चिवचिव 🚩 (@chivachiv) header
चिवचिव 🚩 (@chivachiv) profile picture

रोज पन्नास मराठी ट्विटला मुक्तहस्ताने पुन:ट्विट. चला मराठी वाढवूयात... #मराठी #महाराष्ट्र

Maharashtra, India
Joined May 2017
Photo by चिवचिव 🚩 (@chivachiv)Photo by चिवचिव 🚩 (@chivachiv)Photo by चिवचिव 🚩 (@chivachiv)Photo by चिवचिव 🚩 (@chivachiv)Photo by चिवचिव 🚩 (@chivachiv)Photo by चिवचिव 🚩 (@chivachiv)Photo by चिवचिव 🚩 (@chivachiv)Photo by चिवचिव 🚩 (@chivachiv)Photo by चिवचिव 🚩 (@chivachiv)Photo by चिवचिव 🚩 (@chivachiv)
अमराठी पाहू / ऐकू / बोलू नका 😊🙏 #म
3
1
3
692
दोन अल्पवयीन मुलींच्या गैरवर्तन प्रकरणात अखेर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून स्पष्टीकरण प्रसिद्ध! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील त्रिमूर्ती परिसरात दोन अल्पवयीन मुलींशी अनुचित वर्तन झाल्याच्या तक्रारीची उद्यान प्रशासनाने दखल घेतली आहे. २६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या प्रकरणातील तक्रारीत उल्लेख असलेल्या दोन्ही व्यक्ती छत्रपती संभाजीनगर वन विभागात वनरक्षक पदावर कार्यरत असून, त्या रजेवर मुंबईत आल्या होत्या. संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर निर्भया पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांचा तपास सुरू असून, उद्यान प्रशासन तपासात सहकार्य करीत आहे. तसेच, उद्यानातील सुरक्षा व्यवस्था आणि गस्त अधिक प्रभावी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. The Sanjay Gandhi National Park administration has responded to a complaint of inappropriate behaviour involving two minor girls at the Trimurti area of the park. The incident took place on November 26. According to the administration, both persons named in the complaint are forest guards working with the Chhatrapati Sambhajinagar Forest Division and were in Mumbai on approved leave. A police case has been registered against the concerned employee at Kasturba Marg Police Station. The Nirbhaya Squad also reached the spot following the incident. Police investigation is underway, and the park administration is cooperating with the investigation. Instructions have also been issued to strengthen security and regular patrolling in the park. As per press note of SGNP @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @NaikSpeaks @MahaForest
3
7
186
🚨 Exclusive Breaking | संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन वनरक्षकांविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा; दोघांना अटक मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन अल्पवयीन मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास नॅशनल पार्क ट्रेनजवळील तलाव परिसरात फिरत असताना दोन वनरक्षकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या इच्छेविरुद्ध शरीराला स्पर्श केला. या प्रकरणी वनरक्षक उमेश ज्ञानदेव मार्कंडे आणि प्रभू पांडुरंग चोरमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. CR No. 804/26 नुसार BNS कलम 74, 78, 3(5) तसेच POCSO कायद्याच्या कलम 8 आणि 12 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. A disturbing incident has been reported from Sanjay Gandhi National Park in Mumbai. According to a complaint filed by two minor girls, on November 26, 2026, at around 1:30 PM, they were walking near the lake close to the National Park train when two forest guards allegedly followed them and touched them against their will. An FIR has been registered against forest guards Umesh Dnyandev Markande and Prabhu Pandurang Chormare. The case has been registered under BNS Sections 74, 78 and 3(5), along with Sections 8 and 12 of the POCSO Act (CR No. 804/26). Both accused have been arrested. #Mumbai #SanjayGandhiNationalPark #BreakingNews #POCSO PC– Reliable Source
