This is the official Twitter account of Navi Mumbai Municipal Corporation (NMMC). Connect us on Facebook: NMMConline Instagram: nmmconline

Navi Mumbai
Joined January 2014
नळ बंद ठेवण्यापासून ते पाण्याची गळती वेळीच दुरुस्त करण्यापर्यंत, आपल्या प्रत्येक कृतीतून पाण्याची बचत शक्य आहे. पिण्याच्या पाण्याचा योग्य वापर करा, पर्यायी जलस्रोतांना प्राधान्य द्या आणि इतरांनाही जलसंवर्धनासाठी प्रोत्साहित करा. पाणी वाचवणे हीच काळाची गरज, जलसंवर्धन हीच आपली जबाबदारी! #NMMC #NaviMumbai #जलसंवर्धन #पाणीबचत #SaveWater #WaterConservation
3
467
दिघा तलाव तसेच कोपरखैरणे व दिघा माता बाल रूग्णालयाची महापौर श्रीम.सुजाता पाटील व सभागृह नेते श्री.सागर नाईक यांनी केली पाहणी सविस्तर वृत्त लिंक :- facebook.com/share/p/1Ezw3tq… #nmmcmayor #nmmcengineeringdepartment #nmmchealthdepartment #nmmcmayorvisit #nmmctalavvisit #nmmchospital #nmmchospitalvisit #nmmcmayorsujatapatil #sagarnaik #drjayajinath @MahaDGIPR @MAHA_UDD @mygovindia @MahaMyGov @SujataP88512 @MrSagarNaik @DrJayajiKNath
643
मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात नवी मुंबई महापालिकेची धडक कारवाई 2 हजार 08 मालमत्तांना 7 दिवसांची, तर 507 मालमत्तांना 48 तासांची जप्तीपूर्व नोटीस नोटीस बजावण्यात आलेल्या 182 मालमत्ताधारकांकडून 14 कोटी 35 लाख रुपयांचा करभरणा नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत आर्थिक वर्ष 2026-27 साठी निश्चित करण्यात1 हजार 200 कोटी रुपयांच्या वसूली उद्दिष्टाच्या दिशेने नियोजनबध्द वाटचाल सुरू आहे. दि. 27 ऑक्टोबर 2026 पर्यंत महानगरपालिकेने ५४६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. शहरातील मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, वारंवार आवाहन करूनही कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यासह महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार नियमाप्रमाणे कठोर कारवाई केली जात आहे. सप्टेंबर 2026 पासून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मालमत्ता कराची सातत्याने थकबाकी असलेल्या मालमत्ता ह्या प्राधान्याने चिन्हांकित करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत आतापर्यंत 2 हजार 08 मालमत्ताधारकांना 7 दिवसांची जप्तीपूर्व नोटीस, तसेच 507 मालमत्ताधारकांना 48 तासांची जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आलेली आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या मालमत्ताधारकांपैकी 182 जणांनी 14 कोटी 35 लाख रुपयांच्या थकीत मालमत्ता कराचा भरणा केला आहे. निर्धारित मुदतीत कराचा भरणा न करणाऱ्या उर्वरित थकबाकीदारांविरुद्ध नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिकेकडून औद्योगिक आणि व्यावसायिक मालमत्तांच्या मालमत्ता कर वसुलीवर विशेष भर देण्यात येत आहे. या मोहिमेच्या पुढील टप्प्यात निवासी मालमत्तांच्या थकबाकी वसूलीसाठीही विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. मालमत्ताधारकांनी वेळेत मालमत्ता कराचा भरणा करून महानगरपालिकेच्या वसूली मोहिमेला सहकार्य करावे आणि शहराच्या विकासकार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे. सविस्तर वृत्त लिंक : #nmmcpropertytax #nmmcpropertytaxdepartment
3
879
Small Gadgets. Big Impact! Earphones, chargers, cables, remotes and smartwatches may be small, but they are electronic waste too. Discarding them with regular household waste can lead to improper disposal and environmental harm. ✔️ Keep small electronic items separate from regular waste. ✔️ Never throw old gadgets into regular dustbins. ✔️ Hand them over at designated e-waste collection points for responsible disposal. Every small gadget deserves the right disposal route. Give your e-waste a second life! (E-Waste Management | Responsible Disposal | Electronic Recycling | Circular Economy) #EWaste #EWasteManagement #ResponsibleDisposal #RecycleElectronics #ElectronicWaste #CircularEconomy #SpecialCampaign6 #Swachhata2026 #SwachhBharatMission #SBMUrban2 #SwachhBharat #SwachhMaharashtra #SwachhMaharashtraMission #ReduceReuseRecycle #MajhiVasundhara #MissionLiFE #UrbanDevelopment #JanSahabhag #SustainableFuture #NaviMumbai #NMMC #MaharashtraDGIPR
3
988
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. वारंवार सूचना देऊनही मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्यांवर आता जप्तीची कारवाई केली जात आहे. आपली मालमत्ता जप्तीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी थकीत मालमत्ता कराचा त्वरित भरणा करा. वेळेत कर भरा आणि पुढील कायदेशीर कारवाई टाळा!
