इतर मागास बहुजन कल्याण,दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री, महाराष्ट्र राज्य. संचालक,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , छ.संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar
Joined August 2018
आपण भरभरून मतदान करून भगव्याची शान राखली.. आता छत्रपती संभाजीनगर नावाला शोभेल असा विकास घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! #भाजपाचे_छत्रपती_संभाजीनगर
4
1
26
6,641
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.. कुटुंबीयांसमवेत त्यांचे स्वागत करून विविध विषयांवर औपचारिक, अनौपचारिक चर्चा केली.. #सदिच्छा_भेट #ShivendrasinhRajeBhosale
2
7
403
रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचे आदर्श जीवन रामायणातून सर्वांपर्यंत पोहोचविणाऱ्या महर्षी वाल्मिकी यांचे साहित्य सत्य व कर्तव्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. #महर्षी_वाल्मिकी #जयंती #MaharshiValmiki #ValmikiJayanti
3
97
देवेंद्र सेवा महोत्सव अंतर्गत ‘शिवतेजाचा हुंकार, बळीराजाला मदतीचा आधार!’ या संकल्पनेतून शहरात प्रथमच हे महानाट्य सादर होणार आहे.. सर्वांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित रहावे! प्रताप पुरंदर महानाट्य पत्रकार परिषद संपन्न.. #देवेंद्र_सेवा_महोत्सव #बळीराजा #DevendraSevaMahotsav #PratapPurandar
2
9
279
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचे उद्बोधक विचार, देशातील महत्त्वाच्या घडामोडी आणि विकासाचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी.. ‘मन की बात’ नक्की ऐका! रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ वेळ : सकाळी ११ वा. #मन_की_बात #जनसंवाद #MannKiBaat #PMModi
2
1
5
272
तीर्थक्षेत्र रांजणगाव येथे महागणपतीचे दर्शन घेऊन आरती केली.. राज्यातील शेतकऱ्यांना समृद्धी लाभावी, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.. #रांजणगाव #महागणपती #ranjangaon
1
7
170
संपूर्ण महाराष्ट्रात विशेष मतदार नोंदणी शिबिरे! लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी मतदार यादीत आपले नाव योग्य तपशिलांसह नोंदलेले असणे आवश्यक आहे.. मतदार यादीतील नाव व तपशील तपासून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात २४ व २५ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.. आपल्या नियुक्त मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीतील नाव, पत्ता आणि इतर तपशील तपासून घ्या. नाव वगळले असल्यास नोंदणीसाठी, तसेच तपशिलांमध्ये चूक असल्यास दुरुस्ती किंवा बदलासाठी आवश्यक अर्ज करता येईल.. वेळेत मतदार यादी तपासून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा आणि लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सजग नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी, ही विनंती.. #मतदार_नोंदणी #लोकशाही #VoterRegistration #ElectionCommission
1
5
271
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.. पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे संपन्न झालेल्या या शिबिराचा उद्देश भटक्या जमाती आणि विमुक्त जातींमधील नागरिकांना १४ प्रकारची प्रमाणपत्रे, ६ शासकीय योजनांचे लाभ तसेच इतर विभागांच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.. शासन, प्रशासन आणि सामाजिक संघटनांमध्ये समन्वय साधून शासकीय सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर यावेळी भर देण्यात आला.. ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानात’ राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ९३६ वस्त्यांचा समावेश करण्यात आला.. एकूण ७६६ ठिकाणी आयोजित शिबिरांतून ७६ हजार १७५ लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे आणि योजनांचे लाभ देण्यात आले.. यामध्ये ११ हजार २५८ जात प्रमाणपत्रे, ८ हजार २८७ आयुष्मान भारत कार्ड, ८ हजार २६६ शिधापत्रिका, ८ हजार २१२ उत्पन्नाचे दाखले आणि ६ हजार ३२६ आधार कार्ड वितरित करण्यात आले.. याशिवाय इतर आवश्यक प्रमाणपत्रे आणि योजनांचे लाभही देण्यात आले.. या मोहिमेद्वारे आतापर्यंत विमुक्त जाती आणि भटक्या जमातींमधील नागरिकांना एकूण ३ लाख २७ हजार ६७३ शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.. नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये जाण्याऐवजी शासनाने त्यांच्या वस्त्यांपर्यंत पोहोचून सेवा द्यावी, हा या अभियानामागील महत्त्वाचा विचार आहे.. यावेळी सचिव श्री.आप्पासाहेब धुळाज, भटके-विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष श्री.उद्धवराव काळे, डॉ.संजय पुरी, श्री.शरद माकर यांच्यासह परिषदेचे १५० सदस्य तसेच महसूल विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.. #भटके_विमुक्त #शासकीय_योजना #TribalWelfare #GovernmentSchemes
2
5
18
267
रांजणगाव येथील महागणपतीचे दर्शन घेऊन आरती केली.. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!! #रांजणगाव #MahaGanpati