4
36
91
12,125
चिवचिव 🚩 retweeted
अतिक्रमणे दूर करण्याचे फायदे अनेक. @PMCPune यांनी हीच मोहीम कायम ठेवावी. #पुणे #महापालिका #अतिक्रमण #Pune #PMC @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @navalMH @aparanjape @kuldeepjadhavMT
3
16
2
57
2,287
आम्ही काही दिवसांपासून जीव मुठीत घेऊन कोर्टात येतोय - कोर्टात येताना भीती वाटते. पुण्यात गुन्हेगारांना कुणाचीच भीती राहिलेली नाही - गुन्हेगारी टॉप लेव्हलला गेलीय. गोळीबारात वकीलही जखमी होऊ शकत होता. धन्यवाद मुख्यमंत्री फडणवीस 🙏
25
214
1
986
35,129
चिवचिव 🚩 retweeted
#Constitution या इंग्रजी शब्दासाठी मराठीत '#राज्यघटना' हा शब्द अतिशय सुस्पष्ट, समर्पक आणि सर्वमान्य आहे—कारण त्यातून देशाची शासनपद्धती, संस्था आणि नागरिकांचे हक्क-कर्तव्य यांचा थेट अर्थबोध होतो. भारतीय राज्यघटना दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा! #राज्यघटना_दिन #ConstitutionDay
1
35
तू स्वप्न, किती सुंदर ते रूप, पाहत राहावेसे वाटे तुला आयुष्यभर ती लावण्याची लेणी, सौंदर्याची उधळण, ती रुपाची खाण जणू स्वर्गाची अप्सरा आली भूवर, माझे मनापासून प्रेम आहे तुझ्यावर, हवी आहे तुझी जन्मोजन्मीची सोबत #म
2
2
34
परिसीमन विधेयकावरची अंजलीताई आंबेडकर यांची ही भूमिका अत्यंत योग्य आहे.गेले काही महिने मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आम्ही समाजाच्या विविध घटकापर्यंत परिसीमनाने होणारं नुकसान पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. अंजलीताईंनी गायपट्टा हा शब्द वापरला याबद्दल त्यांचे आभार. कॉंग्रेस परिसीमनाच्या नक्की विरोधी आहे.पण सद्य परिस्थितीत कॉंग्रेस आणि वंचित या मुद्यावर सोबत येऊन लढण्याची शक्यता कमी दिसते. चोरसेना आणि वहिनींची राष्ट्रवादी यांना श्वास सुद्धा बिल्लाच्या परवानगीशिवाय घेता येण्याची शक्यता नाही. पवारसाहेबांच्या पक्षाचं शेंबडात अडकलेल्या माशीसारखं झालं आहे. दोन्ही सेनांना परिसीमनाचा फटका बसणार आहे.त्यामुळे त्यांना रस्त्यावर यावं लागेल,पण त्यांना इतरांसोबत स्टेज शेअर करायला सहसा आवडत नाही. पण परिस्थिती इतकी गंभीर आहे की एकट्याने लढण्याची चैन कुणालाच परवडणारी नाही. अशा परिस्थितीत नागरी समाजातल्या चळवळी + दोन्ही सेना, दोन्ही डावे पक्ष, शेकाप,राजू शेट्टी,महादेव जानकर यांना सोबत घेऊन एक आघाडी उभी करता येईल का? मराठीकारणाच्या चळवळीतले कार्यकर्ते म्हणून अशा प्रकारच्या संवादाचा आणि सक्रीय कृतीतला पूल होण्याचं आम्ही ठरवलं आहे. सगळ्यांचं सगळ्यांशी सर्वकाळ सर्व मुद्यांवर पटेल अशी आदर्श परिस्थिती येईपर्यंत वाट पाहत राहिलो तर रेशीमबागवाले आपल्याला गिळून टाकतील. हीच परिस्थिती महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी होती. आता तर अदानी-अंबानी-लोढा-कंबोज आणि त्यांचा कमिशन एजंट असलेला विनाशपुरूष यांच्या पाशवी नियंत्रणाखालच्या महाराष्ट्राला अखंड ठेवण्याचं आव्हान आपल्यापुढे आहे. हिवाळी अधिवेशनात परिसीमन विधेयक रंग बदलून विकायचा रंगा-बिल्लाचा प्रयत्न असेल. लढाई रस्त्यावरची आहे. एकत्र लढायची आहे. आपण सोबत येणार असाल तर ९१६७१८१६६८ या क्रमांकावर आनंद भंडारेशी किंवा ९९७५०६३७५१ वर रोहित पाटीलशी संपर्क साधा. लवकरच तपशील कळवू.
