मराठी (@MarathiRT) header
मराठी (@MarathiRT) profile picture

मराठी भाषेचा प्रसार. आपल्या सर्वांचा आवाज. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..

Maharashtra, India
Joined January 2013
Photo by मराठी (@MarathiRT)Photo by मराठी (@MarathiRT)Photo by मराठी (@MarathiRT)Photo by मराठी (@MarathiRT)Photo by मराठी (@MarathiRT)Photo by मराठी (@MarathiRT)Photo by मराठी (@MarathiRT)Photo by मराठी (@MarathiRT)Photo by मराठी (@MarathiRT)Photo by मराठी (@MarathiRT)
“जात्यावरची ओवी” ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. हा एपिसोड सर्व मराठी माणसांनी नक्की बघावा. #sandeeppathak #maharashtra youtu.be/b7Ua6oHu7WI?si=-KSQ… Link 🔗 👆
2
2
217
भेदभावाचे रुजलेले संस्कार पुसल्याशिवाय स्त्रीवाद आचरणात येणार नाही : डॉ. छाया महाजन स्त्रीच्या निर्णयाचा आणि नकाराचा सन्मान झाला पाहिजे : डॉ. नीलम गोऱ्हे स्त्रियांना मनातले प्रामाणिकपणे मांडण्यासाठी अवकाश द्या : मंगला गोडबोले स्त्रियांनी लेखणीच्या आधाराने व्यक्त होणे अपरिहार्य : मल्लिका अमरशेख साहित्य परिषद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ९९ नांदी संमेलने : योगेश सोमण पुणे, दि. २४ ऑक्टोबर : स्त्री-पुरुष भेदभावाच्या पिढ्यान्‌पिढ्या रुजविलेल्या धारणा जाणीवपूर्वक पुसून टाकण्याची, म्हणजेच ‘अनलर्न’ करण्याची प्रक्रिया वेगाने घडली पाहिजे. स्त्रीवाद प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही मानसिकतेत मूलभूत बदल आवश्यक आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका तथा संमेलनाध्यक्षा डॉ. छाया महाजन यांनी केले. स्त्रियांच्या अनुभवांना आणि अभिव्यक्तीला मोकळा अवकाश देण्यासोबतच त्यांच्या निर्णयाचा आणि नकाराचा सन्मान करणारा समाज घडविण्याची गरज स्वागताध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ९९ नांदी संमेलनांपैकी १४ व्या ‘स्त्रीवादी साहित्य संमेलनाच्या’ उद्घाटन सत्रात त्या बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त सहभागातून शनिवारी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्वेनगर येथील के. बी. जोशी सभागृहात हे संमेलन आयोजित करण्यात आले. उद्घाटन सत्रात ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, लेखिका-कवयित्री मल्लिका अमरशेख आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी विचार मांडले. डॉ. छाया महाजन म्हणाल्या की, स्त्रीचे देवी म्हणून उदात्तीकरण केले जाते; मात्र तिच्या दैनंदिन आयुष्यात तिला व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा, निर्णयप्रक्रियेत सहभाग आणि समान स्थान कितपत मिळते, याचा विचार व्हायला हवा. संरक्षणाच्या नावाखाली तिचे अधिकार मर्यादित करता कामा नयेत. