District Information Office, Latur (@Infolatur) header
District Information Office, Latur (@Infolatur) profile picture

Official Twitter Handle of District Information Office, Directorate General Of Information & Public Relations, Government of Maharashtra, #Latur

Latur
Joined July 2015
Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)
District Information Office, Latur retweeted
राज्यातील भरती व #स्पर्धापरीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला दुसरा अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालात पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनुचित साधनांचा वापर रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्यासह परीक्षा संचालन, प्रशासकीय यंत्रणा, तंत्रज्ञानाचा वापर, सायबर सुरक्षा आणि उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. व्ही. राधा समितीचा हा दुसरा अहवाल असून एकूण चार टप्प्यात अहवाल सादर होणार आहे. संघटित परीक्षा गैरप्रकारांत सहभागी व्यक्ती व संस्थांना ७ ते १० वर्षे कारावास आणि किमान १० कोटी रुपयांचा दंड, गैरप्रकारांमधून झालेल्या नुकसानीची वसुली तसेच संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची शिफारस समितीने केली आहे. याशिवाय गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष कृती दल (Special Task Force), खटल्यांच्या जलद निपटाऱ्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करणे आणि तपासाची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याबाबत विचार करण्याची तसेच उत्तरतालिकेवरील उमेदवारांची हरकत मान्य झाल्यास हरकत नोंदविण्यासाठी भरलेले शुल्क परत करण्याची महत्त्वपूर्ण शिफारसही अहवालात करण्यात आली आहे. राज्यातील भरती व स्पर्धा परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने शासन निर्णय ४ सप्टेंबर २०२६ अन्वये उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसंदर्भातील पहिला अहवाल ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सादर केला होता. त्यानंतर समितीने आपला दुसरा अहवाल २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनास सादर केला आहे. या अहवालात कायदेशीर तरतुदी, परीक्षा संचालन व्यवस्था, प्रशासकीय समन्वय, उमेदवारांच्या सुविधा आणि तंत्रज्ञानाधारित सुरक्षा याबाबत व्यापक सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. सविस्तर वृत्त - mahasamvad.in/222843/
8
9
1
27
3,909
District Information Office, Latur retweeted
ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि समीक्षक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची #पुणे येथे होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही समस्त मराठी साहित्य विश्वासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या निवडीमुळे मराठी साहित्याच्या वैचारिक परंपरेचा, सामाजिक बांधिलकीचा आणि समतेच्या विचारांचा गौरव झाला आहे, अशी भावना मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या अध्यक्षतेखाली होणारे शतक महोत्सवी साहित्य संमेलन मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या वाटचालीतील एक संस्मरणीय पर्व ठरेल, अशा शुभेच्छाही मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या साहित्यांमधून उपेक्षित समाजाचे वास्तव प्रभावीपणे मांडले आहे. ‘अक्करमाशी’ या आत्मकथनातून त्यांनी सामाजिक विषमता आणि संघर्षाचे वास्तव मांडत मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या ग्रंथातून त्यांनी दलित साहित्याच्या वैचारिक आणि समीक्षात्मक मांडणीला नवी दिशा दिली. तसेच ‘सनातन’ या कादंबरीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान प्राप्त झाला आहे. मराठी साहित्याला सामाजिक जाणिवांची आणि परिवर्तनशील विचारांची समृद्ध परंपरा लाभली आहे. डॉ. लिंबाळे यांच्या साहित्याने या परंपरेत मोलाची भर घातली आहे. १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने या ऐतिहासिक संमेलनाला निश्चितच वैचारिक उंची प्राप्त होईल, असा विश्वासही मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत यांनी व्यक्त केला. @samant_uday #अखिलभारतीयमराठीसाहित्यसंमेलन
3
3
1,502
District Information Office, Latur retweeted
📍हिंगोली हिंगोलीचे राज्यसभा खासदार डॉ. रामराव वडकुते यांच्या पार्थिवावर आज #हिंगोली येथील महाकाली नगर परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याच्या विधिमंडळातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह मंत्री, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजबांधव, नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साश्रूनयनांनी सर्व उपस्थितांनी डॉ. वडकुते यांना अखेरचा निरोप दिला. पोलिस दलाच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. डॉ. वडकुते यांच्या अंत्यविधीस विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार प्रज्ञा सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, हदगावचे आमदार बाबूराव पाटील कोहळीकर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
