GSM retweeted
श्री. जितेंद्र आव्हाड,
आपण लिहिलेले पत्र व्यक्तीगत आहे, राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहीलेले नाही असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की पक्षाची असो की व्यक्तीगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. तुम्ही भाजपबरोबर समझोता करणार नाही याबद्दल व्यक्तीगतरित्या खात्री आहे. परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही. कारण या अगोदर आपल्या पक्षाने बीजेपी बरोबर समझोता केलेला होता.
त्यामुळे संविधान वाचविणे ही जी आपण व्यक्तीगत जबाबदारी घेतलेली आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण आपला पक्ष संविधान वाचविण्यासाठी पुढे येईल का? याबद्दल आमच्या मनात शंका आहे.
आपल्या परीने आम्हाला संविधान वाचविण्यासाठी जे आणि जेवढे करणे शक्य आहे, तेवढे आम्ही संविधान वाचविण्यासाठी करत राहणार आहोत. त्यामुळे पत्राद्वारे आपण व्यक्तीगत संदेश पाठवला असला तरी त्यातून एक सूर दिसत आहे की, आम्ही संविधान वाचवायला निघालेलो नाही. या पत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे सांगतो आहोत की, आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्यावेळी आमच्यातर्फे जेव्हा सांगण्यात आले की, आपल्याला मतदारांना हे आश्वासित करावे लागेल की निवडणुकीनंतर आम्ही बीजेपी किंवा आरएसएसबरोबर समझोता करणार नाही. तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते, ते त्यावर काहीच बोलले नाहीत. ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शविला. आपणच फक्त म्हणालात की "लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे?" ज्या शिवसेनेला आपण सोबत घेतले आहे. त्या शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी उघडउघड असे लिहून देण्यास नकार दिलेला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर बघितले तर आम्हाला जर आपल्याबरोबर यायचे असेल, तर आम्हाला खात्री करुन घ्यावी लागेल की तुम्ही निवडणूक झाल्यानंतर बीजेपीबरोबर जाणार नाहीत, याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल आणि ती व्यक्तीगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल. आपण लिहीलेले हे पत्र सोशल मीडियावर टाकले आहे का हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही जर हे सोशल मीडियावर दिले नसेल तर आम्ही ही आपल्याला आश्वासित करतो की, आमचे हे पत्र सोशल मीडियावर जाणार नाही. परंतु, आपले पत्र जर सोशल मीडियावर गेले तर आमचे पत्रही सोशल मीडियावर जाईल.
ॲड. प्रकाश आंबेडकर
GSM retweeted
The symbolic burning of Professor Doola’s effigy is an act of revolutionary dissent against casteist oppression and the institutional perpetuation of indignity. AIISCA- Mumbai .
Justice for Sahil wakode
"भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय ? "
या विषयावर बाबासाहेबांनी २० मे १९५६ ला 'व्हॉइस ऑफ अमेरिका' या नभोवाणी केंद्रावरून केलेल्या भाषणात आपले अनमोल विचार व्यक्त केलेले आहेत. लोकशाही, राज्यशास्त्र, यांबद्दल बाबासाहेबांचा किती डीप अभ्यास असेल यावरून कल्पना येऊ शकते.
"भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय ? हा विषय मला देण्यात आला आहे. भारतात जणू काही पूर्वी पासूनच लोकशाही नांदते आहे अशा थाटात अनेक लोक या विषयावर मोठ्या गर्वाने बोलतात, विदेशी लोक सुद्धा राजनैतिक मानसन्मानांचा एक भाग म्हणून भारताची महान लोकशाही व भारताचे महान प्रधानमंत्री असा उल्लेख करतात.
कोणत्याही चर्चेची प्रतीक्षा न करता असे गृहीत धरले जाते की जेथे गणराज्य असते तेथे लोकशाही असलीच पाहिजे. प्रौढ मतदानाच्या तत्त्वानुसार जेथे संसदेचे गठण होऊन कायदे करण्याचे काम विशिष्ट कालावधीसाठी लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी करतात तेथे लोकशाही असणारच, असेही सर्वजण मानतात. दुसत्या शब्दात, लोकशाही हे एक राजकीय साधन मानले जाते व जेथे हे राजकीय साधन अस्तित्वात असेल तेथे लोकशाही सुद्धा आहे असे गृहीत धरले जाते.
