
Official Twitter Account of District Information Office, Directorate General of Information & Public Relations, Government Of Maharashtra, #Beed
Beed
Joined June 2016
- Tweets18.9K
- Following16
- Followers10.3K
- Likes3.3K
District Information Office, Beed retweeted
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणास गती दिली. त्यांच्या या कार्याला अभिवादन करण्यासाठी २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त ‘महावॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर’ हे अभियान आयोजित केले आहे. याअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माती आणि पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून ती आपल्या पुढील पिढीचे भविष्य आहे. त्यासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
@SunetraA_Pawar
Mahawalkathon Walk for Water 2026'
#महावॉकेथॉन२०२६ #जलसंधारण #राज्यस्तरीयअभियान #पाणीवाचवा #पाणीअडवापाणीजिरवा #मृदवजलसंधारण #महाराष्ट्रशासन #MahaGovt #SaveWater #SaveSoil #SecureTomorrow
District Information Office, Beed retweeted
माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर उद्याचे भविष्य समृद्ध होईल!
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आयोजित ‘महा-वॉकेथॉन -वॉक फॉर वॉटर’ मध्ये सहभागी व्हा. तसेच ‘रिल चॅलेंज’ स्पर्धेत सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा, मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हा, जाहिरातीतील क्यूआर कोड स्कॅन करा आणि नावनोंदणी करा. पाणी अडवूया, पाणी जिरवूया आणि जलसमृद्ध, हरित व समृद्ध महाराष्ट्र घडवूया - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
@mieknathshinde
'Mahawalkathon Walk for Water 2026'
#महावॉकेथॉन२०२६
#जलसंधारण
#राज्यस्तरीयअभियान
#पाणीवाचवा
#पाणीअडवापाणीजिरवा
#मृदवजलसंधारण
#महाराष्ट्रशासन
#MahaGovt
#SaveWater #SaveSoil
#SecureTomorrow
District Information Office, Beed retweeted
#माती आणि #जलसंधारण चा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये
‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राज्यव्यापी उपक्रमात सहभागी होण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी अभिनेते संजय दत्त यांना निमंत्रित केले असून, त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.
जलसंधारणाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचावा आणि हा उपक्रम लोकचळवळीचे स्वरूप धारण करावा, या उद्देशाने लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी, कलाकार, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांना ‘महा वॉकेथॉन’मध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे.
‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, #जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश घेऊन होणाऱ्या या उपक्रमातून जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे.
@SanjayDRathods
@duttsanjay
#जलसंधारणदिन
#वॉकेथॉन२०२६
#वॉकफॉरवॉटर
#MahaWalkathon
#WalkForWater
District Information Office, Beed retweeted
अवयव प्रत्यारोपणातून ७९८ रुग्णांना नवसंजीवनी. 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी'तून १५ कोटी ७९ लाख ६६ हजार रुपयांची आर्थिक मदत
#CMRF
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR
District Information Office, Beed retweeted
आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
२१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा. जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत युवा पिढीने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक जलसंधारण मोहिमेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेला अधिकृत क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा. “चला, एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मूलमंत्राला जगवूया,” असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
#जलसंधारणदिन
#वॉकेथॉन२०२६
#वॉकफॉरवॉटर
#रिलस्पर्धा
#महाराष्ट्रशासन
#MahaWalkathon
#WalkForWater
#SaveSoilSaveWater
#MahaDGIPR
District Information Office, Beed retweeted
८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला.
@SunetraA_Pawar
#IndependenceDay2026 #SunetraPawar #Beed #Maharashtra
District Information Office, Beed retweeted
🇮🇳 भारताचा ८० वा #स्वातंत्र्यदिन समारंभ शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी साजरा करण्यात येणार असून त्यानुषंगाने खालीलप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल :
➡️ राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येईल.
➡️ पुणे येथे मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.
➡️ राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी परिपत्रकात नमूद मान्यवरांच्या हस्ते #ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
#स्वातंत्र्यदिन२०२६
#IndependenceDay
#IndependenceDay2026
#घरोघरीतिरंगा
#हरघरतिरंगा
District Information Office, Beed retweeted
जागतिक अवयवदान दिवस
अवयवदान हेच सर्वोच्च जीवनदान
#जागतिकअवयवदानदिन #अवयवदान #नवजीवन #महाराष्ट्रशासन
#InternationalOrganDonationDay #OrganDonor #SaveLives #MahaDGIPR
District Information Office, Beed retweeted
📍मुंबई
#टीबीमुक्तमहाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी शासन आणि उद्योगांनी हातात हात घालून मिशन मोडवर काम करणे आवश्यक आहे. उद्योगांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या (#सीएसआर) माध्यमातून या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
#टीबीमुक्तभारत -कॉर्पोरेट सहभाग शिखर परिषद २०२६ अंतर्गत धोरणात्मक कॉर्पोरेट भागीदारीद्वारे #क्षयरोगनिर्मूलन कार्यक्रमात ‘टीबीमुक्त भारत-कॉर्पोरेट सहभाग शिखर परिषदे’चे आयोजन करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर उपस्थित होत्या.
शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्र एकत्र आल्यास राज्यातील सार्वजनिक आरोग्याचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करता येईल. त्यासाठी सीएसआर हा महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. या अभियानात समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. पोलिओ, कोरोना आणि एड्सविरोधातील मोहिमांचा अनुभव पाहता मिशन मोडवर काम केल्यास आरोग्यविषयक अभियान यशस्वी होऊ शकते. त्याच धर्तीवर #टीबी विरोधात लक्ष्यित तपासणी करून आवश्यक उपाययोजनांवर भर दिल्यास महाराष्ट्राच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण काम करता येईल. या कामाला अपेक्षित गती देण्यासाठी सर्व संबंधित कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असेही मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.
@abitkar_prakash
District Information Office, Beed retweeted
येत्या २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात 'जलसंधारण दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, जलसंधारणविषयक योगदानाचे स्मरण करत राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुंबईतील राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमासह सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकाच वेळी ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ चेही आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते या स्पर्धेच्या लोगोचे नुकतेच अनावरण करण्यात आले. या दोन्ही उपक्रमांमध्ये राज्यातील युवक-युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.
महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्राला दूरदृष्टी आणि व्यापक दिशा देणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यावर्षीच्या जलसंधारण दिनाचा मुख्य संदेश ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ असा आहे.
दि. १५ ऑगस्टपासून राज्यात ‘जलसंधारण सप्ताह’ सुरू होणार असून, २१ ऑगस्टपर्यंत शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मृद व जलसंधारण, पाणी बचत, भूजल पुनर्भरण, पावसाच्या पाण्याचे संकलन तसेच नदी-ओढ्यांच्या स्वच्छतेसंदर्भात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ स्पर्धेविषयक अधिक माहिती व सविस्तर वृत्त वाचा : mahasamvad.in/210554/
#महावॉकेथॉन२०२६
District Information Office, Beed retweeted
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या जुलै २०२६ या अंकाचे #प्रकाशन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव तथा अतिथी संपादक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते झाले.
या अंकात ‘आपलं मंत्रालय’च्या नव्या अंकामध्ये ‘बाल मुलाखतकाराने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत’, ‘७६वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’, ‘दादा माणूस’, ‘येवा कोकण आपलोच असा’, ‘पाऊस – काही प्राचीन कल्पना’, ‘स्मार्ट शेती’, ‘विद्यार्थी विज्ञान वारी’ तसेच ‘शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्वागताचा उत्सव : शाळा प्रवेशोत्सव’ या विषयांवरील लेख आहेत.
विविध क्षेत्रांतील घडामोडी, नव्या तंत्रज्ञानाची ओळख, शिक्षण, संस्कृती, ग्रामीण जीवन, विज्ञान तसेच शासनाच्या उपक्रमांची माहिती या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अंकातून करण्यात आला आहे.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (माहिती व जनसंपर्क) अजय भोसले, उपसंचालक तथा वरिष्ठ सहायक संचालक (प्रकाशने) जगदीश मोरे, वरिष्ठ सहायक संचालक ब्रिजकिशोर झंवर उपस्थित होते.
#आपलंमंत्रालय जुलै २०२६ ही #गृहपत्रिका वाचण्यासाठी-
mahasamvad.in/210584/
District Information Office, Beed retweeted
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नवीन मतदारांना फॉर्म क्र.०६ भरून मतदार नोंदणी करण्याची संधी
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (#SIR) कार्यक्रमांतर्गत सन २०२४ नंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांना प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर फॉर्म क्र.०६ भरून मतदार नोंदणी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्थलांतर अथवा नावात बदल असलेल्या मतदारांना फॉर्म क्र. ०८ मध्ये सन २००२ च्या पुराव्यानुसार आवश्यक माहिती विहीत कालावधीत भरून देता येईल. – अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
@CEO_Maharashtra
#SIRMaharashtra
#SIR2026
#ElectoralRoll
#BLO
#ECI
District Information Office, Beed retweeted
बारामती येथे भारतीय हवाई दलाचे विमान कोसळल्याचा दावा खोटा आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी बारामती एअरफिल्डवर Academy of Carver Aviation चे Cessna C172 हे प्रशिक्षण विमान रनवेवरून घसरले. त्याचा भारतीय हवाई दलाशी काहीही संबंध नाही. अशा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये.
