
Official X handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन https://xitter.cf/t.co/vQ3dmidWWZ
Mumbai, India
Joined October 2014
- Tweets83.1K
- Following79
- Followers326K
- Likes119
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष, आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ महापे येथे प्रकल्पाचा शुभारंभ
#IndiaJewelleryPark
#MahaDGIPR
महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
@Jishnu_Devvarma
महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात महर्षी वाल्मिकी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
@MPLodha
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्यासह शिष्टमंडळाची थुमिडीहेट्टी बॅरेज संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. मुख्यमंत्री रेड्डी तसेच जलसंपदा मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांनी थुमिडीहेट्टी प्रकल्पाविषयी माहिती देऊन प्रकल्पाची उंची १४८ वरून १५२ मीटरपर्यंत वाढविण्यासाठी महाराष्ट्राने मान्यता द्यावी, अशी विनंती केली.
#तेलंगणा राज्यातील थुमिडीहेट्टी जलसंपदा प्रकल्पाची उंची वाढविण्याबाबत मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या विनंतीनुसार या प्रकल्पविषयक मुद्द्यांचा महाराष्ट्र स्वतंत्र अभ्यास करेल. यासाठी दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि जलसंपदा विभागांचे सचिव यांची संयुक्त समिती नेमून तांत्रिक मुद्दे आणि महाराष्ट्रातील संभाव्य बुडीत क्षेत्र यांचा अभ्यास केला जाईल. त्यानुसार महाराष्ट्रातील नागरिकांच्या हिताचे रक्षण करत तेलंगणाला सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शेजारी राज्यांचे प्रश्न परस्पर सहकार्याने सोडविण्याची भूमिका महाराष्ट्राने नेहमीच घेतली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचे नुकसान होत नसेल आणि अन्य राज्याला लाभ होत असेल, तर सकारात्मक निर्णय घेण्यास राज्याची हरकत नाही. यापूर्वीही महाराष्ट्राने तेलंगणाच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. पूर्वीच्या मान्यतेनंतर प्रकल्पाचे प्रत्यक्ष बुडीत क्षेत्र अपेक्षित क्षेत्राच्या तुलनेत वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नव्या प्रस्तावामुळे होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रकल्पस्थळ बदलल्यामुळे बुडीत क्षेत्रावर होणारा परिणाम, संबंधित अभयारण्याचा समावेश आणि नदीपात्राबाहेरील आवश्यक जमिनीचे क्षेत्र यांचा अभ्यास केला जाईल. महाराष्ट्राच्या अभ्यासावर तेलंगणाला काही आक्षेप किंवा त्रुटी जाणवल्यास दोन्ही राज्यांचे अधिकारी त्यावर चर्चा करतील. आवश्यकता भासल्यास तज्ज्ञांचे मतही घेतले जाईल. पाणी वाटप आणि वैधानिक मंजुरीशी संबंधित बाबी केंद्रीय जल आयोगाच्या कार्यक्षेत्रात येतात. आयोगाने राज्याचा अभिप्राय मागितल्यानंतर महाराष्ट्र तथ्यांच्या आधारे आपली भूमिका मांडेल. स्वतंत्र अभ्यास आणि तांत्रिक चर्चेनंतर प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
बैठकीस राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (दूरदृश्यप्रणालीद्वारे), तेलंगणाचे जलसंपदा मंत्री उत्तमकुमार रेड्डी, महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, तेलंगणाचे मुख्य सचिव संजय जाजू, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव जयंत बोरकर, सचिव प्रकाश मिसाळ तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
@revanth_anumula
@girishdmahajan
@UttamINC
'आदिकवी' महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
#MaharishiValmiki
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार अभ्यासक्रमातील सुधारणा, ‘निपुण महाराष्ट्र’ अभियान, विद्यार्थ्यांचे आरोग्य, पारदर्शक शिक्षक भरती, ऑनलाइन प्रवेश, सीएमश्री आदर्श शाळा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन, विज्ञानविषयक उपक्रम आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवरील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांची मुलाखत पाहा…
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमांत ही विशेष मुलाखत मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे.
