#परभणी
दुष्काळ निवारणाच्या उपायोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्या
-- पालक सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
- जलतारा शोषखड्डा करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा
- पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचे योग्य नियोजन करा
@MahaDGIPR
@InfoMarathwada
1
67
उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे संचालक (संशोधन) डॉ. भगवानराव असेवार, केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ 'डी' अशोक जाधव, माजी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक (एलडीएम) सुनील हतेकर आदी उपस्थित होते.
#दुष्काळीउपाययोजना
38
District Information Office, Parbhani retweeted
हृदयाचा प्रत्येक ठोका महत्त्वाचा! ❤️
छातीत अस्वस्थता, अचानक घाम, श्वासाचा त्रास जाणवला तर दुर्लक्ष करू नका. लगेच १०८ ला कॉल करा.
जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात ईसीजी सुविधा उपलब्ध आहे.
प्रत्येक हृदय - प्रत्येक गाव - प्रत्येक मिनिट महत्त्वाचा.
माहितीसाठी : १०४ | आपत्कालीन : १०८ क्रमांक
#स्टेमीमहाराष्ट्र
#STEMIMaharashtra #HeartHealth #EveryHeartbeatMatters
#RecognizeSymptomsSaveLife
District Information Office, Parbhani retweeted
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला.
#पिंपरी-चिंचवड शहराला सुंदर, नियोजनबद्ध आणि विकसित बनवण्याचे अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शहरातील सर्व विकासकामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, तसेच शहराच्या प्रत्येक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
#मोशी येथील कचरा दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. मोशी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रलंबित न ठेवता तातडीने पूर्ण करावे तसेच प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांची संभाव्य वाढ लक्षात घेऊन पाणीपुरवठा, निवारा, आरोग्य, स्वच्छता यांसह मूलभूत सुविधांचे आतापासूनच नियोजन करावे. पवना व इंद्रायणी नद्यांवरील अतिक्रमणे रोखून नदी पुनरुज्जीवनाच्या कामांना गती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
शहरात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि पायाभूत सुविधांची कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. नाशिक फाटा ते एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या शहराच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
यावेळी महापौर रवि लांडगे, उपमहापौर श्रीम.शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे डॉ. राजेश देशमुख, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.
@SunetraA_Pawar
District Information Office, Parbhani retweeted
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांची विशेष मुलाखत मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.
#दिलखुलास कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे.
@ibharatgogawale
District Information Office, Parbhani retweeted
📍पुणे
#पुणे ग्रँड टूर २०२७ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा अधिक भव्य आणि यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते, वाहतूक व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षाव्यवस्थेची तयारी वेळेत पूर्ण करावी. जिल्ह्यातील अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांवर संबंधित यंत्रणांनी आवश्यक सुधारात्मक उपाययोजना गतीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पुणे ग्रँड टूर २०२७ च्या नियोजन आढावा बैठकीत दिले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, पुणे ग्रँड टूर ही सायकल स्पर्धा स्वर्गीय अजित पवार यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात सुरू झाली. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पुणेकरांनी दिलेल्या सहकार्यामुळे अल्पावधीतच या स्पर्धेला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे २०३२ मध्ये जागतिक सायकल फेडरेशनची चॅम्पियनशिप पुण्यात आयोजित करण्यास मान्यता मिळाली असून, हे सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे.
२०२७ मधील स्पर्धेची व्याप्ती वाढली असून, यंदा २५ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी अधिक अर्ज प्राप्त झाले असून मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत आयोजनाची जबाबदारी अधिक वाढली आहे. सर्व विभागांनी मागील वर्षीप्रमाणे समन्वय आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या आढावा बैठकीला आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, आमदार हेमंत रासने, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले, शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
@SunetraA_Pawar
@PuneGrandTour
#पुणेग्रँडटूर
#PuneGrandTour2027
District Information Office, Parbhani retweeted
📍परभणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परभणीतील कल्याणनगर येथील गोविंद निवास येथे दिवंगत खासदार रामराव वडकुते यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.