7
106
5
530
7,931
बिहारी गुन्हेगारी !! सावध रहा !! #कोल्हापूर #महाराष्ट्र
8
10
130
चिवचिव 🚩 retweeted
संविधानामुळे आज आम्ही आमचं मत निर्भीडपणे चित्रातून,कवितेतून,कलेमधून मांडू शकतो..ही ताकद तुम्ही दिली आहे…कुणी कितीही आमचा हा अधिकार संपवण्याचा प्रयत्न केला तरी..आम्ही लढत राहू!
7
82
554
नमस्कार मंडळी! 📚✨ सध्या काय वाचताय? काही तरी वाचत असालच, असलंच पाहिजे. नसेल तर ताबडतोब सुरु करा. कारण येत्या गुरुवारी, दिनांक २६.११.२०२६ रोजी पुस्तकांच्या विश्वात हरवून जाण्यासाठी आपल्या मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यालयात 'वाचनकट्टा'चे आयोजन करण्यात येत आहे. मग नेमकं काय करायचं? फार काही नाही! तुमचं आवडतं कोणतंही मराठी पुस्तक सोबत घेऊन या. दीड-दोनतास मोबाईल बाजूला ठेवून शांतपणे वाचन करू आणि 'महाराष्ट्रधर्म व मराठीकारणाची चळवळ' समजून घेऊ . दिनांक २६.११.२०२६ वेळ: संध्याकाळी ६:०० ते ८:३० स्थळ: खोली क्र. ४, पहिला मजला, श्री शिवाजी मंदिर, न. चिं. केळकर मार्ग, दादर (प), मुंबई ४०००२८ मराठी वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून स्वागत आहे. नक्की या आणि तुमच्या वाचक मित्रांनाही सोबत घेऊन या! सहभागी नोंदवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन गुगल अर्ज भरा आणि आपला सहभाग नोंदवा. 📌 महत्त्वाची सूचना : नोंदणी अर्ज भरल्याशिवाय वाचनकट्ट्यात सहभागी होता येणार नाही. प्रथम नोंदणी करणाऱ्या ३० जणांनाच सहभागी होता येईल. ३० जणांची नोंदणी पूर्ण होताच अर्जाची लिंक बंद केली जाईल, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. अर्जाची लिंक : forms.gle/KtLgaBBLbdpZNkf46 #मराठीपुस्तक #वाचन #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #पुस्तकं #Marathi #MaharashtraDharma #Marathi #MarathiAbhyasKendra
4
22
291
एक_सर ०३०८२०२४ yq ०३:४४:३० #शिवाजीम्हणतो #शिवाम्हणे #म
1
2
6
65
माझ्या हृदयाची स्वामिनी, जसे एखादे सुंदर स्वप्न, तशी काहीशी तू प्रिये सुखद स्वप्नवत वाटे जीवन, तुझ्यामुळे हे सोनेरी क्षण, जणू नवा जन्म माझ्यासाठी तुझ्यामुळे या जीवनाला कलाटणी, सुखच सुख अनुभवतो प्रत्येक क्षणी, माझे मनापासून प्रेम आहे तुझ्यावर, माझी राणी #म
1
1
19
सौरऊर्जेमुळे मुंबई महापालिकेच्या वीजबिलात ४७.७३% बचत! मुंबईतील वरळी या जी-दक्षिण विभागात वरळी स्मशानभूमी, महापालिका शाळा आणि कार्यालयीन इमारतींमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मे विरुद्ध जून २०२६ (८ इमारतींची आकडेवारी) : ⚡ वीज वापर : २३,७०१ वरून ११,३१८ युनिट्स ➡️ बचत : १२,३८३ युनिट्स 💰 वीजबिल : ₹२,३२,०४६ वरून ₹१,२१,२८८ ➡️ बचत : ₹१,१०,७५८ (४७.७३%) फोटो - @mybmc
1
1
10
306
चिवचिव 🚩 retweeted
डॉ. लिंबाळे यांचा जाहीर निषेध. अशा व्यक्तीला साहित्यिक मंडळात स्थान देणे अयोग्य आहे 🏴 @CMOMaharashtra #म