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी आजही अंतर, असुरक्षितता आणि सामाजिक बंधनांचा सामना करावा लागतो. त्यावरील उत्तर मुलींना घरात बसविणे हे असू शकत नाही. स्त्रीचे चारित्र्य केवळ लैंगिकतेच्या निकषावर ठरविणाऱ्या धारणांवर त्यांनी टीका केली. लैंगिक अत्याचाराला सामोरे गेलेल्या स्त्रीला दोष देणारी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणारी मानसिकता बदलली पाहिजे. पुढील पिढ्यांना समानतेचे जीवन मिळण्यासाठी घरातील जबाबदाऱ्यांतही पुरुषांचा प्रत्यक्ष सहभाग वाढला पाहिजे. समानतेची शिकवण देण्यासोबतच मनात रुजलेले भेदभावाचे संस्कार पुसण्याची प्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्याच्या व्यासपीठांवर स्त्रियांबरोबरच समाजाने बाजूला ठेवलेल्या विविध घटकांच्या अभिव्यक्तीलाही स्थान देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. स्वागतपर मनोगतात शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्त्रीवादाची व्यापक भूमिका मांडली. स्त्री-पुरुष समानता ही सूडाची संकल्पना नसून प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा आणि स्वतःचे विचार व्यक्त करण्याचा अधिकार मिळवून देणारी भूमिका आहे. शिक्षण, क्रीडा आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांत स्त्रिया पुढे जात असतानाही छळ, दुजाभाव आणि त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती कायम आहे. स्त्रीचा नकार हा नकारच असतो, हे समाजाने स्वीकारले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. कार्यकर्त्या घडविण्यासाठी वाचन, अभ्यास आणि प्रशिक्षण आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी स्त्री आधार केंद्राच्या कामातील अनुभव मांडले. दुष्काळग्रस्त भागातील महिलांच्या वेदनांशी साहित्याने नाते जोडले पाहिजे. दुःखाची, प्रेमाची आणि संवेदनांची भाषा एकच असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आवाज बसलेला असतानाही त्यांनी प्रयत्नपूर्वक उपस्थितांशी संवाद साधला. विविध राज्यांतील महिला लेखिकांच्या साहित्याशी संवाद वाढविण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मंगला गोडबोले यांनी स्वतःची ओळख ‘लेखणीवादी’ अशी करून देत स्त्रियांच्या बदलत्या अनुभवविश्वाचा आणि लेखनाचा आढावा घेतला. शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वतःच्या आयुष्याविषयी निर्णय घेण्याच्या संधींमुळे स्त्रियांचे अनुभवविश्व विस्तारले आहे. मात्र कौटुंबिक अपयशाची जबाबदारी स्त्रीवरच टाकणे, तिच्या प्रयत्नांचे क्षुल्लकीकरण करणे आणि सार्वजनिक जीवनात तिला सूक्ष्मपणे अपमानित करणे या प्रवृत्ती कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. @MahaDGIPR @samant_uday @Shivsenaofc @ANI @ians_india @SakalMediaNews @mataonline @LoksattaLive @MarathiRT @MarathiBrain @PTI_News @shriyogeshwar .~१
1
5
6
402
अन्यायाला प्रश्न विचारण्यासाठी, उपेक्षितांचे जगणे मांडण्यासाठी आम्ही लिहितो! स्त्रीवादी साहित्य संमेलनातील विशेष परिसंवादात सात लेखिकांनी उलगडला ‘मी का लिहिते?’चा प्रवास बातमी स्त्रियांचे लेखन समाजाच्या जाणिवा बदलणारी कृती ठरावे : डॉ. नीलम गोऱ्हे पुणे, दि. २४ ऑक्टोबर : अन्याय सहन होत नाही म्हणून, ग्रामीण स्त्रियांच्या जगण्याला आवाज देण्यासाठी, स्त्रीवादाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी, स्वतःशी संवाद साधण्यासाठी आणि मूक प्राण्यांच्या वेदना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही लिहितो, अशा विविध लेखनप्रेरणा स्त्रीवादी साहित्य संमेलनातील ‘मी का लिहिते?’ या विशेष परिसंवादातून समोर आल्या. वैयक्तिक अस्वस्थतेतून सुरू झालेले लेखन सामाजिक वास्तवाचे दस्तऐवजीकरण आणि परिवर्तनाची कृती कसे बनते, याचे अनुभव लेखिकांनी मांडले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर येथे झालेल्या या सत्रात डॉ. गीताली वि. मं., डॉ. अदिती काळमेघ, शिल्पा कांबळे, अमृता खंडेराव,डॉ.प्रतिभा जाधव, डॉ. विनया जंगले आणि हीना कौसर खान सहभागी झाल्या होत्या. लेखिका व माध्यम अभ्यासक मुक्ता चैतन्य यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डॉ. नीलम गोर्हे ग्रामीण, श्रमकरी, बहुजन आणि विविध सामाजिक पार्श्वभूमीतील स्त्रिया लिहितात, तेव्हा साहित्यामध्ये आजवर पुरेसे स्थान न मिळालेल्या अनुभवांना आवाज मिळतो. अन्यायाला प्रश्न विचारणे, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे आणि इतरांच्या वेदना समजून घेणे या लेखनप्रेरणा समाजाची संवेदनशीलता वाढविणाऱ्या आहेत. स्त्रियांना निर्भयपणे व्यक्त होता येईल, असे वातावरण निर्माण केले पाहिजे. नवोदित लेखिकांना लेखनाबरोबरच प्रकाशन आणि वाचकांपर्यंत पोहोचण्याच्या संधीही मिळाव्यात. स्त्रियांचे लेखन समाजाच्या जाणिवा बदलणारी आणि समतेच्या दिशेने कृती घडविणारी शक्ती ठरावे, अशी त्यांची भूमिका आहे. स्त्रीवाद म्हणजे माणुसकी आणि समतेचा विचार : डॉ. गीताली वि. मं. स्त्रीवाद हा पुरुषविरोधी विचार नसून लोकशाही, सहिष्णुता, विविधता, अहिंसा आणि माणुसकी हा त्याचा गाभा आहे, असे डॉ. गीताली वि. मं. यांनी स्पष्ट केले. स्त्री, पुरुष आणि विविध लैंगिक ओळखी असलेल्या व्यक्तींनी व्यवस्थेने घडविलेले विषमतेचे साचे ओलांडून माणूसपणाकडे वाटचाल करावी, हा स्त्रीवादी विचाराचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रियांनी अन्यायाला प्रश्न विचारले की स्त्रीवादी कार्यकर्त्यांवर कुटुंब मोडण्याचे आरोप केले जातात.मात्र, अन्यायाला विरोध करणे म्हणजे कुटुंबाला विरोध करणे नव्हे, असे त्यांनी नमूद केले. स्त्रीवादाविषयीचा गैरसमज दूर व्हावेत, त्याचा खरा अर्थ लोकांपर्यंत पोहोचावा आणि स्वतःशी स्वच्छंद संवाद साधता यावा म्हणून लेखन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रियांनी राजकारणात अधिक संख्येने सहभागी होऊन समतेचा विचार पुढे नेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनाबरोबर आत्मभानही आवश्यक :डॉ.अदिती काळमेख ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करताना भेटलेल्या स्त्रियांचे संघर्ष आपल्या लेखनाची प्रेरणा ठरल्याचे डॉ.अदिती काळमेघ यांनी सांगितले.अत्यंत कठीण परिस्थितीतही ग्रामीण स्त्री खंबीरपणे उभी राहते,नकारात्मक अनुभव पचविते आणि उद्याच्या आशेवर जगते. तिची ही ताकद खूप काही शिकवून जाते, असे त्या म्हणाल्या. शहरी स्त्रीकडे शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन असले तरी तेवढ्यानेच तिचे आत्मभान आणि स्वाभिमान जागृत होतो असे नाही.