भारतात लोकशाही आहे की भारतात लोकशाही नाही? सत्य काय आहे ? गणराज्य आणि लोकशाही तसेच लोकशाही आणि सांसदीय शासन यांना समान मानल्याने जो गोंधळ होतो तो दूर केल्याशिवाय या प्रश्नांचे निश्चित उत्तर समोर येणार नाही.
लोकशाही, गणराज्यापेक्षा तसेच सांसदीय शासनापेक्षा पूर्णतः भिन्न आहे. लोकशाहीची मुळे, शासनाचा प्रकार सांसदीय असो वा अन्य, यात दिसून येत नाही. लोकशाही सहजीवनाची एक पद्धत आहे. लोकांनी निर्मिलेल्या समाजात सामाजिक संबंध तसेच लोकांच्या परस्परातील सहजीवनात लोकशाहीची मुळे शोधावी लागतात.
'समाज' हा शब्द काय ध्वनित करतो ? थोडक्यात सांगावयाचे झाल्यास जेव्हा आपण समाजाविषयी बोलतो तेव्हा त्याविषयी आपल्या मनात एकत्वाची धारणा असते. सामुदायिक प्रेरणा व व्यापक कल्याणाची इच्छा, सार्वजनिक उद्दिष्टांबद्दल निष्ठा, परस्पर तळमळ आणि सहकार्य ही समाज या एककाची गुणवैशिष्ट्ये असतात.
भारतीय समाजात हे आदर्श आढळून येतात काय? या समाजात व्यक्तींना अस्तित्व नसून तो असंख्य जातींचा समूह आहे. परस्परांपासून विभक्त अशा या जातीसमूहामध्ये समान अनुभूती नाही किंवा अनुकंपेचे बंधही नाहीत.
अर्थात, भारतीय समाजात उपरोक्त आदर्श आहेत काय हा प्रश्नच अप्रस्तुत ठरतो. जातिव्यवस्था अस्तित्वात असल्याने या आदर्शाना, पर्यायाने लोकशाहीला या समाजातून कायमचे हद्दपार केले आहे."
GSM retweeted
Heartfelt tribute to Mahatma Jotiba Phule Ji on his parinirvan Diwas.
Babasaheb Ambedkar regarded him as one of his three Teacher, along with Buddha and Kabir. He dedicated his book Who Were the Shudras? to Mahatma Jotiba Phule, the father of India's social revolution.
💐☸️
GSM retweeted
“Amidst the tens of thousands of names of monarchs that crowd the columns of history... the name of Asoka shines, and shines, almost alone, a star.”
- H. G. Wells, The Outline of History
Jai bhim 💙 ⛩️
Namo Buddhāya 🌼 ⛩️
Jai Devanampriya Priyadarshi ☸️ ⛩️
🟦🟨🟥⬜️🟧
GSM retweeted
A humble tribute to the sun of revolution, Mahatma Jyotirao Phule, on his Parinirvan Diwas.
महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य म्हणजे केवळ शिक्षणाचा प्रसार नव्हे, तर शतकानुशतके समाजमनावर लादलेल्या अज्ञान, अंधश्रद्धा, जातिभेद आणि विषमतेच्या बेड्या तोडण्याची ऐतिहासिक चळवळ होती. त्यांनी शिक्षणाला परिवर्तनाचे साधन बनवून वंचित, शोषित आणि स्त्रियांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला.
समाजातील माणसाची प्रतिष्ठा त्याच्या जातीवरून किंवा धार्मिक स्थानावरून ठरत नसते, तर त्याच्या कष्टातून, कर्तृत्वातून ठरते, हा समतेचा विचार त्यांनी समाजासमोर मांडला. शोषणावर आधारित सामाजिक व्यवस्थेला आव्हान देत त्यांनी सत्य, समता आणि विवेकाचा मार्ग समाजाला दाखवला.
आजही म. फुले यांचे विचार केवळ स्मरणापुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे. शिक्षणातून परिवर्तन, विचारांतून विवेक, संघर्षातून न्याय आणि सामाजिक बांधिलकीतून समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#महात्मा_फुले
GSM retweeted
In his First Separate Kalinga Edict (Kalinga Edict I),
Emperor Asoka The Great stated
“Sabbe manuse pajā mama.”
“All human beings are my children.”
