मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी (@VoteForMNS) header
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी (@VoteForMNS) profile picture

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया!

छत्रपतींच्या महाराष्ट्रातून🚩
Joined February 2024
Photo by मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी (@VoteForMNS)Photo by मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी (@VoteForMNS)Photo by मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी (@VoteForMNS)Photo by मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी (@VoteForMNS)Photo by मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी (@VoteForMNS)Photo by मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी (@VoteForMNS)Photo by मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी (@VoteForMNS)Photo by मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी (@VoteForMNS)Photo by मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी (@VoteForMNS)Photo by मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी (@VoteForMNS)
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
महाराष्ट्रात जिथे उत्तरेतील आक्रमण झालेले आहे त्या विविध शहरातील सर्वच चौपाट्या, तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून परवानग्या नको, सार्वजनिक पर्यटन ठिकाणी स्थानिक नागरिकांची गैरसोय थांबवा बिहारचा हा उत्सव खाजगी ठिकाणी साजरा करावा पर्यावरण मंत्र्यांनी लक्ष घालावे.. मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज
4
51
1
153
1,780
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
हिला कोणीतरी इतिहास वाचायला सांगा .... राज ठाकरे आहे तो ...@Marathi_rash कोण PM कोण CM ..आदेश आला ना तर .. 😂😂
12
39
5
269
19,066
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
४० भाषेत मराठी नाही कारण तुम्हाला खाज आहे हमरे को तुमरे को करायची.. थोडी लाज बाळगा.. हिंदीला दूर करा तर मराठीला मानाचे स्थान मिळेल. विचार येत नाही का की हा सिनेमा मराठीत का नाही? तुम्हाला गृहीत धरले जातेय, कारण तुम्ही बॉलीवूड बघता हिंदी बघता मग मराठी का हवी? #मराठीएकीकरणसमिती
14
111
3
412
6,843
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
पिंपरी चिंचवड शहरातील पवना नदी घाटावर रंगरंगोटी केल्याचे समजताच मनसेचे पदाधिकारी श्री. रुपेश पेटकर यांनी घटनास्थळी धाव घेत पालिकेला कारवाईचे निवेदन दिले, यावर कारवाई करताना पिंपरी चिंचवड पालिकेने नदी घाट परिसर स्वच्छ केला. @pcmcindiagovin धन्यवाद! चित्रफित: @MHKaryakarta
पिंपरी चिंचवड मधील नदीघाटावर रंगरंगोटी आणि विद्रुपीकरण करण्याची परवानगी कोणी दिली ? धर्मशाळा आहे का @pcmcindiagovin ? पिंपरी चिंचवड महापालिकेला नम्रतेची विनंती आहे की आपण तात्काळ कारवाई करून ही रंगरंगोटी त्वरित स्वच्छ करावी.
19
124
6
630
28,525
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
सण साजरा करण्यास विरोध नाही, पण सार्वजनिक जागांवर अतिक्रमण कशासाठी? छट पूजा हा महाराष्ट्राचा पारंपरिक सण नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नद्या, नदीघाट, तलाव आणि समुद्रकिनारे यांसारख्या सार्वजनिक जलस्रोतांवर ताबा मिळवून, परस्पर जागा आरक्षित करण्याचे प्रकार खपवून घेतले जाऊ नयेत. पिंपरी-चिंचवडमध्ये पवना नदीच्या घाटावर चक्क रेघोट्या मारून घाटाची जागाच बुक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. या प्रकारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी रुपेश पाटेकर यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. सण साजरा करण्याला विरोध नाही; मात्र सार्वजनिक जागांचे नियम धाब्यावर बसवून सण साजरा करण्याच्या पद्धतीला नक्कीच आक्षेप आहे. महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या गणेशोत्सवासाठीही प्रशासनाकडून नियम आणि अटी लादल्या जात असतील, तर इतर सणांनाही तेच नियम लागू झाले पाहिजेत. सार्वजनिक जागा कोणाचीही खासगी मालमत्ता नाही! #ChhathPuja #MNS #Maharashtra
1
33
2
102
25,878
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
भाऊबीज २०२६
17
80
2
1,956
98,815
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
आपल्या विनोदी शैलीने महाराष्ट्राला खळखळून हसवणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व महाराष्ट्रभूषण पु.ल देशपांडे यांना जयंती दिनी विनम्र आदरांजली! व्यंगचित्रकार आलोक यांच्या पु.ल देशपांडे दिनदर्शिका प्रकाशन समारंभात राजसाहेब ठाकरे यांनी उलघडला पुलंच्या भेटीचा किस्सा. #पुलदेशपांडे
1
13
64
674
