Rajendra Patode retweeted
१७ जून रोजी, जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदारांनी बाजू बदलून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत या ६ खासदारांना त्वरित 'भो**चे' असे संबोधले.
संजय राऊत यांनी खूप हुशारीने खेळी खेळली आणि या ६ खासदारांना 'भो**चे' म्हटले. या खासदारांना शिवीगाळ करून, संजय राऊत यांनी मतदारांकडून विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांपासून आणि जबाबदारी निश्चित होण्यापासून स्वतःची सुटका करून घेतली! छान खेळलात संजय राऊत, पण आम्ही काही मूर्ख नाहीत!
आता, आम्ही जे सांगत आहोत ते अतिशय काळजीपूर्वक वाचा. संजय राऊत हेच खरे भो**चे आहेत. महाविकास आघाडी हेच खरे भो**चे आहेत.
या उमेदवारांची निवड कोणी केली?
त्यांना तिकीट कोणी दिले?
भाजपविरुद्ध लढणारे, तसेच लोकशाही, संविधान, आरक्षण, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षणकर्ते म्हणून त्यांना जनतेसमोर कोणी सादर केले?
याचे उत्तर खुद्द शिवसेना उबाठा नेतृत्व हेच आहे.
पत्रकार परिषदेतील संजय राऊत यांचा हा स्टंट याच प्रश्नांपासून आणि मतदारांच्या उत्तरदायित्वापासून वाचण्यासाठी होता!
२०२४च्या लोकसभा निवडणुकी प्रचारादरम्यान, काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी मतदारांना विनंती केली होती की, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी, आरक्षण, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी भाजपविरुद्ध त्यांना मतदान करावे.
परंतु, जेव्हा वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत युती करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा वंचितच्या प्रतिनिधींनी आघाडीतील प्रत्येक पक्षाकडून लेखी हमी मागितली होती की, निवडणुकीनंतर त्यांचा कोणताही निवडून आलेला सदस्य भाजपमध्ये जाणार नाही. संजय राऊत यांनी याला स्पष्टपणे नकार दिला होता. "आम्ही अशी हमी देऊ शकत नाही," असे त्यांचे उत्तर होते! धोक्याचे संकेत तर सुरुवातीपासूनच दिसत होते.
त्यावेळी, राजकीय हमी आणि किमान समान कार्यक्रमाशिवाय युती करण्यास नकार दिल्यामुळे, पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी 'वंचित'ला आक्रमकपणे भाजपची 'बी-टीम' ठरवले होते.
या पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांना एक प्रश्न विचारलाच पाहिजे. जर उबाठाचे ६ खासदार भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटात सामील झाले असतील, तर प्रत्यक्षात भाजपला बळ कोणी दिले?
भाजपविरोधी मतदारांची दिशाभूल कोणी केली?
भाजपची खरी 'बी-टीम' कोण आहे?
मविआने मतदारांना पटवून दिले होते की, हे उमेदवार भाजपशी लढतील. पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी मतदारांची खात्री पटवली होती की हे उमेदवार घटनात्मक मूल्यांचे रक्षण करतील.
संजय राऊत खासदारांना हवे तसे शिव्या देऊ शकतात. पण ज्यांना स्वतः निवडले, पुढे आणले, ज्यांच्यासाठी प्रचार केला आणि ज्यांना मतदारांवर लादले, त्या लोकांवर टीका करून किंवा शिव्या देऊन संजय राऊत जबाबदारीतून सुटू शकत नाहीत.
जर एखादा पूल कोसळला, तर अभियंता विटांना दोष देऊन जबाबदारीतून सुटू शकत नाही.
'वंचित'ने पक्षांतराबाबत व्यक्त केलेल्या चिंतांना कोणी फेटाळून लावले?
हे ६ उमेदवार का निवडले गेले?
भाजपशी लढण्यासाठी, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी तसेच आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी त्यांना मते देण्याचे आवाहन मतदारांना कोणी केले? याचे उत्तर आहे महाविकास आघाडी!
मग, खरा भो**चे कोण?
