STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) (@MPSCstudsRight) profile picture

MPSC STUDENTS RIGHTS HELP for MPSC, UPSC AND OTHER COMPETITIVE AND ALL STUDENTS https://teapawt.org/t.co/WQNAqeq0oB

Pune, India
Joined February 2020
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
पोलीस भरतीमध्ये बोगस स्पोर्ट सर्टिफिकेटचे रॅकेट उघड करणाऱ्या वैभव चव्हाण या तरुणाचा झालेला संशयास्पद मृत्यू अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. विशेष म्हणजे आपल्याबाबत असा काही घातपात होऊ शकतो, अशी शंका त्याने व्यक्त केली होती आणि आज तो आपल्यात नाही. MPSC मध्ये देखील बोगस खेळाडू व दिव्यांग उमेदवार भरपूर आहेत त्यांची यादी देखील सरकारला दिलेली आहे परंतु सरकार त्यावर काहीही उपाययोजना करत नाही. म्हणून तुम्ही कितीही आरक्षण दिले तरी खरा खेळाडू व दिव्यांग यांना न्याय मिळणार नाही. सरकारने जे करायला पाहिजे ते वैभवने केले परंतु त्याच्या पदरी काय आले? सरकारने वेळीच वैभव च्या मारेकऱ्यांना आणि पेपर फुटीशी संबंधित सर्व दोषींच्या मुसक्या लवकरात लवकर आवळायला हव्यात. आम्ही सर्वजण त्याच्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि त्याचा बोगसगिरीविरोधातील लढा पुढं घेऊन जाऊ.! @CMOMaharashtra
6
5
194
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
MPSC मधील गैर प्रकारासंदर्भात पूर्वीच सचिवांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार करूनही पेपर फुटतील भामट्यांना अभय... MPSC पेपरफुटी प्रकरणात काल आयोगातील सहायक कक्ष अधिकारी रोहित कोलटक्केला अटक झाली आहे, अटक झालेला आयोगातील हा चौथा अधिकारी आहे. आयोगामधील या भामट्यांची भनक MPSC मधील काही अधिकाऱ्यांना लागलेली होती. या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रार करूनही या भामट्यांवर पांघरून घालण्याचे काम त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले आहे. मोठा मासा नेहमी छोट्या माशांना खातो परंतु या मोठ्या माशांनीच काही छोट्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न या पेपर फुटी मध्ये केलेला आहे. अजूनही काही मासे तपासात समोर आलेले नाहीत ते देखील लवकरच समोर येतील. या संदर्भात SIT ला माहिती देणार आहेच त्यासोबत वास्तव कट्ट्यावर लाईव्ह तर येणारच... -किरण निंभोरे @CMOMaharashtra @mpsc_office
1
41
87
1,694
RT @VastavKatta: संयुक्त परीक्षा गट ब 2026 ची SIT मार्फत चौकशी होऊनच पुढील निर्णय घेतला जाईल असा शब्द मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis महोदयां…
27
37
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
MPSC पेपर फुटी संदर्भातील लढा थांबलेला नाही... अध्यक्ष, सचिव आणि सदस्य यांना हटवल्याशिवाय हा लढा कदापि थांबणार नाही. परीक्षा या पारदर्शकपणे होण्यासाठी संपूर्ण बॉडी बरखास्त होणे गरजेचे आहे तरच MPSC वर विश्वास बसेल. हा लढा कोणा एकाचा नसून तो आपणा सर्वांचा लढा आहे त्यामुळे या लढ्यामध्ये आपण सर्वांनी ताकतीने आणि एकीने उभे राहणे गरजेचे आहे. बाकी सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य करण्याचे आश्वासन जरी दिलेले असले तरी मुख्य मागणी ही अध्यक्ष, सचिव आणि संपूर्ण बॉडीचा राजीनामा हिच असणार आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याकारणाने विद्यार्थी शांत आहेत परंतु हा उत्सव संपल्यानंतर विद्यार्थी पुन्हा एकदा नव्या जोशाने अध्यक्ष सचिव आणि सदस्य यांचा राजीनामा घेण्यासाठी समोर येतील. ही मागणी जिवंत ठेवण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण कमीत कमी आपल्या सोशल मीडियावरून तरी ही मागणी लावून धरणे गरजेचे आहे. कोणी काय केले यापेक्षा आपण काय करतोय हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी आपल्या सोशल मीडियावर तरी व्यक्त होणे गरजेचे आहे. आपण जेवढे ताकतीने एखाद्याला ट्रोल करतो तेवढ्या ताकतीने जर आपण सोशल मीडियावर आपली मागणी लावून धरली तर ती मान्य होण्यास नक्कीच मदत होईल. गणेश विसर्जनानंतर हा लढा आणखीन तीव्र होईल. राजीनामा झाल्याशिवाय हा लढा थांबणार नाहीच मी नेहमी आपल्या सोबत असेल.... धन्यवाद किरण निंभोरे