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
तो कुणाला समजलाच नाही.. समजला असता तर महाराष्ट्र एवढा मागे गेलाच नसता.. असो…तो ही इथेच आहे,आणि महाराष्ट्र ही इथेच आहे… कधी ना कधी या मायभूमीची सेवा त्याच्या हातातून नक्की घडेल… कारण हा महाराष्ट्र आहे…चांगल्या माणसाना सहजासहजी फुकट घालवत नाही ❤️ #RajThackeray
1
72
1
346
12,681
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
अमित चाटमचे थोबाड ऐन दिवाळीत कोर्टाने काळे केले … चाटमच्या बुडाखाली योग्य फटाके लागले … कायम हिंदू-मुस्लिम करणाऱ्या भाजपालाही ही एक जोरदार चपराक आहे …
29
74
6
653
7,064
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
महाराष्ट्र म्हणजे फक्त राजकारण नाही, तर कला, संस्कृतीचा समृद्ध वारसाही आहे. काल राज साहेबांनी चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर आणि पत्रकार-लेखक अंबरीश मिश्र यांचा उल्लेख केला. अनेकांनी त्यानंतर गुगलवर शोध घेतला. आजच्या चमकोगिरीच्या दुनियेत अस्सल हिऱ्यांची चमक झाकोळली जाते, हेच खरं.
1
8
62
1,235
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
राज ठाकरे विरोधाला विरोध करत नाहीत म्हणून ते प्रगल्भ नेते ठरतात. कर्जत मध्ये वृक्षतोड झाली, स्थानिकांनी विरोध केला, बातम्या झाल्या,ग्रामस्थ शिवतीर्थवर आले. म्हणून विरोध केला का? नाही. दरम्यान अनेक तज्ज्ञांशी राज ठाकरे बोलताहेत,स्वतः जंगलात गेले. त्यानंतर आज सभेत भूमिका मांडतील.
10
38
289
3,899
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
"झाडखाऊ" सरकारसाठी फिल्म डिव्हिजन. ची भेट
32
393
6
1,590
25,069
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना, शेतकरी पाण्यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले असताना, दुसरीकडे महाराष्ट्राच्या जंगलांवर कुऱ्हाड चालवली जात आहे! गुजरातमध्ये मुख्यालय असलेल्या टोरंट समूहाच्या ३,००० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात वृक्षतोड सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. सुमारे ₹१३,५०० कोटींच्या या पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी तब्बल ३७७ हेक्टर जमीन प्रस्तावित असून, त्यापैकी २३३ हेक्टर वनक्षेत्र आहे! एकीकडे दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असताना, दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्राचा वापर करण्याचे पर्यावरणीय परिणाम काय असतील? स्थानिक शेतकरी, आदिवासी बांधव, जैवविविधता आणि नैसर्गिक जलस्रोत यांचे संरक्षण कोण करणार? वीज निर्मिती आणि विकास महत्त्वाचा आहेच; पण विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या निसर्गसंपत्तीची किंमत कोण चुकवणार? महाराष्ट्राची जंगले, नद्या आणि जमीन ही केवळ प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेली संसाधने नाहीत; ती आपल्या पुढच्या पिढ्यांची नैसर्गिक संपत्ती आहे! महाराष्ट्राच्या हिताचा, पर्यावरणाचा आणि स्थानिक जनतेच्या हक्कांचा विचार करूनच या प्रकल्पाबाबत निर्णय झाला पाहिजे! #TorrentPower #सायडोंगर #कर्जत #जंगलतोड #महाराष्ट्र #पर्यावरण #शेतकरी #जलसंपदा
42
498
13
1,582
23,570
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
हे झाडखाऊ सरकार आहे, जे विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी देत आहेत! #TorrentPower
1
42
119
1,574
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
टोरेंट हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडी विरोधात... सह्याद्रीच्या रक्षणासाठी! मा. राजसाहेब ठाकरे यांची कर्जत येथे जाहीर सभा.. बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६ सायं. ठीक : ५ वाजता स्थळ : कर्जत पोलीस ग्राउंड, कर्जत पोलीस ठाणे समोर, कर्जत. #MNSAdhikrut #Karjat #BhimashankarForest
58
231
16
1,182
22,062
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही. थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी २०२६ ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं. त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. असो. या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी. पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे. आत्ता देखील आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं ! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही ? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करता ? असो.. पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी. मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच. म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी २०२६ च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा..
