Hingoli District Information Office (@InfoHingoli) header
Hingoli District Information Office (@InfoHingoli) profile picture

Official Twitter Account of District Information Office Directorate General Of Information & Public Relations Government of Maharashtra #Hingoli

Hingoli, India
Joined July 2015
Photo by Hingoli District Information Office (@InfoHingoli)Photo by Hingoli District Information Office (@InfoHingoli)Photo by Hingoli District Information Office (@InfoHingoli)Photo by Hingoli District Information Office (@InfoHingoli)Photo by Hingoli District Information Office (@InfoHingoli)Photo by Hingoli District Information Office (@InfoHingoli)Photo by Hingoli District Information Office (@InfoHingoli)Photo by Hingoli District Information Office (@InfoHingoli)Photo by Hingoli District Information Office (@InfoHingoli)Photo by Hingoli District Information Office (@InfoHingoli)
खासदार डॉ. रामराव वडकुते यांचा अखेरचा प्रवास! #Hingoli #House
90
खासदार डॉ. रामराव वडकुते यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार mahasamvad.in/222846/
53
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परभणीतील कल्याणनगर येथील गोविंद निवास येथे दिवंगत खासदार रामराव वडकुते यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. mahasamvad.in/222751/
1
12
547
Hingoli District Information Office retweeted
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील राज्यसभेचे खासदार मा. श्री. रामरावजी वडकूते यांच्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालेल्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांसह सर्व आप्तस्वकीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ प्रदान करो, हीच प्रार्थना.
1
4
11
498
Hingoli District Information Office retweeted
Deeply saddened by the demise of Rajya Sabha MP Shri Ramrao Sakharam Wadkute Ji. He was dedicated to the cause of public welfare and made valuable contributions to the development of Maharashtra and the nation. My heartfelt condolences to his family members, admirers and well-wishers.
65
145
16
1,162
865,346
Hingoli District Information Office retweeted
Deeply saddened by the passing of Rajya Sabha MP Shri Ramrao Wadkute Ji. He will be remembered for his contribution to society and emphasis on serving the poor and downtrodden. Equally noteworthy were his efforts to strengthen the BJP in Maharashtra. My thoughts are with his family and admirers. Om Shanti. राज्यसभा खासदार श्री रामराव वडकुते जी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. समाजसेवेतील त्यांचे योगदान तसेच गरीब आणि वंचित घटकांच्या सेवेसाठी त्यांनी दिलेले प्राधान्य यासाठी त्यांचे सदैव स्मरण केले जाईल. महाराष्ट्रात भाजप पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही तितकेच उल्लेखनीय होते. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.
378
1,243
53
6,695
1,038,182
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील धामणगाव येथे ओढ्याचं पुनर्जीवन करण्यात आलं, त्यामुळे धामणगाव सह परिसरातील चार गावांना पाणी संचयाचा फायदा झाला. #drought #दुष्काळ #water #पाणी #waterconservation Credit : @abpmajhatv
2
153
खासदार रामराव वडकुते यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय क्षेत्राची हानी -पालकमंत्री नरहरी झिरवाळ mahasamvad.in/222602/
8
191
हिंगोलीतील फटाक्यांच्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तीन जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण. #Hingoli #आर्थिक_मदत
2
108
हिंगोलीतील राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा शब्दांत अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या. १/२
1
2
6
167
२/२ मंत्री झिरवाळ म्हणाले, खासदार रामराव वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारे आहे. तसेच ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांसह सर्व आप्तस्वकीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना मंत्री झिरवाळ यांनी केली.
1
22
Hingoli District Information Office retweeted
भाजपचे राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ नेते रामराव वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक सालस आणि साधे व्यक्तिमत्व राजकारणातून हरपले आहे. हिंगोली जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर त्यांनी अनेक जबाबदाऱ्या भाजपामध्ये सांभाळल्या. धनगर समाजासाठी मोठे काम त्यांनी केले. शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. सहकारात सुद्धा त्यांनी आपल्या नेतृत्वाची छाप पाडली. तळागाळातील समाजासाठी त्यांची कणव सातत्याने जाणवायची. एक साधे आणि समर्पित व्यक्तिमत्व त्यांच्या जाण्याने आपल्यातून निघून गेले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति 🙏
195
609
4
972
18,194
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये लाभ मिळाल्याबद्दल माहिती सांगताना हिंगोली जिल्ह्यातील कडती येथे राहणारे शेतकरी सचिन जाधव. #loan #कर्जमुक्ती #शेतकरी #दुष्काळ #drought
144
राज्यातील मृत बंधारे व जुने तलाव पुनर्जीवित करण्याची महामोहीम - महसूलमंत्री @cbawankule ​🔹 योजनेसाठी ₹५,००० कोटींच्या तरतुदीस मुख्यमंत्र्यांची मान्यता. 🔹 प्रत्येक जिल्ह्यातील ४ ते ५ हजार मृत बंधारे, गाव तलाव व शिवकालीन बंधारे दुरुस्त करणार. ​#WaterConservation
109
दुष्काळग्रस्त भागातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीसाठी उत्पन्न मर्यादेची अट शिथिल #शिक्षण #दुष्काळ #वैद्यकीयशिक्षण #MahaDGIPR
112