मतदारांनी तुमच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला आणि महाविकास आघाडीला डोळे झाकून मते दिली. त्यांना खोटे बोलल्याबद्दल आणि त्यांची फसवणूक केल्याबद्दल खरे भो**चे कोण?
उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर लाईन मारत आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या दिवशी, काँग्रेसने अशा खासदाराच्या मुलाला पाठिंबा दिला जो भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेत सामील झाला होता. भाजपला फायदा करून देण्यासाठी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी अनेक ठिकाणी आपले विधान परिषद उमेदवार मागे घेतले. भाजपकडून १०-१५ कोटी रुपये घेतल्यावर, भाजपविरुद्धच्या प्रचारादरम्यान अमरावतीमधील काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवाराने सोयीस्करपणे स्वतःला आयसीयूमध्ये दाखल करून घेतले.
भाजपची खरी 'बी-टीम' कोण आहे?
ज्या पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी मतदारांना सांगितले की, 'वंचित' ही भाजपची 'बी-टीम' आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी व भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी व शिवसेना उबाठा यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे, त्यांना काय म्हणावे?
मतदारांची फसवणूक केल्याबद्दल खरे भो**चे कोण?
'वंचित'ला भाजपची 'बी-टीम' म्हणणारे महाविकास आघाडी आणि पाकीट पत्रकार व तथाकथित विचारवंत हेच खरे भो**चे आहेत. कारण, त्यांनी फुले-शाहू-आंबेडकरवादी मतदारांची दिशाभूल केली आणि त्यांना फसवले.
Rajendra Patode retweeted
आंबेडकरी चळवळीचं डॉक्युमेंट्शन होणे ही काळाची गरज आहे - प्रा. अंजलीताई आंबेडकर
उद्योगपतींसाठी शेतकऱ्याच्या जमिनी लुटण्याची सरकारची कुटिल मंशा
राजेंद्र पातोडे.
तीन वर्षे जमीन पडीक राहिली तर सरकार ती ताब्यात घेऊ शकते, असे वक्तव्य करून बावनकुळे यांनी सरकारचा शेतकरीविरोधी चेहरा उघड केला आहे.उद्योगपतींसाठी शेतकऱ्याच्या जमिनी लुटण्याची सरकारची कुटिल मंशा आहे.
दुष्काळाने होरपळलेला शेतकरी, पाण्याअभावी उजाड झालेली शेती, बेभाव विकावे लागणारे पशुधन, डोक्यावर कर्जाचा डोंगर, हाताला काम नाही आणि पिकवण्यासाठी साधनसामग्री नाही.शेतमालाला हमी भाव मिळत नाही.जगण्याचा प्रश्न राज्यातील शेतकऱ्या पुढे उभा आहे, अशा भयावह परिस्थितीत शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी त्याच्या जमिनीवरच सरकारची वक्रदृष्टी पडली आहे.बावनकुळे ह्यांचे विधान इंग्रजी राजवटीला लाजवणारे संतापजनक आहे.
शेतकऱ्याची जमीन पडीक राहते ती त्याच्या इच्छेने नाही, तर सरकारच्या अपयशी धोरणांमुळे, सिंचनाच्या अभावामुळे, निसर्गाच्या संकटामुळे आणि आर्थिक विवंचनेमुळे. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी उद्योग धंद्यांना दिली जाते तशी सवलत शेतीला मिळत नाही.पाणी, वीज, कर्जमुक्ती आणि योग्य हमीभाव देण्यात सरकार अपयशी ठरते आणि नंतर त्याच शेतकऱ्याच्या जमिनीवर ताबा मिळवण्याची भाषा करते.शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला घालण्याची मानसिकता आणि भाषा बंद करा अन्यथा हा शेतकरी तुमची माजोर्डी सत्ता उलथवून राहिल्या शिवाय राहणार नाही.असा इशारा देखील राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.
