Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) header
Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) profile picture

Entrepreneur | Social Activist | Politician Interested in Urban Development, Youth & Women Empowerment, Sports

Pune
Joined April 2010
Photo by Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan)Photo by Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan)Photo by Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan)Photo by Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan)Photo by Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan)Photo by Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan)Photo by Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan)Photo by Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan)Photo by Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan)Photo by Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan)
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. महेशदादा लांडगे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! महेशदादा आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सोमेश्वरचरणी प्रार्थना! @maheshklandge #HappyBirthday #MaheshLandge
16
पुणे महानगरपालिकेतील सहकारी नगरसेवक मा. श्री. राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सोमेश्वरचरणी प्रार्थना! #HappyBirthday #raghvendramankar @bapumankarbjp
16
औंध रोड-बोपोडी परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कॅन्सर डायग्नोस्टिक अँड सपोर्ट सेंटरची उभारणी तसेच कै. बाबुराव शेवाळे दवाखान्याचे नूतनीकरण आणि परिसर सुशोभीकरण या महत्त्वपूर्ण कामांचा भूमिपूजन सोहळा काल उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पुणे महानगरपालिका, आर.एस.बी. फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे डाउनटाउन यांच्या संयुक्त सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या सोहळ्याला शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. सिद्धार्थदादा शिरोळे, उपमहापौर मा. श्री. परशुरामजी वाडेकर, सहकारी नगरसेविका सौ. भक्तीताई गायकवाड, सौ. सपनाताई छाजेड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. @SidShirole @ParshuramW1 @BhaktiGaikwad09 #sunnynimhan #HealthcareDevelopment #CancerCare #CancerDiagnosis #AundhBopodi
76
पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. २७ च्या नगरसेविका तथा शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा श्रीमती स्मिताताई वस्ते यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सोमेश्वरचरणी प्रार्थना! #HappyBirthday #smitavaste
20
सोमेश्वरवाडीतील सोमेश्वर महादेव मंदिरात पारंपरिक जल्लोष आणि उत्साहात त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. मंदिर परिसर पणत्यांच्या प्रकाशाने आणि आकर्षक रोषणाईने उजळून निघाला होता. महादेवाच्या पूजेनंतर झालेल्या नेत्रदीपक आतषबाजीने उत्सवाची रंगत आणखी वाढवली. सर्वत्र भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. #SomeshwarMahadevTemple #TripurariPurnima #KartikPurnima #HarHarMahadev #LordShiva
59
औंध-बोपोडीच्या आरोग्य सुविधांना नवे बळ ! औंध रोड-बोपोडी परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कॅन्सर डायग्नोस्टिक अँड सपोर्ट सेंटरची उभारणी तसेच कै. बाबुराव शेवाळे दवाखान्याचे नूतनीकरण आणि परिसर सुशोभीकरण या महत्त्वपूर्ण कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पुणे महानगरपालिका, आर.एस.बी. फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे डाउनटाउन यांच्या संयुक्त सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या सोहळ्याला शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. सिद्धार्थदादा शिरोळे, उपमहापौर मा. श्री. परशुरामजी वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. कर्करोगाचे निदान, रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन आणि सहाय्य यासाठी स्वतंत्र केंद्र उपलब्ध होणे, तसेच दवाखान्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणे, ही परिसराच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना आरोग्यसेवा अधिक सुलभपणे मिळण्यास मदत होईल. यापुढेही आपल्या परिसरातील आरोग्यसेवा अधिक दर्जेदार, सुसज्ज आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील. यावेळी आमच्या सहकारी नगरसेविका सौ. भक्तीताई गायकवाड, सौ. सपनाताई छाजेड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. @SidShirole @ParshuramW1 @BhaktiGaikwad09 #sunnynimhan #HealthcareDevelopment #CancerCare #CancerDiagnosis #AundhBopodi