खासदार रामराव वडकुते यांचे अचानक निधन होणे ही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना आहे. ते जनसामान्यांमध्ये राहणारे आणि सर्वसामान्य माणसांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे नेते होते. त्यांच्या निधनाने मराठवाड्यासह संपूर्ण धनगर समाजाचे मोठे नुकसान झाले असून, एक लोकाभिमुख आणि कर्तृत्ववान नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दिवंगत खासदार रामराव वडकुते यांच्याविषयी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी उत्तम काम केले. त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी यशस्वीपणे न्याय दिला. विशेषतः धनगर समाजासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांनी लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. खासदार म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.
त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये मोठी आत्मीयता आणि विश्वास होता. असे लोकाभिमुख नेतृत्व अचानक हरपल्याने मराठवाड्यासह संपूर्ण धनगर समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यांचे निधन ही आपल्या सर्वांसाठी कधीही न भरून येणारी पोकळी आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी ऊर्जा राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार अमरनाथ राजूरकर, परभणी शहराचे महापौर सय्यद इकबाल, जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले उपस्थित होते.
दिवंगत खासदार रामराव वडकुते यांचे रविवारी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. उद्या सकाळी १०:३० वाजता हिंगोली येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
District Information Office, Parbhani retweeted
राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आयोजित विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी राज्य शासनाचा सहभाग वाढविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उच्चस्तरीय कृतीदलाचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी चर्चा केली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस कृतीदलाचे सदस्य डॉ. एस. सोमनाथ, शंकर मरुवाडा, राष्ट्रीय भरती संस्थेच्या (एनआरए) संचालक श्रुती सिंघल आदी उपस्थित होते.
एनटीएमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील परीक्षांसाठी राज्यातील उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करणे, प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक परीक्षा केंद्रांची उपलब्धता, परीक्षा केंद्रांवरील मनुष्यबळाचे प्रशिक्षण तसेच परीक्षा आयोजनासाठी आवश्यक लॉजिस्टिक व्यवस्थापन या मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन करताना राज्य शासन आणि परीक्षा घेणाऱ्या केंद्रीय संस्थांमध्ये समन्वयाची प्रभावी यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने परीक्षा केंद्रांची उपलब्धता, केंद्रांवरील सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी आणि सुरक्षित परीक्षा वातावरण निर्माण करण्यासाठी राज्याची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. उपलब्ध शासकीय यंत्रणा आणि पायाभूत सुविधांचा यासाठी उपयोग करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
परीक्षा प्रक्रियेत ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, इंग्रजी भाषेची अडचण असलेल्या तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अधिक सुलभ व्हावी, यासाठी आवश्यक बदल करण्यावर भर देण्यात आला. परीक्षांमधील विश्वासार्हता कायम राखताना गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सुरक्षित आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी परीक्षेच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, अभ्यासक्रमाच्या स्वरूपानुसार परीक्षा पद्धती निश्चित करणे आणि स्पर्धात्मक व प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, या बाबींचाही आढावा घेण्यात आला.
@Dev_Fadnavis
#एनटीए
#NTA
District Information Office, Parbhani retweeted
पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालणारा अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन मुंबईतील नवे पर्यटन आकर्षण म्हणून विकसित करण्यात आला आहे. मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, महाराष्ट्राची संतपरंपरा, संस्कृती आणि मुंबईची गौरवशाली गाथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या शोमध्ये सादर केली जाणार आहे. या म्युझिकल फाउंटनमुळे मुंबईच्या पर्यटनाला नवी ओळख मिळेल. तसेच पवई तलावाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
पवई तलाव येथील गणेश घाटावर उभारण्यात आलेल्या 'लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शो'चे उद्घाटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, म्हाडाच्या स्लम बोर्डाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांच्यासह म्हाडा आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाचा मल्टिमीडिया लाईट अँड साउंड शो साकारण्यात आला आहे. यामध्ये संगीतमय कारंजे, वॉटर स्क्रीन आणि फायर जेट्स यांसारख्या आकर्षक सुविधांचा समावेश आहे. विशेष दृश्य परिणामांच्या माध्यमातून तीन वेगवेगळे चित्रपट सादर केले जाणार असून, इतिहास, संस्कृती आणि वारशाचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.
या फाउंटनचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तलावातील पाण्याचे एरेशन (हवामिश्रण) या प्रक्रियेमुळे दररोज सुमारे ३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्यास मदत होणार असून, पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास हातभार लागू शकतो. याशिवाय बाष्पीभवनामुळे परिसरात थंडावा निर्माण होणे आणि स्थानिक तापमानात घट होणे असे संभाव्य पर्यावरणीय फायदेही अपेक्षित आहेत.
@MPLodha
District Information Office, Parbhani retweeted
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येणारा अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम ‘संत रोहिदास अल्पमुदत रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ या नावाने ओळखला जाणार आहे. उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा आणि रोजगाराच्या नव्या संधी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांच्या कार्यक्रमाचा विस्तार करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील युवकांसाठी एकूण २६,५२० प्रशिक्षण प्रवेश क्षमता उपलब्ध करून देण्यात आली असून, आतापर्यंत १८,२६६ प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला आहे.
मंत्री लोढा म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांकडे केवळ शैक्षणिक पदवी असणे पुरेसे नसून, उद्योगांच्या गरजांनुसार आधुनिक आणि रोजगारक्षम कौशल्ये असणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. पहिल्या टप्प्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन या कार्यक्रमाचा पुढील टप्प्यांमध्ये विस्तार करण्यात आला आहे.
पारंपरिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसोबतच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांचा समावेश कार्यक्रमात करण्यात आला आहे. ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि सेमीकंडक्टर यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे युवकांना उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होत आहे, असेही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
यावेळी ऑनलाईन पद्धतीने अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त डॉ.अमित सैनी, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, ४०० आयटीआयचे प्राचार्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
@MPLodha
District Information Office, Parbhani retweeted
विधानपरिषदेच्या माजी उपसभापती तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे लिखित ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे #प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन येथील परिषद सभागृहात झाले.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते.
विधानपरिषदेत २५ वर्षांच्या कार्यकाळात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिला सक्षमीकरण, बालसंरक्षण आणि विविध सामाजिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. त्यांच्या संसदीय कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा दस्तऐवज असलेला ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तकाचा चौथा खंड समाजासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
या पुस्तकातून २०१४ ते २०२० या कालावधीतील सभागृहातील भाषणे, अर्थसंकल्पीय चर्चा, जनहिताचे प्रश्न आणि त्यांचा पाठपुरावा यांचा आढावा घेण्यात आला आहे. महिला व बालकांची सुरक्षितता, कुपोषण, आरोग्य, शिक्षण, शेतकरी, कामगार, दुष्काळ, पुनर्वसन आणि पर्यावरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. महिला आणि बालकांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवून पीडितांना मदत करण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी केलेले कार्य सामाजिक प्रश्नांचा जिवंत दस्तऐवज असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरवोद्गार काढले.
विधानपरिषदेवर सलग पाच वेळा निवडून येणे आणि उपसभापती म्हणून सभागृहाचे कामकाज नियम व शिस्तीने हाताळणे ही डॉ. गोऱ्हे यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यांचा संसदीय अनुभव, अभ्यासपूर्ण मांडणी आणि लोकहिताच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा नव्या लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.
लोकप्रतिनिधींनी सभागृहात केलेले काम आणि जनहिताच्या प्रश्नांचा पाठपुरावा जनतेपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने पुस्तकाची निर्मिती केल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. या खंडात विधिमंडळातील कामकाज, प्रश्न, प्रस्ताव, विधेयके, समित्यांचे कार्य आणि विविध सामाजिक विषयांवरील योगदान संकलित करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी नेमके कोणते काम करतात, याची माहिती जनतेला मिळावी, हा पुस्तकामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
@Jishnu_Devvarma
@rahulnarwekar
@mieknathshinde
@neelamgorhe
District Information Office, Parbhani retweeted
आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे राज्यातील प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ११ लाखांहून अधिक रुग्णांनी १७ लाखांहून अधिक उपचारांचा लाभ घेतला असून, त्यासाठी शासनाने २ हजार ८६९ कोटी ४५ लाख रुपये खर्च केले आहेत.