अदानी अंबानींसारख्या बड्या उद्योगपती आणि सुप्रिया सुळे यांच्या जावयाना द्यायला सरकारी जमीन कमी पडल्या की काय जे आता तीन वर्षे वहीत नसलेल्या जमिनी सरकार कडे घेण्याची भाषा केली जात आहे.सामान्य शेतकऱ्याच्या मालकीच्या जमिनीवर सरकारची नजर जाते.मोठ्या भांडवलदारांसाठी जमीन आणि गरीब शेतकऱ्यासाठी जप्तीची भाषा बंद करा.शेतकऱ्याची जमीन ही त्याच्या वडिलोपार्जित संपत्ती आहे; ती सरकारच्या मर्जीनुसार हिसकावून घेण्याचा विचार सरकारने करू नये.सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेती संकटात असताना त्या संकटाची शिक्षा शेतकऱ्याला देण्याचा वक्तव्य निषेधार्ह आहे.शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी त्याच्या जमिनीवर कब्जा करण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पुढील काळात शेतकरी जागा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही.
वंचित बहुजन आघाडी या शेतकरीविरोधी मानसिकतेचा तीव्र निषेध करते. शेतकऱ्यांच्या जमिनीचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे धोरण आणि नियम आम्ही कदापि खपवून घेणार नाही.शेतकऱ्याच्या जमीन बळकावण्याची भाषा बावनकुळे आणि भाजपने करू नये.जमिनी घ्यायच्या असतील तर ज्या उद्योगपती आणि शिक्षण सम्राट, साखर सम्राट आणि राजकारण्यांनी मोठ्या प्रमाणात शासकीय जमिनी बळकावल्या आहेत त्या आधी शासन जमा करण्याची हिम्मत महसूल विभागाने दाखवली पाहिजे.
राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र प्रदेश.
#वंचितबहुजनआघाडी #शेतकरीविरोधीधोरण #शेतकरी #राजेंद्रपातोडे
संविधान सन्मान महासभा
दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
वेळ : संध्याकाळी ४ वाजता
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई
आयोजक
वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश
वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेश
वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश.
सन्माननीय संविधानवादी भारतीय नागरिकांनो,
सप्रेम जय भिम
फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय लढा सुरू आहे.हा लढा एकाच ध्येयासाठी आहे.भारतीय संविधान अबाधित राखणे.
आज देशात उघडपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची विटंबना होत आहे. संविधानाने दिलेल्या स्वायत्त संस्थांवर हल्ला सुरू आहे. मताचा अधिकारही राजरोसपणे कमकुवत केला जात आहे.हे हुकूमशाहीकडे टाकलेले पाऊल आहे.
हा देश मनुवादाने नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाने चालणार, हे पुन्हा एकदा ठासून सांगण्याची गरज आहे.म्हणूनच वंचित बहुजन आघाडी दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान महासभा आयोजित करते.
२५ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे होणाऱ्या या महासभेत आपण सहभागी व्हावे, अशी आग्रहाची विनंती.
आपली उपस्थितीच संविधानाच्या सन्मानाचे खरे प्रतीक ठरेल.
धन्यवाद.
राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
बाबासाहेबांच्या स्मारक दिरंगाई प्रकरणी नोटिसा देण्याची नौटंकी बंद करून कमिशनखोरीची उच्चस्तरीय चौकशी करा.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. मूळ कंत्राट देताना मूळ निविदेतील वाढ सुमारे २६ टक्के इतकी होती. तरीही कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प, वारंवार मुदतवाढ, कामातील दिरंगाई आणि आता कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करण्याच्या नावावर कमिशन वाढीसाठी दिलेला इशारा आहे.
स्मारक पूर्ण न होण्याला आणि खर्च वाढीसाठी आजवर कोण जबाबदार ?
नोटिसा देण्याची नौटंकी बंद करून कमिशनखोरीची उच्चस्तरीय चौकशी करा.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#InduMill #Ambedkar #Mumbai
@CMOMaharashtra
@MSJEGOI
@soacialwelfare
जलसंपदा विभागातील १६,४९२ पदांचे कंत्राटीकरण करून युवकांच्या नोकऱ्यांचा लिलाव! - राजेंद्र पातोडे
महाराष्ट्र शासनाच्या १९ नोव्हेंबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार जलसंपदा विभागातील एकूण १६,४९२ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विभागासाठी ३९,७२२ पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ३१,५४१ पदे नियमित आहेत. तर ८,१८१ नवीन पदे आणि ८,३११ संक्रमणातील पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत.
