Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) header
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) profile picture

प्रवक्ता @ShivSenaUBT_ मै खामियॅां अंदर और खूबियां बाहर ढुंढता हूं ॥ माझं पूर्ण नाव ॲड. जयेश कुमुद अनंतराव वाणी

Maharashtra, India
Joined April 2010
Photo by Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani)Photo by Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani)Photo by Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani)Photo by Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani)Photo by Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani)Photo by Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani)Photo by Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani)Photo by Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani)Photo by Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani)Photo by Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani)
“दायरा” विवेकावर सोडलेला निर्णय की नितीतत्वांशी प्रतारणा? मेघना गुलज़ार या तशा प्रतिभाशाली दिग्दर्शिका. हुतूतूतू, तलवार, राजी यारख्या वेगळ्या मांडणीचे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत. ज्येष्ठ गितकार गुलज़ार यांच्या कन्या म्हणुन त्या तशाच निर्भिड असतील असा माझा समज खरं तर सॅम बहादूर बघितल्यावर थोडा हलला होता. त्यांचा नेटफ्लीक्सवर नुकताच प्रदर्शित “दायरा” बघतांनांही पुन्हा तेच झालं. या चित्रपटाची एका ओळीतील कथा म्हणजे - उद्देशांच्या प्राप्तीसाठी साधनांची शुचिता असावी का? हा प्रश्न आहे. चित्रपटांना केवळ प्रश्न उपस्थित करू नये या विचारांचा मी मुळीच नाही, किंवा उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली गेलीच पाहिजे असंही वाटत नाही. अनेक चित्रपटांचे शेवट प्रेक्षकांच्या विवेकावर सोडून दिल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. मराठीत ‘फॅंड्री’मधल्या जब्याने कॅमेरावर भिरकावलेला दगड किंवा मंजूळेंच्याच ‘सैराट’ मधील नायक - नायिकेच्या लहानग्या मुलाच्या रक्ताळलेल्या पावलांचे ठसे, हिंदीमधील ‘एक रुका हूआ फैसला’ सारखा हा चित्रपट ज्यात जुन्या काळातलील ज्युरी पध्दतीतले १२ ज्युरी एका खटल्याच्या निवाड्यासाठी एका खोलीत करत असलेली चर्चा आणि प्रेक्षकांच्या विवेकावर सोडून दिलेला खटल्याचा निकाल. …. पण दायरा या चित्रपटाचा शेवट विवेकावर सोडून देण्यासारखा नाहीच. करिना कपुर हीने साकारलेली पोलिस उपायुक्त अजुनी कोहली सारखी एक तत्वनिष्ठ सतर्कता अधिकारी एका चकमकीची चौकशी करत आहे. पृथ्वीराज सुकुमारन याने साकारलेल्या पोलिस उपायुक्त रमण कुमार हा समकक्ष अधिकारी व त्याच्या सहकाऱ्यां बरोबर ही चकमक घडलेली असते. दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखंच चार युवकांनी ज्यातील एक युवक अल्पवयीन असतो त्यांनी पुर्वीप्रमाणेच या नव्या मुलीचा बलात्कार आणि खुन केलेला असतो. रमण कुमार याला खात्री झाल्यावर तो या चौघांचा चकमकीत खात्मा करतो. अजुनी कोहली या चकमकीवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्यावर त्याची सतर्कता अधिकारी म्हणुन चौकशी करते. संपुर्ण चित्रपटात रमण कुमार आणि त्याच्या वरिष्ठांनी ही चकमक कशी घडवून आणली आणि त्यांनी