सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
पुणेकर बीड-कोल्हापूर-नगरकरांना बाहेरचे म्हणत बसले आणि बिहारच्या लोकांनी मुळा मुठा अगदी भीमा इंद्रायणीचा सुद्धा ताबा घेतला.
लॉजिक काय असेल? म्हणजे दिवाळी आली की महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील लोकांना बिनधास्त non punekar म्हणायचं पण हजार किलोमीटर लांबून आलेल्या उत्तर भारतीयांना परप्रांतीय म्हटलं की देश तुटतो!
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
OFFICIAL ANNOUNCEMENT 🦁💛
A once-in-a-lifetime player.
A new role. A bond that lasts forever 💛
Mahendra Singh Dhoni takes charge as the Team Mentor of Chennai Super Kings!
Through countless victories, challenging times, and memories that will stay in our hearts forever, MS has been at the heart of our journey from the very beginning.
From leading us to glory to guiding the next generation of Super Kings, Thala will always be a part of our identity. And Chennai will always be his home.
Read more : chennaisuperkings.com/news/n…
#WhistlePodu
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
Safed jersey se vida le raha hoon, lekin usse judi yaadon se kabhi nahi… 🇮🇳❤️
Jab pehli baar Bharat ki Test jersey pehni thi, tab sirf ek sapna tha — apne desh ke liye kuch kar dikhane ka..
Uske baad har wicket, har sangharsh, har chot aur har comeback ne mujhe kuch na kuch sikhaya.
Test cricket mere liye sirf ek format nahi, meri zindagi ka ek behad khaas hissa raha hai.
Aaj bhaari dil aur anginat khoobsurat yaadon ke saath main Test cricket se retirement lene ka faisla kar raha hoon.
Is safar mein mera saath dene wale har teammate, coach, family aur un karodon Bharatiyon ka dil se shukriya, jinhone achhe aur mushkil dono waqt mein mujh par bharosa banaye rakha..
BCCI aur Cricket Association of Bengal (CAB) ka bhi dil se shukriya, jinhone mere talent par bharosa kiya, mujhe aage badhne ke mauke diye aur mere cricket ke safar mein ek aham bhoomika nibhayi. Aapka saath aur vishwas mere liye hamesha khaas rahega.
Maidan par meri aakhri Test ball bhale hi fenki ja chuki ho, lekin Bharat ke liye khelne ka garv hamesha mere dil mein zinda rahega.
Shukriya, Test Cricket. ❤️
Aapka Shami 🇮🇳
#Mdshami11 #Mdshami #TestCricket #Retirement
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
ढोबळमानाने हिशोब करू आपण
2.5x2.5 मी वर एक झाड धरले तर
1 आर मध्ये 16 झाडे
100 आर म्हणजे 1 हेक्टर म्हणजे 1600 झाडे
100 हेक्टर मध्ये 1,60,000 झाडे
ह्या प्रमाणे 233 हेक्टर मध्ये 3,72,000 झाडे असावीत चौथा हिस्सा जरी पकडला 93,000 झाडे असावीत
#saveourforests #SaveSahyadri
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
कर्जतच्या त्या जंगलातला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत…
#Karjat #SaiDongar #TreeCutting @janhavee
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
झाड रडतंय.. 😔 पण आम्हाला काहीच वाटत नाही...
निसर्गाशी खेळू नका, मनुष्य जन्म राख होईल.. 💯
विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरु आहे - निषेध!
मागील फक्त 5 वर्षात (2021-2025) महाराष्ट्रात *50 लाख 77 हजार झाडे* तोडण्यात आली. तर फक्त ऑक्टोबर महिन्यात भीमाशंकर येथे जलविद्युत प्रकल्पासाठी *32,000 झाडे* तोडणार आहेत. विचार करा हा कोणता विकास आहे?
72 साली पण असा दुष्काळ नव्हता, तसा ह्या वर्षी आहे. जंगल तोडून काँक्रीटचं जंगल उभं करणं म्हणजे विकास नव्हे.
सकाळी नोकरीला गेलात आणि संध्याकाळी तुमचं घर मुलाबाळांसकट तोडलेलं बघाल तर काय वाटेल? तीच अवस्था आज या मुक्या जीवांची आहे.
विकास करा, रोजगार द्या पण निसर्ग उध्वस्त करून नको. उद्याच्या पिढीसाठी स्वच्छ हवा, सुंदर निसर्गच नसेल तर या विकासाचं काय लोणचं घालणार?