533
2,139
151
9,689
422,510
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
संपूर्ण देशात एकटे राज ठाकरे आहेत ज्यांचे ट्विटर अकाऊंट आहे. बाकी राजकीय नेत्यांचे असे कोणतेही खाते नसल्यामुळे ते ती डॉक्युमेंट्री पोस्ट करू शकत नाहीत.
23
140
1,186
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
I shared a documentary by Sabir Bhatia on my social media detailing the long-standing friendship between Gautam Adani and Narendra Modi, and how the Indian industrial landscape is consequently being handed over to Adani. It garnered over 4.8 million views on Twitter alone and received an overwhelming response on Facebook as well, not to mention the additional, uncounted views from shares by others. My intention was for this serious issue to reach the public, and that objective has been achieved. While Sabir Bhatia produced this documentary recently, I had already delivered a major presentation back in January 2026 at Shivtirth in Mumbai, illustrating how the Adani Group is effectively setting out to swallow the entire nation. That presentation received an exceptional response, and those videos remain available on my social media to this day. In fact, some clips from our presentation were even incorporated into this documentary. Anyways. I have clarified my stance on this matter time and again: my opposition is not directed at any specific individual, but rather against the rise of a monopoly. I have often stated in my speeches that the Prime Minister should foster the growth of many industrialists across the country, creating vast employment opportunities and generating immense wealth for the nation, and empower them to conquer global markets. However, if the government chooses to favor only one person to the point where it poses a threat to the nation, we oppose it and will continue to do so. My opposition is, therefore, directed against any form of monopoly, whether it involves Adani or anyone else. Even now, the central government has directed the state government to hand over several hundred hectares of forest land in Bhimashankar to the Gujarat-based Torrent Group. This government has handed over vast tracts of forest and wilderness land in Maharashtra to a select group of industrialist friends, and it plans to hand over even more! I care little about which political party anyone belongs to; however, as citizens of Maharashtra, how can you remain so indifferent while our state is being sold off right before your very eyes? Does it not even spark a sense of outrage among our Marathi Members of Parliament, MLAs, and ministers to see this happening? Such total submission to power is entirely inconsistent with the history, traditions, and culture of Maharashtra. Why, then, do you bother raising slogans in the name of Chhatrapati Shivaji Maharaj or putting on a farce by singing the state anthem? Anyway.. Sabeer Bhatia’s documentary received such an overwhelming response that it was only natural for those in power to grow anxious, fearing that their secrets might be exposed. The intensity of this fear must have been significant, as I received a request, conveyed through the Mumbai Police Commissioner, to take it down. My primary objective, both during the meeting in January 2026 and through the subsequent posting of this documentary, was and remains, to enlighten the nation. However, the request I received came from the Mumbai Police Commissioner. The Mumbai and Maharashtra Police forces are among the most efficient in the country, and I have always held them in high regard. Out of respect for the head of the Mumbai Police, I am choosing to honor this request. Therefore, I am deleting the post containing the documentary. The fire has already been ignited. In January 2026, from Shivteerth, I ignited a spark against the authoritarianism in this country, that has now grown into a raging wildfire. Our struggle continues. Our post from January 2026 remains exactly where it was, and it will stay there. The documentary we shared was produced by others; our sole objective was to ensure it reached the public, a goal that has been achieved. On this occasion, I am bringing our well-researched analysis of this subject back into the spotlight. I am re-sharing a portion of our January 2026 presentation here; please take another look.
773
1,815
239
8,445
818,617
मनसे - रेल्वे इंजिन आपली निशाणी retweeted
“शेतकरी बांधवांना आजवर मतदानासाठी चुकीच्या पद्धतीने वापरलं गेलं. जर कामं न केल्याने शेतकरी चिडत नसेल आणि धार्मिक-जातीय विषयांवर किंवा पैशांच्या पाकिटावर मतदान होत असेल तर कशाला कोण काम करेल?” - मा. राजसाहेब ठाकरे
2
18
2
73
3,403