प्रसारमाध्यमात सांगीतलेली गोष्ट कशी खोटी आहे हे स्पष्टपणे दाखवले गेले आहे. आतापर्यंतच्या घटनाक्रमात प्रेक्षकांना हे तर सुस्पष्ट होतं की ज्यांना खोट्या चकमकीत मारलं गेलंय तेच खरे गुन्हागार होते, किंबहूना त्यांचं गुन्हेगार असणं पोलिसांना त्यांच्याच जबानीवरून पटल्यावरच या चौघांना ठार मारलं जातं. आता या चित्रपटात नितीतत्वांचं हे द्वंद्व उभं केलंय की पोलिसांनी गुन्हेगारांना दिलेला दंड योग्य आहे की त्यांनी गुन्हेगारांना न्यायालयात गुन्हा सिध्द करून दंड देण्यासाठी थांबायला हवं होतं? या प्रश्नाचं कुठलाही डोकं ठिकाणावर असलेला विवेकी नागरीक एकच उत्तर देईल की त्यांना न्यायालयीन प्रक्रियेद्वारे दंड व्हायला हवा होता. यात प्रश्नाच्या उत्तरात “विवेका”चा प्रश्न येतो कुठे? आपण बदलापुर चिमुकली बलात्कार प्रकरणातही हेच बघितलं. अनेकांनी हा आरोप केला की आरोपी अक्षय शिंदेचा खुन करण्यात आला, खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी शिंदे याला मारून त्याच्या आकांचं संरक्षण करण्यात आलं. याच प्रकरणातील एका आरोपीला तर भाजपने चक्क स्विकृत नगरसेवक केलं होतं पण जनमताचा रेटा आणि माध्यमांची टिका झाल्यावर त्या आरोपीने स्वतःच राजिनामा दिला. चित्रपटात ही पोलिसांची चकमक बनावट असल्याचं स्पष्टपणे दाखवण्यात आल्यावर त्या बनावटीचं समर्थन करण्यासाठी इतर भावनीक संवाद किंवा प्रसंगांची मदत घेणं माझ्या दृष्टीने शुचित उद्देशपुर्तीच्या साध्यासाठी भ्रष्ट साधनांचं समर्थन करण्यासारखंच आहे. आजचे पोलिस उद्याचे गेस्टापो होण्याची सुरवातच भ्रष्ट साधनांपासुन होते, त्यामुळेच करीना कपुरचं शेवटचं वाक्य “तुम्हारे और मेरे रास्ते अलग है” हे तीच्या नैतिकतेवर शिक्कामोर्तब करणारं असलं तरी उपायुक्त रमण कुमारचं नुसतंच निघून जाणं दिग्दर्शकाच्या कमकुमत नैतिकतेचं लक्षण आहे. वल्कलांमधला राम योग्य की साधू वेशातला रावण? मुठभर स्वराज्याचे छत्रपती महाराज महान की विस्तीर्ण सल्तनतीचा औरंग्या महान या प्रश्नांची उत्तरं विवेकावर अवलंबुन असुच शकत नाही. रामाचं शुचिर्भुत चारित्र्य आणि महाराजांचा तितकाच शुचिर्भुत लोककल्याणाचा मार्ग यावर चर्चाच होऊ शकत नाही ते योग्य आणि आवश्यकच आहे यात कुठलीच शंका नाही. निःसंकोच उत्तरं असणाऱ्या प्रशांची उत्तरं द्यायला जर मेघना गुलज़ार घाबरत असतील तर “दायरा” हा चित्रपट माझ्या दृष्टीने नितीतत्वाची मांडणी करतांना नितीतत्वांशीच केली गेलेली प्रतारणा आहे. मेघना गुलजार घाबरल्यात. उपलब्ध माध्यम - नेटफ्लीक्स @meghnagulzar
3
4
294
समृध्दी महामार्गावरच्या अपघाताला प्रशासन जवाबदार आहे. हजारो कोटींच्या खर्चाने बनवलेल्या महामार्गावर सुरक्षा उपाय तर शुन्य आहेच सोबतच बेशिस्त वाहतुकीवर कुठलेच नियंत्रण नाही. माझं निरीक्षण असं आहे - १) अवजड वाहनांना ड्रायव्हर साईडच्या ओव्हरटेक लेनमधे पुर्णतः बंदी आहे, तरीही अवजड वाहनं एकाचवेळी १-२-३ अशा सगळ्या लेनमधून बिनधास्त गाड्या चालवतात. त्यांना ना कुठला दंड होतो ना त्यांना अडवलं जातं. मागून वेगात येणाऱ्या गाड्यांना हे अनपेक्षीत असल्याने अपघाताची शक्यता वाढते. २) छोटी वाहनं चालवणारे चालक निर्देश पाट्यांकडे दुर्लक्ष करतात. बहूतांश वेळा छोट्या गाड्या ६०-८० च्या वेगातही ओव्हरटेकींग लेन मधून गाड्या चालवतात त्यांना यात चुक वाटत नाही. यामुळे मागून वेगात येणाऱ्या वाहनांना लेन बदलावी लागते आणि त्यात अपघात होऊ शकतो.