15
124
259
5,790
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
MPSC अध्यक्षांचा राजीनामा तर झालाच पाहिजे पण MPSC वरील विश्वासार्हता संपादन करायची असेल तर अध्यक्ष सचिव सदस्य यांच्यासोबत संपूर्ण बॉडी रिस्ट्रक्चर होणे गरजेचे आहे. अध्यक्ष व सचिव हे थेट IAS असावेत. मुख्यमंत्री महोदय आपण राजीनामा घेऊ शकत नाहीत परंतु आपण संपूर्ण बॉडी restructure करू शकता, ज्यामध्ये अध्यक्ष व सचिव हे थेट IAS असायला हवेत. हे रिफॉर्म्स केले तर अध्यक्षांच्या राजीनाम्याची गरजच नाही ते ऑटोमॅटिक बाहेर पडतील आणि त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जाईल. अध्यक्षांकडे नैतिकता शिल्लक नाही म्हणून राजीनामा नाही, परंतु जानेवारी मध्ये DI पेपर फुटला असेल तर तत्कालीन अध्यक्षांवर कारवाई केव्हा होणार.? राजीनामा झाल्याशिवाय विद्यार्थी शांत राहणार नाहीत. @mpsc_office @CMOMaharashtra
17
185
2
343
5,672
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
MPSC विद्यार्थ्याची आत्महत्या... प्रथमेश दिलीप देशमुख मूळ गाव खासापुरी ता. परंडा जिल्हा धाराशिव. दोन दिवसापूर्वी प्रथमेश घरी गेला होता घरचे सोयाबीन पूर्णपणे जळालेले पाहून तो नैराशेत गेला होता. वडील नाहीत पाच बहिणी व आई हेच त्याचे कुटुंब. आर्थिक परिस्थिती नाजूक असताना स्पर्धा परीक्षेची तयारी पुण्यात करत असताना भविष्यातील आर्थिक खर्च कसा पेलवायचा याचेही टेन्शन होतेच. MPSC मधील पेपर फुटी धोक्यात गेलेले भविष्य आणि धोक्यात गेलेली शेती पुढे होणार काय? या चिंतेतून ही आत्महत्या झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. आज सकाळी पुणे येथे त्यांच्या रूम मध्ये ही आत्महत्या केली. सरकार ने या आत्महत्या कडे गांभीर्याने पहावे ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office @RealBacchuKadu @VikramPachpute_ @RRPSpeaks
8
94
8
205
4,314
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
MPSC अध्यक्षांचा बचावाचा केविलवाणा प्रयत्न... अध्यक्षांच्या मते औषध निरीक्षक पदाची प्रश्नपत्रिका जानेवारी 2026 मध्येच फुटली, पोलिसांच्या तपासात मात्र विश्वेश्वर नकाते यांनी 19 मार्च रोजी पार्किंग मध्ये प्रश्नपत्रिका संच अभिजीत लेंडवे याला दिला अशी माहिती सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. या महोदयांनी तीन मार्च 2026 रोजी पदाचा प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारला. 19 मार्चला जर प्रश्नपत्रिका पार्किंग मध्ये मिळाले तेव्हा अध्यक्ष महोदय झोपले होते का? एक खोटं लपवण्यासाठी किती खोटे बोलणार? आणि तुम्हाला कोणी सांगितले की आम्ही फक्त तुमचा राजीनामा मागतोय? आम्ही तुम्हाला सह आरोपी करण्याची मागणी करतोय. माझ्या माहितीनुसार आयोग तीन महिने आधी प्रश्नपत्रिका तयार करत नाही. अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कार्यकाळात म्हणजेच 19 मार्चला जर प्रश्नपत्रिका पार्किंग मधून देवाण-घेवाण झाले असेल तर मुख्य आरोपी अध्यक्षांनाच करावी लागेल. आणि जर तुमच्या म्हणण्यानुसार प्रश्नपत्रिका जानेवारी 2026 मध्ये फुटले असेल तर तत्कालीन अध्यक्षांवरती सध्याचे अध्यक्ष गुन्हा दाखल करणार का? @mpsc_office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @bhimanwar
10
155
1
309
4,205
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