1
1
1,521
District Information Office, Latur retweeted
📍मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस, मुंबई #थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन #LIVE teapawt.org/i/broadcasts/2jPVJzpqE…
1
5
1,691
राज्यातील भरती व #स्पर्धापरीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला दुसरा अहवाल शासनास सादर केला आहे. सविस्तर वृत्त - mahasamvad.in/222843/
178
शेतकरी बांधवांनो, पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यायचा आहे? मग महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या! #पशुसंवर्धन #महाडीबीटी #शेतकरीयोजना #AnimalHusbandry #MahaDBT
214
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत २४ योजनांसाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध #मत्स्यव्यवसाय #मच्छीमार #मत्स्यसंपदायोजना #महाडीबीटी #MahaDGIPR
259
महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांना पाणी, दर्जेदार बियाणे, शेतीमालाला योग्य भाव आणि जलसंधारणाची मजबूत व्यवस्था देणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल! #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
246
माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथे केळी बागेची, तसेच नायगाव येथे व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत सुरू असलेल्या पांदण रस्ता कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी, मजुरांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. #latur
1
1
310
राज्याचे माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि दुष्काळ निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पमध्ये ही बैठक झाली.
1
352
माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी चाकूर येथील बीएसएफ कॅम्प येथील तलावाची पाहणी केली. या प्रसंगी राज्यचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थित होते.
1
1
267
राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे 19 नोव्हेंबर रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते चाकूर तालुक्यातील आनंदवाडी, नायगाव येथे येथे भेट देवून पीक नुकसान, पाझर तलावाची पाहणी करणार आहेत. तसेच नायगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
1
2
465
दुर्मिळ मराठी नाटकांचे जतन; अर्जास मुदतवाढ! निर्मिती संस्थांना अर्जासाठी २१ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ... #मराठी #मराठीनाटक #सांस्कृतिकवारसा #MahaDGIPR
1
240
भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी विकासाला मिळणार नवी दिशा ! सविस्तर लेख : mahasamvad.in/222024/
211
🗓️ निवृत्तीवेतनधारकांसाठी विशेष मेळावा - लातूर 🗓️ आपले निवृत्तीवेतन नियमितपणे सुरू राहावे यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला देणे बंधनकारक असते. यासाठी लातूर जिल्हा कोषागार कार्यालयात १८ ते २० नोव्हेंबर २०२६ दरम्यान विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. #Latur #JeevanPramaan
🤖 Made with AI
2
310
📣 जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता ६ वी प्रवेश परीक्षा २०२७-२८ चे प्रवेशपत्र उपलब्ध! 📅 परीक्षा दिनांक: २८ नोव्हेंबर, २०२६ 📥 प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी: cbseitms.rcil.gov.in/nvs/ 🔑 लॉगिन: नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख. 📝 #NavodayaVidyalaya #NVS #ExamUpdate
🤖 Made with AI
2
455
दुष्काळात दिवाळीसाठी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत मिळाल्याबद्दल #लातूर जिल्ह्यातील नागेश आंबेगावे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाचे आभार मानले. #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
318
भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताह 11 ते 18 नोव्हेंबर 2026 राज्यभर विविध उपक्रम #भगवान_बिरसा_मुंडा_गौरव_दिवस #सेवा_सप्ताह #बिरसामुंडा
230
दुष्काळाच्या या कठीण काळात समाजाने शेतकऱ्यांप्रती आपली सामाजिक संवेदनशीलता जपावी आणि मदतीसाठी पुढे यावे - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे लातूरमधील चाकूर तालुक्यातील सैनिकांची हाडोळी येथे 'माणुसकीची दिवाळी' उपक्रमांतर्गत ३०० शेतकरी व ५० निराधारांना मदत! 🌾
305
District Information Office, Latur retweeted
उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी नांदेड तालुक्यातील सायाळ येथील शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली. राज्यातील शेतकऱ्यांनी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत खचून जाऊ नये, कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. पुढील दहा महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, टँकर, आनंदाचा शिधा यांसह आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे, अशी ग्वाही मंत्री डॉ. सामंत यांनी दिली. @samant_uday #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
9
1
5
2,347