राज्यातील सर्व अधिवासी कुटुंबांना आरोग्य संरक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनांमध्ये कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार, अवयव प्रत्यारोपण, अपघात आणि अन्य गंभीर आजारांसह २ हजार ३९९ उपचार व शस्त्रक्रिया पद्धतींचा समावेश आहे. राज्यातील पाच हजारांहून अधिक शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये पात्र लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळतात. तसेच ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना ‘आयुष्मान वय वंदना’ योजनेंतर्गत अतिरिक्त पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण उपलब्ध आहे.
राज्यात आजअखेर ४ कोटी ४५ लाख आयुष्मान कार्डे आणि १२ लाख २० हजार ज्येष्ठ नागरिकांची वय वंदना कार्डे तयार करण्यात आली आहेत. लाभार्थ्यांनी अद्ययावत शिधापत्रिका, आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकाच्या आधारे आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकाने किंवा आयुष्मान ॲपद्वारे कार्ड तयार करून घ्यावे. योजनांची माहिती व तक्रारींसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या १५५३८८ किंवा १८००२३३२२००, तर आयुष्मान भारत योजनेच्या १४५५५ किंवा १८००१११५६५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा.
#PMJAY
#MJPJAY
District Information Office, Parbhani retweeted
लोकभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवनच्या इतिहास व वारशावर आधारित तीन कॉफी टेबल पुस्तके आणि मोरांच्या छायाचित्रांचा विशेष कॅटलॉग अशा चार प्रकाशनांचे अनावरण करण्यात आले. यावेळी या पुस्तकांच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
लोकभवनचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. आपल्या भूतकाळाची जाणीव ठेवून वर्तमानात जगणे आणि भविष्यातील पिढ्यांना इतिहासाची ओळख करून देणे महत्वाचे आहे. लोकभवनमधील ऐतिहासिक वस्तू, मेजवानीच्या परंपरा, पाककला आणि नैसर्गिक वैभव यांचे दस्तऐवजीकरण करणारी पुस्तके या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतील, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
राज्यपाल म्हणाले की, लोकभवनमधील ब्रिटिश कालीन ऐतिहासिक कटलरी, क्रॉकरी, पोर्सिलिन आणि चांदीची भांडी या केवळ वापराच्या वस्तू नसून इतिहासाच्या महत्वपूर्ण नोंदी आहेत. त्यातून तत्कालीन जीवनशैली, कलात्मकता आणि त्या काळातील परंपरांचे दर्शन घडते. या वस्तूंची निर्मिती अत्यंत मेहनतीने आणि कलात्मक पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे जतन आणि दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे. यापूर्वी तेलंगणाचे राज्यपाल असताना हैदराबाद येथील सालार जंग संग्रहालयाचे अध्यक्ष होतो. त्यावेळी आपण ऐतिहासिक वस्तूंचे महत्व जवळून अनुभवले असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकभवनमधील मोरांची छायाचित्रे हा देखील एक वैशिष्ट्यपूर्ण ठेवा आहे. मुंबईसारख्या महानगरात मलबार हिल परिसरात मुक्तपणे वावरणारे मोर पाहणे ही सर्वांकरिताच अनोखी बाब आहे. त्यामुळे या मोरांच्या छायाचित्रांचा संग्रह तयार करून त्याची नोंद पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांच्या मेजवानी संदर्भातील पुस्तकाविषयी राज्यपाल वर्मा म्हणाले की, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांच्या भेटी, त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ आणि काळानुसार बदललेले मेन्यू यांची माहिती या पुस्तकात आहे. खाद्यसंस्कृतीचा संबंध केवळ पोट भरण्याशी नसून ती संबंधित देशाच्या संस्कृतीचा अनुभव देणारी असते. पाककला ही कौशल्य, सर्जनशीलता आणि कलात्मकतेची अभिव्यक्ती आहे. त्यामुळे पाककलेचे दस्तऐवजीकरणही महत्वाचे आहे.
महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेल्या कलांचे जतन करण्यासाठी स्वतंत्र पुस्तक प्रकाशित करण्याचा मानसही राज्यपालांनी व्यक्त केला. वारली कलेला केवळ संग्रहालये आणि प्रदर्शनांपुरते मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनात स्थान मिळावे, यासाठी शाळांच्या वर्गखोल्या आणि अंगणवाड्यांमध्ये वारली चित्रकला साकारण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेच्या वारली पेंटिंगने वर्गखोल्या रंगविण्याच्या उपक्रमाची माहिती देताना राज्यपाल म्हणाले की, सुमारे ३० शाळांचे मुख्याध्यापक या शाळेला भेट देणार आहेत. वारली कलेच्या माध्यमातून बालगीते आणि पौराणिक कथाही साकारता येतील. यामुळे लहान वयातच मुलांना पारंपरिक कलेची ओळख होईल.
या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आलेल्या चारही पुस्तकांचा परिचय आणि माहिती लोकभवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी दिली.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन केले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पुस्तकांच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास चिकित्सक समूहाचे सचिव गुरुनाथ पंडित, पाटकर-वर्दे महाविद्यालयाच्या हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग विभागाच्या विभागप्रमुख तथा मुख्य शिक्षण अधिकारी डॉ. माला खारकर, पाटकर महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. शेफ अमोल राऊळ, ॲटलस स्किलटेक विद्यापीठाच्या शिक्षणतज्ज्ञ व प्रमुख डॉ. इंदू शहानी, विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थ शहानी, कुलसचिव डॉ. पराग अमिन, प्रा. मानसी कक्कर, प्रा. कनुप्रिया शर्मा, शांतनू घुरियानी, चार्वी किंजर आणि काशिश शाह उपस्थित होते.
@Jishnu_Devvarma
@maha_governor
District Information Office, Parbhani retweeted
#नवीदिल्ली येथे आयोजित #पुरस्कार वितरण समारंभात राज्याला कर्जवितरणात देशात प्रथम, तर डिजिटल व्यवहारांच्या अवलंबनात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय मंत्री मनोहर लाल आणि केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
#परभणी महानगरपालिकेने १ ते १० लाख लोकसंख्या गटात, #परळी नगरपरिषदेने १ लाखांपेक्षा कमी लोकसंख्या गटात कर्जवितरणात प्रथम क्रमांक, तर #छत्रपतीसंभाजीनगर महानगरपालिकेने १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात तृतीय क्रमांक मिळविला.
पथविक्रेत्यांना संस्थात्मक कर्जसुविधा उपलब्ध करून देणे, आर्थिक समावेशन आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राला ‘पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६’ मध्ये पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
पथविक्रेत्यांना तारणमुक्त कर्ज, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन, यूपीआयशी संलग्न रुपे क्रेडिट कार्ड, सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडणी आणि कौशल्य प्रशिक्षण अशा माध्यमातून त्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी पीएम स्वनिधी योजना राबविण्यात येत आहे. योजनेची मुदत मार्च २०३० पर्यंत वाढविण्यात आली असून, राज्य शासन, नगरविकास विभाग, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि बँकांच्या समन्वित प्रयत्नांमुळे महाराष्ट्राने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
District Information Office, Parbhani retweeted
शेतकऱ्याने जमीन पडीक ठेवल्यास ती सरकारजमा होणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीला धक्का लागणार नसल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी खरेदी केल्या आहेत. मात्र, या जमिनी वर्षानुवर्षे पडीक ठेवल्या आहेत. अशा जमिनी केवळ गुंतवणूक किंवा लँडबँक म्हणून वापरल्या जाऊ नयेत, तर त्या प्रत्यक्ष लागवडीखाली आल्या पाहिजेत. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ च्या अनुषंगाने अशा पडीक शेतजमिनी शासकीय व्यवस्थापनाखाली आणण्याबाबत भाष्य केल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
#शेतकरी
@cbawankule
teapawt.org/cbawankule/status/2124…
सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीला धक्का लागणार नाही!
