मराठा_क्रांती_मोर्चा (@mumbaimkm) header
मराठा_क्रांती_मोर्चा (@mumbaimkm) profile picture

मराठा क्रांती मूक महामोर्चा मराठा क्रांती ठोक मोर्चा

Mumbai, India
Joined July 2017
Photo by मराठा_क्रांती_मोर्चा (@mumbaimkm)Photo by मराठा_क्रांती_मोर्चा (@mumbaimkm)Photo by मराठा_क्रांती_मोर्चा (@mumbaimkm)Photo by मराठा_क्रांती_मोर्चा (@mumbaimkm)Photo by मराठा_क्रांती_मोर्चा (@mumbaimkm)Photo by मराठा_क्रांती_मोर्चा (@mumbaimkm)Photo by मराठा_क्रांती_मोर्चा (@mumbaimkm)Photo by मराठा_क्रांती_मोर्चा (@mumbaimkm)Photo by मराठा_क्रांती_मोर्चा (@mumbaimkm)Photo by मराठा_क्रांती_मोर्चा (@mumbaimkm)
मराठा_क्रांती_मोर्चा retweeted
पुण्यातल्या कल्याणी नगरमधला अपघात नाही तर, भ्रष्ट पोलिस भ्रष्ट व्यवस्था भ्रष्ट प्रशासन भ्रष्ट राजकारणी भ्रष्ट व्यावसायिक भ्रष्ट एक्साईज विभाग  भ्रष्ट शोरुम मालक ज्याने क्रमांकाशिवाय गाडी दिली, यांनी केलेला खून आहे. -जर नियमाप्रमाणे पब बंद असते -जर नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलांना मद्य दारू पबमध्ये पुरवली नसती -जर नियमाप्रमाणे शोरुमने ती कार क्रमांकाशिवाय दिली नसती -जर नियमाप्रमाणे पालकांनी अल्पवयीन मुलाला ती कार चालवायला दिली नसती,  - जर नियमाप्रमाणे ट्राफिक पोलिसांनी गाडीवर कारवाई केली असती तर दोन्ही तरणी पोरं रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली नसती.. ऐरवी साधा हेल्मेट नाही घातला, लायसन्स, पियुसी जवळ नाही म्हणून ट्राफिक पोलिस टोळधाड पडल्यासारखे अंगावर येऊन आपल्या खिश्याचे लचक तोडतात. मग रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर बिना नंबर प्लेटची डोळ्यात भरणारी महागडी गाडी सुसाट पळतेय हे दिसत असूनही वाहतूक पोलिसांनी कारवाई का केली नाही.?   वरुन मागच्या दाराने पोलिस ज्याने दोघांना चिरडलं, २ कुटुंब उध्वस्त केली अश्या नालायकाला ताब्यात घेतल्यावर मागच्या दाराने बिर्याणी पिझ्झा बर्गर पुरवतात...आपल्याहातून २ जणं मेल्याचा जराही गिल्ट नसलेला बड्या बापाचा पोरगा तो निर्लज्जपणे खातो सुद्धा.  मेलेल्यांना न्याय द्यायला नाही तर आरोपीला शिक्षेपासून वाचवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी न्यायालय कामकाज करतं का? आणि काही तासात नजराणा पेश करावा तसा जामिन मंजूर होतो. अशी भावना आहे दोघांचा जीव गेला आणि न्यायालयाने रविवार असून बक्षिस द्यावं तसा जामिन दिला, त्यात अट काय तर -३०० शब्दांचा निबंध लिहीण्याची - मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेण्याची - १५ दिवस वाहतूकीचे धडे गिरवण्याची...यापेक्षा जास्त शिक्षा तर शाळेत द्यायचे...इथे २ पोरं मेली...  -विदाऊट लायसन्स गाडी चालवल्यास ३ महिने तुरुंगवास -अल्पवयीनाने वाहन चालवल्यास ३ महिन्यांचा तुरुंगवास -मद्यपान करुन वाहन चालवल्यास ६ महिन्यांचा तुरुंगवास  - ओव्हरस्पिडींग असल्यास १ महिन्याचा तुरुंगवास  अहो साधं रेल्वे मध्ये विनातिकीट प्रवास केला तरी ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे आणि इथें १५ तासात जामिन...वा.... यात निर्लज्ज पणाचा कळस म्हणजे दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी एक आमदार पुढे येतो आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो हे तर भयंकर आहे. पुणेकर न्यूज/ pune mirror च्या दाव्यानुसार वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हेच ते नेते आहेत ज्यांनी आरोपी गाडी चालवत नव्हता असा बनाव रचण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षदर्शीनी तो हाणून पाडला.  हे खरं असेल तर अश्यांची पक्षातून सुद्धा हकालपट्टी व्हायला हवी.  मेलेल्या दोघांना मी ओळखत नाही... पण उद्या हेच तुमच्या माझ्यासोबत सुद्धा घडू शकतं.. म्हणून आपण बोललं पाहीजे... निदान या निर्ढावलेल्या व्यवस्थेपुढे तेवढं तरी ताठ मानेने आपण करायला हवं..  तडकाफडकी मिळालेल्या जामिनाची पुणे पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे.  तसच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आऱोपीवर कठोर कारवाईच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसच पोलिस स्टेशनमधलं सीसीटीव्हीही तपासण्याचे आदेश दिलेयत. कारवाई होईल, न्याय मिळेल ही अपेक्षा!!!