समाजाच्या नजरेतून स्वतःची ओळख शोधणे आणि सौंदर्यभानालाच आत्मभान समजणे या गोष्टी अस्वस्थ करतात, असे त्यांनी नमूद केले. अनुभव, निरीक्षण आणि चिंतन यांच्या संयोगातून आपल्या कविता, कथा आणि लेख आकाराला येतात. चुकीचे घडताना त्यावर बोलणे हे नागरिक म्हणूनही आपले कर्तव्य आहे,अशी भूमिका त्यांनी मांडली. अन्याय सहन होत नाही म्हणून लिहिते : शिल्पा कांबळे “अन्याय सहन होत नाही म्हणून मी लिहिते,” असे स्पष्ट उत्तर शिल्पा कांबळे यांनी दिले. वाचत असलेल्या साहित्यात आपल्या अनुभवांशी आणि बहुजन स्त्रियांच्या जगण्याशी पुरेशी ओळख पटत नव्हती.हे वास्तव मांडण्याच्या गरजेतून ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी लिहिल्याचे त्यांनी सांगितले. लेखन हे विचार मांडण्याबरोबरच स्वतःला सावरण्याचे आणि जगण्याची ताकद मिळविण्याचे माध्यमही ठरले. काही व्यक्तिरेखांनीच आपल्याला कठीण काळात आधार दिला,असे त्या म्हणाल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकेच्या लेखनातून त्यांचे विचार मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचविता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.आपली गोष्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून पुस्तकांबरोबर दूरचित्रवाणी, नाटक व चित्रपट यांसारख्या माध्यमांकडे वळल्याचेही त्यांनी मत व्यक्त केले . (मी कां लिहीते. परिसंवाद बातमी भाग -२ contd)
4
4
13
557
मराठी retweeted
भीमाशंकरच्या पायथ्याशी आतापर्यंत ३०० झाडांची कत्तल झाली आणि आणखी ५,००० झाडे तोडण्याची तयारी सुरू आहे💔 निसर्गाचा हा विध्वंस पाहून तरी सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे विकासाच्या नावाखाली सह्याद्रीचा गळा घोटणार असाल, तर हा विकास नाही, विनाश आहे! #SaveBhimashankar #SaveSahyadri
34
304
18
1,010
17,522
शासनाचे डोकं ठिकाणावर आहे का? #भीमाशंकर #जंगलवाचवा
30
231
2
708
5,034
माझा मित्र कार्टूनिस्ट आलोक @caricatured यावर्षी एक भन्नाट, क्रिएटिव्ह आणि पुर्ण नवा प्रयोग घेऊन आलाय. पुलं देशपांडे यांच्या खुमासदार विनोदांचं कॅलेंडर. आपल्याकडे मराठीत असे ‘धाडसी’ प्रयोग व्हायला हवेत. आपणही सर्वांनी अशा प्रयोगांना साथ द्यायला हवी. #मराठी #दिनदर्शिका १/३
2
55
6
189
12,059
ई-मुद्रा! काल पासून बातम्यांमध्ये हे नाव ऐकून हा तांत्रिक गोंधळ नीट उमगला नाही, त्यांच्यासाठी ही सोपी माहिती. आपण संगणकावर कुठलीही वेबसाइट उघडली तर डाव्या बाजूला कोपऱ्यात एक कुलूपाचे चित्र दिसते, ते हिरवे असेल तर समजते की हे संकेतस्थळ सुरक्षित आहे. हे फोनच्या ब्राऊजरमध्येही बघता येते. एखाद्या बँकेचे संकेतस्थळ उघडून बघा. हे हिरवे कुलूप म्हणजे त्या वेबसाईटचे सर्टिफिकेट. एखाद्या वेबसाईटचे कम्युनिकेशन सुरक्षित आहे हे ते सर्टिफिकेट दर्शवते. हे सर्टिफिकेट (याला SSL/TLS Certificate म्हणतात) म्हणजे त्या त्या वेबसाईटचे ओळखपत्र म्हणता येईल. प्रत्येक संकेतस्थळाला हे ओळखपत्र प्रदान करायचा अधिकार असलेल्या जगमान्य संस्थांना 'सर्टिफिकेट ऑथॉरिटी' म्हणतात, आणि ई-मुद्रा ही अशीच एक संस्था. ती हे ओळखपत्र (सर्टिफिकेट) वितरित करते. हे सर्टिफिकेट वितरित करताना ई-मुद्रा सारख्या संस्थांना एक 'प्रायव्हेट की' (Private key) आवश्यक असते. ही की वापरुन ते वेबसाईटचे सर्टिफिकेट तयार करतात. ही 'की (Key)' गुप्तपणे तयार केली