Hingoli District Information Office retweeted
📍लातूर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि #दुष्काळ निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा चाकूर येथे झालेल्या बैठकीत घेतला. बैठकीस पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील दुष्काळाची सद्यस्थिती, पाणीटंचाई निवारण, चारा नियोजन, पीक नुकसान भरपाई आदी बाबींच्या माहितीचे यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. #लातूर जिल्ह्यातील ऋतुचक्र लक्षात घेऊन जिल्ह्यात भूजल पुनर्भरणासाठी मोहीम स्वरूपात रिचार्ज शाफ्टसारखी कामे हाती घेण्यासाठी प्रयत्न करावेत. यासोबतच पीक पद्धतीतही अनुरूप बदलासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. कमी सिंचन सुविधेत घेता येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. तसेच सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी यावेळी दिल्या. @Jishnu_Devvarma @Shivendraraje11 @babasahebpati1
4
1
4
2,484
Hingoli District Information Office retweeted
📍#लातूर चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथे केळी बागेची, तसेच नायगाव येथे व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत सुरू असलेल्या पांदण रस्ता कामाची पाहणी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकरी, मजुरांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच शेतीचे नुकसान, पाणीटंचाई, चारा व रोजगाराविषयी माहिती घेतली. याप्रसंगी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आदी उपस्थित होते. यावेळी माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते जलतारा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दुष्काळाच्या या संकटात सरकार सर्व पातळीवर काम करत असून #दुष्काळ निवारणासाठी करण्यात येत असलेल्या तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये नागरिकांनीही सहभागी व्हावे. सरकार आणि समाजाने एकजुटीने काम केल्यास या संकटावर मात करण्यास, यातून बाहेर पडण्यास मदत होईल. या संकटकाळात आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशा शब्दात राज्यपालांनी शेतकऱ्यांना धीर दिला. लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन होते, मात्र यंदा अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या संकटकाळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी, पीक विमा भरपाई मिळावी, यासाठी पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे असून या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र व राज्य शासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्यात येत आहेत, असे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश, प्रमाणपत्रांचे व प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले. यामध्ये व्हीबी-जी राम जी योजना, चारा लागवडीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून बियाण्यांचे वाटप, ट्रॅक्टर, कडबाकुट्टी यंत्र, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना मंजुरी पत्रे, अवैध सावकारीच्या कब्जातून मुक्त झालेल्या जमिनीचा सातबारा सुपूर्द करण्यात आला. @Jishnu_Devvarma @Shivendraraje11 @babasahebpati1
4
1
2
1,781
Hingoli District Information Office retweeted
📍धाराशिव राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी उमरगा तालुक्यातील बलसूर येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला. सध्याचा काळ अत्यंत कठीण आहे. दुष्काळासारख्या संकटावर मात करण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याची गरज आहे. शासन आणि नागरिक यांनी एकत्रित काम केल्यासच जलसंवर्धनामध्ये यश मिळू शकते,असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. पुढच्या वेळी जेव्हा या गावात येईन,तेव्हा बलसूर गावचा कायापालट झालेला दिसेल, असा विश्वासही राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी व्यक्त केला. जिल्हा प्रशासन सध्या तात्कालिक आणि दीर्घकालीन अशा दोन स्तरांवर काम करत आहे. तत्कालिक उपाययोजनांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा,प्रत्येक घरात रोजगार पोहोचवण्याचे नियोजन केले जात आहे. नागरिकांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे,पुढील मदतही दिली जाणार आहे. दीर्घकालीन उपाययोजनांतर्गत भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून मशीनच्या साहाय्याने नाले रुंद व खोल करण्याचे काम सुरू आहे.तसेच, जलसंवर्धनाच्या कामात 'पाणी फाउंडेशन'चीही मदत घेतली जात आहे,असेही राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले. याप्रसंगी आमदार प्रवीण स्वामी,माननीय राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, ‍जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, प्रा.सुरेश बिराजदार,गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजयकुमार थोरात आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बलसूर गावातील शेती,पीक -पाणी परिस्थिती,दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची पाहणी करत येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. गावातील पीक व चारा लागवड,साठवण तलाव आदींची पाहणी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केली. @Jishnu_Devvarma
7
8
2,203
महात्मा जोतीराव फुले यांची अभ्यासूवृत्ती त्यांच्या हस्ताक्षरातूनही स्पष्ट होते. त्यांना उत्तम मराठी भाषेबरोबरच इंग्रजीचेही उत्तम ज्ञान होते. त्यांचे इंग्रजीचे हस्ताक्षर (संदर्भ : महात्मा फुले : समग्र वाङ्मय)
64
दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील सामूहिक विवाह लोकसहभागातून आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी ग्राम, तालुका व जिल्हास्तरीय समित्या स्थापन करून तातडीने नियोजन करण्याचे निर्देश -मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड #सामूहिकविवाह #दुष्काळ
116