
शेतकरीपुत्र🌾| साहेबप्रेमी ❤️ @pawarspeaks @ncpspeaks
Solapur, India
Joined February 2017
- Tweets5.4K
- Following991
- Followers1.2K
- Likes8.8K
Pinned Tweet
सुखाचे हे सुख, श्रीहरी मुख ।
पाहता ही भूक, तहान गेली ॥
ज्या दैवतासाठी हृदयाचं प्रत्येक स्पंदन अर्पण केलंय त्या दैवताचं प्रत्यक्ष दर्शन !
@PawarSpeaks ❤️
Akash Pandhare retweeted
रोहित दादांनी जो स्फोटक खुलासा केला आहे त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायलाच हवं...त्याचवेळी त्यांनी याचा देखील खुलासा करायला हवा की,
दादा जाऊन 10 महिने झालेले असताना देखील त्यांच्या अपघाताचा (घातपाताचा) FIR का होत नाही..?
Akash Pandhare retweeted
तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ?
चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान !
घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही!
लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं !
आता यायला लागतंय!
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा..
9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..
Akash Pandhare retweeted
सरकारमार्फत संचालक नेमूनच सत्तेत यायचे असेल, तर निवडणुका घेतात तरी कशाला ? आज फडणवीस सरकारने लोकशाहीच्या मूल्यांना हरताळ फासणारा एक विकृत पायंडा पाडला आहे. असे करून गोकुळ तुम्हाला मिळेलही; पण ते मिळवताना काय गमावलं आहे, याची जाणीव कदाचित आज होणार नाही. त्याची किंमत मात्र भविष्यात नक्कीच मोजावी लागेल…
@Dev_Fadnavis
Akash Pandhare retweeted
कोल्हापुरात गोकुळच्या विजयाने सत्ताधारी गट पिसाळलेला दिसतोय.आज 4 शासन नियुक्त सदस्य त्यांनी गोकुळवर नेमले आहेत.
हा जनमताचा अपमान आहे.
हा कोल्हापूरकरांचा अपमान आहे.
कोल्हापूरकरांनो याचा "कंडका" तुम्ही पाडला पाहिजे..!
बंटी पाटलांना आता सर्वाधिक तुमच्या साथीची गरज आहे.त्या माणसाच्या सोबत ताकदीने उभे राहा.
#गोकुळ
Akash Pandhare retweeted
लोकशाही ❌
हुकूमशाही ✅
#गोकुळ वर शासननियुक्त 4 संचालक नेमून त्यांना
मतदानाचा अधिकार देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय निषेधार्ह आहे. साम दाम दंड भेद वापरूनही सत्ता आणता न आल्यामुळे हा रडीचा डाव महायुती खेळत आहे.
#गोकुळ
#हुकूमशाही
#महाराष्ट्र
पायाला वेदना… पण मन आजही बळीराजासाठी तळमळतंय !
#पवारसाहेब ❤️🙌
वय ८६… पायाला दुखापत, पण अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर! ❤️🌾
राजकारणात पदं महत्त्वाची नसतात, तर संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभं राहणं महत्त्वाचं असतं. दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आजही थेट बांधावर पोहोचणारे शरद पवार साहेब!
शेतकऱ्यांशी जोडलेली नाळ आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी, हेच खऱ्या नेतृत्वाचं सामर्थ्य!
#SharadPawar #FarmerFirst #FarmersVoice #Maharashtra #leadershipdevelopment
“यशवंतराव चव्हाण साहेबांनी उजनीचं पाणी अडवलं ते शेतकऱ्यांचं सोनं फुलावं म्हणून… मग आज उजनीवर AI Data Centre उभारताना शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार?”
#UjaniDam #YashwantraoChavan #AIDataCentre #Solapur #Shetkari
Akash Pandhare retweeted
अभिनयातून मन जिंकले,
माणुसकीतून आयुष्य समृद्ध केले…
भावपुर्ण श्रद्धांजली नाना..
#nanapatekar
Akash Pandhare retweeted
शब्दातून मराठी मनाला स्पर्श करणारे महान गीतकार, कवी आणि साहित्यिक 'आधुनिक वाल्मिकी' ग. दि. माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
#गदिमाडगूळकर #गदिमा #जयंती
Akash Pandhare retweeted
२०१५ चं साल. माझी नुकतीच दहावी झालेली.