21
16
1
92
10,853
धक्कादायक - इंग्लंड मधील डेलीमेल नावाच्या वृत्तसंस्थेने फरार मेहूल चोकसीचा इंटरव्यु केला असल्याचा दावा केला आहे. या मुलाखतीत खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. “भारताच्या आदेशानुसार कॅरिबियनमधील एका हिऱ्यांच्या व्यापाऱ्याचे अपहरण करण्यासाठी हनीट्रॅपचा कट रचणाऱ्या' यूके-स्थित संशयितांची चौकशी करण्याचे आवाहन ब्रिटिश पोलिसांना करण्यात आले आहे.” वाचण्यात आलेली लिंक कमेंटमधे. @AUThackeray @RahulGandhi @INCMaharashtra @ShivsenaUBTComm @bbcnewsmarathi @News18_marathi @TheWireMarathi @zee24taasnews @abpmajhatv @milindkhandekar @rajivkhandekar @TulsidasBhoite @lokmat
2
4
26
1,582
आज तुम्ही किती लोकांना नावासह किंवा नावाशिवाय दिवाळीच्या शुभेच्छा “लिहून” पाठवल्यात? की तुम्हीसुध्दा इतरांप्रमाणेच “आलेला” किंवा “बनवलेला” शुभेच्छांचा फोटो फक्त पुढे ढकलला? इतके रुक्ष झालोत आपण? नशिब, दारासमोरची रांगोळी अजुनही कोपी पेस्ट करता येत नाहीये.
213
आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी सन्माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांची सहकुटूंब सदिच्छा भेट घेतली. साहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात आणि त्यांचे आशिर्वाद घेतलेत. राजकारणात उध्दवसाहेबांसारखी तत्शील माणसं विरळच.
6
29
407
4,789
How this audio clip comes under your jurisdiction? @CPMumbaiPolice . जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी हे गाव मुंबई पोलिस आयुक्तांच्या न्याय कक्षेत कधी पासुन आलं? जालना पोलिस इतके निष्क्रीय आहेत का की ते तपास करू शकत नाहीत? तुमची SIT स्थापनेची घोषणा अधिकारक्षेत्राचं उल्लंघन नाही काय? यापुढे ही राज्यातल्या कुठल्याही भागात घडलेली गुन्हा मुंबई पोलिस चं तपासणार का? कि जरांगेंना मुंबईत आणणं सोयीचं आहे?
1
6
29
1,338
दुष्काळी महाराष्ट्रात बेसुमार वृक्ष तोडीला परवानगी. जय हो !
3
7
36
569
बच्चा बच्चा जाग उठा है इंकलाब के नारे से “स्वराज्य ते संविधान मार्च” मी येणार आहे, तुम्हीही येताय नं? 📆 उद्या, शनिवार दि. १७ ॲाक्टो. २०२६ 🕰️ दुपारी २ वाजता 📍 छत्रपती शिवाजी चौक, कल्याण पश्चिम.
4
12
69
959
मुख्यन्यामुर्तींनी सरकार पक्षाच्या मंत्र्यांबरोबर बॅडमिंटन खेळलेलं चालतं… मुख्य न्यायमुर्तींनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार स्विकारलेला चालतो. मुख्य न्यामुर्तींनी सरकारचे प्रमुख पंतप्रधानांना गणपती आरतीसाठी घरी बोलावलेलं चालतं. विरोधी पक्षांच्या नेत्यांना यासाठी भेटायचं नाही कारण त्यांच्या केसेस न्यायीलया समोर चालतात, ते तत्वाला धरून नाही. असो….
10
44
142
2,052
सेनापती मैदानात थेट भिडतोय… या अंगावर - घेऊ शिंगावर. @AUThackeray
13
18
3
135
1,240
Leave aside the question of right or wrong; the real question is whether Delhi police personnel possess conscious or not ? Are they have heart or only having Salary date? @DelhiPolice #cjp #votechorgaddichordh
2
1
19
679
सर्वोच्च न्यायालयात #CJP चा मोठा विजय… दिल्लीतील मेट्रो, इंटरनेट सेवा मंगळवाळ पर्यंत कुठल्याही परिस्थितीत (अनुच्छेद १९(२) वगळता) बंद न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे तुर्तातुर्त (interim) आदेश. मंगळवारी सरकारला न्यायालयात उत्तर देणं बंधनकारक. सरकार तर्फे हजर तुषार मेहता यांची सर्वोच्च न्यायालयाला माहिती - १० ॲाक्टो. रोजी मेट्रो, इंटरनेट सारख्या कुठल्याच नागरी सुविधा बंद नव्हत्या (🤣🤣🤣).
