableEnergy #GreenEnergy #SustainableMaharashtra #BharatRESummit2026



