#बारामती
#Baramati
#BaramatiAirstrip
District Information Office, Beed retweeted
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (#SIR) कार्यक्रमात गणना प्रपत्र भरताना आपले नाव व्यवस्थित नोंदवावे. पुराव्यादाखल दिल्या जाणाऱ्या सर्व शासकीय कागदपत्रांवर एकसारखे नाव असल्याची खात्री करावी. त्यामध्ये चूक होऊ नये याची काळजी घ्यावी. तसेच, मतदारयादीत दोन ठिकाणी नाव असेल, तर ज्या ठिकाणी वास्तव्य असेल, त्याठिकाणी गणना प्रपत्र भरुन बीएलओकडे द्यावे आणि दुसऱ्या ठिकाणी नाव वगळण्यास सांगावे, असे आवाहन अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे.
@CEO_Maharashtra
#SIRMaharashtra
#SIR2026
#ElectoralRoll
#BLO
#ECI
District Information Office, Beed retweeted
महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्डधारकांना १५ ऑगस्टनिमित्त ९ हजार रुपये मिळणार असल्याचा दावा खोटा आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
महाराष्ट्र शासनाने अशा कोणत्याही योजनेची घोषणा केलेली नाही. अशा आशयाचा कोणताही शासन निर्णय (#GR) किंवा अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.
District Information Office, Beed retweeted
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण व पुनर्रचना १७ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण करण्यात येईल.
मतदार यादीचा प्रारूप मसुदा २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी आणि निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडेल.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे भारत निवडणूक आयोगामार्फत कळविण्यात आले आहे
District Information Office, Beed retweeted
आज बीड दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या, अडचणी आणि विविध प्रश्न जाणून घेतले. प्रत्येकाच्या अपेक्षा आणि भावना समजून घेत संबंधित प्रश्नांवर सकारात्मक, प्रभावी आणि वेळेत तोडगा काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास व्यक्त केला.
📍 बीड
District Information Office, Beed retweeted
बीड जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विभागांच्या आढावा बैठका पार पडल्या. यामध्ये नगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्प, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, मानव विकास निर्देशांक, क्रीडा विकास तसेच ऑलिम्पिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या आयोजनासंदर्भातील विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
नगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्प हा बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, मराठवाडा मुक्ती दिन (१७ सप्टेंबर २०२६) पर्यंत प्रकल्पाचा पुढील टप्पा पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या. राज्य शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच स्थानिक अडथळे दूर करून कामांना गती देण्याचे निर्देशही देण्यात आले.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास या क्षेत्रांवर विशेष भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. डीपीडीसीच्या निधीचा पारदर्शक, परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण वापर करून शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. विविध विकासकामांचा आढावा घेत निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी दिवंगत अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चित केलेल्या विकासाभिमुख दृष्टिकोनातून काम करण्याचे आवाहन करण्यात आले. लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासनाच्या माध्यमातून विकासकामांना अधिक गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
यानंतर जिल्हा क्रीडा संकुल समिती तसेच ऑलिम्पिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजन समितीची बैठक पार पडली. बैठकीत जिल्ह्यातील क्रीडा पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा क्रीडा संकुलासाठी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, या विकासकामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच जिल्ह्यातील व्यायामशाळांना डीपीडीसीमधून सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करणे तसेच संबंधित प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ऑलिम्पिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्याच्या प्रतिष्ठेला साजेशा, शिस्तबद्ध आणि दर्जेदार पद्धतीने व्हावे, यासाठी खेळाडूंच्या निवास, भोजन, वैद्यकीय सुविधा, वाहतूक, सराव तसेच इतर आवश्यक व्यवस्थांचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून स्पर्धेचे यशस्वी आयोजन सुनिश्चित करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
📍 बीड
District Information Office, Beed retweeted
बीड दौऱ्यानिमित्त आगमन झाल्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांनी सदिच्छा भेट घेत स्वागत केले.
📍 शासकीय विश्रामगृह, बीड
District Information Office, Beed retweeted
📍जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर - बीड - परळी वैद्यनाथ रेल्वे मार्गावरील भूसंपादन सह जिल्हा परिषद कामांचा आढावा, बीड जिल्हा क्रीडा संकुल, स्व. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेचे आयोजन, बीड नगर परिषदेतील प्रलंबित विषय आदी विषयांवर सविस्तर आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी परळी वैद्यनाथ शहर बायपासवरील रेल्वे पुलाचे काम तातडीने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याबाबत सूचना केली. भूसंपादनातील अडचणी दूर करण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
लहान बालकांमध्ये सध्या मेंदू विकारांचे प्रमाण वाढत असल्याने जिल्हा परिषद अंतर्गत बीड येथे किमान एक एकर शासकीय जागेत ऑटीझम सेंटर व थेरपी पार्क करण्याची मागणी केली असता त्यास उद्या होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्याचा शब्द आदरणीय वहिनींनी दिला आहे.
यावेळी आदरणीय सुनेत्रा वहिनींनी सविस्तर मार्गदर्शन करत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतले जातील, असे आश्वस्त केले.
@SunetraA_Pawar
#Beed
#DMUpdates





























