Joined January 2020
सावित्री मॉल : महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी हक्काची बाजारपेठ ! पुणे जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या दर्जेदार उत्पादनांना विक्रीसाठी, संकलन, ग्रेडिंग व पॅकेजिंगसाठी पुणे शहरातील गुलटेकडी येथे "सावित्री मॉल" हे भव्य मध्यवर्ती हब विकसित करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या या एकूण ७५ कोटी रुपयांच्या अभिनव प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. सावित्री मॉलच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली असून १९.१९ कोटी रुपयांच्या निधीलाही राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. #ceozp #mspa2point0 @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
121
स्वयंसहायतेकडून स्वावलंबनाकडे : ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणातून परिवर्तनाची नवी दिशा नवी दिल्ली येथे आयोजित One Purpose India Forum (OPIF) 2026 मध्ये ‘स्वयंसहायतेकडून स्वावलंबनाकडे : बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था आणि ग्रामीण परिवर्तन’ या विषयावरील चर्चासत्रात सहभागी होत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी आपले विचार मांडले. ग्रामीण विकासाचे लाभ समाजातील अशा घटकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, ज्यांच्या अडचणी अनेकदा दुर्लक्षित राहतात. विशेषतः कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी एकट्याने सांभाळणाऱ्या महिलांना रोजगाराच्या मर्यादित संधी आणि सामाजिक आधाराचा अभाव अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागातील जवळपास एक लाख कुटुंबांचे सर्वेक्षण केल्यामुळे या महिलांची परिस्थिती, त्यांच्या गरजा आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना अधिक स्पष्टपणे समजून घेतल्या. या माहितीच्या आधारे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र बचत गटांची निर्मिती आणि शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. या प्रयत्नांचा केंद्रबिंदू महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि सुरक्षित भविष्य मिळवून देणे हा आहे. #ceozp #mspa2point0
1
1
172
महिलांना वाहनचालक प्रशिक्षण देऊन रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच सावित्री कॅन्टीन, स्थानिक सुपरमार्केट आणि प्राथमिक आरोग्यसेवेशी संबंधित उपक्रम राबविणे, अशा विविध माध्यमांतून महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, स्वावलंबन म्हणजे केवळ उत्पन्न मिळवणे नव्हे. बाजारपेठेपर्यंत पोहोच, आर्थिक व्यवहारांबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि स्वतःच्या भविष्याची दिशा ठरविण्याचा आत्मविश्वास या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. OPIF 2026 मधील चर्चेतून बचत गट आणि शेतकरी उत्पादक संस्थांचे जाळे अधिक सक्षम करणे, उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण स्तरावर दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवू शकतील अशी शाश्वत उपजीविकेची प्रारूपे विकसित करणे, यांचे महत्त्व अधोरेखित झाले. या महत्त्वपूर्ण संवादासाठी CSRBOX टीमचे तसेच चर्चासत्रातील सहकारी वक्त्यांचे मनःपूर्वक आभार. @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
1
28
पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या ‘उमेद’ला नवे बळ! महिलांच्या हाताला काम, कष्टाला योग्य दाम आणि त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, हा आदरणीय अजितदादांचा नेहमीच ध्यास होता. त्यांचे हेच विचार पुढे नेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. पुणे येथे उभारण्यात येणाऱ्या ७५ कोटी रुपयांच्या ‘सावित्री-उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे २० कोटी रुपयांच्या बांधकामाला राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. उर्वरित ५५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. पुणे जिल्ह्यात ‘उमेद’ अभियानाशी जोडलेल्या सुमारे २७ हजार स्वयं-सहाय्यता गटांमधून तीन लाखांहून अधिक महिला कार्यरत आहेत. या महिला कृषी व अन्नप्रक्रिया उत्पादने, फळे-भाजीपाला, मसाले, धान्य, मध, हस्तकला अशा विविध उत्पादनांची निर्मिती करतात. त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळावी, यासाठी ‘सावित्री–उमेद