सुट्ट्या लागल्या होत्या. लहानपणापासून कधी मामाच्या गावाला जाणं फारसं आवडलं आणि करमलं दोन्ही नाही.
त्या वर्षी गावातील माझा मित्र IIT बॉम्बेमध्ये पीएचडी करत होता.
त्याला भेटायला मी तिथे गेलो होतो. IIT बॉम्बेचा भव्यदिव्य कॅम्पस, तिथल्या सुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी असलेली व्यवस्था पाहून मी अक्षरशः भारावून गेलो होतो.
जवळपास आठ दिवस मी त्याच्या हॉस्टेलवर राहिलो. त्याला क्रिकेटची प्रचंड आवड होती, त्यामुळे आम्ही रोज त्या गवतावर सीजन बॉलने क्रिकेट खेळायचो.
खेळताना तिथे उत्तर भारतातून आलेल्या काही मुलांशी बोलण्याचा योग आला. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला एक गोष्ट धक्कादायक वाटली. IIT सारख्या देशातील प्रतिष्ठित संस्थेत शिकणारी ही बरीचशी मुलं भाजप आणि मोदींची कट्टर समर्थक होती. आणि त्यापेक्षाही वाईट म्हणजे दलित आणि मुसलमानांविषयी उघड द्वेष बाळगणारी होती.
त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या मित्राला म्हटलं, 'इतक्या मोठ्या संस्थेत शिकूनसुद्धा ही मुलं इतकी धर्मांध आणि इतकी बावळट कशी असू शकतात?'
तो हसला आणि म्हणाला, 'बुद्धिमत्ता आणि विवेक यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. IIT च नाही.. तर जगभरातल्या अनेक प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकणारी मुलंही धर्मांध आहेत, जातीयवादी आहेत आणि इतर धर्मांचा द्वेष करणारी आहेत.'
तेव्हा केंद्रात भाजपचं सरकार येऊन साधारण दोन वर्षं झाली होती. मी त्याला सहज विचारलं, 'हे सरकार कधी जाईल रे? अजून किती वर्षे ही लोकं सत्तेत असतील?'
त्यावेळी त्याने काय कॅल्क्युलेशन केलं होतं माहिती नाही. पण त्याचं उत्तर आजही माझ्या डोक्यात जसंच्या तसं आहे आणि त्याने बोललेली प्रत्येक गोष्ट खरी ठरतेय.
तो म्हणाला, 'भाजप फार मोठ्या काळानंतर सत्तेत आली आहे. ही लोकं दहा-पंधरा वर्षं आरामात सत्तेत राहतील. पण माझी इच्छा आहे की यांनी किमान पंचवीस-तीस वर्षे तरी सत्तेत राहावं.'
मी म्हटलं, 'अरे, तू तर भाजपविरोधी आहेस. मग असं का म्हणतोयस?'
त्यावर तो म्हणाला, 'कारण ही लोकं या देशाचं प्रचंड नुकसान करणार आहेत. आणि यांची सत्ता कोणताही विरोधी पक्ष घालवणार नाही. ही स्वतःच स्वतःची सत्ता घालवतील. त्यामुळे यांना जेवढं नुकसान करायचं आहे ते एकदाच करू दे. लोकांनी ते पूर्णपणे अनुभवू दे. लोकांना त्याचे चटके बसूदे. महागाई काय असते, भ्रष्टाचार काय असतो, बेरोजगारी काय असते याचा फर्स्ट हॅण्ड अनुभव घेऊदे म्हणजे त्यानंतर अनेक पिढ्या धर्म, जात आणि द्वेषाच्या राजकारणाला पुन्हा इतक्या सहज बळी पडणार नाहीत.'
आज ऑफिस मधून घरी जाताना देशातील एकंदर परिस्थिती बघून त्याचा प्रत्येक शब्द पुन्हा आठवला.
आज फक्त NEET च्या एका मुद्द्यावरून संपूर्ण देशात सरकारचा कारभार उघडा पडलाय. अजून राम मंदिरातील गैरव्यवहार, विविध प्रकल्पांमधील भ्रष्टाचार, संस्थांचं होत गेलेलं खच्चीकरण ... अशी कितीतरी प्रकरणं अजून बाकी आहेत.
त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप सत्तेतून जाणार हे सत्य असलं तरी जगभरातील अनेक लोकशाहींसाठी 2014 ते 20?? हा भारतातील मोदी राजवटीचा काळ एक केस स्टेडी असेल.