4
166
आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी : ११४ पदकांसह नवा विक्रम! २०२६ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. जपानमधील आयची-नागोया येथे ही स्पर्धा झाली. भारतीय दिव्यांग खेळाडूंनी या स्पर्धेत एकूण ११४ पदके जिंकली. यात ३० सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४९ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताने पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. facebook.com/share/p/1Bg3ZUY… #आशियाई_पॅरा_गेम्स #दिव्यांग_खेळाडू #AsianParaGames #ParaSports #KheloIndia
3
122
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी संकलित करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या महानाट्याच्या संदर्भात पत्रकार परिषद संपन्न झाली.. मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित देवेंद्र सेवा महोत्सव अंतर्गत ‘शिवतेजाचा हुंकार, बळीराजाला मदतीचा आधार!’ या संकल्पनेतून शहरात प्रथमच हे महानाट्य सादर होणार आहे.. #देवेंद्र_सेवा_महोत्सव #बळीराजा #DevendraSevaMahotsav #PratapPurandar
5
223
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्ही मतदानाचा हक्क बजावला.. आपणही मतदान करावे!! लक्षात ठेवा, प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे आहे.. #मराठवाडा_पदवीधर #मतदारसंघ #मतदान #Graduate_Constituency #Voting
1
1
5
229
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला.. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करणे महत्त्वाचे आहे.. आपले मत ही लोकशाहीतील महत्त्वाची ताकद आहे. सर्व पात्र मतदारांनी मतदानात सहभागी व्हावे, ही विनंती.. #मराठवाडा_पदवीधर #मतदारसंघ #मतदान #Graduate_Constituency #Voting
2
2
5
211
श्री सद्गुरु बाळूमामा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! बाळूमामांनी आपल्या कार्यातून सेवा, साधेपणा आणि माणुसकीचा संदेश दिला.. त्यांच्या विचारांतून प्रत्येक जीवाबद्दल प्रेम आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याची प्रेरणा मिळते.. #सद्गुरु_बाळूमामा #बाळूमामा_जयंती #SadguruBalumama #Jayanti
5
110
देवेंद्र सेवा महोत्सवाच्या वतीने आयोजित ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या भव्य ऐतिहासिक महानाट्याची जय्यत तयारी! #देवेंद्र_सेवा_महोत्सव #प्रौढ_प्रताप_पुरंदर #छत्रपती_संभाजीनगर #ChhatrapatiSambhajinagar
3
179
देवेंद्र सेवा महोत्सवाच्या वतीने आयोजित ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या भव्य ऐतिहासिक महानाट्याच्या तयारीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील जाबिंदा मैदानावर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महानाट्य पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची आसनव्यवस्था, सोयी-सुविधा आणि कार्यक्रमाचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. #देवेंद्र_सेवा_महोत्सव #प्रौढ_प्रताप_पुरंदर #जाबिंदा_मैदान #छत्रपती_संभाजीनगर #ChhatrapatiSambhajinagar
1
4
212
'EV कार लोन मेळावा व टेस्ट ड्राईव्ह कॅम्प' एचडीएफसी बँक, ज्योती नगर शाखा, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांचा अनुभव, टेस्ट ड्राईव्ह आणि आकर्षक कर्ज सुविधांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल एचडीएफसी बँकेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन! #EVCarLoanMela #ElectricVehicles #GreenFuture #HDFCBank #ChhatrapatiSambhajinagar
1
6
246
एचडीएफसी बँकेच्या वतीने आयोजित ‘EV कार लोन मेळावा व टेस्ट ड्राईव्ह कॅम्प’मध्ये नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनांची अनुभूती घेण्याची आणि आकर्षक कर्ज सुविधांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली.. #EVCarLoanMela #ElectricVehicles #GreenFuture #HDFCBank
2
6
245
दशकांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेत केंद्रीय गृहमंत्री ना.श्री.अमित शाह साहेब यांनी देशाच्या राजकारणात निर्णायक नेतृत्वाची छाप उमटवली आहे. कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय आणि नक्षलवादाविरोधातील लढ्याला मिळालेली गती हे त्यांच्या कार्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. #HBDayAmitShah
1
98
‘आधुनिक भारताचे चाणक्य’, केंद्रीय गृह व सहकार मंत्री ना.श्री.अमितभाई शाह साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन फौजदारी कायदे, नक्षलवादमुक्त भारताचे उद्दिष्ट आणि सशक्त सीमा सुरक्षा या माध्यमांतून त्यांनी भारताच्या अंतर्गत सुरक्षेला नवे बळ दिले आहे. ‘सहकारातून समृद्धी’ आणि ‘राष्ट्रप्रथम’ या संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवल्या आहेत.. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! #AmitShah #BJP #वाढदिवस #शुभेच्छा #राष्ट्रसेवा
1
6
208