जाते आणि कधीही उघड केली जात नाही. जसे एखाद्या अधिकृत कागदपत्रांवर शिक्का मारला जातो, तो शिक्का पाहून समजते की एखाद्या अधिकृत व्यक्तीने हा कागद तयार केला आहे, त्यावर विश्वास ठेवता येऊ शकतो. तसे ही 'प्रायव्हेट की' काम करते. ही प्रायव्हेट की जोपर्यंत गुप्त आणि मजबूत आहे तोपर्यंतच तिने तयार केलेल्या 'सर्टिफिकेट' वर विश्वास ठेवता येतो. आपण पासवर्ड जसा 'स्ट्रॉंग' हवा म्हणतो तशी ही प्रायव्हेट की 'स्ट्रॉंग' असायला हवी तरच ती उघड होणार नाही. ही की एक प्रोग्राम वापरुन कुणालाही ओळखता येणार नाही अशी ऑटोमॅटिक तयार केलेली असते. आता नेमकं बिघडलं काय? एप्रिल २०२५ मध्ये ई-मुद्राने काही सर्टिफिकेट तयार केले होते. पण ते तयार करणाऱ्या स्क्रिप्टमध्ये चूक झाली आणि ही प्रायव्हेट की अत्यंत कमकुवत तयार झाली. ती की कुणालाही सहज ओळखता येईल अशी. त्यामुळे ही प्रायव्हेट की वापरुन कुणीही खोटे सर्टिफिकेट तयार करू शकेल. हे बनावट सर्टिफिकेट वापरुन तो कुठलीही वेबसाईट सुरक्षित आणि खरी आहे असे दर्शवणे सहज शक्य होते. म्हणजे एखाद्या बँकेच्या नावाने बनवलेल्या खोट्या वेबसाईटवरही ते कुलूप हिरवे दिसले असते आणि त्यातून फसवणूक करता आली असती. पण इथे थोडा दिलासाही आहे. जगातील बहुतांश ब्राऊजरने ह्या प्रायव्हेट की ने तयार केलेली सर्टिफिकेट आधीच ब्लॉक केली आहेत. त्यामुळे आता हे सर्टिफिकेट वापरणाऱ्या वेबसाईट सामान्य ब्राऊजर मध्ये उघडणारच नाहीत. उघडल्या तरी त्यांवर सूचना लिहून येईल. मग धोका उरला कुठे? ब्राउझरच्या बाहेर. आपल्या फोनमधली अनेक ॲप्स, जुनी उपकरणं, कंपन्यांची अंतर्गत सॉफ्टवेअर्स ही सार्वजनिक ब्राऊजर वापरत नाहीत, त्यांची अंतर्गत सर्टिफिकेट वापरण्याची सोय केलेली असते. म्हणूनच गो, पायथन, रस्ट, इलेक्ट्रॉन अशा प्रोग्रॅमिंग जगतातल्या मंडळींनी तातडीने अपडेट्स काढले आहेत. ज्यांच्या संकेतस्थळाचं प्रमाणपत्र ई-मुद्राच्या या रूटवर आधारित आहे, त्यांना ते लगेच बदलावं लागणार आहे, नाहीतर त्यांचं संकेतस्थळ ब्राउझरमध्ये उघडणारच नाही. आपण सामान्य माणसांनी काय करायचं? फार काही नाही. फोन, ब्राउझर आणि ॲप्सचे अपडेट्स 'नंतर करू' म्हणून पुढे ढकलू नका. सार्वजनिक वायफायवर बँकेचे व्यवहार शक्यतो टाळा. आणि एखाद्या वेबसाइटवर ब्राउझरने "हे कनेक्शन सुरक्षित नाही" असा इशारा दिला, तर तो दुर्लक्षित करून पुढे जाऊ नका. तो इशाराच तुम्हाला वाचवत असतो. या प्रकरणातून एकच शिकायला मिळते. सायबर सुरक्षेचे गडकिल्ले मोठमोठ्या भिंतींवर उभे केलेले असतात, पण सुरक्षेचे हे गड कोसळतात ते एका छोट्याशा चुकीमुळे. कुलूप कितीही भक्कम असो, चावीच कमकुवत असेल तर आपलं घर सुरक्षित नसते.
3
34
2
161
11,108
‘पिक्चर ऑफ डोरियन ग्रे’च्या प्रस्तावनेतलं एक वाक्य सर्व कलाकारांनी आपल्या आरशावर कोरून ठेवण्यासारखं आहे - “To reveal art and conceal the artist, that is art’s aim.” कला दिसायला हवी आणि कलाकार अदृश्य राहायला हवा, हे कलेचं (कलाकृतीचंही) उद्दिष्ट आहे.
आपल्या लेखनाने जगभरात खळबळ निर्माण करणारे ख्यातनाम लेखक ऑस्कर वाईल्ड यांचा आज स्मृतिदिन. दि पिक्चर ऑफ डोरियन ग्रे, दि इम्पोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या.