या कंत्राटी पदांना आरक्षण, नियमित वेतन आणि कायमस्वरूपी रोजगाराची हमी नाही. म्हणजेच युवकांसाठी सरकारी नोकऱ्यांऐवजी ‘कामावर ठेवा आणि काढून टाका’ अशी शोषणाची व्यवस्था निर्माण केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगावे की, नियमित पदे कमी का ठेवली? हजारो पदे आउटसोर्स का केली? गरीब, बहुजन, दलित आणि आदिवासी युवकांना कायमस्वरूपी नोकऱ्यांपासून वंचित का ठेवले?
वंचित बहुजन आघाडी या कंत्राटीकरणाच्या निर्णयाचा तीव्र निषेध करते.
युवकांच्या भविष्याचा लिलाव करणारा हा निर्णय रद्द करण्यासाठी युवक-युवतींनी आंदोलनाची तयारी करावी. वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील!
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAforIndia
प्रति, वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातील सर्व प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर, ग्रामीण व शाखास्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथप्रमुख.
विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण SIR प्रक्रियेअंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व अपात्र मतदारांची पडताळणी तसेच मतदार यादीचे पुनरीक्षण करण्यात येत आहे. मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिये बाबत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गणनेच्या अर्जाचे वाटप व संकलन १८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६, दावे व हरकतींची विल्हेवाट १५ डिसेंबर २०२६ पर्यंत, मतदार यादीचे अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेदरम्यान वंचित, उपेक्षित, शोषित, बहुजन, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक व इतर दुर्बल घटकांतील पात्र मतदारांची नावे कोणत्याही कारणास्तव मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत, याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
मतदानाचा अधिकार हा लोकशाहीने प्रत्येक पात्र नागरिकाला दिलेला मूलभूत लोकशाही अधिकार आहे.
प्रशासकीय त्रुटी, माहितीचा अभाव किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे एकाही पात्र नागरिकाला मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करावे.
आपल्या गावात, वॉर्डात, परिसरात व बुथनिहाय वंचित समूहातील मतदारांची विशेष पडताळणी करावी. प्रत्येक पात्र मतदाराला गणनेचा अर्ज प्राप्त झाला आहे की नाही, याची खात्री करावी.
गणनेचा अर्ज योग्य प्रकारे भरून विहित मुदतीत जमा होईल, यासाठी मतदारांना मदत करावी.
कोणत्याही पात्र मतदाराचे नाव अनुपस्थित, स्थलांतरित किंवा अन्य चुकीच्या कारणाने वगळले जाणार नाही, यावर लक्ष ठेवावे.
मतदार यादीत नाव नसल्याचे आढळल्यास किंवा नाव वगळण्याची नोटीस मिळाल्यास संबंधित मतदाराला दावे व हरकती दाखल करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करावे. विशेषतः गरीब, अशिक्षित, वृद्ध, दिव्यांग, महिला, भटके विमुक्त व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांना या प्रक्रियेची माहिती द्यावी.
प्रत्येक बुथवरील कामाचा आढावा घेऊन पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहतील, यासाठी निवडणूक यंत्रणेकडे आवश्यक पाठपुरावा करावा.
वंचित समाजाच्या लोकशाहीतील सहभागाशी आणि मतदानाच्या अधिकाराच्या संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.
एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये ह्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातील सर्व प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर, ग्रामीण व शाखास्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथप्रमुख यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून ही जबाबदारी प्राधान्याने पार पाडावी.
मतदार यादीत नाव असेल तरच मतदानाचा आणि निवडणूक लढण्याचा अधिकार कायम राहील. त्यासाठी बीएलए १ आणि बीएलए २ आणि पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांनी नियोजन करावे. केलेल्या कामाचा अहवाल पक्षा कडे सादर करण्यात यावा.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
: सोमनाथ साळुंके
महासचिव, वंचित बहुजन आघाडी
#VBAforIndia
न्यायालय राज्यातील मतचोरी रोखू शकले असते, मात्र न्यायालये गंभीर नाहीत...
thehindu.com/news/national/m…
Rajendra Patode retweeted
📍 नाशिक
जय भीम Gen - Z
फुले-शाहू-आंबेडकरवादी Gen Z चा उत्स्फूर्त प्रतिसाद!.