Jai bhim 💙 ⛩️
Namo Buddhāya 🌼 ⛩️
Jai Devanampriya Priyadarshi ☸️ ⛩️
🟦🟨🟥⬜️🟧
लोकशाही शासन पद्धतीचे फायदे घेण्यासाठी जनता लायक असायला हवी म्हणजे जनतेमध्ये तेवढी पात्रता असायला हवी हे सांगताना बाबासाहेब आंबेडकर नोव्हेंबर १९५४ रोजीच्या आपल्या भाषणात सांगतात,
" इंग्लंडच्या लोकशाहीमागे शेकडो वर्षांची परंपरा आहे. तेथील सर्वसामान्य समाजातील सर्व अपप्रवृत्ती नष्ट झाल्यावर तेथे प्रौढ मतदानाचा हक्क मिळाला.
आमच्या येथे लोकांचे अज्ञान हेच प्रौढ मतदानाच्या अधिकाराचे अधिष्ठाण झालेले आहे. लोकांना व त्यांच्या प्रतिनिधींना कसलेच ज्ञान नाही. यामुळे या पोकळ लोकशाहीच्या चौकटीचा लबाड, संधिसाधू व हितसंबंधी लोक फायदा घेतात.
पदवीधर होण्यासाठी मॅट्रिकच्यानंतर चार वर्षे अभ्यास करावा लागतो. क्रमाक्रमाने पदवीधर बनतो. पण लोकसभेचे, विधिमंडाळाचे सभासद होण्यास अगर मंत्री बनण्यास आमच्या लोकशाहीत क्रम नाही. कसे तरी करून कोणी तरी निवडून यायचे, हजार भानगडी करून एका रात्रीतून मंत्रीपदापर्यंत पोचायचे, अशी विचित्र दशा आहे आमच्या राजकारणाची. अशारितीने निवडून येणाऱ्याच्या हातून लोकशाही परंपरा कशी निर्माण होणार आहे. लोकशाहीसाठी अनुकूल जागृती व परंपराच आमच्या येथे आहे कोठे ? अंधश्रद्धा, रूढिप्रियता वगैरे दोषांमुळे आमचा समाज दृष्टिहीन बनला आहे."
#Delimitation
GSM retweeted
अलेक्जेंडर कनिंघम द्वारा भरहुत में शिखरों का सचित्र पुनर्निर्माण
🕉️⛩️☸️
नमो बुध्दाय 🪷
जय सम्राट असोक महान 🙏🏻
GSM retweeted
Those who have done great work in Buddhism by excavating ancient Buddhist ruins, temples, stupas, pillars, sculptures, and inscriptions, thereby revealing the ancient identity of Buddhism. My Inspiration🛐❤️ Founder & Father of Archeological survey of India (ASI) ,SIR ALEXANDER CUNNINGHAM ,Humble greetings on his death anniversary🙏🏻🌺❤️
GSM retweeted
“The system is killing the brain of the country”
These were my words before the Hon’ble Bombay High Court, appearing for the parents of Sahil Wakode.
I urged the court to order a CBI or SIT probe into Sahil Wakode’s death, also sought orders for the probe to be supervised by a retired High Court judge, the preservation of CCTV footage from the day of the boy’s death, and an inquiry into the leak of the footage to the media.
#JusticeForSahilWakode
👇🏼
hindustantimes.com/cities/mu…
इस लिये बुद्ध ने कहा था 'करुणा' जरुरी है..भगवान बुद्ध सभी प्रकार के प्राणीयो की नृशंस हत्या के विरुद्ध थे.समस्या यह है की अगर आपको करुणा समझनी है तो उस लेवल पर आना होगा जहा बुद्ध को समझना पडे. ये एक प्रकार का उग्र आतंकवाद है.
निर्दोष प्राणीयो के बच्चो को कोई ऐसे कैसे मार सकता है.
GSM retweeted
संविधानाची निर्मिती होत होती, तेव्हापासूनच RSS ने त्यावर टीकेची झोड उठवली. उजव्या विचारधारेचे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'मधून त्यावेळचे अंक पाहिले, तर संविधानावर अत्यंत वाईट शब्दांत टीका केलेली दिसते.
डाव्या विचारधारेच्या मार्क्सवाद्यांनीही संविधानावर जहरी टीका केली. डावे आणि उजवे अशा दोन्ही बाजूंचे हल्ले पचवून हे संविधान निर्माण झाले.
सुरुवातीपासून आजपर्यंत संविधानाचा विरोध आणि अपमान करण्याची प्रक्रिया सुरूच राहिली आहे. काँग्रेसच्या काळात हा स्तर वर गेला, पण भाजपच्या काळात तो अधिक वाढला.