15
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक कोंडीच्या संदर्भात आमदार श्री. सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक पार पडली. शहरातील काही मोकळ्या जागांमध्ये अंधाराचा फायदा घेऊन मद्यप्राशन करणे, अंमली पदार्थांचे सेवन करणे अशा घटना घडत आहेत. अनेकदा रस्त्याच्या कडेला लावलेल्या रिक्षांमध्येही मद्यप्राशन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी CCTV यंत्रणेचे जाळे भक्कम करावे, सम-विषम पार्किंगचे धोरण प्रभावीपणे राबवावे, अतिक्रमण हटाव मोहिमेच्या माध्यमातून मोकळ्या झालेल्या जागांवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा विविध मागण्या यावेळी पोलीस आयुक्तांकडे केल्या. तसेच, दर तीन महिन्यांनी अशा बैठकीचे आयोजन करावे असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले. रात्रभर बेकायदेशीररित्या चालू राहणारे वाईन शॉप, पब्स, तरुणाईला व्यसनाधिनतेकडे नेणारे नशेचे अड्डे बंद करावेत. तरुणाईमध्ये नशा व गुन्हेगारीचे निर्माण होणारे आकर्षण थांबवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी अशी यावेळी विनंती केली. पुणेकरांना स्वच्छ व सुंदर शहर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, पोलिस प्रशासनाची साथ लाभल्यास स्वच्छ, सुंदर व सुरक्षित पुणे घडवू हा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी आमच्या सहकारी नगरसेविका सौ. भक्तीताई गायकवाड, सौ. सपना ताई छाजेड, शिवाजीनगर मतदारसंघातील नगरसेवक मा. अपूर्व खाडे, नगरसेविका मा. निवेदिता येकबोटे, नगरसेविका मा. निशाताई मानवतकर, नगरसेविका मा. अमृता म्हात्रे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी तसेच, पोलीस विभागातील डीसीपी, एसीपी, डेक्कन, शिवाजीनगर, बोपोडी, चतु:शृंगी व खडकी पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच वाहतूक विभागातील सर्व डीसीपी व पोलीस निरीक्षक उपस्थित होते. @SidShirole @BhaktiGaikwad09 #sunnynimhan #Shivajinagar #PublicSafety #TrafficManagement #CCTVSurveillance
28
मुंबई दहशतवादी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना आणि या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना विनम्र श्रद्धांजली! त्यांचे बलिदान, शौर्य आणि त्याग सदैव स्मरणात राहील. #2611mumbaiattacks
20
भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 भारतीय संविधानाने दिलेल्या समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांचा सन्मान करूया. संविधानातील आदर्श जपत एक सशक्त, समतामूलक आणि प्रगत भारत घडवण्यासाठी कटिबद्ध होऊया! #भारतीय_संविधान_दिन
21
पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मा. श्रीनाथजी भिमाले साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! पुणे शहराच्या विकासाला नवी दिशा देत, पुणेकरांच्या अपेक्षा आणि आकांक्षांना न्याय देणारे आपले कार्य अधिकाधिक यशस्वी होवो. आपल्या नेतृत्वातून पुणे शहराच्या प्रगतीचा आलेख सदैव उंचावत राहो, हीच सदिच्छा! @BhimaleShrinath #HappyBirthday #shrinathbhimale
18
त्रिपुरारी पौर्णिमा तथा कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र दिनाचे औचित्य साधून औंध येथील श्री कार्तिक स्वामी मंदिर येथे भेट देऊन मनोभावे आरती केली. या दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या सर्वांच्या जीवनात सुखाचा, समाधानाचा प्रकाश निर्माण व्हावा अशी यावेळी मनोभावे प्रार्थना केली. यावेळी मंदिर व परिसरातील अनेक नागरिकांसोबत संवाद साधला व सर्वांना कार्तिक पौर्णिमेच्या या पावन उत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. #KartikPurnima #TripurariPurnima #KartikSwami #Aundh #DivineBlessings
55
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीत पार पडणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या सार्थ निवडीबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. मराठी साहित्याला वैचारिक समृद्धी देण्यात डॉ. लिंबाळे यांचे योगदान मोलाचे आहे. आपल्या लेखणीतून त्यांनी दलित समाजाचे प्रश्न, सामाजिक विषमता आणि वंचितांच्या संघर्षमय जीवनाचे वास्तव अत्यंत प्रभावीपणे अधोरेखित केले आहे. त्यांच्या साहित्याने मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. या प्रतिष्ठित संमेलनाचे अध्यक्ष म्हणून झालेली त्यांची निवड हा त्यांच्या याच योगदानाचा गौरव आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या नेतृत्वात होणारे पुण्यनगरीतल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरेल हा मला विश्वास आहे. #DrSharankumarLimbale #MarathiSahitya #AkhilBharatiyaMarathiSahityaSammelan #100thSahityaSammelan #Pune