MPSC पेपर फुटी मध्ये जे आरोपी पकडले ते फक्त मोहरे आहेत, या पेपर फुटीमध्ये अध्यक्ष, सचिव, सदस्य व मंत्रालयातून डेप्युटेशन वर आलेले अधिकारी यांनाही सहआरोपी करून यांची हकालपट्टी करावी. तरच 7 सप्टेंबर रोजीच्या मुलाखती पारदर्शक होतील व मागील परीक्षांची पारदर्शक चौकशी होईल. या चौकशीसाठी SIT नेमणे गरजेचे असतानाही अजूनही सरकार कशाची वाट पाहत आहे. अध्यक्ष, सचिव व काही अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय का? मुख्यमंत्री यावर काहीच का बोलत नाहीत? एक आमदार सोडता विरोधक व सत्ताधारी आमदार, खासदार या पेपर फुटीवर का काहीच बोलत नाहीत? विद्यार्थ्यांचे भविष्य चोरणाऱ्यांविरोधात विद्यार्थी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरणार मग पोलिसांनी दबाव आणला तरीही आणि लाठीचार्ज झाला तरीही. मुख्यमंत्री महोदयांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office @mieknathshinde @SunetraA_Pawar
21
184
292
3,761
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
Drug Inspector प्रमाणेच MPSC चे बाकी पेपर पण फुटले असतील का?
91%हो
9%नाही
458 votes • Final results
7
25
34
1,797
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
MPSC DRUG INSPECTOR PAPER LEAK... आज पर्यंत MPSC वर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि सर्व परीक्षा एमपीएससी कडे देण्यास भाग पाडले पण इथेही कुंपणच शेत खात आहे... पण राखणदार कुठे होते? राखणदार बदलणे गरजेचे आहे... कारण हा फक्त ड्रग इन्स्पेक्टर या पदाचा प्रश्न नाही तर आता संपूर्ण एमपीएससी वरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. आता फक्त राजीनामाच... अन्यथा .... आपणास माहित आहेच... @CMOMaharashtra @mpsc_office
7
70
1
140
2,521
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
आयोगाचा पेपर लीक होणे ही MPSC इतिहासातील दुर्दैवी घटना व गंभीर बाब असून आयोगाच्या विश्वासार्हतेला तडा पोहचविणारी घटना आहे. मागील 20 वर्षात अशी घटना कधीच घडली नाही. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी व सचिवांनी नैतिक जबाबदारी घेत तत्काळ राजीनामा द्यावा. सरकारने स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती अध्यक्ष व सचिव म्हणून निवडावी अन्यथा सरकार व MPSC ला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. ऑनलाईन परीक्षेचा घाट घालण्यासाठी तर हा पेपर फोडला नसेल ना? याचाही विचार व्हायला हवा. @CMOMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis
14
117
2
187
2,699
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
🎯"निपुण सेतू योजना" कार्यान्वित करण्यासाठी MPSC कडून विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून देण्याची आमदार ॲड. विक्रम पाचपुते यांची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश. MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमदार विक्रम पाचपुते यांच्या प्रयत्नातून सुरू झालेली "निपुण सेतू योजना" कार्यान्वित करण्यासाठी MPSC ने मुलाखतीचा टप्पा गाठलेल्या उमेदवारांची माहिती उपलब्ध करून द्यावी ही विद्यार्थी हिताची मागणी माननीय आमदार विक्रम पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. त्यामुळे संपूर्ण स्पर्धा परीक्षार्थींमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन वर्षांमध्ये सुमारे 30 हजार पदे एमपीएससी मार्फत भरली गेली. या पदांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले होते. निपुण सेतूचा जो मुख्य उद्देश आहे त्यासाठी जे उमेदवार पात्र आहेत अशा उमेदवारांचा डेटा हा खाजगी व निमसरकारी संस्थांना देण्यासाठी MPSC ला सूचना द्याव्यात जेणेकरून बेरोजगार, हुशार, होतकरू उमेदवारांना रोजगाराची संधी मिळेल ही बाब आमदार विक्रम पाचपुते यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. या मागणीचा गांभीर्याने विचार करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थी हिताच्या या निर्णयासाठी प्रयत्न करत असल्याकारणाने समस्त स्पर्धा परीक्षार्थींकडून आपले मनःपूर्वक आभार🙏 #mpsc #nipunsetu @CMOMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis @VikramPachpute_ @kiran_nimbhore @SakalMediaNews @abpmajhatv @TV9Marathi @LoksattaLive @timesofindia
3
12
36
1,223
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
