शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
🔸Strengthening Anti-Narcotics Operations Through Advanced Technology!
Mumbai Police has introduced a state-of-the-art "Anti-Narcotics Investigation and Forensic Van", equipped with five advanced drug detection devices and 360-degree CCTV cameras, enabling on-the-spot screening, sample collection and forensic procedures.
During a Live Music Event at Mahalaxmi Racecourse, screening conducted using the van led to legal action against 12 persons found consuming narcotic substances.
🔸अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड!
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘'Anti-Narcotics Investigation and Forensic Van'’ दाखल झाली आहे. पाच अत्याधुनिक अंमली पदार्थ शोध यंत्रे आणि ३६०-डिग्री CCTV कॅमेऱ्यांनी सुसज्ज या वाहनामुळे घटनास्थळीच प्राथमिक तपासणी, नमुना संकलन व फॉरेन्सिक प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित एक लाइव्ह म्युझिक कार्यक्रमादरम्यान या वाहनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तपासणीत अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळलेल्या १२ व्यक्तींविरुद्ध NDPS कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
#DrugFreeMumbai #MumbaiPolice4All
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
🔸 Recognising and rewarding excellence in policing!
Mumbai Police personnel from various branches and zones were felicitated for their outstanding work in crime detection, investigations, action against smugglers, cybercrime detection and sports.
Congratulations to all the awardees and their teams for their dedication and commitment to keeping Mumbai safe.
🔸 उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई पोलिसांचा गौरव!
विविध शाखा व परिमंडळांतील पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुन्हे तपास, तस्करांवरील कारवाई, सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन!
#MumbaiPolice4All #RecognisingExcellence
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
Hon’ble Shri @Dev_Fadnavis, Chief Minister, Maharashtra State, inaugurated and launched several advanced technology initiatives of the Mumbai Police.
Projects like Fusion Centre (Pratyancha), Citizen App, Samvad App – Police’s own secure messenger, DigiID, Mumbai Police Integrated Working System (MPIS), distribution of 50,000 tablets, secure data centre, forensic vehicle of the Anti-Narcotics Cell, and a secure network connecting more than 490 offices, all officers and staffs individually; will make the Mumbai Police Force more modern, fast and transparent.
On this occasion, Hon’ble Minister for Information Technology and Cultural Affairs Adv. Ashish Shelar (@OfficeofAShelar), Hon’ble Minister for Skill Development, Employment, Entrepreneurship and Innovation Shri. Mangal Prabhat Lodha (@MPLodha), Additional Chief Secretary (Home) Smt. Manisha Patankar-Mhaiskar, @CPMumbaiPolice Shri. Deven Bharti, Secretary to Hon’ble Chief Minister Dr. Shrikar Pardeshi, and senior officers of the Mumbai Police Force were also present.
🔸 मुंबई पोलीस दलाच्या तंत्रज्ञान संवर्धित विविध प्रकल्पांचे कार्यान्वयन व लोकार्पण आज मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे संपन्न झाले.
फ्युजन सेंटर (प्रत्यंचा), नागरिक ॲप (Citizen App), संवाद ॲप – पोलिसांचा स्वतःचा सुरक्षित मेसेंजर, DigiID, मुंबई पोलीस एकात्मिक कार्य प्रणाली (MPIS), ५०,००० टॅब्लेट वितरण, सुरक्षित डेटा सेंटर, अंमली पदार्थ विरोधी कक्ष करीता फॉरेन्सिक वाहन आणि ४९० हून अधिक कार्यालयांना जोडणारे एक सुरक्षित नेटवर्क, ज्याद्वारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वैयक्तिकरित्या जोडलेले आहेत या सारख्या प्रकल्पांमुळे मुंबई पोलीस दल अधिक आधुनिक, जलद, पारदर्शक आणि लोकाभिमुख होणार आहे.
या वेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव (गृह) श्रीमती मनिषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, तसेच मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#TechnologyDrivenPolicing #FusionCentre #Pratyanch #CitizenApp #SamvadApp #DigiID #MPIS #AntiNarcoticsCell #InnovationInPolicing #FutureReadyPolice
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
🔸Inaugurated a two-week training programme for @MumbaiPolice personnel under the 'Swastha Police, Sashakt Police' initiative.