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून संभ्रम निर्माण केला जात आहे. राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारी व्यवस्थापनाखाली आणण्याबाबत माझे वक्तव्य नव्हते. वर्षानुवर्षे स्वतःच्या जमिनीवर शेती करणाऱ्या मूळ मालक शेतकऱ्यांनी कोणताही संभ्रम बाळगण्याचे कारण नाही. त्यांच्या शेतजमिनींना या वक्तव्याचा कोणताही संदर्भ नाही.
काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून ५० ते १०० एकर किंवा त्याहून अधिक मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी खरेदी केल्या आहेत. मात्र, या जमिनी वर्षानुवर्षे पडीक ठेवल्या आहेत. अशा जमिनी केवळ गुंतवणूक किंवा लँडबँक म्हणून वापरल्या जाऊ नयेत, तर त्या प्रत्यक्ष लागवडीखाली आल्या पाहिजेत, ही आमची स्पष्ट भूमिका आहे.
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ च्या अनुषंगाने अशा पडीक शेतजमिनी सरकारी व्यवस्थापनाखाली आणण्याबाबत मी भाष्य केले होते.
शेतजमिनींचा योग्य वापर होऊन त्या पुन्हा लागवडीखाली आल्यास कृषी उत्पादनात आणि पर्यायाने राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल. जमिनीचा वापर शेतीसाठी व्हावा, केवळ त्या खरेदी करून पडीक ठेवून लँडबँक तयार करण्यासाठी नव्हे.
@PMOIndia @CMOMaharashtra @AgriGoI @maharevenue @MahaDGIPR @IGR_Maharashtra
#Maharashtra #FarmlandDevelopment #AgriculturalGrowth #FarmersFirst #NationalIncomeGrowth #RevenueMinister #ChandrashekharBawankule
District Information Office, Parbhani retweeted
स्वदेशी शोध संस्थानच्या मुंबई चॅप्टरतर्फे विकसित करण्यात आलेल्या 'एमएसएस' ॲपचे लोकार्पण राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन येथे करण्यात आले.
माहिती हे सक्षमीकरणाचे प्रभावी साधन असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र हे आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीचे महत्त्वाचे माध्यम आहे. या क्षेत्रातील उद्योजकांना विविध शासकीय योजना, सुविधा आणि संधींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे स्वदेशी शोध संस्थानचे 'एमएसएस' ॲप उपयुक्त ठरेल. विशेषतः हे ॲप मराठी भाषेतही उपलब्ध असल्याने राज्यातील उद्योजकांना त्याचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
#एमएसएमई क्षेत्र आर्थिक विकासाबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करते. कोविडच्या काळात या क्षेत्राला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे या क्षेत्रातील उद्योजकांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना आवश्यक माहिती व सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक घडविण्यासाठी एमएसएमई क्षेत्राचा विस्तार होणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, स्वदेशी शोध संस्थानच्या मुंबई चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. आसावरी बापट, प्रमुख डॉ. आर. श्रीनिवासन अय्यंगार, ॲप विकास पथकाचे सदस्य, राजलक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नईचे प्रतिनिधी, स्वदेशी शोध संस्थानचे सदस्य तसेच विविध शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
@Jishnu_Devvarma
@maha_governor
District Information Office, Parbhani retweeted