#JaiBhimGenZ #VBAxGenZ #MH15 #VBA
जलसंपदा विभागात १६,४९२ पदांचे कंत्राट, युवकांच्या नौकरीचा लिलाव.
महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभागाने जारी केलेल्या शासन निर्णय क्रमांक : आढावा-२०२१/प्र.क्र.१६/आ.पुनर्रचना दि. १९ नोव्हेंबर २०२६ नुसार जलसंपदा विभागात १६,४९२ पदांचे कंत्राट करून युवकांच्या नौकरी लिलाव सरकारने केला आहे.२००३ नंतर प्रथमच आकृतीबंध बदलला तो कंत्राटीकरणाच्या दिशेने
🔹 एकूण मंजूर आकृतीबंध : ३९,७२२ पदे आहेत.
🔹 नियमित (कायमस्वरूपी) पदे : ३१,५४१ असून
🔹 बाह्ययंत्रणेद्वारे (आउटसोर्स) नवीन पदे : ८,१८१ आणि ८,३११ अशी एकूण १६,४९२ पदे खाजगी एजन्सी कंपनी मार्फत कंत्राटी स्वरूपात भरण्याचा निर्णय घेतला आहे.
ही कायमस्वरूपी सरकारी नोकरी नाही.
ही 'कामावर ठेवा आणि काढून टाका' अशी शोषणाची व्यवस्था आहे.
@Dev_Fadnavis @mieknathshinde
ह्यांनी उत्तर दिले पाहिजे नियमित पदे का कमी ठेवली? मृत संवर्गातील हजारो पदे आउटसोर्स का केली? गरीब, बहुजन, दलित, आदिवासी युवकांना कायमस्वरूपी नोकरी का नाही?
वंचित बहुजन आघाडी या शासन निर्णयाचा आणि कंत्राटीकरणाचा निषेध करते.१६,४९२ पदांचे कंत्राटीकरण म्हणजे युवकांच्या भविष्याचा लिलाव आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश
#आउटसोर्सिंगनको
#कायमस्वरूपीनोकरीहवी
#जलसंपदापदेविकली
#शासननिर्णयविरोध
#वंचितबहुजनआघाडी
चलो मुंबई
संविधान सम्मान महासभा!
२५ नोव्हेंबर २०२६ रोजी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात संविधान बचावाचा नारा देत शिवाजी पार्क, मुंबई येथे महाराष्ट्रातील संविधानवादी जनता एकत्र येणार आहे.
मनुवादी व्यवस्थेला लगाम लावण्याचे काम संविधानवाद्यांना करायचे आहे. सर्वांनी देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी संविधान सन्मान महासभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#संविधान_सम्मान_महासभा #VBAforIndia
Rajendra Patode retweeted
2.5 लाख अग्निवीर जे रिटायर होतात, त्यांना आता फक्त दोन वर्षाचं जे गाजर दाखवलेलं आहे. ती पॉलिसी कदाचित चेंज होईल रेगुलर आर्मीमध्ये त्यांना घेतलं जाईल.
- ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#AgniveerScheme
#PrakashAmbedkar
#VanchitBahujanAghadi
#IndianArmy
#AgniveerRetirement
Rajendra Patode retweeted
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट हे भाजपची 'ए टीम' आणि 'बी टीम' आहेत.
शरद पवार कधीही मोदी आणि अमित शहाने सांगितलेला एकही प्रश्न धुडकवू शकत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. भाजपच्या इशाऱ्यावर ते नाचतात.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
Rajendra Patode retweeted
मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या परिसरातील सुमारे १०० झोपडीधारकांना पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती. पंधरा दिवसांच्या आत त्यांच्या घरावर कारवाई करण्यात येणार असल्याचे या नोटिशीत नमूद करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, कुर्ला ते ट्रॉम्बे विभागातील रेल्वे मार्गालगत राहणाऱ्या झोपडीधारकांचा प्रश्न सुटल्यामुळे नागरिकांनी आज राजगृह येथे भेट घेतली.