मॉल’ महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. सुमारे १ लाख १२ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या मॉलमध्ये व्यावसायिक दुकाने, प्रशिक्षण हॉल, कार्यालयीन सुविधा, कॅफेटेरिया, बहुउद्देशीय सभागृह, निवास व्यवस्था आणि ३३६ वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल. विशेष म्हणजे, हा मॉल केवळ विक्री केंद्र न राहता संकलन, पॅकेजिंग, ब्रँडिंग, विपणन आणि ई-कॉमर्स अशा सुविधांचे एकत्रित केंद्र ठरेल. यामुळे ग्रामीण महिला उद्योजकांना व्यापक बाजारपेठ मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ, रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेला चालना मिळेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि ग्रामविकास विभागाचे आभार! आदरणीय अजितदादांनी पाहिलेले महिला सक्षमीकरणाचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि आपल्या भगिनींना अधिक सक्षम, स्वावलंबी व उद्यमशील बनविण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. #सावित्रीउमेदमॉल #महिलासक्षमीकरण #WomenEmpowerment
1
6
13
710
एका सरकारी शाळेचा प्रवास थेट NASA, AI आणि Robotics पर्यंत! हे शक्य झालंय जिल्हा परिषद शाळा, वराळे येथे. शिक्षकांचे अथक प्रयत्न, ग्रामस्थांची साथ आणि CSR च्या मदतीने या शाळेने आधुनिक शिक्षणाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. इथे विद्यार्थी पुस्तकी ज्ञानासोबत Robotics, AI आणि कौशल्याधारित शिक्षणातून नवनवीन गोष्टी शिकत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा, क्रीडा आणि इतर क्षेत्रांतील यशासोबतच शाळेची वाढलेली पटसंख्याही या बदलाची साक्ष देते. योग्य संधी, उत्तम मार्गदर्शन आणि गावाची साथ मिळाली, तर सरकारी शाळाही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मोठी भरारी देऊ शकतात! #ceozp #punezillaparishad #mspa2point0 @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
2
176
New spaces. New dreams. New possibilities. Pune Model School is ready to inspire young minds and shape brighter futures! #ceozp #punezillaparishad #mspa2point0 @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
177
पुणे मॉडेल स्कूल : आधुनिक शिक्षणाची नवी दिशा! पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘पुणे मॉडेल स्कूल’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून STEM लॅब, डिजिटल बोर्ड यांसारख्या आधुनिक शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळत आहेत. #ceozp #punezillaparishad #mspa2point0
1
3
233
काळानुरूप बदल स्वीकारत जिल्हा परिषद शाळा आता नव्या शैक्षणिक संधींची दारे खुली करत आहेत. आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या बळावर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी या शाळा सज्ज होत आहेत. @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
48
आपली शाळा बदलतेय... "स्मार्ट" होतेय ! पुणे जिल्हा परिषदेच्या "पुणे मॉडेल स्कूल" या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत शाळांमध्ये STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) लॅब, डिजिटल बोर्ड अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध निर्माण करण्यात येत आहेत. आता आधुनिकीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत जिल्हा परिषदेच्या शाळा शाळा "मॉडेल स्कूल" म्हणून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी सज्ज होत आहेत. #ceozp #punezillaparishad #mspa2point0 @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
1
211
पुणे जिल्हा परिषद आयोजित "पुणे सावित्री हाट" लोगो डिझाईन व टॅगलाईन स्पर्धा ! महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, महिला बचतगटांनी तयार केलेल्या स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी व महिलांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने "पुणे सावित्री हाट" हा अभिनव उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमासाठी लोगो डिझाईन व आकर्षक टॅगलाईनसाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होत व्हावे ही नम्र विनंती. #ceozp #punezillaparishad #mspa2point0 #maharashtra @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
1
160