The programme will feature expert guidance on physical fitness, yoga, pranayama, nutrition, legal awareness and financial planning, along with other therapy sessions.
This will continue as a permanent initiative of Mumbai Police.
Through the Police Welfare Fund, we aim to train 1,200 police personnel this year. In the initial phase, police personnel on the higher side of the BMI scale are being prioritised.
A step towards building a healthier, fitter and stronger Mumbai Police!
🔸 तंदुरुस्त पोलीस दलासाठी 'स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस' उपक्रमाचा प्रारंभ!
'स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस' उपक्रमांतर्गत @MumbaiPolice दलातील अंमलदारांसाठी दोन आठवड्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आज उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमात शारीरिक तंदुरुस्ती, योग, प्राणायाम, आहार, कायदेविषयक जागरूकता आणि आर्थिक नियोजन या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असून, इतर उपचारात्मक (थेरपी) सत्रांचाही समावेश असेल.
हा उपक्रम मुंबई पोलीस दलाचा कायमस्वरूपी उपक्रम म्हणून सुरू राहील.
पोलीस कल्याण निधीच्या माध्यमातून चालू वर्षात १,२०० पोलीस अंमलदारांना प्रशिक्षित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जास्त BMI असलेल्या पोलीस अंमलदारांना प्राधान्य देण्यात येत आहे.
निरोगी, तंदुरुस्त आणि सशक्त मुंबई पोलीस दलाच्या दिशेने एक पाऊल!
#SwasthaPoliceSashaktPolice #MumbaiPolice
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
🔶Dear Mumbaikars,
To discuss your grievances, suggestions, or queries, visit me at @MumbaiPolice Headquarters every Tuesday at 3:30 PM. Walk-ins are welcome; no prior appointment is required.
Listening to you and working towards effective solutions remains our priority.
🔶 प्रिय मुंबईकर,
आपल्या तक्रारी, सूचना किंवा शंकांबाबत चर्चा करण्यासाठी दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. यासाठी पूर्वनियोजित वेळ घेण्याची आवश्यकता नाही.
आपले म्हणणे ऐकून घेणे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करणे, हे आमचे प्राधान्य आहे.
#MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
🔸Cyber Cell Mumbai conducted a cyber awareness session at Parle Tilak ICSE School, Vile Parle, Mumbai, sensitising around 500 students on cyberbullying, stalking, sharing obscene content, fake profiles and other forms of cybercrime.
The session also highlighted the impact of excessive mobile phone usage, encouraging students to stay alert, responsible and safe in the digital world.
🔸मुंबई सायबर कक्षातर्फे विलेपार्ले येथील पार्ले टिळक आयसीएसइ शाळेत सायबर जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर सत्रातून सुमारे ५०० विद्यार्थ्यांना सायबर बुलिंग, सायबर स्टॉकिंग, अश्लील मजकूर/सामग्री शेअर करणे, बनावट प्रोफाइल्स तसेच सायबर गुन्ह्यांच्या विविध प्रकारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच मोबाईल फोनच्या अतिवापराचे दुष्परिणाम अधोरेखित करत विद्यार्थ्यांना डिजिटल जगात सतर्क, जबाबदार आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
#MumbaiPolice4All #CyberSafeMumbai
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
🔸There is a rhythm to crossing too. Slow down, look and go!
🔸रस्ता ओलांडताना पांढऱ्या पट्ट्यावरूनच ओलांडा. रहदारीची शिस्त पाळा आणि सुरक्षित प्रवास करा.
#NineHuesCues #HappyNavratri
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
🔸Recognising excellence in policing!
At the Monthly Crime Review Conference held today, Mumbai Police personnel were felicitated with Certificates of Appreciation for their exceptional work in crime detection, securing convictions, recovery of stolen property, and outstanding performance in the line of duty.
Heartiest congratulations to all the awardees for their exemplary dedication, commitment, and service to Mumbai.
🔸पोलीस सेवेतील उत्कृष्टतेचा गौरव!