4
833
नळातून होणारी पाण्याची गळती ही केवळ छोटी समस्या नाही, तर पाण्याचा मोठा अपव्यय आहे. घरात, सोसायटीत किंवा कार्यालयात कुठेही नळाची गळती आढळल्यास ती त्वरित दुरुस्त करा. तुमची छोटीशी दक्षता पाण्याची मोठी बचत करू शकते. #NMMC #NaviMumbai #पाणीबचत #जलसंवर्धन #SaveWater #WaterConservation
1
1
7
760
नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम. सलुजा सुतार यांनी 1 ते 4 नोव्हेंबर 2026 या कालावधीत करावे- नेरूळ सेक्टर 26 येथील गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी उद्यानामध्ये आयोजित भव्यतम 'हिरकणी महोत्सव' यामध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे केले आवाहन. #NMMC #navimumbai #NaviMumbaiMunicipalCorporation #nmmcsamajvikasdepartment #NMMCMahilaVaBalkalyanSamiti #HirkaniMahotsav #nmmchirkanimahotsav #MayorNaviMumbai #mayorsujatapatil #NaviMumbaiMahapaurSujataPatil #salujasutar @MAHA_UDD @MahaDGIPR @salujaspeaks
3
839
नमुंमपा महिला व बालकल्याण समितीच्या वतीने 1 ते 4 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या 'हिरकणी महोत्सव 2026' मध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग होण्याचे उपमहापौर श्री. दशरथ भगत यांनी केले आवाहन. #NMMC #navimumbai #NaviMumbaiMunicipalCorporation #nmmcsamajvikasdepartment #NMMCMahilaVaBalkalyanSamiti #HirkaniMahotsav #nmmchirkanimahotsav #MayorNaviMumbai #mayorsujatapatil #NaviMumbaiMahapaurSujataPatil #salujasutar @MahaDGIPR @MAHA_UDD @dashrathbhagat
1
4
966
विविध विभागांच्या कामकाजाचा नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला आढावा सविस्तर वृत्त लिंक :- facebook.com/share/p/1HM6DbE… #nmmc #navimumbaimunicipalcorporation #nmmccommissioner #drkailasshinde #nmmcreviewmeeting @MahaDGIPR
2
748
27 ऑक्टोबरला नवी मुंबईत राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम सविस्तर वृत्त लिंक :- facebook.com/share/p/1Ly4YYR… #nmmchealthdepartment #nationaldeworming #nationaldewormingday #nationaldewarmingdaycampaign #dewarming #dewormingday #dewormingawareness @MahaDGIPR @MAHA_UDD @mygovindia @MahaMyGov
1
637
27 ऑक्टोबरला कायाकल्प उपक्रमांतर्गत स्वच्छता व आरोग्य स्वच्छता एकदिवसीय राष्ट्रव्यापी कार्यक्रम शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत "विशेष मोहीम 6.0" राबविण्यात येत असून, या मोहिमेचा उद्देश प्रशासकीय स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचे प्रमाण कमी करणे आणि संस्थात्मक स्वच्छता वृद्धिंगत करणे हा आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून दि. 27 ऑक्टोबर 2026 रोजी देशभर ‘कायाकल्प उपक्रम (स्वच्छता व आरोग्य स्वच्छता)' हा एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महापालिका रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे, आपला दवाखाना या ठिकाणी कायाकल्प उपक्रमातील नमूद मानके व कार्यपद्धतीच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये - (1) स्वच्छता व कचरा व्यवस्थापन : रुग्णांची जास्त वर्दळ असलेली ठिकाणे, बाह्यरुग्ण विभाग (OPD), कक्ष (Wards) तसेच स्वच्छतागृहे यांची सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच जैव वैद्यकीय कचरा (BMW) व्यवस्थापन नियमावलीचे पालन करण्यात येईल. (2) आरोग्य स्वच्छतेस प्रोत्साहन व संसर्ग नियंत्रण : या अंतर्गत संसर्ग प्रतिबंधक प्रोटोकॉलची पुनर्पडताळणी करणे, हात स्वच्छतेचे पालन (Hand Hygiene Compliance) करण्यात येईल. (3) सौंदर्यीकरण व पर्यावरणीय देखभाल : निरुपयोगी भंगार साहित्य हटविणे, अनावश्यक वस्तूंचे व्यवस्थापन करणे, उपलब्ध जागेचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करणे तसेच रुग्णालय परिसरातील खुल्या हरित क्षेत्राची निगा राखून उपचारास पोषक वातावरण निर्माण करणे. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमांतून कायाकल्प उपक्रम यशस्वी केला जाणार आहे. #NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #NaviMumbaimahanagarpalika #DGIPR #nmmccommissioner #nmmchealthdepartment #SpecialCampaign #SpecialCampaign6 @MahaDGIPR @MAHA_UDD @mygovindia @mygovMaha
1
655