#राष्ट्रीयशैक्षणिकधोरण
नाशिकमध्ये गोदावरीच्या तीरावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ५१७ जणांनी एकाच वेळी सामूहिक #शंखनाद करून विश्वविक्रमाची नोंद केली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी या विक्रमाची घोषणा केली.
#नाशिक #त्र्यंबकेश्वर #सिंहस्थकुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेनिमित्त आयोजित या उपक्रमाने भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि सामूहिक सहभागाचे दर्शन घडविले. यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री महाजन यांनी सहभागींचे अभिनंदन करत हा विक्रम देशाच्या लौकिकात भर घालणारा असल्याचे सांगितले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तयारीत सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच भाविकांचे आपुलकीने स्वागत करून स्वच्छता, वाहतूक आणि अन्य सुविधांसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा महत्त्वाचा टप्पा म्हणून ३१ ऑक्टोबर रोजी नाशिकच्या रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वर येथे दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे.
@girishdmahajan
#विश्वविक्रम
‘मन की बात’च्या १३९ व्या भागात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र शासनाच्या #आदिवासी विकास विभागांतर्गत विकसित करण्यात आलेल्या #शबरीनॅचरल्स या ब्रँडचा विशेष उल्लेख केला. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या उत्पादनांच्या वैशिष्ट्यपूर्ण पॅकेजिंगला ‘इंडिया डिझाईन मार्क’ आणि जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ प्राप्त झाला आहे.
वारली, गोंड आणि चित्रकथी यांसारख्या कला परंपरांचे प्रतिबिंब असलेल्या या पॅकेजिंगमुळे महाराष्ट्राच्या आदिवासी संस्कृतीला जागतिक स्तरावर ओळख मिळत आहे. शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या नैसर्गिक, हस्तकला आणि कृषी उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे. ई-कॉमर्स, मोबाइल ॲप्लिकेशन आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या माध्यमातून ही उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचत असून, आदिवासी कारागीर, शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये शबरी नॅचरल्सचा उल्लेख केल्याने आदिवासी समाजाच्या कला, परंपरा आणि कौशल्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या माध्यमातून आदिवासी उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होऊन आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केला.
शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या दर्जेदार उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रधानमंत्री यांनी या उपक्रमाची दखल घेतल्याबद्दल अभिमान व्यक्त करत, आदिवासी संस्कृती आणि उत्पादनांचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी केले.
@narendramodi
@drashokuike_mla
#मनकीबात
#आदिवासीविकास
नवी मुंबईतील महापे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.
महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ, सुरक्षित औद्योगिक वातावरण आणि उद्योजकतेची परंपरा यांच्या बळावर राज्याला जागतिक दागिने उत्पादन व निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्याची संधी या प्रकल्पामुळे उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह, रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी उपस्थित होते.
महापे येथील २२ एकर क्षेत्रावर अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र विकसित करण्यात येत आहे. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीशी जुळवून घेत आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनातील नावीन्य आणि निर्यातीच्या नव्या संधींचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. प्रकल्पाच्या उभारणीसाठी वीज, पाणी, रस्ते, पायाभूत सुविधा आणि विविध विभागांच्या परवानग्या वेळेत उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या संकल्पपूर्तीत उत्पादन, निर्यात, रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेची भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्राला एक ट्रिलियन अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने इंडिया ज्वेलरी पार्कसारखे प्रकल्प महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
#नवीमुंबई #महापे येथे उभारण्यात येणाऱ्या #इंडियाज्वेलरीपार्क प्रकल्पातून २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एक लाख रोजगारांच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