7
33
1
260
6,745
Breaking 2 - सर्वोच्च न्यायालयाचे आदेश - … नागरीकांच्या स्वंतंत्रपणे विहार करण्याच्या (कुठून कुठेही जाण्याच्या) अधिकारावर कुठलेच बंधन नाहीं. वकिलांवर त्यांची व्यावसाईक कर्तव्ये पार पाडण्यावर कुठलेच नाही.
1
9
430
सुशिक्षीत नागरीक विरूध्द अंधभक्त असा लढा सुरू झालाय आता.
“300 me bik ke aayi hai, ham bhi khareedte hai ladkiya”
2
18
139
2,252
जंतर-मंतरवर चाललेलं #CJP आंदोलन दडपण्यासाठी ज्याप्रकारे पोलिसांच्या बरोबरीने भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवलं गेलं त्यावरून भाजपची गुन्हेगारी प्रवृत्ती दिसून येते. पोलिसांना बळाचा वापर करणं एकवेळ समजू शकतो पण “गेस्टापो” चा वापर लोकशाहीला आणि सभ्य समाजाला कलंकच आहे. #jantar_mantar2
4
8
68
1,007
हरहून्नरी कलाकार… अफलातुन दिग्दर्शक… सामाजीक भान असलेला नागरीक अशी ओळख निर्माण करणारे अभिनेते नाना पाटेकर यांना विनम्र श्रध्दांजली. 🙏🏻 #NanaPatekar #RIPNana #Ripnanapatekar #नानापाटेकर
4
238
भगतसिंह, सुभाषचंद्र बोस, अश्फाखउल्ला खान, मुझफ्फर अहेमद, सौमेंद्रनाथ टागोर, मानबेंद्रनाथ रॅाय, भुपेंद्र दत्ता (स्वामी विवेकानंदांचा सख्खा लहान भाऊ), ए.के. हंगल (शोले पिच्चरवाले), रामप्रसाद बिस्मील, राजेंद्र लाहिरी, चंद्रशेखर आझाद, बटूकेश्वर दत्त, जयप्रकाष नारायण… ही काही वानगी दाखल दिलेली डाव्या विचारसरणीच्या स्वातंत्र्य सैनिकांची नावे. डाव्यांशी माझे वैयक्तीक वैचारिक मतभेद आहेतच, पण त्या विचारसरणीच्या स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान कसं नाकारता येईल. मग मी विचार केला की १९२५ साली किंवा आजूबाजूला स्थापन झालेल्या स्वयंघोषित उजव्या विचारसरणीच्या संघटनेतील स्वातंत्र्य सैनिकांची १० नावं शोधावी तर मला शोधता येईनात. कृपया कुणाला माहित असेल तर नक्की मदत करा.
1
2
19
667
देशभक्तांना जेल मधे टाकून जागोजागी भारतीयांचा अनन्वीत छळ करणाऱ्या इंग्रजांच्या राजवटीतलं स्वातंत्र्याचं आंदोलन कसं असेल ते समजून घ्यायला सध्याची परिस्थिती पुरेशी आहे. त्याकाळातल्या अनेकांना त्यांचं नाव इतिहासात नोंदवता आलं नाही, त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी इतर स्वातंत्र्यसैनिकांच्याच गोष्टी वाचल्यात. आज पुन्हा संधी आलीय, आपल्या पुढच्या पिढ्यांना आपलं नाव अभिमानाने मिरवू द्या. त्याकाळतले काही आपलेच बांधव देशद्रोही होऊन सत्ताधारी इंग्रजांना फितूर होते आणि स्वातंत्र्य सैनिकांना त्रास देत होते पण स्वातंत्र्य सैनिकांनी तिकडे दुर्लक्ष केलं आणि भारतमातेचा लढा यशस्वी केला.
1
4
23
531
दुष्काळ घोषित झालेल्या राज्यात जनतेच्या पैशाने जाहिराती करण्याला राज्य सरकारवर निर्बंध येतात का? जनाच्या लाजेने येत नसेल कदाचित, पण… मनाच्या लाजेला काही किंमत आहे की नाही? कृपया जनतेच्या पैशाची जाहिरातींवर होणारी उधळपट्टी थांबवा आणि शेतकरी, दुष्काळी भागातील जनतेला तीच आर्थिक मदत थेट पोहोचवा.
2
3
276