MPSC मार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त परीक्षा "गट ब" 2025 चा निकाला MPSC ने 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केला. या निकालामध्ये Sub Registar- 84 State Tax Inspector- 279 ASO - 3 उमेदवारांची निवड झाली आहे पैकी 76 उमेदवार हे SUB REGISTAR व STI या दोन्ही पदावर निवड झालेले आहेत. MPSC ने नुकताच वन कॅंडिडेट वन पोस्ट हा निर्णय घेतलेला असूनही एकाच उमेदवाराला दोन पोस्ट मिळत असल्याने 76 पदे रिक्त राहणार आहेत या सर्व गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार करून MPSC ने Opting out किंवा विद्यार्थ्यांकडून पदांचा पसंती क्रम मागवावा व नव्याने निकाल प्रसिद्ध करावा अशी मागणी श्रीगोंदा -नगर मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाला दिलेले आहेत. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @VikramPachpute_ @mpsc_office
3
48
1
81
1,894
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
महाराष्ट्र FDA ने फिल्म अभिनेता शाहरुख खान, अजय देवगन और टाइगर श्रॉफ को 'विमल इलायची' विज्ञापन मामले में शो-कॉज नोटिस जारी किया है। शिकायतकर्ता और बीजेपी विधायक विक्रम पचपुते ने इस कार्रवाई का स्वागत करते हुए इसे सरोगेट विज्ञापन पर बड़ी कार्रवाई बताया। #ReporterDiary | @ritvick_ab
1
6
17
2,759
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
🎯संयुक्त परीक्षा "गट ब" 2025 (SR व STI) चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रम पाचपुते यांनी घेतली माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट.. संयुक्त परीक्षा "गट ब" 2025 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालामध्ये 76 उमेदवार Sub Registar व STI या दोन्ही पदी निवड झालेले आहेत. ऑप्टिंग आउट नसल्याकारणाने 76 STI पदे हे रिक्त राहू नये यासाठी पसंती क्रम देऊन पुन्हा नव्याने निकाल लावावा ही विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन माननीय आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी आज मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेऊन हा विषय मांडला. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दाखवत यावर तात्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. विद्यार्थी हिताचा हा निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल माननीय आमदार विक्रम पाचपुते यांचे सर्व स्पर्धा परीक्षार्थींच्या वतीने मनःपूर्वक आभार. @CMOMaharashtra @mpsc_office @VikramPachpute_ @Dev_Fadnavis
25
47
1,130
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
Opting Out रद्द केल्याने MPSC ने साध्य काय केले? जे विद्यार्थ्यांना समजते ते MPSC ला का समजू नये? Group B मुख्य परीक्षा 2025 मधून 76 उमेदवार SUB REGISTAR व STI या दोन्ही पदावर निवड झालेले आहेत. आयोगाच्या निर्णयानुसार waiting list लावणार आहेत पण, या process ला जवळ जवळ 6 ते 9 महिने वाट बघावी लागेल. Sub Registrar ॲडमुळे बऱ्याच ASO, STI, PSI अशा Post holder मुलांनी ही परीक्षा दिली असल्याने तेही या लिस्ट मधे आहेत...पण त्यातील SR न झालेल्यांना बाहेर पडण्यासाठी काहीच व्यवस्था नाहीये. आता परिस्थिती अशी आहे की, PSI फिजिकल लिस्ट मध्ये SR आणि STI हिच मुले रिपीट होतील, आणि खरी PSI मुले वंचित राहतील आणि गेल्यावर्षी प्रमाणे , यावर्षीही PSI पदाच्या 392 जागा पूर्णपणे भरल्या जाणार नाहीत... म्हणून आयोगाने revised list लावावी...त्यासाठी Opting out किंवा Preference मागवावे... आयोगाने यापूर्वी वन कॅंडिडेट वन पोस्ट या त्यांच्या निर्णयालाच शहीद केले आहे. MPSC अध्यक्ष व सचिव यांना जर हा गोंधळ थांबवता येत नसेल तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्यापेक्षा राजीनामा द्या.. @mpsc_office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @RRPSpeaks
4
93
5
127
3,259
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
"किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्यात याव्यात" या मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाचा नक्की अर्थ काय समजावा? सुरक्षित क्लासरूम हे ऑफलाईन परीक्षेसाठी की ऑनलाईन परीक्षेसाठी? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे "शिक्षण संस्थाचालक" म्हणजे कोण? शिक्षण संस्था चालक याचा अर्थ महाराष्ट्रातील शिक्षण संस्था असा असेल तर त्यांचा स्पर्धा परीक्षा व नोकर भारतीसी संबंध काय? सविस्तर माहिती घेऊन उद्या सकाळी वास्तव कट्ट्यावर लाईव्ह येत आहे? विद्यार्थ्यांशी दगाफटका होऊ नये हीच अपेक्षा.. @CMOMaharashtra @RealBacchuKadu @RealBacchuKadu @RRPSpeaks @mieknathshinde
3
7
19
1,084
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे महाराष्ट्रातील विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात बैठक पार पडली. महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षापद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित, आणि सर्वसंमत सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी घेतला. ही समिती प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेईल. त्याआधारे राज्यासाठीचे समग्र धोरण निश्चित केले जाईल. केंद्र सरकारने पेपरफुटीसंदर्भात आणि परीक्षा गैरव्यवहारासंदर्भात संसदेत कायदा केला आहे. महाराष्ट्रातही यासंदर्भात स्वतंत्र कायदा आहे. तथापि, संसदेने केलेला कायदा अधिक कठोर असल्याने तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भातील प्रक्रिया येत्या पंधरवड्यात पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्यात याव्यात, असेही निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mieknathshinde #Maharashtra #DevendraFadnavis #CompetitiveExams
80
65
1
165
17,807
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
MPSC ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात विदर्भ दौरा... MPSC च्या सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे कायमस्वरूपी ऑनलाईन ऐवजी ऑफलाईनच झाल्या पाहिजेत, सोबतच ६० हजार जागांची जाहीर केलेली मेगाभरती ही 2026 मधेच पूर्ण झालीच पाहिजे! या मागणीसाठी विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत आहे. सध्या विदर्भ दौऱ्यावर असताना अमरावतीनंतर आता नागपूर मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. एक वर्ष ऑफलाइन पद्धतीला मुदतवाढ दिलेली असली तरीही आणि तलाठी भरती MPSC मार्फत घेण्यात येत असली तरीही विद्यार्थ्यांमधील रोष कमी झालेला नाही हे विद्यार्थ्यांशी चर्चा करताना लक्षात आले. तूर्तास तरी विद्यार्थ्यांनी आगामी परीक्षेची तयारी करावी कारण इतिहासात पहिल्यांदाच एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर तलाठ्याचा गुलाल पडणार आहे. नागपूर येथील सर्व शिक्षक वृंद / संस्थाचालक, अभ्यासिकचालक यांनी या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी एक समिती स्थापन केलेले आहे. भविष्यात हा निर्णय मागे न घेतल्यास ही समिती विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. सरकारने हिवाळी अधिवेशनात नागपूर मध्ये आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये हीच विनंती. जोपर्यंत MPSC कायमस्वरूपी ऑफलाइनची घोषणा करत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील... विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद लवकरच वास्तव कट्ट्यावर व्हिडिओ स्वरूपात प्रदर्शित करत आहे #onlyofflineexam #mpscofflineexam
2
14
57
2,012
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) retweeted
ऑफलाईन पद्धतीने घेतलेले पेपर फुटतात म्हणून ऑनलाईन पेपर घेण्यात कुठला शहाणपणा? ऑनलाईन परीक्षेचा सावळा गोंधळ जगाने पाहिला. पेपर ची सुरक्षितता जपण्यात सरकार अपयशी झाले. भुरट्या चोरांपासून तुम्ही पेपर वाचवू शकत नसाल तर परकीय शत्रूंपासून तुम्ही देश कसा वाचवणार? @RealBacchuKadu @RRPSpeaks @Dhananjay4INC @abpmajhatv @TV9Marathi @abhijeet_dipke
5
47
1
92
3,744