सरकारी शाळेतील मुलं स्वतः Robots बनवत आहेत? होय, हे घडतंय जिल्हा परिषद शाळा, वराळे येथे! इथल्या Robotics Lab मध्ये विद्यार्थी फक्त टेक्नॉलॉजी शिकत नाहीत, तर स्वतः Water Level Detector, Heavy Object Lifting Robot, Drawing Robot आणि Flying Drone सारखे प्रोजेक्ट्स बनवतात. एवढंच नाही, तर 3D Printer च्या मदतीने आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष आकारही देतात. Arduino, Raspberry Pi, Home Automation आणि Smart Irrigation यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना अगदी शालेय वयातच करून दिली जाते. जिल्हा परिषद शाळा, वराळे — जिथे मुलं फक्त टेक्नॉलॉजी शिकत नाहीत, तर स्वतःच्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवायला शिकतात! #ceozp #punezillaparishad #mspa2point0 @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
1
171
पुस्तकात NASA बद्दल वाचण्यापासून ते प्रत्यक्ष NASA ला भेट देण्यापर्यंतचा प्रवास... लोणीकंदच्या श्रावणी आणि शंतनू यांच्यासाठी हा अनुभव स्वप्नवत होता! अमेरिकेतील Kennedy Space Center मध्ये Rockets, Space Shuttles आणि Astronaut Training Experience चा अनुभव घेत या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचं जग जवळून अनुभवलं. या प्रवासात महत्त्वाची भूमिका होती ती पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणीकंदच्या शिक्षकांची! विद्यार्थ्यांना या संधीची माहिती देण्यापासून ते परीक्षेची तयारी करून घेण्यापर्यंत, शिक्षकांनी त्यांना प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केलं. शाळेच्या योग्य मार्गदर्शनामुळे श्रावणी आणि शंतनू यांना आपल्या स्वप्नांच्या दिशेने मोठी झेप घेता आली. कारण जेव्हा शाळा संधी देते आणि शिक्षक योग्य दिशा दाखवतात, तेव्हा विद्यार्थ्यांची स्वप्नं प्रत्यक्षात उतरू शकतात! #ceozp #punezillaparishad #mspa2point0 #maharashtra @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
1
170
आपल्या कर्तृत्वाच्या बळावर विजयाचे सीमोल्लंघन करण्याचा दिवस म्हणजेच.. "विजयादशमी" ! या पावन मुहूर्तावर आपणही संकल्प करूया, एकजुटीने विकासाचे सीमोल्लंघन करूया.. सर्वांना विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा ! #ceozp #maharashtra #punezillaparishad #mspa2point0 @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
1
200
सहकार्यातून समृद्धी : बचतगट चळवळीला जिल्हा परिषदेचे बळ ! प्रत्येक स्त्रीमध्ये कौशल्य व जिद्दीचा संगम असतो. अशा अनेक स्त्रियांनी एकत्रित येऊन एकाच ध्येयाने मार्गक्रमण केल्यास मोठी क्रयशक्ती निर्माण होऊ शकते. हेच ध्येय साध्य करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने महिला बचत गटांच्या चळवळीला विशेष महत्त्व व बळ दिले. पुणे जिल्ह्यात महिला बचत गट चळवळीतून हजारो महिलांनी आर्थिक सक्षमीकरण साधले. नवरात्रीच्या या पावन उत्सवात पुणे जिल्ह्यातील महिला शक्तीने केलेला सक्षमीकरणाचा प्रवास नक्की पाहा..! #ceoz #punezillaparishad #mspa2point0 #maharashtra @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
168
तळेगाव ढमढेरेच्या १४ विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची संधी! विज्ञानाच्या जगात कुतूहलातूनच नव्या शोधांचा जन्म होतो, याची प्रचिती तळेगाव ढमढेरे येथील विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीतून दिली आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आयोजितIndia’s Science Exhibition मध्ये येथील शाळेतील १४ विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रकल्पांची निवड झाली. या निवडीमुळे त्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोला भेट देण्याची संधी मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि सर्जनशीलतेच्या बळावर मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. विज्ञानाची आवड, प्रयोगशील वृत्ती आणि योग्य मार्गदर्शन यांची सांगड घातल्यास विद्यार्थी किती मोठी भरारी घेऊ शकतात, हे या यशातून दिसून येते. या सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि त्यांच्या यशामागे मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक अभिनंदन! #ceozp #punezillaparishad #mspa2point0 #maharashtra @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @Info_Pune @MahaDGIPR
1
183