542
2,707
132
7,972
332,829
मराठा_क्रांती_मोर्चा retweeted
कल्याणीनगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणजे परत कोणी पैश्यावाल्याची औलाद अशी मस्ती करणार नाही. या घटनेतील दोषी - १) पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल आग्रवाल ज्याने मुलाला ही आलीशान गाडी चालविण्यास दिली.या विशाल अग्रवालला तातडीने अटक झाली पाहिजे. २)अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या मुंढव्यातील Cosie रेस्टॉरंट, Marriott suits मधील Black पब,Ballr पब या सर्व पब मालकांवर देखील अटकेची कारवाई करत हे पब कायम स्वरुपी बंद केले पाहिजे. ३)येरवडा पोलीस स्टेशन मधील विकली गेलेली कायदा व सुव्यवस्था ज्यांनी अगदी किरकोळ कलमे लावून मुलाच्या जामिनासाठी रेड कार्पेट टाकून दिले.पैश्याच्या जिवावर दोघांना किड्या मुंगी प्रमाणे चिरडणाऱ्या या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये बिर्याणी आणि पिझ्झा आणून खाऊ घातला.या पोलिसांवर कारवाई करत येथील अधिकारी कर्मचारी निलंबित केले गेले पाहिजे. ही घटना एवढी भयानक होती की मागे बसलेली अश्विनी कोस्टा सुमारे 10 ते 15 फूट हवेत उडून खाली पडली. डोक्याला मार लागल्याने तिचा जागेवरच म्रुत्यु झालेला आहे. अनिस अवधिया देखील गंभीर जखमी होऊन तडफडत पडला होता, त्याची हालचाल बघून काही तरुणांनी त्याला उचलून एका रिक्षामध्ये टाकले आणि नगर रोडवरील सह्याद्री हाँस्पीटलमध्ये नेले, परंतु हाँस्पीटलमध्ये पोचण्यापूर्वीच त्याचाही म्रुत्यु झाला. सुरूवातीला वेदांत अल्पवयीन असल्याचा ड्रामा करण्यात आला. तो देखील फार काळ टिकला नाही. अगदी सलमान खान हीट अँण्ड रन केसप्रमाणे ड्रायव्हर ला ही उभे करण्यात आले, परंतु प्रत्यक्षदर्शींनी मात्र मयत तरुण आणि तरूणीची बाजू मांडली. गाडी विशाल आग्रवालचा मुलगाच चालवत होता आणि ड्रायव्हर बाजूला बसलेला होता याचे व्हीडीओ पुरावे त्यांनी पोलिसांना दिले. येथे कारवाई चा पाठपुरावा करणाऱ्यांना देखील शांत राहण्यासाठी आँफर दिली जात होती. अखेर येरवडा पोलिसांनी मुला विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. बर्याच केसेसमध्ये उशिरा अटक दाखवून , आरोपीला कायद्याचा धाक रहावा या उद्देशाने एक दिवस कोठडीमध्ये ठेवण्यात येते. येथे मात्र तत्परतेने CRPC च्या तरतुदींचे तंतोतंत पालन करत आरोपीला सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आले. सर्व सेक्शन्स Bailable असल्यामुळे वेदांत चा तात्काळ जामीन झाला. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. #justicefor_anishashwini
318
1,659
82
6,504
433,637
मराठय़ांनो, आपले पहिले लक्ष स्वतः आझद मैदान पोहचणे नाही तर जारांगे पाटील साहेबांना आझद मैदान सुखरूप पोहचवणे आहे, शुरवीर बाजी प्रभु देशपांडे यांच्या सारखी खिंड लढवा. दादा पोहचले किं मेसेज च्या तोफ़ा गडगडतील, तेव्हा आपले काम फ़त्ते होईल आणि मग आझाद मैदानावर पोहचू
43
आज ठाणे शहरात जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करणार्या सर्व मराठा बंधू भगिनी, त्याच सोबत सदरचा कार्यक्रम सुरळीत पाडण्यासाठी सदैव तत्पर @ThaneCityPolice यांचे हार्दिक आभार #ठाणे_मराठा_क्रांती_मोर्चा
28
नवीन सकल मराठा समाज ??? @CMOMaharashtra या फोटोतील २ लोक तुमच्या ठाणे पक्षीय कार्यालयात कामाला आहेत आणि सदरच्या व्यक्तीने दिलेल्या पत्रावर पत्ता आहे का जरा तपासा @mieknathshinde
29
सरकारला 50 दिवसापेक्षा जास्त वेळ देऊन ही सरकार आज ही खोटी आश्वासन देत आहे. अजून किती दिवस, महिने, वर्ष मराठा समाजाला अशीच खोटी आश्वासने देणार. कायदा व सुव्यवस्था जी बिधडली आहे त्या फक्त सरकारचं जबाबदार आहे @CMOMaharashtra
21
सकल मराठा समाज ठाणे, मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाचा 4था दिवस.