या भेटीदरम्यान सर्व नागरिकांना आश्वस्त केले की, एकाही नागरिकाचे घर निष्कासित होऊ दिले जाणार नाही. ५ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या संयुक्त बैठकीत रेल्वे मार्गालगत राहणाऱ्या झोपडीधारकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती, तसेच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशीही या संदर्भात चर्चा केली होती.
या चर्चेतील मुद्द्यांचा आधार घेत प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरातील झोपडीधारकांवर कोणत्याही प्रकारची तोडक कारवाई होऊ दिली जाणार नाही. तसेच पश्चिम रेल्वे प्रशासनाने बजावलेल्या नोटिशीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नागरिकांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
#Mumbai
धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील विलास काशिनाथ भोसले यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट!
जातीय द्वेषातून खोटा आरोप व बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल केल्याने तरुणाने जीवन संपवले. मृत्यूपूर्व व्हिडिओ व ठोस पुरावे असूनही भूम पोलिसांनी अद्याप #SCSTAtrocityAct ची कलमे लावलेली नाहीत व आरोपींना अटकही केलेली नाही.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायदा कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष @RajendraPatode यांनी @DGPMaharashtra यांच्याकडे केली आहे.
@Prksh_Ambedkar @VBAforIndia @DharashivPolice @CMOMaharashtra @NCSC_GoI @NHRCIndia
#JusticeForVilasBhosale #Dharashiv #Bhoom #Section4AtrocityAct #MaharashtraPolice #VanchitBahujanAghadi #StopCasteAtrocities
अत्यंत महत्त्वाचे...
आंदोलन बाबत अत्यंत महत्त्वाचे निर्णय विविध उच्च न्यायालयाने दिला आहे.
शांततापूर्ण निदर्शने दडपण्यासाठी फौजदारी खटले दाखल करणे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील खराब रस्त्याविरोधात शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या निष्कर्ष निमगडे यांच्यावर रस्ता अडवल्याचा आरोप ठेवून एफआयआर नोंदवण्यात आली होती.उच्च न्यायालयाने तो एफआयआर आणि आरोपपत्र रद्द करताना सांगितले.संविधानातील अनुच्छेद १९(१)(ब) शांततेने निदर्शने करण्याचा अधिकार देते.जोपर्यंत हिंसाचार किंवा मालमत्तेचे नुकसान होत नाही, तोपर्यंत विरोध दडपण्यासाठी खटले दाखल करू नयेत.
ही अत्यंत महत्त्वाची टिप्पणी आहे.पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते याची नोंद जपून ठेवावी.
शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार पोलिस हिरावून घेऊ शकत नाहीत. आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा दबावही स्वीकारता येणार नाही.
खालील महत्त्वाचे न्यायिक निर्णय आंदोलन संदर्भात महत्वाचे आहे.त्यामध्ये हिम्मत लाल के. शाह वि. पोलीस आयुक्त, अहमदाबाद १९७३ सार्वजनिक रस्त्यांवर शांततापूर्ण सभा घेण्याचा अधिकार मूलभूत आहे. राज्य नियमन करू शकते, पण पूर्ण बंदी घालू शकत नाही.अनियंत्रित परवानगीची व्यवस्था असंवैधानिक ठरवली.
कामेश्वर प्रसाद वि. बिहार राज्य १९६२ शांततापूर्ण निदर्शने संरक्षित आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनाही शांततापूर्ण निदर्शनाचा अधिकार आहे स्ट्राइकचा अधिकार मात्र मूलभूत नाही.
अमित साहनी वि. पोलीस आयुक्त शाहीन बाग प्रकरण, २०२० निदर्शनाचा अधिकार सार्वजनिक जागा अनिश्चित काळासाठी व्यापून ठेवण्यापर्यंत विस्तारित होत नाही.सार्वजनिक सोयी आणि इतरांच्या अधिकारांचाही विचार करावा लागतो.इतर अनेक निर्णयांमध्ये न्यायालयाने सांगितले आहे की हिंसक निदर्शने, रस्ता अडवून दीर्घकाळ कब्जा करणे किंवा सार्वजनिक व्यवस्थेला धोका निर्माण करणे या अधिकाराच्या कक्षेबाहेर आहे.