16
पारंपरिक जल्लोष आणि उत्साहात सोमेश्वरवाडीतील महादेव मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमेश्वरवाडीतील सोमेश्वर महादेव मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली.दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसर पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता, तसेच मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. सर्वत्र भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले. महादेवाची पूजा झाल्यानंतर मंदिर परिसर आकर्षक फटाक्यांच्या अतिषबाजीने उजळून निघाला. #TripurariPournima #SomeshwarWadi #SomeshwarMahadev #MahadevTemple #LordShiva
66
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि ज्येष्ठ लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील. #yashwantraochavhan
22
मानवतेची शिकवण संपूर्ण जगभरात नेणारे थोर मानवतावादी विचारवंत, शीख धर्माचे संस्थापक वंदनीय श्री गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळेच "गुरूपूरब" उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करतो. याच उत्सवाचे औचित्य साधून रेंज हिल्स, खडकी व औंध येथील गुरुद्वारांना सदिच्छा भेट दिली, मनोभावे प्रार्थना केली. यावेळी आमदार श्री. सिद्धार्थदादा शिरोळे, उपमहापौर श्री. परशुरामजी वाडेकर, सहकारी नगरसेविका सौ. भक्तीताई गायकवाड, सौ. सपनाताई छाजेड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. #GuruNanakJayanti #GuruNanakDevJi #SikhCommunity #aundh #Khadki @SidShirole @ParshuramW1 @BhaktiGaikwad09
49
जय हरी विठ्ठल ! नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर औंध गावठाण व परिसरात अनेक ठिकाणी कीर्तन सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अशा विविध कीर्तन सोहळ्यांमध्ये सहभागी होत हरिनामाचा गजर करण्याच्या सौभाग्य आज लाभले. विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झालेले वैष्णव, भक्तिमय वातावरण व सर्व भाविकांचा उत्साह पाहून मन प्रसन्न झाले. या भक्तीमय सोहळ्यांचे आयोजन करून संपूर्ण औंध बोपोडी प्रभागातील नागरिकांना पांडुरंगाच्या सेवेची संधी देणाऱ्या सर्व आयोजकांचे, कीर्तनकार महाराजांचे, समस्त ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी पुण्यनगरीचे उपमहापौर परशुरामजी वाडेकर उपस्थित होते. #sunnynimhan #Haripath #KirtanSohala #aundh
12
वाहे गुरुजी दा खालसा, वाहे गुरुजी दी फ़तेह ! मानवतेची शिकवण संपूर्ण जगभरात नेणारे थोर मानवतावादी विचारवंत, शीख धर्माचे संस्थापक वंदनीय श्री गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळेच "गुरूपूरब" उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करतो. याच उत्सवाचे औचित्य साधून रेंज हिल्स, खडकी व औंध येथील गुरुद्वारांना सदिच्छा भेट दिली, मनोभावे प्रार्थना केली. गुरूपूरब उत्सवाचे चैतन्य, गुरुद्वारातील भक्तिमय वातावरण, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील समाधान, सेवाभाव व बंधुभाव खरोखर मनाला भावणारा होता. याप्रसंगी समस्त शीख बंधू-भगिनींसोबत संवाद साधला, गुरूपूरब उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व श्री गुरुनानक देवजी यांनी दिलेला मानवतेचा संदेश समाजात रुजवण्यासाठी शीख समाजाकडून नेहमीच होणाऱ्या प्रयत्नाबद्दल सर्वांचे कौतुक केले. यावेळी आमदार श्री. सिद्धार्थदादा शिरोळे, उपमहापौर श्री. परशुरामजी वाडेकर, सहकारी नगरसेविका सौ. भक्तीताई गायकवाड, सौ. सपनाताई छाजेड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. @SidShirole @ParshuramW1 @BhaktiGaikwad09 #GuruNanakJayanti #GuruNanakDevJi #SikhCommunity #aundh #Khadki
18
आज दि २४ मंगळवार रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री सोमेश्वर महादेवास ५६ भोग अर्पण करण्यात आले. 🔱🕉️🚩 #someshwardevasthan #TripurariPurnima #KartikPurnima #56Bhog #ChappanBhog
1
61
बॉलिवूडचा ही-मॅन, अभिनयाचा बादशाह! आपल्या दमदार अभिनयाने, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने आणि अविस्मरणीय भूमिकांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #dharmendradeol
21
अहिल्यानगर दक्षिणचे माजी खासदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. सुजयदादा विखे पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सोमेश्वरचरणी प्रार्थना! @drsujayvikhe #HappyBirthday #sujayvikhepatil
33