2
1
14
664
मराठी retweeted
भारतीय रेल्वेच्या अधिकृत रेलवन अँपमध्ये मराठीला स्थान नाही. त्यात मुंबई ऐवजी बंबई म्हणजे ही तर मुजोरीच म्हणणे योग्य ठरेल. @RailMinIndia @ekikaranmarathi @MarathiRT
4
5
167
मराठी retweeted
या नक्की सगळ्यांनी #मराठी #बदलापूर – at Badlapur, India
2
3
103
मार्केटिंग डोकं वापरत नाही की अजेंसी मंद आहे मराठी कलाकार, मराठी दैनिक, मराठी वाचकांचे मराठी शहर पुणे काय कर्मदरिद्री पणा सकाळ मध्ये हिंदी जाहिरात पहिल्याच पानावर? वर्तमानपत्रही पैसे मिळतात म्हणून मराठीलाच डावलतात @VikramTea @VikramTeas @RahulGadpale @khareviews @SakalMediaNews – at Pune, India
5
22
2
60
2,764
१२/१०/२०२६ पनवेल : मागील महिन्यात उरण मध्ये अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतियांकडून स्थानिकांना मारहाण झाल्याच्या दोन घटना घडल्या त्या अनुषंगाने पनवेल शहरातील बस स्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली, पदपाथावर व सार्वजनिक मोकळ्या जागांवर अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींमुळे निर्माण होणारे सुरक्षा, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न याबाबत पाहणी करून आवश्यक कारवाई करण्याबाबत मराठी एकीकरण समिती मार्फत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाळा कुंभार यांची भेट घेऊन कारवाईसाठी निवेदन देऊन विनंती करण्यात आली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पालिकेला याबाबत पत्र पाठवले असून लवकरच पालिका आणि पोलीस संयुक्त कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली. सदर भेटीसाठी पनवेल शहर उपाध्यक्ष श्री. विनायक पाटील, पनवेल शहर संघटक प्रशांत काशिद, अजित महापदी, अजय रेवाळे, निलेश शेटकर आणि इतर सदस्य उपस्थित होते. -योगेश कमल प्रभाकर मोहन मराठी एकीकरण समिती -महाराष्ट्र राज्य #नवीमुंबई #मराठीएकीकरणसमिती
30
96
1,334
मराठी retweeted
खूप वर्षांच्या अथक प्रयत्नातून आज २००५ साली 'माहितीचा अधिकार' सामान्य माणसाच्या हातात आला. भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि सरकारी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी #RightToInformation हा कायदा लागू करण्यात आला.
1
27
904
मराठी retweeted
#WATCH | Mumbai, Maharashtra: On the first day of Shardiya Navratri, devotees offer prayers at Shri Mumba Devi temple.
41
766
9
15,974
173,895
महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्याचा प्रश्न असेल, तर मराठी एकीकरण समिती विद्यार्थ्यांच्या सोबत आहे. - गोवर्धन देशमुख #मराठीएकीकरणसमिती #mpsc #protest #pune #एमपीएससी
1
20
98
882
खानदेशी गाणं म्हणजे मनोरंजनाचं खणखणीत नाणं #sandeeppathak #folk #maharashtra #dhule Episode Link 🔗 👇 youtu.be/O265OZx3jQo?si=hApU…
2
5
246
MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनास मराठी एकीकरण समितीचा जाहीर पाठिंबा. @RRPSpeaks पुणे इथे सुरू असलेल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग MPSC @mpsc_office विद्यार्थ्यांच्या संघर्षाशी एकजूट व्यक्त करण्यासाठी दिनांक ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ९ वा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख व पदाधिकारी मुंबईहून प्रत्यक्ष आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला, पाठींबा निवेदन सादर केले. हा पाठिंबा केवळ निवेदनापुरता मर्यादित नसून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांसाठी लोकशाही आणि संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या संघर्षात मराठी एकीकरण समिती विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष मैदानात उभी राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आंदोलनाची सांगता करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी आमची मागणी आहे. @Dev_Fadnavis @maha_governor महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्याचा प्रश्न असेल, तर मराठी एकीकरण समिती सदैव विद्यार्थ्यांच्या सोबत आहे. #मराठीएकीकरणसमिती #mpsc #student #pune #protest #महाराष्ट्र #विध्यार्थी #महाराष्ट्रलोकसेवाआयोग #भीमनवारराजीनामाद्या
3
42
172
1,400
MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनास मराठी एकीकरण समितीचा जाहीर पाठिंबा. पुणे इथे सुरू असलेल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग MPSC विद्यार्थ्यांच्या संघर्षाशी एकजूट व्यक्त करण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.
24
104
634