16
मराठा आरक्षणासाठी आंदोलन मनोज जरांगे पाटील करीत आहेत. सरकारने त्यांच्याशीच चर्चा करावी. इतरांशी बोलून काहीच उपयोग नाही. दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला अशी अवस्था दिसते.@goacm
36
#ठाणे_बंद #ठाणे #बंद #११_सप्टेंबर #सोमवार जालना येथे शांततेत उपोषण करणाऱ्या मराठा बांधवावर अमानुष लाठी हल्याचा निषेधर्थ आणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी #ठाणे_बंद #ठाणे_बंद सोमवार दी.८ सप्टेंबर आज ठाण्यातील शासकीय विश्राम गृहात ठाणे शहरातील मराठा समाजाच्या सोमवारच्या ठाणे
2
95
बंदच्या बद्दल बैठक पार पडली.ह्या बैठकीला ठाण्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. आयोजक - #सकल_मराठा_समाज_ठाणे
2
38
आता सरकार सोबत बंद दाराआड चर्चा नको मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाईव्ह येऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे @mieknathshinde
1
46
मराठा_क्रांती_मोर्चा retweeted
Replying to @mieknathshinde
बोला काही तरी, महाराष्ट्र गृहमंत्री च्या अधिकारी खाली येणाऱ्या पोलिसांनी निर्दोष मराठा आंदोलकावर जो गोळीबार झालंय तो खरंच स्तुती योग्य आहे म्हणून 💁‍♂️ सिद्ध करा 🤷‍♂️मोदी भक्ती 😂
3
8
2
51
2,784
अंतरवली (जिल्हा - जालना) येथे मराठा आरक्षनासाठी स्थानिक मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होता.यात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. परंतु एक आदेश येतो आणि या बांधवांवर पोलीस अमानुष लाठीहल्ला करतात.याची तीव्रता इतकी असते की,अनेक सामान्य नागरिक अक्षरशः रक्तबंबाळ
2
1
53
होतात. राज्यातील एखादा समाज शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या सरकारच्या समोर ठेवत असताना,त्यांच्यावर असा अमानुष लाठीचार्ज करणे,हे सरकारला शोभत नाही.केंद्रात आणि राज्यात सरकार असताना देखील मराठा बांधवांना,आरक्षण देण्याची हमी देण्याचं सौजन्य सुद्धा हे सरकार दाखवत नाही.उलट
1
28
त्यांच्यावरच लाठीचार्ज करून या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत.मराठा समाजावर झालेल्या या अमानुष हल्ल्याचा जाहीर निषेध.
1
25
मराठा_क्रांती_मोर्चा retweeted
निर्दयी पोलीस कुणाच्या आदेशाने असे अमानुषपणे वागत होते? #JalnaProtest #jalnamarathaprotest #जालना_लाठीचार्ज
2
64
4
146
4,065
मराठा_क्रांती_मोर्चा retweeted
पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाला = उपमुख्यमंत्री अजित पवार. आंदोलकांनी पोलिसांना घेरून दगडफेक केली. लाठीचार्ज करताना कोणी जखमी होऊ नये याची काळजी घेतली = गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. लोकांना चुत्या समजता का? मराठा आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रकार बंद करा. नपूंसक सरकार
36
169
10
1,135
46,100
मराठा_क्रांती_मोर्चा retweeted
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो. ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित. राहता राहिला प्रश्न ह्या संवेदनशील विषयाचा, तर ह्याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? (इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं). मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे. साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं ह्या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत. काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे. माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की ह्या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि ह्यापुढे पण राहील. राज ठाकरे
225
726
47
4,802
266,909