1
4
48
चिवचिव 🚩 retweeted
काल चौंडाळ ता. कागल या गावाने उस दराच्या यशस्वी आंदोलनाबद्दल माझा नागरी सत्कार केला. हा सत्कार सोहळा गावातील लोकांनी लोकवर्गणी काढून घेतला होता. या लोकवर्गणीतील सत्कारचा कार्यक्रमाचा पुर्ण होण्यासाठी झालेला खर्च वजा जाता शिल्लक राहिलेली रक्कम शेतकरी चळवळीला देणगी म्हणून
2
10
148
3,427
ब्रेकिंग - आज सकाळी गोरेगाव येथून बिबट्या जेरबंद. PC - From Relaible Source #mumbai #leopard
1
5
11
377
चिवचिव 🚩 retweeted
मराठी अभ्यास केंद्राची 'महाराष्ट्रधर्म प्रचार समिती' येत्या शुक्रवारी, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ४:४५ वा. दादर इथल्या संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट देऊन निषेद नोंदवायला जात आहे. लोकांनी यात सहभागी व्हावं. 'मी एकटा मराठीसाठी-महाराष्ट्रासाठी काय करणार...' असली कातडी-वाचवणारी रडारड न करता, आता या कामात सहभागी व्हा. #महाराष्ट्रधर्म
27
90
661
चिवचिव 🚩 retweeted
शेकडो वर्षांनी एखादं पुस्तक हातात धरलं असेल. आणि तेही सरदार वल्लभभाई पटेल यांचं. ..दृष्टिकोन स्पष्ट आहे. – at Mumbai, India
1
1
17
गोरेगावमधील समता सोसायटी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. आठवडाभरात दोनदा बिबट्या दिसल्यानंतर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज दीड वर्षांचा बिबट्याचा बछडा अडकला. गोरेगाव परिसरातून पकडलेल्या बिबट्याला सामान्यतः प्राथमिक शारीरिक तपासणीसाठी जवळच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेले जाते. मात्र, यावेळी या बछड्याला थेट मुंब्रा येथील शिळफाटा वन्यप्राणी उपचार केंद्रात हलवण्यात आले. अंतराचा विचार केला तर गोरेगावमधील समता सोसायटीपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान साधारण ९ ते ११ किमी अंतरावर आहे, तर शिळफाटा उपचार केंद्र सुमारे ३५ ते ३८ किमी दूर आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या पुनर्वसन केंद्रात आधीच २४ बिबटे असल्याने जागेची कमतरता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पालघर आणि गोरेगावमधून पकडलेल्या बिबट्यांना शिळफाट्याला हलवले जात आहे. मात्र, या बछड्याला आधी जवळच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेऊन प्राथमिक शारीरिक तपासणी केल्यानंतर पुढील उपचारांसाठी शिळफाट्याला हलवणे शक्य नव्हते का? वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या वाहतुकीतील अंतर आणि प्रवासाचा ताण यांचाही विचार होणे आवश्यक आहे. मुळात, या बिबट्याने कोणत्याही मनुष्यावर हल्ला केलेला नव्हता. तसेच तो मनुष्यवस्तीच्या आसपास कोणत्याही धोकादायक स्थितीत असल्याचेही समोर आलेले नाही. Public Pressure मुळे वन्यप्राण्याला जेरबंद करण्याचा ट्रेंड वेळीच थांबवायला हवा.
7
4
18
738