आरोग्यसाक्षरता : स्त्रीच्या आरोग्यमय जीवनाचा मंत्र ! स्त्रियांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली व महिलांमध्ये मासिक पाळीसह आरोग्याच्या विविध प्रश्नांबाबत माहितीचा व जागरूकतेचा अभाव आढळतो. जनजागृतीच्या माध्यमातून हाच माहितीचा अभाव दूर करण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीसह या वयात होणारे मानसिक बदल व इतर बाबींबद्दल जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यासोबतच महिलांच्या उत्तम आरोग्यासाठीही विशेष शिबिरांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्रशासन कार्यरत आहे #ceozp #punezillaparishad #MSPA2point0 #maharashtra @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
1
209
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, आपल्या नेतृत्वात महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्याच्या विकासालाही गती मिळावी याच सदिच्छा ! #deputychiefministerofmaharashtra @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
1
214
शाळेच्या वर्गातून तंत्रज्ञानाच्या विश्वात भरारी! धानोरीच्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील पूनम सपकाळ आणि कार्तिकी चव्हाण या विद्यार्थिनींनी कोडिंगच्या माध्यमातून आपल्या कल्पकतेला नवे व्यासपीठ मिळवून दिले आहे. शैक्षणिक खेळ तयार करताना त्यांना प्रोग्रामिंगची आवड निर्माण झाली. ही आवड जोपासण्यासाठी शिक्षकांनी त्यांना विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले. प्रोजेक्ट तयार करताना उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने मदत केली, तर मुख्याध्यापकांनी तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. या मार्गदर्शनातून दोघींनी स्वतःच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात केली. नव्या गोष्टी शिकण्याची उत्सुकता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि तंत्रज्ञानाचा सर्जनशील वापर करण्याचा आत्मविश्वास त्यांच्या या प्रवासातून दिसून येतो. विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल जागवणारे, त्यांच्या कल्पकतेला चालना देणारे आणि कृतीतून शिकण्याची संधी देणारे शिक्षणच उज्ज्वल भविष्याचा पाया घालते. धानोरीच्या या शाळेतील उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देत नाहीत, तर भविष्यातील नवसंशोधक घडवण्याच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊल ठरत आहेत. #ceozp #punezillaparishad #mspa2point0 @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
181
माझे अस्तित्व : एकल महिलांच्या अस्तित्वाला सन्मानाची जोड देणारा उपक्रम ! पुणे जिल्ह्यातील एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, समाजात त्यांना सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून एकल महिलांना विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. एकल महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण, व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य व आवश्यक साहित्यही उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने मदत केली. या माध्यमातून अनेक एकल महिला आज उद्योजक म्हणून आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. "माझे अस्तित्व" या उपक्रमाची राज्य पातळीवरही दखल घेण्यात आली असून, संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवण्यासाठी कार्यवाही प्रगतीपथावर आहे ! #ceozp #punezillaparishad #MSPA2point0 #maharashtra @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
181
सक्षमीकरणाच्या पंखांना प्रयत्नांचे बळ ! स्थानिक महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार झालेल्या दर्जेदार उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुणे विमानतळ येथे "सावित्री" दालन निर्माण करण्यात आले. या दालनात महिला बचत गटांकडून उत्पादित झालेली उत्पादने नागरिकांना खरेदीसाठी सहजपणे उपलब्ध होतात. यामुळे या उत्पादनांच्या विक्रीत कित्येक पटींनी वाढ झाली असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच उद्योग क्षेत्रात त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत झाली आहे. #ceozp #punezillaparishad #MSPA2point0 #maharashtra @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @gajananpatilIAS @Info_Pune @MahaDGIPR
1
1
180