#SaveTree #Bhimashankar #Deforestation #Maharashtra #Environment #Paryavaran #JungleBachao #SayajiShinde #SBNewsMarathi #Nisarg #GlobalWarming #Dushkal
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
🌳 वृक्षतोड थांबवा, झाडे वाचवा…! 🌱
झाडे वाचली, तरच निसर्ग वाचेल; निसर्ग वाचला, तरच आपले भविष्य वाचेल! 🌿
#वृक्षतोड_थांबवा #झाडे_वाचवा #पर्यावरण_वाचवा #SaveTrees
@Dev_Fadnavis
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
बरं मग जिथे वृक्ष तोड चालू आहे, ती लोकं आम्ही कायदा हातात घेऊन जंगल नक्षल बनून जर ठोकली तर तुम्हाला आणि @DGPMaharashtra ह्यांना आक्षेप नसणार आहे
बरोबर ना
चलो #भीमाशंकर
#SaveBhimashankar #SaveSahyadri
सरकारचा काहीचआक्षेप नाहीये बिनधास्त ठोका #झाडखाऊ
Replying to @MahaForest
परंतु भीमाशंकर अभयारण्यामध्ये कंपनीच्या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची अवैध वृक्षतोड सुरू नाही. तरी याबाबतची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
ह्याच बरोबर सोनुभाऊ असे ही म्हणावे वाटते की
पावसाळी बेडकासारखे सह्याद्रीत ट्रेक ला जाणारे, शिवप्रेमी, सर्वांनी आंदोलन, सोशल मीडिया जिथं शक्य आहे तिथं विरोध करायला सुरुवात करायला पाहिजे ह्या आक्रमणामुळे पूर्व वाहिनी नद्या अटणार आहेत, मराठवाडा विदर्भ वाळवंट होईल #SaveSahyadri
मोठमोठ्या गाड्यात फिरणाऱ्या, एसी मध्ये राहणाऱ्या निगरगठ्ठ अन नीच राजकारण्यांना दुष्काळाची झळ बसत नाही, ती बसते तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेला, वन्य प्राण्यांना, पक्ष्यांना.
त्यामुळे आपणच आवाज उठवला पाहिजे, नाहीतर विनाश अटळ आहे.
#महाराष्ट्र_वाचवा
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
शेकरू खार,
महाराष्ट्राचा राज्यपक्षी ,आपल्या भीमाशंकर परिसरात आढळतो,जणू तीच लेकरुच म्हणायच,
शेकरु, इतर जीव पक्षी कुठ जातील,आधीच जंगल पर्यावरण कमी होत चाललाय.
कसा पाऊस पडेल?
कशी शुध्द हवा मिळेल ?
६०० एकर म्हणजे थोड नाय वरून अजून आजूबाजूला फरक पडेल तो वेगळाच
#SaveSahyadri
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
कहर झाला. ७० हजार झाडांच जंगल तोडणार.
साभार:शिवाई न्यूज
सरकारने महाराष्ट्राचा ७/१२ एकदाचा या सर्व #उद्योगपतीच्या_नावावर_करुन_टाकावा जेणकरुन संपूर्ण महाराष्ट्राच #वाळवंट करायला हे #उद्योगपती_मोकळे होतील. महाराष्ट्राची वाट लावायची असा विडा या उद्योगपती भाजप सरकारने घेतला आहे.
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
जे मुघलांना जमले नाही ते गुज्जू उद्योगपतींनी करून दाखवलं. सह्याद्रीला नांगर लावलं.
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
अदानीच्या टोरोन्ट पॉवर साठी भीमाशंकर अभयारण्यातील 600 एकर वरिल झाडे तोडण्यात येणार आहेत.2 दिवसात 250 च्या आसपास झाडें तोडली गेली आहेत. भीमाशंकर जंगलसाठी कोणी वाली नाही का? एवढा विकास करून पुढील पिढी जगवायची कि मारायची जल जंगल वाचवा तरच माणूस वाचेल.
#महाराष्ट्र #savebhimashankar
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
Maharashtra Forest department has permitted felling of 32,490 trees near Karjat for Torrent Power’s 3000 MW Saidongar pumped storage project.
32,490 is not a small number man. Do we not have any other alternative @CMOMaharashtra?
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
#भीमाशंकर मध्ये होणारी जंगलतोड राज्यातील सर्वांना अमान्य आहे, याबाबत उद्या खूप मोठ्या प्रमाणावर जनता रस्त्यावर येणार आहे कारण सद्यःस्थितीत निसर्ग ही जनतेची जबाबदारी आहे, सरकारची नाही... राज्यात सध्या दुष्काळा असताना बेमुसार वृक्षतोड बाबतचे आदेश देणारे झोपा काढताय का...?