२२ एकर क्षेत्रावर विकसित होणाऱ्या या प्रकल्पात दोन हजारांहून अधिक उत्पादन युनिट्स सामावून घेण्याचे उद्दिष्ट असून, महाराष्ट्राला जागतिक रत्न व आभूषण उत्पादन आणि निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्यास यामुळे चालना मिळेल. राज्याच्या जेम्स अँड ज्वेलरी धोरणांतर्गत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे, पाच लाख रोजगार निर्माण करणे आणि निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व प्रशासकीय सहकार्य शासनाकडून उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
वनमंत्री गणेश नाईक यांनी इंडिया ज्वेलरी पार्कमुळे नवी मुंबईचे जागतिक स्तरावरील महत्त्व वाढेल, असे सांगितले. शहराची डेटा सेंटर हब म्हणूनही ओळख निर्माण होत असून, औद्योगिकीकरणातून निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि उद्योगाच्या विकासातील त्याचे महत्त्व विशद केले.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@NaikSpeaks
@MlaMandaMhatre
@GJEPCIndia
#IndiaJewelleryPark
#नवीमुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील (नैना) नियोजनबद्ध विकासातून सुमारे १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी पाच लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील. या विकासातून निर्माण होणाऱ्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येईल. शेतकऱ्यांना विकासाचे भागीदार बनवून आणि आधुनिक पायाभूत सुविधा व सक्षम दळणवळण व्यवस्था विकसित करून #तिसरीमुंबई महाराष्ट्राच्या विकासाचे नवे आर्थिक केंद्र ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
#पनवेल तालुक्यातील #शिरढोण येथे #नैना क्षेत्रातील विकासकामांचे भूमिपूजन, नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील जोडणीसाठी उभारण्यात आलेल्या एसबीआर-९, बीआर-४, बीआर-५ आणि उरण बायपास पुलांचे लोकार्पण तसेच भूधारकांना मालमत्ता पत्रकांचे वाटप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री भरत गोगावले, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, अतुल पाटीलउपस्थित होते.
नैना क्षेत्राचा एकात्मिक विकास आराखडा आणि नगररचना योजनांच्या माध्यमातून नियोजनबद्ध व कालबद्ध विकास करण्यात येत आहे. भूधारकांच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे, मालकी नोंदी आणि मोजणीची प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या क्षेत्रात एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी, एरोसिटी आणि नॉलेज सिटी यांसारख्या संकल्पनांच्या माध्यमातून रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर परिसराच्या विकासाला चालना देणारा हा प्रकल्प भूमिपुत्रांच्या हिताचे संरक्षण करून राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नैना क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून विकासाला गती देण्यात येणार असून, भूमिपुत्रांना विकासाचे भागीदार बनवून न्याय व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जमीनधारकांसाठी विकास शुल्क आणि बेटरमेंट चार्ज शून्य करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, फ्रीहोल्डसंदर्भातील कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. पुढील २५ ते ५० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन नैना क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू तसेच सक्षम रस्ते व मेट्रो जोडणीच्या माध्यमातून हा परिसर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
नैना क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि विमानतळ जोडणी प्रकल्पांमुळे उद्योग, व्यापार, सेवा व पर्यटन क्षेत्राला चालना मिळून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले. सुमारे ९५३ कोटी रुपये खर्चाच्या एसबीआर-९, बीआर-४ व बीआर-५ प्रकल्पांमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारी वाहतूक अधिक वेगवान होणार असून, ५० कोटी रुपये खर्चाच्या उरण बायपासमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास सुलभ होईल. अटल सेतू, उलवे कोस्टल रोड आणि अन्य जोडरस्त्यांमुळे नवी मुंबई व रायगड परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी नांदगावचे राजाराम पाटील, रामचंद्र भोईर, नामदेव भोईर, देवेंद्र भगत, धनाजी खुटले तर देवदगावचे जगदीश वाघमारे, गणेश गायकर, वामन वाघमारे, निलेश वाघमारे, विनोद वाघमारे या स्थानिक भूमिपुत्र भूधारकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मालमत्ता पत्रकांचे वितरण करण्यात आले.