: सिद्धार्थ मोकळे
मुख्य प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी
#VBAforIndia
GSM retweeted
आता कळले का जर महाविकास आघाडीसोबत (MVA)युती झाली तर निवडणुकीनंतर त्यांचे निवडून आलेले खासदार-नेते भाजपमध्ये जाणार नाहीत किंवा भाजपशी हातमिळवणी करणार नाहीत याची लेखी हमी द्यावी अशी प्रमुख अट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी का घातली होती😂😂
जिरली का😂😂
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जरी वाचले तरी बुद्ध धम्म आणि त्याच्या जवळजवळ सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात एवढा प्रचंड अभ्यास बाबासाहेबांनी केलेला होता आणि त्यानंतरच बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. नोव्हेंबर १९५६ मध्ये काशी विद्यापीठात बोलताना बाबासाहेब सांगतात,
" वैदिक धर्माशी विरोध असणाऱ्या बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी ब्राह्मणांनी भल्याबुऱ्या सर्व प्रकारच्या साधनांचा उपयोग केला. बौद्ध धम्म ज्या गोष्टींमुळे लोकप्रिय झाला त्या गोष्टी आपल्या पूर्वापार धर्मास सम्मत नसल्या तरी त्यांचा त्यांनी उपयोग केला. या प्रचार पद्धतीस अनुसरूनच वेरूळच्या बौद्ध लेण्याजवळ त्यांनी आपली ब्राह्मणी लेणी कोरली.
वस्तुतः ब्राह्मण हा गृहस्थाश्रमी. अग्निहोत्र हे त्यांचे नित्यव्रत. त्याला परिमार्जित भिख्खुसारखे गुहेत राहाण्याचे कारण नव्हते. भिख्खूंना पावसाळ्याच्या तीन महिन्यात कुठेतरी निवाऱ्याच्या जागी वास करण्याचा बुद्धाचा आदेश होता. त्यामुळे त्यांना लेण्याची आवश्यकता होती. गृहस्थाश्रमी ब्राह्मणाला ती तशी नव्हती. परंतु बौद्ध लेण्यांकडे उपासकांचा मोठा मेळावा आकृष्ट होतो म्हणूनच केवळ त्यांच्या लेण्याच्या बाजूला आपली लेणी कोरून आपल्या धर्माकडे उपासक ओढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे मुख्य कारण म्हणजे, हिंदू पंडित सांगतात त्याप्रमाणे, कुमारिल, शंकराचार्य इत्यादींनी बुद्धमताचा वाग्युद्धात केलेला पराभव हे नव्हे. कारण दोघांनीही बुद्धाच्या शिकवणुकीचे मध्यवर्ती सिद्धांत जे सामाजिक समता, जगातील दुःख परिहारासाठी प्रत्येक व्यक्तिचे मनःपरिवर्तन, नीति तत्त्वांची सामाजिक जीवनातील प्रतिष्ठापना, बुद्धिवाद इत्यादी, त्यावर या पंडितांनी मुळीच आघात केलेला नाही. या दोघाही पंडितांनंतर बौद्ध धर्म भारतात कित्येक वर्षे समृद्धावस्थेत होता.
बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे मुख्य कारण म्हणजे ज्या भिन्न संस्कृतीच्या व भिन्न सांस्कृतिक पातळीच्या लोकांमध्ये त्याचा प्रचार झाला, त्यांच्या आचारांची व समजुतीची बौद्ध धर्मावर झालेली अनुचित प्रतिक्रीया.
भारतातील बौद्ध धर्मावर झालेला सर्वात मोठा आघात म्हणजे इस्लामी आक्रमणाचा. भारताकडे वळताना मुसलमान आक्रमकांना जे परधर्मी लोक भेटले ते बौद्धधर्मीयच होते. त्यांच्या भाषेत मूर्तिला " बुत्" असे म्हणत, बुत्शिकन म्हणजे मूर्तिभंजक होणे हे त्यांच्या मते गाझीपणाचे लक्षण होते. हिंदूंपेक्षा बौद्धांवर चढविलेले त्यांचे हल्ले अधिक हिंस्त्र व विध्वंसक स्वरूपाचे होते. त्यांनी केलेल्या बौद्ध भिख्खूंच्या कत्तलीने ११ पासून १३ व्या शतकापर्यंतची इतिहासाची पाने रक्ताने रंगलेली आहेत.