लोकभवन मुंबई येथे मागील ७५ वर्षांत विविध देशांचे राष्ट्रप्रमुख, शासनप्रमुख आणि आंतरराष्ट्रीय मान्यवर यांनी दिलेल्या भेटींच्या दुर्मिळ छायाचित्रांचे ‘संस्थात्मक वारसा’ हे प्रदर्शन मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विकास हा सर्वसमावेशक असावा. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि विकासाच्या योजनांची फळे २०४७ पर्यंत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामांचा अनुभव सांगताना राज्यपाल म्हणाले की, ग्रामीण विकास आणि आदिवासी भागांचा विकास हा आपल्या कार्यकाळातील महत्वाचा प्राधान्यक्रम होता. ग्रामीण विकास विभागाला नोडल विभाग म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आकांक्षित ब्लॉक घोषित करणाऱ्या देशातील पहिल्या राज्यांमध्ये त्रिपुराचा समावेश होता. २०१९ मध्ये राज्यातील १२ ब्लॉक आकांक्षित ब्लॉक म्हणून घोषित करण्यात आले. विकासाच्या विविध निर्देशांकांमध्ये मागे असलेल्या आदिवासी भागांना विकासाच्या एका विशिष्ट स्तरावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. हे तत्कालीन सरकारचे महत्वपूर्ण यश असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी प्रेस क्लबच्या कार्यकारिणी सदस्यांशी संवाद साधला. प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण आणि चेअरमन एस. बालाकृष्णन यांनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे प्रेस क्लबचे कोषाध्यक्ष ओमप्रकाश तिवारी, जनरल सेक्रेटरी अनिल सिंग तसेच कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
हे छायाचित्र प्रदर्शन २३ नोव्हेंबरपासून एक आठवडा सर्वांसाठी खुले राहणार आहे. त्यानंतर प्रदर्शनातील छायाचित्रे महाराष्ट्र लोकभवन येथे जतन करून ठेवण्यात येणार आहेत.
@Jishnu_Devvarma
@maha_governor
@mumbaipressclub
District Information Office, Parbhani retweeted
#PMEGP योजनेअंतर्गत केवळ आधार कार्डवर १० लाख रुपयांचे व्याजमुक्त कर्ज आणि साडेतीन लाख रुपयांची कर्जमाफी मिळू शकते, असा सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
या योजनेतील कर्जावर बँका व्याज आकारतात आणि त्यासाठी आधार कार्डव्यतिरिक्त इतर कागदपत्रेही आवश्यक असतात. प्रकल्प खर्चावरील ३५% अनुदान केवळ ग्रामीण भागातील विशेष प्रवर्गातील अर्जदारांना लागू आहे. अधिकृत अर्जप्रक्रिया मोफत असून, खासगी क्रमांकावर मागितल्या जाणाऱ्या १,२५० रुपयांच्या फाइल शुल्काचा योजनेशी कोणताही संबंध नाही.
District Information Office, Parbhani retweeted
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील डहाणूजवळ #चारोटी येथे लोखंडी साहित्य पडल्याच्या व्हिडिओप्रकरणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) स्पष्टीकरण दिले आहे. संबंधित व्हिडिओ चित्रित करण्यात आला, त्यावेळी लोखंडी साहित्य बसविण्याचे काम सुरू होते. वाहनचालकांना सूचना देण्यासाठी ध्वजांसह कर्मचारी तैनात होते; मात्र चालत्या वाहनातून व्हिडिओ चित्रित केल्याने संपूर्ण सुरक्षा व्यवस्था त्यात दिसत नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले.
अच्छाड ते दहिसर महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी एनएचएआयच्या ठाणे प्रकल्प अंमलबजावणी विभागाकडे असून, जे. इन्फ्राटेक या ठेकेदार कंपनीमार्फत विविध ठिकाणी काम सुरू आहे. या घटनेची दखल घेत प्राधिकरणाने ठेकेदाराला लोखंडी साहित्य सुरक्षितपणे रचणे, सूचना फलक, बॅरिकेड्स, दिशादर्शक पट्ट्या व ब्लिंकर्स लावणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत.
बांधकाम साहित्य किंवा यंत्रसामग्रीमुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्यासही सांगण्यात आले आहे. प्राधिकरणाचे अभियंते कामाच्या ठिकाणी नियमित देखरेख ठेवून सुरक्षा नियमांच्या पालनाची तपासणी करणार आहेत, असे एनएचएआयने स्पष्ट केले.
#NHAI
















