प्रकल्पाविषयी माहिती
उरण शहरातील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी सिडकोच्या वतीने द्रोणागिरी परिसरातील हॉटेल आनंदी ते उरण शहरादरम्यान ५०.२६ कोटी रुपये खर्चून ९४१ मीटर लांबीचा बायपास पूल उभारण्यात आला आहे. ११ मीटर रुंदीच्या या पुलामुळे स्थानिक नागरिक, मच्छीमार, शेतकरी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ व जलद होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पूर्वेकडून जलद व थेट जोडणी देण्यासाठी ९५३ कोटी रुपये खर्चाचे एसबीआर-९, बीआर-४ आणि बीआर-५ हे तीन महत्त्वपूर्ण पूल उभारण्यात आले आहेत. पनवेल खाडीवरील या पुलांमुळे पुणे, पनवेल, ठाणे आणि कल्याण परिसरातून राष्ट्रीय महामार्ग ४बीमार्गे विमानतळ, उलवे किनारी मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) आणि अमरा मार्गाशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे. दोन्ही दिशांना प्रत्येकी चार मार्गिका आणि स्वतंत्र सेवा रस्ते, तसेच क्लोव्हरलीफ इंटरचेंजमुळे वाहतूक अधिक सुरळीत होऊन प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ibharatgogawale
@SunilTatkare
@MPShrirangBarne
#नवीमुंबईआंतरराष्ट्रीयविमानतळ
📍 प्लॉट नंबर ईएल 237, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, #महापे, #नवीमुंबई
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इंडिया ज्वेलरी पार्कच्या कामाचा शुभारंभ
#LIVE xitter.cf/i/broadcasts/1mxPaZyEL…
📍 दिल्ली पब्लिक स्कुल, सांगुर्ली लगतचे मैदान, शिरढोण, ता. पनवेल, जिल्हा रायगड
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नैना परिसरातील विकास कामांचा शुभारंभ
#LIVE xitter.cf/i/broadcasts/1PJqrNMWb…
सीबीजी संपीडित जैविक वायू प्रकल्प
वर्षभरात ३० ते ४० प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट
#Biogas
#जैविकवायू
#MahaDGIPR
महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्री-शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, जातिभेद निर्मूलन आणि मानवाधिकार या क्षेत्रांत दिलेले योगदान आजही आधुनिक भारतासाठी प्रेरणादायी आहे.
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता राखून योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.
पुणे यशदा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरास भटके-विमुक्त विकास परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष उद्धवराव काळे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे, राज्यस्तरीय अशासकीय सदस्य राजेंद्र दोनाडकर, डॉ. संजय पुरी, नरेश पोटे, शरद माकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. प्रशासकीय नियम व कार्यपद्धतींचे पालन करताना क्षेत्रीय स्तरावरील कामकाज अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यावर भर दिला पाहिजे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक सुसूत्रपणे करण्यास मदत होईल, असे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अशासकीय सदस्य, विभागाचे क्षेत्रीय अधिकारी आणि महसूल विभागाचे क्षेत्रीय अधिकारी यांचे २४ व २५ ऑक्टोबरदरम्यान हे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजे उमाजी नाईक आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
@save_atul
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
भारतातील प्राचीन #शिक्षण व्यवस्था अतिशय महान असून येथे तक्षशिला, नालंदा, विक्रमशिलासारखी विद्यापीठे अस्तित्वात होती. जगाच्या कानकोपऱ्यातून विद्यार्थी येथे ज्ञानार्जनासाठी येत. हे प्राचीन ज्ञान एवढे वैशिष्ट्यपूर्ण होते की तेव्हाही भारत जागतिक व्यापार, जीडीपी व निर्यातीतही वर्चस्व गाजवत होता. वर्तमानात दिशादर्शक ठरणाऱ्या प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्थेचा वारसा जपणे ही येणाऱ्या पिढीची मोठी जबाबदारी व काळाचीही गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मिहान येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट(आयआयएम) येथे आयोजित ९व्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेच्या समारोपीय समारंभास शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, माजी खासदार डॉ. नितीश भारद्वाज यांची विशेष उपस्थिती होती. आयआयएम नागपूरचे संचालक डॉ.भीमराया मेत्री, द साऊथ पब्लिक स्कूलच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी दस्तुरे आदी यावेळी उपस्थित होते.