आज आयोजित करण्यात आलेल्या 'मासिक गुन्हे आढावा परिषदेत' गुन्ह्यांचा शोध घेणे, आरोपींना शिक्षा मिळवून देणे, चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे आणि कर्तव्य बजावताना दाखवलेली उल्लेखनीय कामगिरी याबद्दल मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबई शहराप्रती दाखवलेली अतुलनीय निष्ठा, कटिबद्धता आणि उत्कृष्ट सेवेबद्दल सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#ExcellenceInPolicing
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
Garba ke rounds are a go, red signals are a no-go!
Follow every signal on your way to the celebrations.
गरब्याचा ताल आणि ट्रॅफिक सिग्नलचा लाल रंग चुकवणे टाळाल, तर प्रवास सुखकर होईल.
#NineHuesCues #HappyNavratri
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
Your day can go from rosy reds to gloomy blues real quick when you don't verify - be it links or information.
उत्सवाचा दिवस आनंदाने साजरा करा, पण अतिउत्साहाने अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. पडताळणी करून मगच क्लिक करा.
#NineHuesCues #HappyNavratri
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
Dear Mumbaikars,
You can meet me at the @MumbaiPolice Headquarters every Tuesday at 3:30 PM to share your grievances, suggestions and queries. No prior appointment is required.
Hearing you out, finding effective solutions and taking necessary action remain our top priorities.
I look forward to meeting with you.
प्रिय मुंबईकर,
आपल्या समस्या, सूचना आणि प्रश्न माझ्यासमोर मांडण्यासाठी दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.
आपल्या समस्या ऐकून घेणे, त्यावर योग्य त्या उपाययोजना करणे आणि आवश्यक ती कार्यवाही करणे, हेच आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
आपले प्रश्न समजून घेत, त्यांचे निराकरण करण्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे.
#MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
🔸A Safe Farewell to Bappa!
As Mumbaikars come together to bid farewell to Bappa, our officers and staff at Girgaon Chowpatty are on ground, ensuring seamless arrangements and a safe, smooth visarjan for all.
🔸निरोप आपल्या लाडक्या गणराजाला!
बाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर मुंबईकरांची मोठी गर्दी होत असताना, भाविकांच्या सुरक्षिततेसह विसर्जन सोहळा शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडावा, यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत.
#GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan2026
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
🔸Ganapati Bappa Morya!
Attended the Ganapati Pujan at Police Headquarters, Naigaon.
🔸गणपती बाप्पा मोरया!
नायगाव येथील पोलीस मुख्यालयात आयोजित गणपती पूजन सोहळ्यास उपस्थित राहून बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.
#Ganeshotsav2026
#गणेशोत्सव_२०२६
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
🔸As we bid farewell to Ganraya, His presence remains in our hearts and His blessings continue to guide us. Ganpati Bappa Morya!
🔸आपल्या लाडक्या गणरायाला तात्पुरता निरोप दिला असला तरी, तो कधीच आपल्याला सोडून जात नाही. तो कायम आपल्यातच असतो.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
#AnantChaturdashi2026 #अनंत_चतुर्दशी_२०२६
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
🔸A Musical Goodbye to Bappa!
The Mumbai Police Band marks Bappa’s Visarjan with a melody of devotion, celebrating His journey and eagerly awaiting His return next year.
🔸बाप्पाला संगीतमय निरोप!
मुंबई पोलीस बँडच्या सुरेल वादनातून बाप्पाला विसर्जनानिमित्त भक्तिमय निरोप दिला. बाप्पाचा प्रवास मंगलमय व्हावा यासाठी भक्तिभावाने दिलेला हा सुरेल निरोप!
#GanpatiBappaMorya
#GanpatiVisarjan2026
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
🔸 Think Before You Invest. Verify Before You Transfer!
West Cyber PS arrested 4 accused for allegedly providing fake/mule bank accounts to facilitate an investment fraud racket run through Telegram & WhatsApp groups.
Victims were lured with promises of attractive share-market returns, leading to fraudulent transactions of approximately ₹9.68 crore across multiple accounts.