शांततापूर्ण निदर्शने, मोर्चे, सभा यांना संरक्षण आहे.
पोलिसांना रस्ता अडवणे, ट्रॅफिक नियंत्रित करणे, वेळ ठिकाण पद्धत याबाबत युक्तियुक्त निर्बंध घालण्याचा अधिकार आहे.
परंतु हिंसाचार नसताना केवळ विरोध दडपण्यासाठी FIR दाखल करणे किंवा खटले चालवणे हे लोकशाहीसाठी हानिकारक आहे.असेच मुंबई उच्च न्यायालयाने चंद्रपूर प्रकरणात निष्कर्ष निमगडे सांगितले आहे.स्ट्राइक, बंदी किंवा हिंसक कृत्ये या अधिकारात येत नाहीत.
लोकशाहीतील महत्त्व
अनुच्छेद १९(१)(ब) नागरिकांना सरकार आणि प्रशासना विरुद्ध शांततेने आवाज उठवण्याची संवैधानिक हमी देतो.
हे सर्व मुद्दे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या करीता महत्वाचे आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी,
महाराष्ट्र प्रदेश.
#शांततापूर्णआंदोलन #संविधानिकअधिकार #मुंबईउच्चन्यायालय #वंचितबहुजनआघाडी
छटपूजेच्या विरोधावरून भाषिक द्वेष पसरवणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई होणार का? भाजपने खुलासा करावा : ॲड. प्रकाश आंबेडकर
मुंबई : मुंबईमध्ये छटपूजेला यापूर्वीही शिवसेनेकडून विरोध करण्यात आला होता. ‘छटपूजा मुंबईत का?’ असा त्या विरोधाचा सूर होता. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही छटपूजेला विरोध केला आहे. मात्र, आता या विरोधाची व्याप्ती वाढली असून हा विरोध भाषेच्या आधारावर केला जात आहे. भाषा हीसुद्धा एक प्रकारची सब नॅशनॅलिटी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भावनिक मुद्द्यांच्या आधारे भाषेचा प्रश्न उपस्थित केला जात असून त्यातून भाषिक द्वेषाची भावना निर्माण केली जात आहे.
भाषेच्या आधारावर जगभरात अनेक राज्ये आणि देशांचे विभाजन झाले आहे. त्यामुळे भाषेच्या नावाखाली द्वेषाची ठिणगी पाडणाऱ्यांना मी देशविरोधी मानतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) कारवाई होणार आहे की नाही, याचा खुलासा भाजपने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
भाजपने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर कारवाई केली तरच सरकार खरोखर कारवाई करत आहे, असे मी मानेन. मात्र, भाजपने कारवाई केली नाही, तर स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी या दोन्ही नेत्यांचा वापर केला जात आहे, असे स्पष्ट होईल, असे आंबेडकर म्हणाले.
यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी मांडलेल्या कॉर्पोरेटच्या वर्चस्वाच्या मुद्द्याचाही संदर्भ दिला. देशात ज्या पद्धतीने कॉर्पोरेट व्यवस्था उभी केली जात आहे, त्यातून देशाचे विघटन होण्याची शक्यता असून उद्याचे राज्य हे लोकशाही व्यवस्थेऐवजी कॉर्पोरेटच्या नियंत्रणाखालील राज्य असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजप उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर कारवाई करत नसेल, तर कॉर्पोरेटचे वर्चस्व निर्माण करण्याच्या मोठ्या राजकीय योजनेचा हा एक भाग आहे, असे मला वाटते. राज्याच्या जागी कॉर्पोरेटचे जग उभे करण्याचा भाजपचा डाव पुढे नेण्यासाठी या दोन्ही नेत्यांचा वापर केला जात आहे, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सावध राहावे, असा इशाराही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
पत्रकार परिषद
पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर संबोधित करणार आहेत.
दिनांक 🗓 : 15 नोव्हेंबर 2026
वेळ ⏰ : दुपारी 3 वाजता.
स्थळ 📍 : राजगृह, दादर (पूर्व), मुंबई.
#VBAForIndia

