'एआय'च्या युगात मानवी मूल्ये, नीतिमत्ता व चारित्र्य जपण्याची मोठी जबाबदारी नव्या पिढीवर असून आपल्या शिक्षण प्रणालीचा केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थ्यांभोवतीच्या अनेक चर्चा आपण ऐकतो. या परिषदेने 'जनरेशन वॉव' (वर्ल्ड ऑफ वंडरफुल जनरेशन) ही नवी संकल्पना मांडली असून 'झेन झी' किंवा 'जेन अल्फा'पेक्षा ती निराळी आहे. ही पहिली पिढी आहे, जी माहितीच्या स्फोटासोबत जन्माला आली व तंत्रज्ञानाच्या स्फोटासोबत वाढत आहे. 'मिलेनियल्स' अशी पिढी आहे की ज्यांच्या आयुष्याचा नंतरचा भाग विकसित तंत्रज्ञानासोबत जात आहे.
'जनरेशन वॉव'कडे प्रचंड प्रमाणात माहिती व अफाट उगमस्थाने आहे. त्याचे ज्ञानात रूपांतर करण्याची व त्याचा विचारपूर्वक वापर करण्याची दुहेरी जबाबदारी या पिढीवर आहे. ज्ञान हे त्या माहितीवर प्रक्रिया करण्याचे शहाणपण आहे. त्या माहितीला एक नैतिक स्वरूप देणे, योग्य-अयोग्य ओळखणे व संवेदनशीलतेने ते आचरणात आणणे हेच आज खरे आव्हान आहे.
सध्याच्या काळात शिक्षक - अध्यापकांची भूमिका ही विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्या विचार प्रक्रियेला योग्य तो आकार देण्याची असली पाहिजे. माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी आवश्यक ती सखोल चर्चा व मंथन या परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत असल्यामुळे ही परिषद महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी 'पाथेय– द गोल्डन एलिक्सिर' (Pathey – The Golden Elixir) या ई-स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, शिक्षण आणि संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समर्पित व्यक्तींना प्रतिष्ठित 'नचिकेता' आणि 'सुपर नचिकेता' पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सर्वोत्तम नचिकेता पुरस्कार श्री नितीश भारद्वाज यांना लाईफ टाईम नचिकेता पुरस्कार, श्रीमती रजिया हुसेन व श्रीमती श्रद्धा केळापुरे यांना व अकॅडमिक्स कन्सल्टंटच्या संचालिका व प्रमुख डॉ. इंदिरा नयना, सेंटर पॉईंट शाळेच्या प्राचार्या श्रीमती कंचन उके यांना सुपर नचिकेता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
@Dev_Fadnavis
@DRPANKAJBHOYAR
@IIMNagpurIndia
राज्यात घरगुती पाइप गॅस (#PNG) जोडण्यांचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने गॅस कंपन्यांना दिलेल्या विविध सवलतींची मुदत 31 मार्च 2027 पर्यंत वाढवली आहे. यामध्ये परवानग्या 24 तासांत देणे, काही शुल्क माफ करणे आणि 24 तास काम करण्याची परवानगी देणे अशा सवलतींचा समावेश आहे.
राज्यातील स्वंयपाकाच्या गॅसच्या सुलभ वितरणासाठी पाइपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) वितरणाला गती मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार व केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) नेटवर्कचा जलद आणि वेगवान विस्तार करण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारने ईज ऑफ डुइंग अंतर्गत परवाने देणे सुलभ केले असून काही परवान्यांच्या शुल्क माफीसह अनेक महत्त्वपूर्ण सवलती घोषित केल्या आहेत. गॅस कंपन्याना या सवलती यापूर्वी 30 जून 2026 पर्यंत देण्यात आल्या होत्या. आता यामध्ये मुदतवाढ देण्यात आली असून आता या सवलती 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय नगर विकास विभागाने जारी केला आहे.
जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने एलपीजी उपलब्धतेवर मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात पाइपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) जोडण्यांचा विस्तार गतीने करण्यासाठी नगर विकास विभागाने सर्व महापालिका व नगरपालिकांसाठी सूचना निर्गमित केल्या आहेत.



