ज्याप्रमाणे हिटलरच्या राजवटीतून जर्मनीने धडा घेतला आणि पुन्हा कधीही द्वेष, धर्मांधता आणि अतिरेकी विचारसरणीला संधी दिली नाही, त्याचप्रमाणे भारतही या काळातून धडा घेईल. हा.. या काळाची एक मोठी आणि कधीही भरून न निघती किंमत एका पिढीला मोजावी लागेल; पण त्यातूनच पुढच्या पिढ्या कायमच्या उद्धारतील हे नक्की!
माणसांमुळेच गावाची ओळख निर्माण होते... आणि खैरावला अशीच एक अभिमानाची ओळख लाभली आहे!
आमच्या खैराव गावचे सुपुत्र श्री. फुलचंद (दादा) नागटिळक यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गेली तब्बल ३० वर्षे संत गाडगेबाबा यांची वेशभूषा साकारत, 'निर्मल वारी'चा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवत ते अखंडपणे आषाढी वारीची सेवा करत आहेत.
स्वच्छता, समाजप्रबोधन आणि निस्वार्थ सेवाभाव यांचा वारसा जपणाऱ्या अशा सेवाभावी व्यक्तिमत्त्वामुळेच खैराव गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाने घेतलं जातं.
दादा, तुमच्या सेवेला मनापासून सलाम! ❤️🚩
#Khairao #PhulchandNagatilak #SantGadgeBaba #NirmalWari #AshadhiWari #Warkari #Maharashtra #ProudMoment #SocialService
10
558
Akash Pandhare retweeted
निर्यातवाढ करणे आवश्यक असताना निर्यातबंदी..?
केंद्र सरकारने अचानक घेतलेला साखर निर्यातबंदीचा निर्णय महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी दुहेरी फटका ठरत आहे. एकीकडे साखरेचा अतिरिक्त साठा, वाढलेली एफआरपी आणि दुसरीकडे निर्यातीवर बंदी; यामुळे साखर उद्योग आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
देशाला परकीय चलनाची गरज असताना आपल्या अतिरिक्त साखरेला जागतिक बाजारपेठेत विक्री करण्याऐवजी गोदामात साठवून ठेवणे हे चुकीचे धोरण आहे. हा निर्णय कोणतीही ठोस पूर्वतयारी न करता घेण्यात आला असून, सरकारने तातडीने याचा पुनर्विचार करून निर्यातबंदी मागे घ्यावी.
#SugarIndustry #AgriPolicy
Akash Pandhare retweeted
भाजपसाठी छुप्या पद्धतीने काम करणाऱ्या भोंदू कीर्तनकारांना बेक्कार झापलं आहे याठिकाणी!
@HanumantP_inc
Akash Pandhare retweeted
थलपती विजय या व्हिडिओत जे बोलालले आहेत ते ऐकायला खूप भारी वाटत.आता मुख्यमंत्री म्हणून विजय यांनी हे प्रत्यक्षात उतरवून दाखवलं तर याहून चांगलं काही नसेल तामिळनाडूच्या जनतेसाठी..!
Akash Pandhare retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमचे सहकारी विकास लवांडे सर यांच्यावर संग्राम भांडारे आणि इतर गुंडांकडून झालेल्या धक्काबुक्की आणि शाईफेकीचा जाहीर निषेध!
पोलिसांनी तात्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करून या टोळक्याला अटक करावी!
@VikasLawande1 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @PawarSpeaks @RRPSpeaks @shindespeaks
Akash Pandhare retweeted
देशातील सर्वांत ‘तरुण’ लोकनेता..!
हा क्षण आपल्या सर्वांसाठीच केवळ भावनिकच नाही तर अभिमानास्पदही आहे…!
#साहेब
Akash Pandhare retweeted
लैंगिक शोषण ते मनी लॉन्ड्रीग असा खरात प्रकरणाचा प्रवास सध्या सुरू आहे.
हे सर्वात आधी ओळखल्याने देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घातले होते.अर्थात एकच वेळी ५० हून अधिक नेत्यांवर कायमचा अंकुश ठेवण्याची संधी देवेंद्र फडणवीसांसारखे मुत्सद्दी राजकारणी अशीच वाया जाऊ देणार नाही.




