Where Does Your E-Waste Go Next? Ever wondered what happens to your old electronics after collection? They go through a series of carefully managed processes to recover valuable materials and ensure hazardous components are handled safely. ✔️ Collection: Old electronics are collected separately. ✔️ Sorting & Dismantling: Devices are sorted and dismantled through approved processes. ✔️ Material Recovery: Valuable materials such as copper and aluminium are recovered. ✔️ Refined Raw Materials: Recovered materials are processed for use in manufacturing. Responsible e-waste disposal helps recover valuable resources and supports a circular economy. Give your old electronics the right next destination! (E-Waste Management | Responsible Recycling | Material Recovery | Circular Economy) #EWaste #EWasteManagement #ResponsibleDisposal #RecycleElectronics #MaterialRecovery #CircularEconomy #SpecialCampaign6 #Swachhata2026 #SwachhBharatMission #SBMUrban2 #SwachhBharat #SwachhMaharashtra #SwachhMaharashtraMission #ReduceReuseRecycle #MajhiVasundhara #MissionLiFE #UrbanDevelopment #JanSahabhag #SustainableFuture #NaviMumbai #NMMC #MaharashtraDGIPR
1
6
1,006
महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अभिवादन महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे उपमहापौर श्री.दशरथ भगत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. भागवत डोईफोडे, उपसचिव श्री.संजीव पवार आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. #jayanti #MaharshiValmikiJayanti #ValmikiJayanti #dymayornavimumbai #dashrathbhagat @MahaDGIPR @MAHA_UDD @dashrathbhagat
2
577
पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे! दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर जाणीवपूर्वक करा, गरज नसताना नळ सुरू ठेवणे टाळा आणि पाण्याचा अपव्यय रोखा. आज केलेली पाण्याची बचत उद्याच्या जलसुरक्षेसाठी मोलाची ठरेल. #NMMC #NaviMumbai #पाणीबचत #जलसंवर्धन #SaveWater #WaterConservation
2
600
थकीत मालमत्ता कर त्वरित भरा आणि थकबाकीदार न राहता 'करदाता' म्हणून आपली अभिमानास्पद ओळख निर्माण करा #NMMC #NaviMumbai #मालमत्ताकर #PropertyTax #OnlinePayment #TaxPayment
1
697
किल्ले गावठाण येथील वृक्षांवर विषबाधा हे वृत्त विपर्यास्त किल्ले गावठाण सीबीडी बेलापूर भागात काही झाडांवर विषप्रयोग झाल्याच्या बातम्या काही प्रसार माध्यमांमधून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वास्तविकत: काही दिवसांपूर्वी प्राप्त या तक्रारीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रत्यक्ष पाहणीनुसार या झाडांवर कोणत्याही प्रकारचा विषप्रयोग (poisoning) झाल्याचे आढळून आलेले नाही. याबाबत पर्यावरण तज्ञांचे अभिप्रायही घेण्यात आलेले आहेत. वृक्षतज्ञांशी केलेल्या चर्चेनुसार झाडांतून स्त्रवणारा स्राव हा जुन्या जखमा आणि नैसर्गिक उपचार प्रक्रियेचा (natural healing process) परिणाम असू शकतो. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून चुना, हायड्रोजन पेरॉक्साइड आणि बोर्डेक्स (Bordex) यांचा वापर करून निर्जंतुकीकरण आणि कीड नियंत्रण उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ही जागा 'सीजीएसटी आयुक्त' (CGST Commissioner) कार्यालयाच्या मालकीची असून, संबंधित कार्यालयालाही याबद्दल माहिती देण्यात आली आहे. तसेच याविषयी तक्रार करणाऱ्या नागरिकांनाही वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करण्यात आले आहे. त्यामुळे सदर वृक्षांवर विषबाधा झाल्याचे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. #NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #nmmcgardendepartment #clarification
1
6
1,520
जलसंवर्धन ही केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. घर असो, सोसायटी असो किंवा कार्यालय पाण्याचा काटकसरीने वापर करा. #NMMC #NaviMumbai #जलसंवर्धन #पाणीबचत #SaveWater #WaterConservation
2
737
नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने 1 ते 4 नोव्हेंबर 2026 या कालावधीत गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदान, सेक्टर 26, करावे - नेरूळ येथे आयोजित करण्यात येत असलेल्या 'हिरकणी महोत्सव 2026' मध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग व्हावे असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील यांनी केले आहे. #NMMC #navimumbai #NaviMumbaiMunicipalCorporation #nmmcsamajvikasdepartment #NMMCMahilaVaBalkalyanSamiti #HirkaniMahotsav #nmmchirkanimahotsav #MayorNaviMumbai #mayorsujatapatil #NaviMumbaiMahapaurSujataPatil #salujasutar @MAHA_UDD @MahaDGIPR @SujataP88512
1
1
12
1,760