🔸गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा; पैसे पाठवण्याआधी पडताळणी करा!
शेअर बाजारातून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून टेलिग्राम व व्हॉट्सॲप गटांच्या माध्यमातून फसवणुकीचे जाळे चालविणाऱ्या आरोपींना बनावट बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या ४ आरोपींना पश्चिम विभागाच्या सायबर पोलिसांनी अटक केली.
या प्रकरणात विविध बँक खात्यांमधून सुमारे ९ कोटी ६८ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.
#MumbaiPolice4All
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
🔸Recovery and Return of Lost Property!
North Zone-2 Police recovered property worth ₹1,73,01,554 from various cases and successfully returned it to the rightful owners. The recovery includes 684 gm of gold, ₹22,87,554 in cash, 348 mobile phones, funds recovered from online fraud cases, 13 two-wheelers and 1 auto-rickshaw.
🔸हरवलेली मालमत्ता हस्तगत करून मूळ मालकांच्या स्वाधीन!
उत्तर परिमंडळ - २ पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली ₹१,७३,०१,५५४ किंमतीची मालमत्ता संबंधित कायदेशीर मालकांना परत केली. यामध्ये ६८४ ग्रॅम वजनाचे सोने, ₹२२,८७,५५४ इतकी रोख रक्कम, ३४८ मोबाईल फोन, ऑनलाईन फसवणूक प्रकरणांतून परत मिळवलेली रक्कम, १३ दुचाकी आणि १ ऑटो-रिक्षा यांचा समावेश आहे.
#MumbaiPolice4All
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
Drugs free Mumbai awareness programs were organised by Anti Narcotics Cell of Mumbai City, in Ganesh Pandals across the Mumbai, sensitising citizens about the harmful effects of Drugs abuse and encouraging everyone to stay away from drugs.
गणेशोत्सवाचे औचित्य साधून अंमली पदार्थ विरोधी कक्षातर्फे मुंबई शहरातील विविध गणेशमंडळांमध्ये आयोजित विशेष जनजागृती उपक्रमांद्वारे नागरिकांना अंमली पदार्थांचे होणारे घातक दुष्परिणाम समजावून सांगत, व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
#MumbaiAgainstDrugs
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars,
You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter. During this meeting, you can share your grievances, questions, and suggestions with me.
No prior appointment is required. Understanding your concerns and taking appropriate action is our primary duty.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या अडचणी, प्रश्न आणि सूचना तुम्ही माझ्याकडे मांडू करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या अडचणी आणि प्रश्न समजून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे आमचे प्रमुख कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai retweeted
🔸A sea patrol with a ‘shell’ of surprise.
While on sea patrol near Mazagon Dock, the crew of Mumbai Nauka-03 spotted a turtle struggling on the water’s surface.
Recognizing that something was wrong, our personnel brought it aboard, alerted the South Control Room and coordinated with wildlife rescuers from the Mangrove Foundation’s Marine Wildlife Rescue team. The turtle was later identified as a rare Loggerhead turtle and safely transported to a marine life clinic for treatment.
🔸संकटात सापडलेल्या समुद्री कासवाचे संरक्षण!
समुद्र गस्तीवर असताना मुंबई नौका-०३ वरील पोलीस अधिकारी व अंमलदारांना माझगाव डॉक परिसरातील अरबी समुद्रात एक कासव मंद व असामान्य हालचाली करताना आढळून आले. सदर कासवास सुरक्षितपणे बोटीवर घेऊन किनाऱ्यावर आणण्यात आले व दक्षिण नियंत्रण कक्षास माहिती देण्यात आली. त्यानंतर रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (RAWW) संस्थेच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी येऊन कासवाची पाहणी केली.
सदर कासव दुर्मिळ लॉगरहेड प्रजातीचे असून पुढील उपचारांसाठी कांदळवन विभागाच्या समन्वयाने खार येथील समुद्री जीव उपचार केंद्रात रवाना करण्यात आले. समुद्री जीवाचे संरक्षण व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलेली ही तत्पर कार्यवाही.
#MumbaiPolice4All























