
Official Handle of District Information Office, #KOLHAPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra.
Kolhapur, India
Joined September 2012
- Tweets22.4K
- Following122
- Followers12.5K
- Likes1.6K
जलसंधारणासाठी महाराष्ट्राचा व्यापक कृती आराखडा.
दुष्काळमुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल.
#WaterConservation #JalyuktaShivar
#DroughtRelief
176
महात्मा जोतीराव फुले: द्विशताब्दी जयंती वर्ष
#महात्माफुले200
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
#महाराष्ट्रशासन
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
@MahaDGIPR
168
District Information Office, Kolhapur retweeted
जलसंचय : जनभागीदारी अभियानातून महाराष्ट्रात जलसंधारणाला गती
१८ हजार गावांत जलयुक्त शिवार ३.०
#जलसंधारण
#पाणीअडवापाणीजिरवा
District Information Office, Kolhapur retweeted
📍पंढरपूर
कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा.
@mieknathshinde
#कार्तिकीएकादशी #कार्तिकीवारी #कार्तिकीएकादशी२०२६ #पंढरपूर
District Information Office, Kolhapur retweeted
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी (अतिरिक्त कार्यभार) बप्पासाहेब थोरात यांनीही हुतात्मा स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विविध पदाधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
@SunetraA_Pawar
@MPLodha
@neelamgorhe
#HutatmaSmrutiDin
शेतकरी सुखी व्हायचा असेल तर महात्मा जोतीराव फुले यांची त्रिसूत्री
एकटी शेती कधीच परवडत नाही
उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव शेतीमालाला मिळाला पाहिजे.
शेती आधुनिक पद्धतीनेच केली पाहिजे. शेतीला नळाद्वारे पाणीपुरवठा केला पाहिजे.
164
District Information Office, Kolhapur retweeted
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२४ ही ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. आयोगाने या परीक्षेसाठी जाहिरात क्रमांक ०१३/२०२६ अन्वये ३० एप्रिल २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. तसेच २३ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकान्वये उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.
ही परीक्षा राज्यातील छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नवी मुंबई आणि नागपूर या जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांनी परीक्षेच्या दिनांकाची नोंद घ्यावी, असे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.
@mpsc_office
#कोल्हापूर: गुरुनानक जयंतीनिमित्त दि. २४ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने सीपीआर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद राहणार आहे. मात्र, अपघात विभाग, आंतररुग्ण विभाग (आयपीडी), सर्व वैद्यकीय सेवा व तातडीच्या शस्त्रक्रिया सेवा २४x७ सुरू राहणार आहेत.
@MahaDGIPR
354
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘तंबाखूमुक्त युवा अभियान ४.०’ राबविण्यात येत आहे. या ६० दिवसीय देशव्यापी अभियानाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात जनजागृतीपर उपक्रमांना सुरुवात झाली आहे. बाजार भोगाव (ता. पन्हाळा) येथे जनजागृती रॅली काढण्यात आली.
1
187
#कोल्हापुरातील कसबा बावडा सेवा रुग्णालयात लवकरच ‘यलो फिव्हर’ लसीकरण केंद्र सुरू होणार!
आरोग्यमंत्री @iprakashabitkar यांच्या पुढाकारातून आवश्यक प्रक्रिया पूर्ण; परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना जिल्ह्यातच मिळणार लसीकरणाची सुविधा. कोल्हापूरच्या आरोग्य सुविधांमध्ये महत्त्वाची भर.
221
एकटी शेती कधीच परवडत नाही - महात्मा जोतीराव फुले
महात्मा जोतीराव फुले यांनी 'शेतकऱ्याचा असूड' या पुस्तकात शेतीविकासाचे संकल्पचित्र रेखाटले होते.
#महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
@MahaDGIPR
2
236
#कोल्हापूर शहर आणि लगतच्या गावांमधील विविध विकासकामे व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.
@MahaDGIPR
@CollectorKolha1
2
329
District Information Office, Kolhapur retweeted
एमपीएससी परीक्षांतील कथित गैरव्यवहार प्रकरणी चौकशी
निवेदने सादर करण्यास २३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ
#स्पर्धापरीक्षा
#महाराष्ट्रलोकसेवाआयोग
#MPSC
#MPSCExam
#MahaDGIPR
जलजीवन मिशनची अपूर्ण कामे पूर्ण करून गावे टँकरमुक्त करण्यासाठी ८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर-दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
#RevenueDepartment
#MaharashtraGovernment
#JalJeevanMission
#WaterSupply
#DroughtRelief
204
District Information Office, Kolhapur retweeted
दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी अनुयायांसाठी सुविधा, सुरक्षा व वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश
सविस्तर वृत्त - mahasamvad.in/222141/
आदिवासी समाजाचा स्वातंत्र्यलढा हा केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धचा संघर्ष नव्हता, तर तो जल, जंगल, जमीन, संस्कृती, स्वाभिमान आणि पांरपरिक अधिकारांच्या संरक्षणासाठीचा लढा होता.
#आदिवासीविकास
#महाराष्ट्रशासन
#जनजातीयगौरवसप्ताह
@MahaDGIPR
1
217
जल हेच जीवन!
महात्मा जोतीराव फुले यांनी 1883 सालीच पाण्याचे महत्व ओळखून जलसंधारणाचा मूलमंत्र दिला होता.
पाणी आडवा, पाणी जिरवा - हाच खरा विकासाचा मंत्र!
#महात्माफुले200
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR
1
201



