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
कर्जत तालुक्यात (जि. रायगड) सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या सायडोंगर वनक्षेत्रात सध्या विकासाच्या नावाखाली निसर्गाचा भयानक विनाश सुरू आहे. पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी २३३ हेक्टरवरील घनदाट जंगलातील तब्बल ३२ हजारांहून अधिक झाडांची अक्षरशः कत्तल सुरु झालीय. कागदावर हा आकडा ३२ हजार दिसत असला तरी उद्या तो लाखापर्यंत जाईल आणि हे होत असताना जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या तेथील हजारो-लाखो पक्षांचा आकांत कुणालाही ऐकू येत नाही, हे दुर्दैव आहे. एखाद्या कसायाप्रमाणे निर्घृणपणे पक्षांची घरटी, अंडी आणि अजून पंखही न फुटलेली घरट्यातील पिल्लं नष्ट केली जातायेत… सिंमेंटच्या जंगलात राहणाऱ्यांना जंगलातील पक्षांची ही आर्त किंकाळी ऐकू येणार आहे की नाही?
हा प्रकार केवळ वृक्षतोड नसून एका इकोसिस्टिमचा अंत आहे आणि हे याचे गंभीर परिणाम माणसाला भविष्यात भोगावे लागणार आहेत. हे घनदाट जंगल महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूसह बिबटे, भेकर, उदमांजर, खेकडे आणि शेकडो दुर्मिळ पक्षांचं हक्काचं निवासस्थान आहे. पण या झाडांची कत्तल होत असल्याने आता ते पूर्णपणे बेघर होतायेत. मौल्यवान औषधी वनस्पती, दुर्मिळ कीटक आणि वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेने नटलेली सह्याद्रीची ही रांग या बेसुमार कत्तलीमुळे कायमची नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच भर म्हणून या प्रकल्पासाठी डोंगरांमध्ये जे शक्तीशाली सुरुंगाचे स्फोट केले जातील त्यातून संपूर्ण डोंगराचा भाग कमकुवत होऊन भविष्यात माळीण किंवा इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होण्याचाही धोका आहे.
कर्जतसारखा निसर्गरम्य परिसर जो मुंबई-पुण्याचं हवामान संतुलित राखण्यात मोठी भूमिका बजावतो, तिथली वनसंपदा नष्ट झाल्यास पर्यावरणीय समतोल बिघडणार असून स्थानिक आदिवासींचा जगण्याचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. याला सर्वस्वी भांडवलदारांच्या हातचं बटीक बनून काम करणारं हे भाजप सरकार जबाबदार असून याच भांडवलदारांच्या फायद्यासाठी मुक्या पशू-पक्ष्यांचा बळी देऊन हा निसर्गाचा विनाश सुरुय. ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार असून तोपर्यंत येथील संपूर्ण जंगल यांना नष्ट करायचंय आणि अशा प्रकारे जंगल नष्ट करुन होणारा विकास पंतप्रधान साहेबांना तरी मान्य असेल का? निसर्गाचा विनाश करून होणारा विकास हा विनाशकारी असून तो कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मान्य नाही. या प्रकल्पाला आणि संबंधित कंपनीला विरोध असण्याचं काहीच कारण नाही, परंतु त्यांनी जे स्थान निवडलंय ते पूर्णतः चुकीचं आणि पर्यावरणाच्या मुळावर उठणारं आहे. त्यामुळं जिथं पर्यावरणाचा नाश होणार नाही, अशा ठिकाणी हा प्रकल्प नेला तर त्याला कुणाचाच विरोध असणार नाही. तसा प्रयत्न सरकार का करत नाही.
त्याऐवजी या ‘झाडखाऊ’ सरकारने महाराष्ट्राचं वाळवंट करण्याचा विडाच उचलला की काय अशी शंका येते. एक जागरूक नागरिक म्हणून या पर्यावरणाच्या विनाशाविरोधात आपण सर्वांनीच एकत्र येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे. माध्यमांनीही पर्यावरणाचा आणि पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करुन यावर आवाज उठवला पाहिजे. यामध्ये ‘शिवाई न्यूज’ यासारखी एक वात वादळातही मिणमिणतेय आणि या स्थानिक चॅनलचे पत्रकार यावर पोटतिडकीने निसर्गाचा होणारा हा विनाश ओरडून जगाला दाखवतायेत याचं निश्चितच कौतुक आहे. भविष्यात त्यांच्यावरही दबाव आणला जाऊ शकतो. तसंच ज्यांनी हा विनाश रोखायचा त्या सर्व संस्था देखील सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळं हे थांबवायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे तो म्हणजे जनतेचा दबाव.. तो आपण सर्वजण मिळून निर्माण करु आणि आपलं पर्यावरण वाचवू…
यापासून आपण आज अलिप्त राहिलो तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही.
#SaveSahyadri #SaveForests #SaveEnvironment #सह्याद्री_वाचवा #जंगलतोड_थांबवा #पर्यावरण_वाचवा #SaveWildlife
