नालंदा सारख्या जगविख्यात बौद्ध विद्यापिठाचा त्यांनी पूर्ण नाश केला. हिंदुंप्रमाणे बौद्धांमध्ये धर्मप्रचाराचे पिढिजात काम करणारा ब्राह्मणासारखा वर्ग नसल्याने भिख्खूंच्या कत्तलीनंतर बौद्ध धर्माचा झपाट्याने ऱ्हास सुरू झाला. सत्याचाही कधी कधी पराभव होतो हे ह्याचे हे एक उदाहरण आहे.
परंतु आज त्यानंतर सहाशे वर्षांनी भारताला बुद्धाची आठवण होत आहे आणि आज जर त्याने बुद्धाच्या विचारसरणीचा स्वीकार केला नाही तर त्याचे भवितव्य ठीक नाही."
समाजात खरे काम करणारे लोक फार कमी असतात. बहुतेक लोक फक्त स्वतःच्या सुख-सुविधांमध्ये मग्न असतात. सुशिक्षित माणसाने अशा लोकांना जागृत करणे आणि त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य समजले पाहिजे असे परमपूज्य, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या जुलै 1954 मध्ये मुंबई येथील भाषणात सांगताना म्हणतात,
" आज पर्वताला देखील मुंग्या भोके पाडू लागल्या आहेत व आता पुढेही पाडीत राहातील याची तुम्हाला फारशी जाणीव नाही. तेव्हा आज तुमची ही स्थिती आहे, पुढे काय होणार ? तुमचा भावी काळ काय आहे ? तुमचे भवितव्य काय आहे ? ह्याची अजून कल्पना नाही. तुमच्या पुढील काळाची जरी कल्पना असली तरी आज मी तुम्हाला त्याबद्दल काही बोलत नाही. असा एखादा दिवस येईल की, ज्या दिवशी मी तुम्हा साऱ्यांना एकत्र जमा करून पुढे काय होणार आहे व त्याकरिता काय करावयास पाहिजे, हे सर्व काही सांगेन निदान आजतरी या बाबतीत मी काही बोलू इच्छीत नाही. परंतु तुमच्या भविष्यकाळाकडे नीट नजर द्या.
समाजात कार्य करणारी माणसे अत्यंत थोडी असतात. कार्याची कळकळ फार थोड्या माणसांना असते. सर्वजण कार्यकर्ते असते तर इमारत फंडासाठी एवढा आटापिटा करावयास लागलाच नसता. सामाजिक कार्याचा उमाळा फारच थोड्या लोकांना असतो. बाकीचे सर्वजण शेणातल्या किड्याप्रमाणे स्वतःच्या आनंदात मग्न असतात. तेव्हा अशा माणसाला टोचून' तू शेणातल्या किड्याचे जीवन जगतो आहेस याची जाणीव करून देणे हे प्रत्येक सुशिक्षिताने आपले कर्तव्य समजले पाहिजे."
GSM retweeted
Sahil Wakode was twenty years old. On 18 September 2026, the Dalit student at IIT Bombay died by suicide after alleged caste-based humiliation, ten years after the death of Rohith Vemula. Yesterday, at the 19th Session of the UN Forum on Minority Issues at the Palais des Nations in Geneva, I spoke his name before the United Nations.
Speaking on behalf of Ambedkar International Mission, Australia, under this year's theme, "Advancing minority rights through regional initiatives and cooperation", I raised the total absence of any regional human rights mechanism in South Asia, which is home to most of the world's communities discriminated on work and descent. India has one of the most comprehensive sets of formal legal measures against caste-based discrimination, and yet Dalit students continue to die in the very institutions meant to deliver equality, while accountability remains elusive.
I called on the Government of India to ensure an independent and time-bound investigation into the death of Sahil Wakode, prosecution under the Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, and concrete steps to address systemic caste discrimination in educational institutions. I asked the Forum to recommend that South Asian States begin building a regional human rights mechanism with an express mandate on discrimination based on caste, work and descent, because when domestic remedies fail, a Dalit family today has no regional commission, court or rapporteur to turn to.
Watch my intervention on UN Web TV:
webtv.un.org/en/asset/k1s/k1…
Today at 13:00 in Room III, I take this argument further at the side event "Regional momentum for global standards: Discrimination based on work and descent".
#SahilWakode #RohithVemula #JusticeForDalits #CasteDiscrimination #WorkAndDescent #CDWD #UNForumOnMinorityIssues #MinorityRights #HumanRights #Ambedkar #Geneva
























